* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KINARE MANACHE
  • Availability : Available
  • ISBN : 9788171619382
  • Edition : 3
  • Publishing Year : AUGUST 1999
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 184
  • Language : MARATHI
  • Category : POEMS
  • Available in Combos :SHANTA SHELKE COMBO SET - 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SHANTABAI IS JOTTING DOWN HER THOUGHTS IN A VERY RHYTHMIC STYLE AND EXPRESSING HERSELF STANZAS AFTER STANZAS SINCE LAST 50 YEARS. SHE HAS NOT STUCK TO THE FORM OF POETRY ONLY BUT HAS TRIED HER HANDS SUCCESSFULLY ON OTHER FORMS OF LITERATURE; YET POETRY IS THE AREA WHICH IS LIKE HER BREATH, HER HEART BEATS MORE RHYTHMICALLY HERE. THIS COLLECTION OF HER POETRY IS COMPILED OF HER MOST EXCLUSIVE POEMS. IT WAS VERY DIFFICULT TO MAKE A SELECTION FROM ALL HER POETRIES, EACH BEAUTIFUL AND PERFECT IN ITS OWN WAY. THE FAMOUS POETESS DR. PRABHA GANORKAR HAS CRITICALLY VIEWED HER POEMS AND TAKEN A REVIEW OF PROGRESS ON THE PATH OF POETRY. DR. GANORKAR HAS VERY ELABORATELY STUDIED AND METICULOUSLY DIAGNOSED THE POETRY, ITS MEANING, ITS MANIFESTATION, ITS PLUS POINTS, ITS MINUS POINTS, AND ITS POSITION IN COMPARISON WITH ITS CONTEMPORARY POEMS. THIS WILL HELP THE READERS IN UNDERSTANDING THE POEM IN A BETTER WAY AND IT WILL ALSO HELP THE SCHOLARS WHO ARE STUDYING THE LITERATURE IN DETAILS.
बाईंच्या दीर्घकालीन काव्य प्रवासाचा चिकित्सकपणे आणि सहृदयतेने घेतलेला वेध गेल्या अर्धशतकापासून शांताबाई काव्य लेखन करीत आहेत.इतर अनेक साहित्यप्रकार त्यांनी आतापर्यंत हाताळले असले तरी आत्मनिष्ठ कविता हीच त्यांची सर्वात आवडती निर्मिती राहिली आहे.`किनारे मनाचे` हा शांता बाईंच्या दीर्घकालीन काव्याप्रवासाचा चीकीत्सतपणे आणि सहृदयेने वेध घेणारा त्यांच्या निवडक कवितांचा संग्रह आहे.सुप्रसिद्धी कवयित्री आणि नामवंत समीक्षिका डॉ.प्रभा गणोरकर यांनी शांत बाईंच्या कवितेचा विकासक्रम इथे मार्मिकपणे उलगडून दाखविला आहे.तिचा आशय,अविष्कार,भाषेचे पोत,तिच्या मर्यादा आणि तिची शक्ती,त्याबरोबर समकालीन कवितेच्या संदर्भात तिचे असलेले नेमके स्थान या सर्व गोष्टींचा अत्यंत अभ्यासपूर्ण,मुलभूत आणि स्वतंत्र विचार डॉ.गणोरकर यांनी आपल्या विस्तृत प्रास्ताविकात केलेला आढळेल.एका जेष्ठ कवयित्रींचा या निवडक कविता आणि तिच्या सर्व काव्यलेखनाच्या हि सर्वांगीण समीक्षा काव्यासारीकांना आणि विशेषतः साहित्याच्या अभ्यासकांना उतबोधक वाटेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#आंधळी#कॅथरिन ओवेन्स पिअर#कादंबरी# शान्ता ज.शेळके#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#THE HELENKELLERSTORY #CATHERINEOWENSPEARE #SHANTAJ.SHELKE #ANDHALI #ANDHALYACHE DOL #ANOLAKH #ANUBANDH #CHAUGHIJANI #GAVATI SAMUDRA #GONDAN #KAVITA SMARANATALYA #KINARE MANACHE #LEKHAK ANI LEKHANE #MEGHDUT #NIMITTA NIMITTANE #PAVSAAADHICHAPAUS #PURVASANDHYA #RANGRESHA #RESHIMREGHA #SANGAVESEVATALEMHANUN #SANSMARNE #SUVARNAMUDRA #VARSHA
Customer Reviews
