* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
`LITTLE WOMEN` WAS PUBLISHED FIRST IN THE YEAR 1868, IT WAS WRITTEN BY THE FAMOUS AMERICAN AUTHOR LOUISA MAY ALCOTT. IT WAS A BEST SELLER. IT WAS TRANSLATED IN MANY LANGUAGES. HOLLYWOOD USED THE THEME FOR TWO OF ITS MOVIES. `LITTLE WOMEN` IS THE STORY OF THE MARCH FAMILY; ESPECIALLY OF THE FOUR SISTERS NAMELY MEG, JYO, BETH, AND AMY, IN AMERICA. THESE CHARACTERS ARE BASED ON THE ORIGINAL AUTHOR`S REAL SISTERS. THIS STORY IS VERY TOUCHY AND MAGNIFICENT. WE GET INVOLVED IN IT WITH THE OTHER CHARACTERS, THE OLD, HANDSOME NEIGHBOUR LAWRENCE AND HIS EQUALLY HANDSOME AND LOVING GRANDSON LORRY. THESE MARCH SISTERS ARE TOTALLY DIFFERENT FROM EACH OTHER. BUT THEY LOVE EACH OTHER TRULY. THEY ARE VERY MUCH FOND OF EACH OTHER. THIS NOVEL IS BECOME READABLE BECAUSE OF THE NATURAL ASPECTS OF A FAMILY; WHILE READING WE COME ACROSS WITH THE HOPES, AMBITIONS, HAPPINESS, SADNESS, THEIR PLANS FOR FUTURE, THE HUMOUR IN THEIR LIFE, THE TOUCHING AND MELTING MOMENTS IN THEIR LIFE; EVERYTHING MAKES THE STORY VERY COMMON, AS IF IT IS HAPPENING IN OUR LIVES, AS IF SOMEONE IS REVEALING OUR FAMILY LIFE. THIS CLOSENESS INVOLVES US MORE AND MORE IN THE LIVES OF MARCH SISTERS AND THIS SIMPLICITY IS THE SECRET OF THE SUCCESS OF THIS NOVEL.
मुग्ध शैशवातली कोवळी सुखदु:खे ..... लुइसा मे अलकॉट या ख्यातनाम अमेरिकन लेखिकेची ‘लिटल् वुइमेन’ ही कादंबरी अठराशे अडुसष्ट साली प्रथम प्रकाशित झाली. प्रसिद्धीबरोबरच तिला अभूतपूर्व लोकप्रियता लाभली. अनेक भाषांमधून ती अनुवादित झाली आहे. हॉलिवुडने तिच्यावर दोन वेळा चित्रपटही काढले आहेत. ‘लिटल् वुइमेन’ ही अमेरिकेतल्या ‘मार्च’ कुटुंबाची – विशेषत: त्यातल्या मेग, ज्यो, बेथ आणि अ‍ॅमी या चार बहिणींची – कहाणी आहे. या व्यक्तिरेखा लेखिकेने आपण व आपल्या बहिणी यांच्यावरूनच बहुतांशी रंगवल्या आहेत. शेजारचे वृद्ध लॉरेन्स आजोबा आणि त्यांचा देखणा प्रेमळ नातू लॉरी यांनी या कथेत आणखी अनोखे रंग भरले आहेत. हे एक अतिशय हृद्य आणि विलोभनीय असे कुटुंबचित्र आहे. एकमेकींपासून स्वभावाने अगदी वेगळ्या असलेल्या मार्च बहिणींचे परस्परांवरील उत्कट प्रेम, त्यांच्या आशाआकांक्षा, कोवळी सुखदु:खे, भविष्याची स्वप्ने याचे हे कधी विनोदी, तर कधी हृदयस्पर्शी असे चित्रण आपल्या साध्या सच्चेपणामुळे वाचकाला थेट अखेरपर्यंत गुंतवून ठेवते...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#LOUISA M. ALCOTT#LITTLE WOMAN # SHANTA SHELKE #आंधळी#कॅथरिन ओवेन्स पिअर#कादंबरी# शान्ता ज.शेळके#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#THE HELENKELLERSTORY #CATHERINEOWENSPEARE #SHANTAJ.SHELKE #ANDHALI #ANDHALYACHE DOL #ANOLAKH #ANUBANDH #CHAUGHIJANI #GAVATI SAMUDRA #GONDAN #KAVITA SMARANATALYA #KINARE MANACHE #LEKHAK ANI LEKHANE #MEGHDUT #NIMITTA NIMITTANE #PAVSAAADHICHAPAUS #PURVASANDHYA #RANGRESHA #RESHIMREGHA #SANGAVESEVATALEMHANUN #SANSMARNE #SUVARNAMUDRA #VARSHA
Customer Reviews
 • Rating StarMedha Phadke Marathe

