* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: THE HELEN KELLER STORY
 • Availability : Available
 • Translators : SHANTA J SHELAKE
 • ISBN : 9788177666663
 • Edition : 7
 • Publishing Year : OCTOBER 1963
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 160
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : FICTION
 • Available in Combos :SHANTA SHELKE COMBO SET - 21 BOOKS
Quantity
Buying Options:
 • Ebooks:
 • Print Books:
HELEN KELLER, THE NAME IS VERY FAMILIAR TO ALL. SHE REPRESENTS THE PERFECT IMAGE OF CONFIDENCE AND AMBITION; SHE WAS DETERMINED TO FACE THE DESTINY, HER WILL WAS NEVER DEFEATED BY DESTINY. WE ARE LUCKY THAT THE NATURE HAS BESTOWED US WITH 5 SENSES. IT IS THROUGH THIS SENSES THAT WE CONTACT EVERYBODY AND EVERYTHING. HELEN KELLER WAS NOT AMONG THOSE LUCKY ONE. SHE HAD ONLY TWO SENSE ORGANS. NATURE HAD DEPRIVED HER FROM HER ABILITY TO HEAR, TO SEE AND TO SPEAK. TOUCH WAS THE ONLY MEDIUM THROUGH WHICH SHE COULD ESTABLISH CONTACTS WITH ANYBODY. BUT APART FROM TOUCH, SHE HAD ONE MORE QUALITY. SHE WAS EXTREMELY OPTIMISTIC. SHE HAD IMMENSE DETERMINATION, AND SHE HAD AN ABILITY TO WORK EFFORTLESSLY FOR HOURS TOGETHER. WITH THE HELP OF THESE DISTINGUISHED CHARACTER SHE CONQUERED OVER ALL HER DISABILITIES, SHE GAVE A MEANING TO HER LIFE. WHILE DOING SO SHE DID REMEMBER THE OTHER MEMBERS OF HER COMMUNITY. SHE OPENED A DOOR TO KNOWLEDGE, ADVANCEMENT, PROGRESS FOR THE BLINDS, DEAFS AND DUMBS ALL OVER THE WORLD. THE STORY OF HELEN KELLER, STRIKING, THRILLING AND INSPIRING.
हेलन केलर हे आजच्या जगाला सर्वपरिचित असलेले केवळ एक व्यक्तिनाम नाही. माणसाच्या अदम्य आत्मविश्वासाचे आणि अपराजित, विजिगीषु वृत्तीचे ते एक सुंदर प्रतीक आहे. निसर्गाने दिलेल्या पंचेंद्रियांच्या साह्याने माणूस परस्परांशी, भोवतालच्या जगाशी संवाद साधतो. हेलनची तर तीन ज्ञानेंद्रिये निसर्गाने हिरावून घेतली होती. ती आंधळी होती. बहिरी होती. मुकीही होती. परस्परांशी संपर्क जोडण्याचे स्पर्श हे एकमेव साधन तिला लाभले होते. पण आशावादी मनोवृत्ती, विलक्षण जिद्द आणि अपरंपार परिश्रमशीलता यांच्या बळावर तिने या साया उणिवांवर मात केली. आपले स्वत:चे जीवन तर तिने अर्थपूर्ण केलेच; पण जगातील सर्व अंध, मूकबधिर यांनाही तिने प्रगतीच्या, विकासाच्या वाटा खुल्या करून दिल्या. त्या हेलन केलरची ही जीवनगाथा. जितकी वेधक, रोमांचकारक, तितकीच स्फूर्तिदायक...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#HELLENKELLER #SHANTASHELKE #MARATHITRANSLATION #CHAUGHIJANI #BLINDDEAFDUMB
Customer Reviews
 • Rating StarDhanesh Dangat