  • Rating StarDAINIK KESARI 26-12-1999

    शांता शेळके यांच्या निवडक कवितांच्या संकलनाच्या प्रस्तावनेमध्ये प्रभा गणोरकर यांनी शांतबार्इंच्या कवितेचे मर्म अतिशय हृद्यपणे उलगडले आहे. शांता शेळके हे नाव त्यांच्या मधुर गीतांच्या, चित्रपटगीते, द्वंद्वगीते, भावगीते, कोळीगीते, भूपाळी आरती अशा विविध द्यरचनांच्या गेय आविष्कारातून महाराष्ट्रातील रसिक मनांच्या मनावर गेली कित्येक वर्षे अधिराज्य करत आहे. शांताबार्इंचे अन्य साहित्यिक आकृतीबंधही मराठी साहित्य रसिकांच्या मनात संस्मरणीय आहेतच; परंतु मनुष्याच्या आणि समाजाच्या मनोरचनेत वाचन संस्कृतीपेक्षा श्रवण संस्कृती अधिक रुळली असल्याने शांताबार्इंचे कवयित्री रूप काहीसे मागे पडल्यासारखे होते. वास्तविक गेली सत्तावन्न-अठ्ठावन्न वर्षे शांताबाई काव्य लेखन करत आहेत. १९६० पासून आजतागायत सातत्याने कविता लिहिताना त्यांनी कवितेची अनेक रूपे पाहिली. कवितेच्या नव्या-जुन्या वाटा आणि वळणे यांचा संस्कार आणि कवितेसंबंधी जागृत आत्मभान शांताबार्इंना आहे. कवींच्या तसेच वाचकांच्याही पिढ्या शांताबार्इंच्या लेखणीशी परिचित आहेत. इतक्या दीर्घकालीन पल्ल्यात भिन्न अभिरुचीच्या वाचकांना आनंद देण्याची तकद त्यांच्या कवितेत आहे. शांताबार्इंच्या कवितेचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कवितेने जरी वेगवेगळी वळणे घेतली असली तरी ती भरकटत गेलेली नाहीत. स्वत:च्या जाणिवा आणि त्यांची अभिव्यक्ती यांच्याशी ती प्रामाणिक राहिली. उलट त्यांची कविता अधिक प्रगल्भ होत गेली. ‘वर्षा’ आणि ‘रुपवी’मधले त्यांच्या कवितेचे आत्मलक्षी रूप, निसर्ग प्रेम, यांची एकेरी अनुभूती आणि व्यक्तिगत रूप कमी-कमी होत जाऊन अनोळखी, जन्मजान्हवी आणि पूर्वसंस्था या संग्रहात शांताबार्इंची कविता चिंतनशील, व्यापक विचारांची होत गेलेली आहे. आयुष्याच्या वळणावरती आठवणी एकेक तेवत ठेवून उरात आपण विझून गेलो कैक (गोदण) किंवा अवघे नकार मनी दाटतात हाता धरले हात सुटतात पाहताना कधी मागे परतून पुसटही तेथे उरते ना खूण (गोंदण) असे अशा-निराशेचे आत्मलक्षी खेळ रंगविणारी त्यांची शब्दकळा अज्ञात विश्वाचा शोध घेऊ लागते. ऐल अंधुक उजेड, पैल काळोखाचा डोह त्यात तिरीप एखादी, तिचा पडतसे मोह दाट काळोखाच्या पोटी मंद चमकती लाटा काही अज्ञात भोवरे काही असंभाव्य वाटा (जन्मजान्हवी) शांताबार्इंना जनमजात प्रतिभेचे आणि तिच्या आविष्काराचे शब्दभाग्य लाभले आहे. शब्दांसवे मी जन्मले, शब्दांतून मी वाढले हे शाप, हे वरदान, हा दैवाने दिलेला वारसा, मी जाणते इतुकेचे की यांच्याविना कंगाल मी भाषण हे यांच्यावरी मी लाविते मजला कसा, शब्दांमध्ये जगणे मला शब्दांमध्ये मरणे पुन्हा. शांताबार्इंच्या मनाचे किनारे असंख्य कविता संग्रहातून वाचकांना भेटलेले आहेत. त्यांचा पहिला संग्रह ‘वर्षा’ १९४७ मध्ये निघाला. नंतरच्या काळात रुपसी, गोंदण, अनोळखी, जन्मजान्हवी, पूर्वसंध्या आणि इश्यर्थ अश एकूण सात कवितासंग्रहात त्यांची कविता अधिकृत झाली आहे. त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये शब्दांचा आणि मनाचा प्रक्षोभ व्यक्त करणाऱ्या निवडक १३६ कवितांचा हा कवितासंग्रह मेहता प्रकाशनाने अतिशय सुबक आवृत्तीमध्ये प्रसिद्ध केला आहे. -मल्हार कृष्ण गोखले ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more