* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE ODESSA FILE
  • Availability : Available
  • Translators : ASHOK PATHARKAR
  • ISBN : 9789353170172
  • Edition : 1
  • Publishing Year : JULY 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 304
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :FREDERICK FORSYTH COMBO OFFER
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Print Books:
"IT`S 1963 AND A YOUNG GERMAN REPORTER HAS BEEN ASSIGNED THE SUICIDE OF A HOLOCAUST SURVIVOR. THE NEWS STORY SEEMS STRAIGHFORWARD, THIS IS A TRAGIC INSIGHT INTO ONE MAN`S SUFFERING. BUT A LONG HIDDEN SECRET IS DISCOVERED IN THE PAGES OF THE DEAD MAN`S DIARY. WHAT FOLLOWS IS LIFE-AND-DEATH HUNT FOR A NOTORIOUS FORMER CONCENTRATION CAMP-COMMANDER, A MAN RESPONSIBLE FOR THE DEATHS OF THOUSANDS, A MAN AS YET UNPUNISHED. "
सॉलोमन टाउबर या ज्यू व्यक्तीने लिहिलेल्या डायरीत छळ छावणीत हिटलरच्या एस. एस. संघटनेकडून ज्यूंवर केल्या गेलेल्या अनन्वित अत्याचारांचे, विशेषत: रोशमन या एस.एस. अधिकाऱ्याच्या क्रूरतेचे वर्णन असते. सॉलोमन आत्महत्या करतो आणि ती डायरी पोलिसांच्या हाती लागते. नंतर तरुण जर्मन पत्रकार पीटर मिलरच्या हाती ती डायरी लागते. ती डायरी वाचून मिलर रोशमनचा शोध घ्यायचा, असं ठरवतो. जेव्हा मिलर ती डायरी वाचतो तेव्हा तो खूप अस्वस्थ होतो. ज्यूंच्या हत्याकांडाबरोबरच त्या डायरीतील आणखी एक बाब त्याला रोशमन या क्रूरकम्र्याचा शोध घ्यायला प्रवृत्त करते. ती बाब कोणती याचं रहस्य कथानकाच्या शेवटी उलगडतं. रोशमनला शोधण्यासाठी मिलरला कोणत्या दिव्यातून जावं लागतं, याची कहाणी ‘द ओडेसा फाईल’ या कादंबरीतून चित्रित केली आहे. मिलरचा या शोध मोहिमेच्या दरम्यानचा प्रवास चित्तथरारक आणि उत्कंठावर्धक आहे. तो प्रवास वाचकाला खिळवून ठेवतो. तो अनुभवण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचलं पाहिजे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#MILLER# JEW# RIGA# ROSCHMANN# HAMBURG# ODESSA# KENNEDY# GERMANY# EGYPT# JAGUAR# SIGI# ISRAEL# GENERAL# SS# NAZIS# MACKENSEN# KAMERALD# SALOMON TAUBER# LAWYER#मिलर# रोशमन# जग्वार# एस.एस. # हॅम्बुर्ग# जर्मनी# ज्यू# कर्नल# केनेडी# कामेराड# रिगा# जनरल# इस्त्राईल# क्षेपणास्त्र# खटला# इजिप्त# वकील# स्पोर्ट्स कार# वार्ताहर# छळछावणी# ओडेसा# मॅकेनसन# न्युरेंबर्ग# सिगी# नाझी द ओडेसा फाइल# फ्रेडरिक फॉर्सिथ# अशोक पाथरकर
Customer Reviews
  • Rating Starप्रकाश पिटकर