  अपराजिता... वैगुण्यावर मात करून जीवन अर्थपूर्ण बनवणाऱ्या व्यक्ती या स्वत:बरोबर इतरांचंही जीवन सार्थ करून जातात. जगाच्या इतिहासात जिचं नाव अमर झालं आहे, अशी हेलन केलर याच दुर्दम्य आशेचं प्रतीक होती. हेलन केलर आंधळी, बहिरी आणि मुकी होती. पण आपल्या नाील जिद्दीच्या बळावर आणि कष्टांच्या मदतीने तिने आयुष्यातल्या सर्व उणिवांवर मात केली. जगातल्या सर्वच अपंगांना तिने जगण्याची खरी वाट खुली करून दिली. तिचं चरित्र कादंबरीच्या रूपाने कॅथरिन ओवेन्स पिअर्स हिने लिहिलं. याचा अनुवाद शांता शेळके यांनी ‘आंधळी’ या नावाने केला होता. हेलन केलरच्या जीवनाच प्रेरक आलेखच ही छोटेखानी कादंबरी मांडते. दोन वर्षांची असताना आलेल्या तापामुळे हेलनच्या दृष्टीवर आणि श्रवणशक्तीवर परिणाम झाला. तिला बोलताही आलं नाही. अशा मुलीचं पालनपोषण करणं ही सोपी गोष्ट नव्हती. आसपासचे लोकही तिच्या आईला भविष्याबद्दल नाउमेद करीत. आई हाच हेलनच्या जगाशी असलेल्या संपर्काचा दुवा होता. हेलन सहा वर्षांची झाली तरी, तिला काहीच करता येत नसे. या मुलीला योग्य पद्धतीने शिकवलं तर ती चारचौघांसारखी जगू शकेल अशी आशा तिच्या आईला वाटत राहिली. कार्ल्स डिकन्सच्या एका पुस्तकात बोस्टनमधील ‘पार्किन्सन अंधशाळा’ हा संदर्भ वाचून, म्हणजे हेलनच्या आईला कुठेतरी आशेचा किरण दिसल्याप्रमाणे वाटलं. तिथल्या लॉरा खिस्तमन या अंध आणि मूक-बधिर मुलीबद्दल तिने वाचलं आणि आपल्या हेलनलाही स्पर्शाच्या भाषेची ओळख असल्याने तीही लॉराप्रमाणे शिकेल असा विचार तिच्या मनात चमकून गेला. हेलनला घेऊन केलर पतिपत्नी मग थेट वॉशिग्टनला डॉ. अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलना भेटून आले. ब्रेल लिपीचा शोध लावणारे हेच डॉ. बेल. लॉराला ज्यांनी शिकवलं त्या डॉ. गिंडले यांच्या जागी आलेल्या मायकेल अ‍ॅनॅग्नॉस यांनी हेलनसाठी अ‍ॅन रुलिव्हन या चोवीस वर्षांच्या मुलीची निवड केली. ती स्वत: एक अंध बालिका म्हणून पार्किन्स शाळेत आली होती. पुढे शस्त्रक्रियेनंतर तिला थोडंफार दिसूही लागलं होतं. हेलनला शिकवण्यासाठी म्हणून अ‍ॅन तिच्या गावी येऊन दाखल झाली व आयुष्यभराचं नातंच या दोघींमध्ये जडून गेलं. मात्र हेलनला हाताळणं सोपं नव्हतं. तरीपण अ‍ॅननं हे आव्हान स्वीकारलं आणि एका तुसड्या, रागीट बालिकेला तिने स्पर्शाच्या भाषेची गोडी लावली. तिला जगाचा चेहरा माहीत करून दिला. या पुस्तकात हेलन आणि अ‍ॅन दोघींच्या नात्याचा सुंदर वेध घेण्यात आला आहे. शब्द म्हणजे काय हे समजल्यावर हेलनला नवेनवे शब्द शिकून घेण्याचा ध्यासच लागला. मग भाषा, गणित, वेगवेगळे विषय तिला खुणावू लागले. हेलनला शिकायची ओढ लागली. एका टप्प्यानंतर तिला बोलायचा ध्यास लागला. एका मर्यादेपर्यंत त्यात ती यशस्वीही झाली. हेलन हा एक चमत्कार होता. रंगभूमीवर कार्यक्रम करून ती जगासमोर गेली. देशोदेशी फिरून तिने अंधत्वाबद्दल आणि मुकेपणा, बहिरेपणा याबद्दल समाजात