    आपण गोष्ट वाचत जातो .. पीटर मिलरच्या आणि त्याच्या जग्वार गाडीच्या मागोमाग जात राहतो ... खरं तर त्या गाडीतून आपण पण जात राहतो ... त्याचा बेधडक मागोवा ... त्यातले जीवावरचे धोके ... त्याच्या मागे असलेले अनेक गुप्तहेर .. आपण हा थरार अनुभवत राहतो ... सालोन टौबरच्या डायरीतल्या अनेक गोष्टींनी आपण देखील हललेले असतो .... पुस्तकातली गोष्ट राहत नाही .. आपली होऊन जाते ... आपली राजकीय मतं काहीही असली तरी ते कल्पनेपलीकडचे अत्याचार बघून आपण दिग्मूढ होत जातो .... फ्रेडरिक फोर्सिथने वास्तवावर आधारित अफलातून पुस्तक लिहिलंय... हे त्याचं दुसरं पुस्तक ..१९७२साली प्रकाशित झालं.... त्याला जगभरात प्रसिद्धीच्या शिखरावर नेतं झालं. .. त्यावर रोनाल्ड निम (Ronald Neame) याच्या दिग्दर्शनाखाली तेव्हडाच अफलातून सिनेमा निघाला... पुस्तक आपल्याला दुसऱ्या महायुद्धाच्या दिवसात घेऊन जातं ...आपण अगोदर कुठेतरी धूसरपणे वाचलेलं असतं... मतं ठाम केलेली असतात ... पण हे पुस्तक वाचून मात्र आपण हादरतो ... पुस्तकातल्या पिटर मिलरच्या मागे आपण जात राहतो .... मोसाद आणि अनेक गुप्तहेर यांच्या देखील मागोमाग जातो ... खूप थ्रिलिंग आहे .... मोसादने मिलरच्या सुरक्षितेसाठी आपला एक कडक गुप्तहेर लावलेला असतो ... मिलरला हे अजिबात माहित नसतं.... मिलर प्रत्येक भयानक संकटातून वाचत राहतो .. एकदा तर त्याच्या जॅग्वारमध्ये बॉम्ब लावतात... जॅग्वार त्यात पूर्णपणे नष्ट होते पण मिलर मात्र वाचतो ... शेवटी तरी तो भयानक जखमी होतो .. मोसादचा गुप्तहेर त्याला वाचवतो ... फ्रँकफर्टमधल्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा चार पाच दिवसांनंतर त्याला शुद्ध येते तेव्हा तो गुप्तहेर बाजूलाच असतो .... तो त्याचा हात हातात घेतो ... मिलर त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघून विचारतो... मी तुला ओळखलं नाही ... तो मिश्किलपणे हसत म्हणतो ... मी मात्र तुला उत्तम ओळखतो ... तो खाली वाकतो आणि त्याच्या कानात हळू म्हणतो ... ऐक मिलर ... तू हौशी पत्रकार आहेस .... अशा पोचलेल्या लोकांच्या मागे लागणं तुझं काम नाहीये ... तू या क्षेत्रात पकलेला नाहीयेस ... तू खूप नशीबवान आहेस .. म्हणून वाचलास ... टौबरची डायरी माझ्याकडे ... म्हणजे मोसाद कडे सुरक्षित आहे .. ती मी घेऊन आता इझ्रायलला जाणार आहे ..... तुझ्या खिशात मला सैन्यातल्या एका कॅप्टनचा फोटो मिळालाय .. तो कोण आहे ? तुझे बाबा आहेत का? मिलर मान डोलावून होय म्हणतो .. मग तो गुप्तहेर म्हणतो ... आता आम्हाला कळतंय की तू जीवावर उदार होऊन एड़ुयार्ड रॉस्चमनच्या एवढ्या मागे का लागलास ... तुझे बाबा जर्मन असूनही रॉस्चमनमुळे त्यांना जीव गमवावा लागला होता .... मग तो गुप्तहेर विचारतो ... की तुला मिळालेली ओडेसा फाइल कुठे आहे? मिलर त्याला ती पोस्टाने कुणाला पाठवली ते सांगतो ... जोसेफ ... तो गुप्तहेर मान डोलावतो .... मिलर त्याला विचारतो ... माझी जग्वार कुठे आहे ... जोसेफ त्याला सांगतो की त्यांनी तुला मारण्यासाठी त्यात महाशक्तिशाली बॉम्ब ठेवला होता ... त्यात ती पूर्णपणे जळली ... कारची बॉडी न ओळखण्यासारखी आहे ...... जर्मन पोलीस ती कोणाची आहे, हे शोधणार नाहीयेत .. तशी व्यवस्था केली गेल्येय ... असो ... माझ्याकडून एक छोटासा सल्ला ऐक ... तुझी गर्लफ्रेंड सिगी ... फार सुंदर आणि चांगली आहे ...हॅम्बर्गला परत जा .. तिच्याशी लग्न कर .... तुझ्या जॅग्वारच्या insurance साठी अर्ज कर .. तीही व्यवस्था केली गेल्येय .. तुझ्या गाडीचे सगळे पैसे तुला ते परत देतील ...जग्वार परत घेऊ नकोस .... त्या सुंदर कारमुळेच नेहेमीच तुझा ठावठिकाणा त्यांना लागत होता ... आता मात्र तू साधी अशी Volkswagen घे ... आणि शेवटचं ... तुझी गुन्हेगारी पत्रकारिता चालू ठेव ... आमच्या या क्षेत्रात परत डोकावू नकोस ... परत जिवंत राहण्याची अशी संधी मिळणार नाही .... त्याच वेळी त्याचा फोन वाजतो ... सिगी असते ... फोन वर एकाच वेळी ती रडत असते आणि आनंदाने हसत देखील ... थोडया वेळाने परत एक फोन येतो ... Hoffmannचा ... त्याच्या संपादकाचा .... अरे आहेस कुठे ... बरेच दिवसात तुझी स्टोरी आली नाहीये .. मिलर त्याला सांगतो .. नक्की देतो ... पुढच्या आठवडयात ... इकडे तो गुप्तहेर ... जोसेफ ... तेल अव्हीवच्या लॉड विमानतळावर उतरतो ... अर्थात त्याला न्यायला मोसादची गाडी आलेली असते ... तो त्याच्या कमांडरला सगळी गोष्ट सांगतो ... मिलर वाचल्याचं आणि बॉम्ब बनवण्याची ती फॅक्टरी नष्ट केल्याचं देखील सांगतो ... कमांडर त्याचा खांदा थोपटून म्हणतो .. वेल डन ..... ! पुस्तक जरूर वाचा... भाषा खूप सोपी आणि सहज समजणारी आहे .... जगातलं एक नामांकित आणि लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेलं पुस्तक आहे ... ...Read more

  • Rating StarKIRAN BORKAR

    जर्मनीतील माजी एस.एस. सभासदांची संघटना आहे . त्या संघटनेचे संक्षिप्त नाव ओडेसा. जर्मनी दुसरे महायुद्ध हरल्यावर बहुतेक एस.एस.अधिकाऱ्यांनी आपली ओळख लपवून जगभरातील विविध देशांमध्ये आश्रय घेतला आणि एकमेकांच्या संपर्कात राहू लागले . आपल्या लोकांचे रक्षण कणे ..जर्मनीला पुन्हा बलवान बनवायचे ..इस्त्रायलाजगाच्या नकाशावरून नष्ट करायचे हे त्यांचे उद्दिष्ट होते. अतिशय गुप्तपणे ओडेसाचे कार्य चालू होते .पण 22 नोव्हेंबर1963 ला राष्ट्राध्यक्ष केनेडीची हत्या झाली आणि त्याच दिवशी हॅम्बुर्गला एक वृद्ध इसमाने आत्महत्या केली . फ्री पत्रकार असलेल्या पीटर मिलरने सहजच त्या व्यक्तीची चौकशी केली आणि त्याच्या हाती लागली त्या व्यक्तीची डायरी . आत्महत्या केलेली व्यक्ती ज्यू होती आणि ती हिटलरच्या छळछावणीतून सुटून आलेली होती . डायरीत होती त्याच्या क्रूर छळाची हालअपेष्टाची कहाणी .पण त्यातही एक रहस्य होते .80000 ज्यूच्याहत्याकांडाला कारणीभूत असलेला एस एस अधिकारी एडवर्ड रोशमन अजूनही जिवंत आहे असे त्यात नमूद केले होते . ह्या एडवर्डला जगापुढे आणून त्याला शिक्षा व्हावी अशी त्या ज्यूची इच्छा होती . एक मोठी स्टोरी मिळेल या आशेने मिलर त्या घटनेचा माग घेण्याचे ठरवतो आणि चालू होतो एका क्रूरकर्म्याचा जीवघेणा पाठलाग .यात कोणाची सरशी होते ते पुस्तक वाचल्यावरच कळेल . ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
विजय भास्कर, अमरावती