जागृती करण्याचा प्रयत्न केला. ही कादंबरी हेलन केलरच्या या कष्टांबरोबरच तिच्या शिक्षिकेचा, अ‍ॅनचा तिला शिकवण्याचा ध्यासही समोर ठेवते. या दोघींमधलं नातं आणि अ‍ॅनच्या मृत्यूपर्यंत हेलनने तिला दिलेलं प्रेम हा सगळा सुंदर प्रवास ही कादंबरी चित्रित करते. हेलनने अ‍ॅनचं चरित्रही पुढे लिहिलं आणि स्वत:च्या वैगुण्यावर तिने कशी मात केली होती हे जगापुढे आणलं. हेलन केलर आणि अ‍ॅन सलिव्हन यांची ही कहाणी प्रेरक आहे आणि मानवी जीवनातील एक रोमांचकारी पर्वच उलगडून दाखवणारी आहे. ...Read more

 • Rating StarPrasaad Phatak

  `आंधळी` : फिटे अंधाराचे जाळे... ------------------------------------------------------ जन्मापासून माणूस काही ना काही ग्रहण करत असतो, आपल्या पंचेंद्रियांनी विश्वाचे तपशील प्राशून घेत असतो. प्रत्येक इंद्रिय त्याच्याकडे पोहोचवत असणाऱ्या ज्ञानबिंदूंच जुळवाजुळव करत तो आपल्या मेंदूत चित्रं रेखाटत असतो. जसजसे त्याचे अनुभव वाढत जातात तसतशी त्याच्या डोक्यातल्या विचार आणि धारणांची दिशा पक्की होत जाते. म्हणजेच, माणसाचं जे काही व्यक्तिमत्व तयार होतं ते असं अनेक गोष्टी ग्रहण करत करतच झालेलं असतं. दुर्दैवाने काही व्यक्तींना जन्मतः किंवा एखाद्या आजार/अपघातामुळे एखादं ज्ञानेंद्रिय गमवावं लागतं आणि त्यांच्या ग्रहणक्षमतेवर परिणाम होतो. त्यांचं त्यांचं भवतालाचं आकलन सर्व इंद्रियं कार्यरत असणाऱ्या माणसांच्या तुलनेत अपुरं राहतं. पण हेलन केलरसारख्या व्यक्तीकडून नियतीने एक, दोन नव्हे तर तीन ज्ञानेंद्रियं हिरावून घेतली होती असं जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा तिच्या समोर आलेल्या अडचणी या आपल्या कल्पनेच्या कित्येक योजने पुढे असतात. पण हेलन सामान्य स्त्री नव्हती. अंधार, निःशब्दता आणि सुन्नता यांच्याशी तिने एकाच वेळी दोन हात केले आणि इतिहासपुरुष आपल्या पुस्तकात ठळक नोंद करून ठेवेल असं आयुष्य जगून गेली. `आंधळी` हे पुस्तक वाचून तोंडात बोटं गेलं नाही तरच नवल… आभाळ कोसळलं हेलन लहानपणी खूप दंगेखोर होती. पण तिची बागडणारी पावले आणि चिमखडे बोल विधात्याला का बघवले नाहीत ते त्यालाच ठाऊक ! हेलन २ वर्षांची असताना पोटात आणि मेंदूत तापामुळे रक्त साकळून तिचं आयुष्यच धोक्यात आलं होतं, पण आईच्या अथक सुश्रुषेमुळे ती कशीबशी वाचली. पण मोठा आघात हा होता की तिची दृष्टी व श्रवणशक्ती मात्र नष्ट झाली होती. ऐकण्याची क्षमता नष्ट झाल्यामुळे तिच्या वाचेच्या आकलनावरही परिणाम झाला आणि ती वाचेलाही पारखी झाली. दिसतही नाही, ऐकूही येत नाही म्हटल्यावर हेलनला काहीच कळेनासं झालं. त्यामुळे हेलन सैरभर झाली, गोंधळून जाऊ लागली आणि अगदी स्वाभाविकपणे अत्यंत हट्टी बनली. हेलनसमोर आख्खं आयुष्य `आ` वासून उभं होतं. तिच्या आईवडिलांसमोर यक्षप्रश्न उभा राहिला. तिला यातून बाहेर कसं काढायचं हे त्यांना कळेना. काय करावं या विचारविनिमयातच