*दुर्दम्य : दहा कोटीत एक असा अजब ऑफिसर* *प्रामाणिकपणाचा दर्प, माणुसकीचा स्पर्श आणि एकाकी आयुष्याची कहाणी. काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, आपल्या कामाचा आणि जगण्याचा ठसा उमटवतात; पण त्यांना एका शब्दात चांगलं किंवा वाईट ठरवणं कठीण अतं. त्यांच्या स्वभावातील विरोधाभासच त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात. ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे जी. बी. देशमुख यांचं पुस्तक अशाच एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतं. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात सुमारे पंचवीस वर्षे सहकारी म्हणून अनुभवलेले सी. व्ही. कृष्णन एकनाथानन, म्हणजेच एकनाथन, यांचं व्यक्तिचित्र लेखकाने कोणताही कृत्रिम मुलामा न देता रेखाटलं आहे. त्यांच्या कठोर शिस्तीमागची तत्त्वनिष्ठा, विचित्र वाटणाऱ्या सवयींमागची भूमिका आणि एकाकीपणाच्या आड दडलेली माणुसकी उलगडत जाते. त्यामुळे हे केवळ एका अधिकाऱ्याचं चरित्र राहत नाही; ते माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न ठरतं. *पहिली भेट : हात मागे घेतला!* ४ जुलै १९८८. चंद्रपूरहून अमरावतीला बदली होऊन आलेल्या लेखकाची एकनाथन यांच्याशी पहिली भेट. उंच, धिप्पाड आणि गंभीर व्यक्तिमत्त्वाच्या या अधिकाऱ्यांसमोर लेखकाने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत एवढंच म्हटलं— “So you are reporting today. Okay.” या कोरड्या प्रतिसादातून त्यांच्या स्वभावाची पहिली झलक दिसते. मात्र, पुढे लेखकाने दिलेल्या टंकलेखनाच्या कामाची अचूकता पाहून आणि तो मेजर पी. के. बापट यांच्याकडे काम करून आल्याचं समजल्यावर एकनाथन म्हणाले— “Only a military man can carve out such workers. I am impressed.” कडक शिस्तीचा आग्रह धरणारा हा अधिकारी गुणवत्तेची दखल घ्यायलाही तितकाच तत्पर होता. पहिल्या भेटीत हात मागे घेणारा माणूस कामातील गुणवत्तेसमोर मात्र मनमोकळेपणाने दाद देतो. इथूनच या व्यक्तिमत्त्वातील विरोधाभासांची रंजक ओळख सुरू होते. *दोन रुपये चाळीस पैशांतून दिसलेलं तत्त्वज्ञान* एका व्यापाऱ्याकडून चुकून दोन रुपये चाळीस पैसे जास्त घेतले गेल्याचं लक्षात आल्यानंतर एकनाथन यांनी ती रक्कम परत करण्यासाठी स्वतःचे शंभर रुपये खर्च करून माणूस पाठवला. रक्कम छोटी होती; पण हिशेबातील तत्त्व मोठं होतं. त्यांच्या दृष्टीने पैशाची किंमत त्याच्या रकमेवर नव्हे, तर तो योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याच्या प्रामाणिकपणावर ठरत होती. नियम पाळताना ते कोणतीही तडजोड करत नसत. मात्र, कर्मचाऱ्याचा न्याय्य लाभ असेल, तर त्याला मंजुरी देण्यासही ते मागेपुढे पाहत नसत. नियमभंग करणाऱ्यांसाठी कठोर आणि हक्कासाठी पात्र असणाऱ्यांसाठी तत्पर, ही त्यांच्या कार्यपद्धतीची दोन टोकं होती. त्यांची वक्तशीरपणाची कल्पनाही विलक्षण होती. उशिरा येणं चुकीचं; पण वेळेच्या खूप आधी येणंसुद्धा शिस्तीच्या चौकटीबाहेरचं! “Before time is also not the right time.” या भूमिकेतून त्यांच्या नियमप्रियतेचा अतिरेक जाणवतो; पण त्याच वेळी प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःची एक काटेकोर चौकट असणारा माणूसही दिसतो. *शिस्तीच्या पोलादी चौकटीमागचा माणूस* एकनाथन यांची शिस्त कधी कधी इतरांना विक्षिप्तपणाच्या जवळ जाणारी वाटे. स्फोटक कारखान्यातील