काही काळ गेला. हेलन ६ वर्षांची असताना तिची आई चार्ल्स डिकन्सचे `काही अमेरिकन टिपणे` हे पुस्तक वाचत असताना तिला बोस्टन अंधशालेविषयी माहिती मिळाली. अंध-मूक-बधिर असूनही आपापले काम करू शकणाऱ्या लॉरा ब्रिजमनबद्दल कळलं. हेलनच्या आईवडिलांनी सर्वप्रथम टेलिफोनचे जनक अॅलेक्झांडर ग्रॅहम बेल यांची भेट घेतली. त्यांनी हेलनच्या आई-वडिलांच्या मनातली नैराश्याची जळमटे दूर केली. त्यांनी पर्किन्स अंधशाळेशी संपर्क साधला. त्यांच्याकडून अॅन सलीव्ह्न या शिक्षिकेची नेमणूक झाली. अॅनची स्वतःची दृष्टीही आधी काम करत नव्हती पण नंतर शस्त्रक्रियेमुळे तिला विशिष्ट मर्यादेपर्यंत दृष्टी प्राप्त झाली होती. अॅन : एक आधारस्तंभ अॅन जणू हेलनचे भविष्य उजळून टाकायलाच या जगात आली होती. तिने अत्यंत कुशलपणे हेलनला समजवायला सुरुवात केली. सुरुवातीला तिचा तिरस्कार करणारी हेलन तिच्या मायेत गुंतत गेली. खूप लहानपणी हेलनच्या प्रमुख संवेदनांचे दरवाजे बंद झाले असल्याने शब्द म्हणजे काय, स्वर म्हणजे काय याबद्दलच्या तिच्या संकल्पनाच विकसित झाल्या नव्हत्या. निरनिराळ्या संवेदना आणि संकल्पना यांचं आकलन करून देण्यासाठी अॅनने अनोख्या क्लृप्त्या वापरायला सुरुवात केली. बागेतल्या पंपातून धो धो पडणाऱ्या पाण्यात हेलनचा हात धरला आणि मग तिच्या तळहातावर खूण केली. पाणी आणि तळहातावर केली जाणारी विशिष्ट खूण याचा यांचं काहीतरी नातं हेलनच्या असल्याचं लक्षात आलं. `शब्द म्हणजे काय` याची अनुभूती हेलनला कशी झाली हे दर्शवणारा हा प्रसंग मुळातूनच वाचण्यासारखा आहे. अॅनमुळे हेलनचे मातीच्या गोळ्यासारखे आकारहीन आयुष्य सुबक आकार धारण करू लागलं आणि जात्याच कुशाग्र असलेली हेलन पाहता पाहता एका ज्ञानकुंभात परिवर्तित झाली. हेलन अविश्वसनीय गतीने शिकत गेली. तळहातावरच्या खुणा, ब्रेल लिपी यांच्या सहाय्याने ती कल्पनेच्या भराऱ्या घेऊ लागली. संपूर्णपणे अज्ञात असणाऱ्या रंगांविषयी तिने स्वतःचे संकेत बांधले आणि चक्क वरुणराजाची सुंदर कथा लिहिली ! शिकता शिकता तिने फ्रेंच आणि जर्मन भाषाही अवगत केल्या. अंध-बधिर लोकांच्या समस्या तिला स्वानुभवाने कळल्याच होत्या पण त्यांच्यासमोरच्या आणखी अडचणींची माहिती तिने स्वतःहून वाचन आणि पत्रलेखन करून मिळवली. जगातल्या अनेकांशी पत्रमैत्री केली. या सगळ्यात अॅनचा सिंहाचा वाट होता. स्वतःच्या अधू दृष्टीची पर्वा न करता तिने आपले आयुष्य हेलनसाठी अक्षरशः समर्पित करून टाकले होते. हेलन : एक दीपस्तंभ हेलनच्या प्रयत्नांमुळे अंधांच्या समस्या जगाच्या कानाकोपऱ्यात पोचल्या. `अमेरिकन फाऊंडेशन फॉर ब्लाइंड` ही देशव्यापी संस्था उदयाला आली. हेलनने रॅडक्लिफ कॉलेजमध्ये जिद्दीने प्रवेश घेतला. जे कॉलेज तिला प्रवेश नाकारत होते त्याच कॉलेजातून तिने सर्वसाधारण मुलींप्रमाणे चार वर्षात चांगल्या गुणांनी परीक्षा उत्तीर्ण केली. हेलनने अस्पष्ट का होईना पण ऐकता येऊ शकेल अशा आवाजात