सुरक्षानियमांचं काटेकोर पालन असो किंवा बंदुकीच्या हाताळणीतील खबरदारी, नियम म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नव्हेत, अशी त्यांची धारणा होती. पण या कठोरतेला दुसरी बाजूही होती. कार्यालयातील शिपाई पत्नी-मुलांसह त्यांच्या वातानुकूलित दालनात झोपलेला आढळला. अशा वेळी कारवाई होईल, अशी अपेक्षा असताना एकनाथन यांनी त्याला विचारलं, “तुम हमारे चेंबर मे सोता?” या प्रश्नात नियम मोडल्याची जाणीव होतीच; पण त्याहून आधी दुसऱ्या माणसाच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यांच्या स्वभावातली ही माणुसकी मोठ्या भाषणांतून नव्हे, तर अशा छोट्या प्रसंगांतून व्यक्त होते. म्हणूनच त्यांचं व्यक्तिचित्र एकरेषीय होत नाही. *एकटेपणाचा स्वीकार की त्याची किंमत?* एकनाथन यांनी अविवाहित राहणं, मोजक्याच वस्तूंमध्ये आयुष्य घालवणं, दूरचित्रवाणी-रेडिओपासून दूर राहणं आणि सामाजिक समारंभ टाळणं पसंत केलं. स्वतःच्या अवकाशाबाबत ते अत्यंत आग्रही होते. नातेसंबंधांच्या गर्दीपेक्षा एकांत त्यांना अधिक जवळचा वाटत होता. मात्र, आयुष्याच्या उत्तरार्धात आजारपणाने त्यांची शारीरिक स्वायत्तता हिरावून घेण्यास सुरुवात केली. कर्करोगावरील उपचारांसाठी केरळला गेल्यानंतर भावाच्या घरी राहणंही त्यांना अवघड वाटलं. आपल्यामुळे भावाच्या कुटुंबाला गैरसोय होऊ नये, या विचाराने त्यांनी हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमान आणि स्वावलंबन यांची ही भूमिका समजण्यासारखी असली, तरी तिची किंमत एकटेपणाच्या रूपाने मोजावी लागते. लेखकाने दिलेल्या वडिलांच्या जुन्या पलंगावर अखेरच्या काळात त्यांना आधार मिळाला, हा तपशील मनाला स्पर्शून जातो. आयुष्यभर व्यवहारात काटेकोर राहिलेल्या एकनाथन यांनी त्या पलंगाचा स्वीकार केला. काही नाती शब्दांनी नव्हे, तर अशा साध्या कृतींनी व्यक्त होतात. २०१९ मध्ये मोठ्या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी लेखकाला म्हटलं— “Is this life, Deshmukh? I have to struggle for reaching even upto toilet.” आणि त्यानंतरची त्यांची विनंती अधिक बोलकी होती— “Try to come more frequently. I know it is a long distance. But I need to talk to someone like you with whom I can interact.” जगापासून अंतर राखणाऱ्या माणसालाही अखेरीस संवादाची गरज भासते. दुसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालं. आयुष्यभर स्वावलंबनाचा आग्रह धरणाऱ्या या माणसाच्या शेवटच्या शब्दांत मात्र सोबत हवी असल्याची साधी, मानवी ओढ होती. *दहा कोटीत एक हीच खरी ओळख* एकनाथन यांच्यात दोष नव्हते, असं लेखक सांगत नाही. त्यांच्या कठोरतेचा अतिरेक, सामाजिक अलिप्तता आणि विचित्र वाटणाऱ्या सवयी लपवण्याचाही प्रयत्न करत नाही. यामुळेच हे व्यक्तिचित्र अधिक विश्वासार्ह बनतं. एखाद्या माणसाचं मोठेपण सिद्ध करण्यासाठी त्याला निर्दोष ठरवण्याची गरज नसते. निवृत्तीपूर्वी एकनाथन यांनी लेखकाला विचारलं होतं, आपण गेल्यानंतर लोक आपल्याला चांगलं म्हणतील की वाईट? त्यावर लेखकाने दिलेलं उत्तर या पुस्तकाच्या शीर्षकाचा अर्थ उलगडतं— “I won`t tell people as to whether he was a good man or bad man, but whenever such reference comes I would certainly say that he was a man one in ten crore!” ‘दहा कोटीत एक’ ही उपाधी म्हणजे एखाद्या माणसाला देवत्व देणं नव्हे. ती त्याच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची, तत्त्वांशी असलेल्या निष्ठेची आणि सहज वर्गीकरणात न मावणाऱ्या स्वभावाची नोंद आहे. एकनाथन यांचं व्यक्तिमत्त्व समजून घेताना ‘अंतरंगीचे आभाळ : एक काव्यवर्तुळ’ या काव्य संग्रहातील ‘माणसातले सुंदर गुण’ ही कविता आठवते. “संकट येता कुणाचा हात पुढे सरतो; नाव न विचारता माणूस माणसाला धरतो.” एकनाथन यांच्या आजारपणात लेखकाने केलेली मदत आणि चंदूभाऊ पवार यांनी दाखवलेली माणुसकी या ओळींना जगण्याचा संदर्भ देतात. माणुसकी नेहमी गोड शब्दांतूनच व्यक्त होते असं नाही. कधी ती एखाद्याच्या हक्कासाठी ठामपणे उभी राहते, कधी चुकीच्या गोष्टीला विरोध करते, तर कधी आजारी माणसाच्या एकटेपणात त्याला संवादाची सोबत देते. एकनाथन यांच्यातील गुण आणि मर्यादा दोन्ही समजून घेताना ही कविता माणसाकडे पाहण्याची एक खिडकी उघडते. कारण माणसातले सुंदर गुण गाजावाजा करून येत नाहीत; ते एखाद्या कृतीतून, एखाद्या स्पर्शातून किंवा दुसऱ्याच्या दुःखापाशी थांबण्यातून प्रकट होतात. कवितेच्या शेवटच्या ओळींत म्हटल्याप्रमाणे— “माणूस जपता माणूस— अंतरी उघडे आभाळ.” कदाचित एकनाथन यांच्या आयुष्याकडे पाहण्याची हीच एक दृष्टी असू शकते. त्यांच्या सगळ्या स्वभाववैशिष्ट्यांशी सहमत न होताही त्यांच्यातील माणूस समजून घेणं, हीच या पुस्तकाची आणि त्यातून मिळणाऱ्या अनुभवाची खरी कमाई आहे. जी. बी. देशमुख यांनी आठवणींच्या आधारे उभं केलेलं हे व्यक्तिचित्र वाचकाला एका प्रश्नासमोर उभं करतं—माणसाला त्याच्या गुणदोषांच्या बेरजेतून समजून घ्यायचं, की त्याच्या संपूर्ण जगण्याच्या संदर्भात? ‘दुर्दम्य’ हे पुस्तक एका अजब अधिकाऱ्याची गजब गोष्ट सांगतं; पण त्याचबरोबर शिस्त, स्वाभिमान, माणुसकी आणि एकटेपणा यांच्या सीमारेषांवरही विचार करायला लावतं. काही माणसं आपल्याला आवडतात म्हणून लक्षात राहत नाहीत; ती आपल्याला विचार करायला भाग पाडतात म्हणून लक्षात राहतात. एकनाथन हे त्यापैकीच एक. माणसाला समजून घेण्याची, त्याच्या गुणदोषांसह त्याच्याकडे पाहण्याची आणि माणुसकीच्या अर्थाचा नव्याने शोध घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे पुस्तक अवश्य वाचावं. कारण काही पुस्तकं केवळ एका व्यक्तीची ओळख करून देत नाहीत; ती आपल्याला माणसांकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात. हे पुस्तक त्यापैकीच एक. ..... विजय भास्कर , अमरावती ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
नरेंद्र तायडे, अमरावती

*दुर्दम्य* पुस्तक आज हाती घेतलं, शेवट कधी झाला कळलंच नाही. अक्षरशः डोळे पाणावले कधी गदगद हसुन तर कधी गहिवरून *खरंच* दहा करोडात एक होता एकनाथन अप्रतिम शब्दप्रपंचाने घडले व्यक्तीदर्शन... ...... नरेंद्र तायडे, अमरावती