बोलण्यात यश मिळवले. बोलणाऱ्याच्या गळ्याची कंपने, जीभ व ओठांची हालचाल यांना स्पर्श करून त्यातून शिकण्याचा थक्क व्हावा असा प्रयोग करून तो यशस्वी करून दाखवला ! तिच्या भाषणाला नेहमीप्रमाणेच अॅनचे मोलाचे सहकार्य लाभले. हेलनने स्वतः वरच्या चित्रपटात व रंगभूमीवरही कामे केले. जगभर फिरून जागृती केली. अंध-बधिरांचे प्रश्न सर्वपरिचित झाले. अनेक मदत संस्था उभ्या राहिल्या. एका आयुष्यात एवढे सगळे केले हेलनने ! या पुस्तकाची भाषा सोपी पण प्रवाही आहे. पण फार मोठे नसल्यामुळे हेलनच्या बालपणीच्या प्रगतीची धावती ओळखच करून घ्यावी लागते. त्यामुळे तिची प्रगती फारच भरभर झाल्याची भावना होऊ शकते. त्यातल्या त्यात हीच एक उणीव या पुस्तकात आहे. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी चितारलेले पुस्तकाचे मुखपृष्ठ अगदी अर्थपूर्ण आहे. अंधांच्या लाल-पांढऱ्या काठीला हिरवी पालवी फुटलेली दाखवली आहे . जिद्द आणि आशेचं प्रतीक! एका सर्वाथाने पराधीन स्त्रीचा स्वयंपूर्णतेकडे झालेला हा प्रवास वाचून अक्षरशः निःशब्द आणि नतमस्तक व्हायला होतं. तिच्या जिद्दीला आणि अॅन सालीव्हानच्या जिद्दीला करू तेवढा कुर्निसात कमीच ठरेल. गुरुपौर्णिमेला आपण जेव्हा गुरू-शिष्यांचं स्मरण करतो तेव्हा आधुनिक जगातल्या अॅन आणि हेलन या जोडगोळीला विसरून चालणारच नाही ! ...Read more

 • Rating StarDAINIK SAKAL 18-06-2004

  अपराजिता... वैगुण्यावर मात करून जीवन अर्थपूर्ण बनवणाऱ्या व्यक्ती या स्वत:बरोबर इतरांचंही जीवन सार्थ करून जातात. जगाच्या इतिहासात जिचं नाव अमर झालं आहे, अशी हेलन केलर याच दुर्दम्य आशेचं प्रतीक होती. हेलन केलर आंधळी, बहिरी आणि मुकी होती. पण आपल्या मनाील जिद्दीच्या बळावर आणि कष्टांच्या मदतीने तिने आयुष्यातल्या सर्व उणिवांवर मात केली. जगातल्या सर्वच अपंगांना तिने जगण्याची खरी वाट खुली करून दिली. तिचं चरित्र कादंबरीच्या रूपाने कॅथरिन ओवेन्स पिअर्स हिने लिहिलं. याचा अनुवाद शांता शेळके यांनी ‘आंधळी’ या नावाने केला होता. हेलन केलरच्या जीवनाच प्रेरक आलेखच ही छोटेखानी कादंबरी मांडते. दोन वर्षांची असताना आलेल्या तापामुळे हेलनच्या दृष्टीवर आणि श्रवणशक्तीवर परिणाम झाला. तिला बोलताही आलं नाही. अशा मुलीचं पालनपोषण करणं ही सोपी गोष्ट नव्हती. आसपासचे लोकही तिच्या आईला भविष्याबद्दल नाउमेद करीत. आई हाच हेलनच्या जगाशी असलेल्या संपर्काचा दुवा होता. हेलन सहा वर्षांची झाली तरी, तिला काहीच करता येत नसे. या मुलीला योग्य पद्धतीने शिकवलं तर ती चारचौघांसारखी जगू शकेल अशी आशा तिच्या आईला वाटत राहिली. कार्ल्स डिकन्सच्या एका पुस्तकात बोस्टनमधील ‘पार्किन्सन अंधशाळा’ हा संदर्भ वाचून, म्हणजे हेलनच्या आईला कुठेतरी आशेचा किरण दिसल्याप्रमाणे वाटलं. तिथल्या लॉरा खिस्तमन या अंध आणि मूक-बधिर मुलीबद्दल तिने वाचलं आणि आपल्या हेलनलाही स्पर्शाच्या भाषेची ओळख असल्याने तीही लॉराप्रमाणे शिकेल असा विचार तिच्या मनात चमकून गेला. हेलनला घेऊन केलर पतिपत्नी मग थेट वॉशिग्टनला डॉ. अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलना भेटून आले. ब्रेल लिपीचा शोध लावणारे हेच डॉ. बेल. लॉराला ज्यांनी शिकवलं त्या डॉ. गिंडले यांच्या जागी आलेल्या मायकेल अ‍ॅनॅग्नॉस यांनी हेलनसाठी अ‍ॅन रुलिव्हन या चोवीस वर्षांच्या मुलीची निवड केली. ती स्वत: एक अंध बालिका म्हणून पार्किन्स शाळेत आली होती. पुढे शस्त्रक्रियेनंतर तिला थोडंफार दिसूही लागलं होतं. हेलनला शिकवण्यासाठी म्हणून अ‍ॅन तिच्या गावी येऊन दाखल झाली व आयुष्यभराचं नातंच या दोघींमध्ये जडून गेलं. मात्र हेलनला हाताळणं सोपं नव्हतं. तरीपण अ‍ॅननं हे आव्हान स्वीकारलं आणि एका तुसड्या, रागीट बालिकेला तिने स्पर्शाच्या भाषेची गोडी लावली. तिला जगाचा चेहरा माहीत करून दिला. या पुस्तकात हेलन आणि अ‍ॅन दोघींच्या नात्याचा सुंदर वेध घेण्यात आला आहे. शब्द म्हणजे काय हे समजल्यावर हेलनला नवेनवे शब्द शिकून घेण्याचा ध्यासच लागला. मग भाषा, गणित, वेगवेगळे विषय तिला खुणावू लागले. हेलनला शिकायची ओढ लागली. एका टप्प्यानंतर तिला बोलायचा ध्यास लागला. एका मर्यादेपर्यंत त्यात ती यशस्वीही झाली. हेलन हा एक चमत्कार होता. रंगभूमीवर कार्यक्रम करून ती जगासमोर गेली. देशोदेशी फिरून तिने अंधत्वाबद्दल आणि मुकेपणा, बहिरेपणा याबद्दल समाजात जागृती करण्याचा प्रयत्न केला. ही कादंबरी हेलन केलरच्या या कष्टांबरोबरच तिच्या शिक्षिकेचा, अ‍ॅनचा तिला शिकवण्याचा ध्यासही समोर ठेवते. या दोघींमधलं नातं आणि अ‍ॅनच्या मृत्यूपर्यंत हेलनने तिला दिलेलं प्रेम हा सगळा सुंदर प्रवास ही कादंबरी चित्रित करते. हेलनने अ‍ॅनचं चरित्रही पुढे लिहिलं आणि स्वत:च्या वैगुण्यावर तिने कशी मात केली होती हे जगापुढे आणलं. हेलन केलर आणि अ‍ॅन सलिव्हन यांची ही कहाणी प्रेरक आहे आणि मानवी जीवनातील एक रोमांचकारी पर्वच उलगडून दाखवणारी आहे. -नंदिनी आत्मसिद्ध ...Read more

 • Rating StarPayal Surpam‎

  काही दिवसांपूर्वी `आंधळी` हे हेलन केलर वर लिहिलेल्या; कॅथरिन ओवेन पिअर्स हिने लिहिलेल्या पुस्तकाचा शांता शेळके लिखित मराठी अनुवाद वाचला. `चिकन सुप फॉर द सोल` यातील पुस्तकात एकदा हेलन केलर हिचा एक कोट वाचण्यात आला. फार भावला तो. तिच्या जीवनावरीलच ुस्तक हे अस मी हाती घेईल याची कल्पना नव्हती. तिचं जीवन फार मस्त रेखाटल आहे. शांता शेळके चा अनुवाद म्हटल्यावर तसेही काही बोलायची वेळच येत नाही. इतक्या समर्थपणे स्वतःची शारिरीक व्यंगे पेलुन समोर येणार्‍या हेलन केलरचं कौतुक वाटत राहत. आयुष्यात जिद्द आणि महत्त्वकांक्षा असेल तर काहीच अशक्य नाहीए हे परत एकदा जाणवून गेलं. आता पुढे तिचे स्वलिखित साहित्य `टू बी रिड` या लिस्ट मधे ठेवलेय. :) नक्की वाचाव अस पुस्तक. ...Read more

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more