  सन 2000.. लायब्ररीत एक पुस्तक दिसलं.. सुंदर मुखपृष्ठ बघून आणि शांता शेळक्यांचा अनुवाद हे वाचून लगेच उचललं गेलं.. घरी येऊन वाचायला घेतलं.. आणि.. असं काही खिळवून ठेवलंय या पुस्तकाने.. की पूर्ण होईपर्यंत हातातून खाली ठेववलंच नाही...😊☺️ नशिबाे काही दिवसांनी एका प्रदर्शनात हे दिसलं.. पटकन विकत घेतलं.. तेव्हापासूनच ही मर्मबंधातली ठेव...😊 लुईसा मे अल्कॉट या अमेरिकन लेखिकेच्या `लिटिल वुईमेन` आणि `गुड वाईव्हज्` या दोन पुस्तकांचं एकत्रीकरण म्हणजे हे पुस्तक. मार्च कुटुंबातील मेग, ज्यो, बेथ आणि एमी या चार बहिणी. भिन्न स्वभाव, भिन्न रंगरूप पण एकमेकींविषयी असलेले अपार प्रेम आपल्याला खिळवून ठेवते. गरिबीत सुद्धा स्वाभिमान जपणा-या या चार बहिणी, त्यांचं निर्मळ, निरागस, लोभस जग, त्यांच्यातील प्रेम, स्नेह, भांडणं, शेजारच्या लॉरीशी निखळ मैत्री, लॉरीचे वरवर कडक वाटणारे पण मुळात प्रेमळ, मिश्किल आजोबा, गरिबीतही या चौघींनी जपलेली नीतिमूल्यं, पैशापेक्षा अंतरीचं समाधान हे जास्त महत्वाचं असतं हे त्यांना नीट पटवून देणारी त्यांची आई - मिसेस मार्च.. हे सगळं आपल्याला मोहून टाकतं.. त्यांच्या परीने साधेपणातही त्या बहिणींनी साजरा केलेला नाताळचा सण, आई घरात नसताना आजारी बेथ ची केलेली सेवा, अफलातून पिकविक क्लब आणि पोस्ट ऑफिस ची आयडिया, त्यांची मुग्ध गुपिते, रहस्ये, मेगचे लग्न, एमी ची कलासेवा आणि बेथची साहित्यसेवा, मेगचं वैवाहिक जीवन, बेथचा मृत्यू असे हेलावणारे, सुंदर आणि मनाला भिडणारे प्रसंग या पुस्तकात आहेत.. वाचताना कुठेतरी डोळ्यांत पाणी येतं.. या नितांतसुंदर पुस्तकाचा शांताबाई शेळक्यांनी अनुवाद करणं म्हणजे अक्षरश: दुधात साखर.. इतकी ओघवती, अवीट आणि रसाळ शैली आहे शांताबाईंची.. 😊👌👌 अजून एक सांगायचं म्हणजे सन 1986 मध्ये टिव्हीचं जेव्हा एकच चॅनेल होतं त्या काळात दर रविवारी प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक अमोल पालेकर यांची `कच्ची धूप` ही तेरा भागांची नितांतसुंदर सिरीयल लागायची. ती या कादंबरीवरच बेतलेली होती. हे कळलं तेव्हापासून हे पुस्तक अधिकच आवडू लागलं.. त्यात बेथ नव्हती फक्त.. मेग म्हणजे `मैने प्यार किया` फेम भाग्यश्री पटवर्धन, ज्यो म्हणजे शाल्मली पालेकर, एमी म्हणजे पूर्णिमा पटवर्धन, लॉरी कोण होता आठवत नाही.. पण तो मुलगा अतिशय गोड होता.. लॉरीचे प्रेमळ आणि मिश्किल आजोबा म्हणजे अरविंद देशपांडे आणि लॉरीचे शिक्षक जॉन ब्रूक म्हणजे देखणा आणि त्या काळात, त्या वयात प्रचंड आवडलेला आशुतोष गोवारीकर.. 😊😊 पुस्तक वाचून झाल्यावर वाटलं काय भन्नाट कास्टिंग होतं😊👌👌👌 काल रात्री अर्धं वाचलं.. सकाळी उठून कामं आवरून जी बसले ती पुस्तक संपवून आणि संपन्न होऊन उठले☺️☺️😊😊 © मेधा फडके-मराठे(07.05.2020) ...Read more

 • Rating StarHarsh Joshi

  #आवडलेली_पुस्तके_भावलेले_संवाद_!_२ - चौघीजणी. #भावलेला_संवाद_! "लीनपणे जो जगे तयाला, पतनाचे भय कधीच नाही; कुणी न ज्याचे,देव तयाचा, सदैव सहचर होऊन राही !! मूठपसा जे मिळेल येथे, तृप्त त्यात मी सदा असावे; तुझ्या कृपेच्या सावलीत रे, सार सुाचे मला दिसावे !! चिरंतनाचा यात्रिक मी तर, हवे कशाला पार्थिव ओझे; स्वर्गामधले असीम वैभव, उद्या व्हायचे आहे माझे !!" - लुईसा मे अल्कॉट. (अनुवाद:- शांता शेळके). ("चौघीजणी" या पुस्तकातून). --------------------------------- #पुस्तकाचे_माझ्या_दृष्टिकोनातून_परीक्षण_! वरील कविता आहे शांताबाई शेळके यांनी अनुवादित केलेल्या "चौघीजणी" या पुस्तकातील ! मूळ इंग्रजी लेखिका लुईसा मे अल्कॉट लिखित "लिटिल वुमेन्" आणि "गूड वाईव्ह्स" या दोन पुस्तकांचा "चौघीजणी" या नावाने एकत्रित अनुवाद केला आहे. ही कथा आहे चार बहिणींची आणि त्यांच्या कुटुंबाची.त्यांचे वडील युद्धावर गेले आहेत,त्यांची आई आणि त्या साऱ्या कष्ट करून उपजीविका चालवीत आहेत आणि त्यांच्या आयुष्यातील चढउतार,राग,द्वेष,आनंद,समाधान,वैशिष्ट्यपूर्ण घटना ह्या साऱ्यांचे लक्षवेधी चित्रण या कादंबरीत लेखिकेने केले आहे.ही कथा लुईसा अल्कॉट हिच्याच कुटुंबाची कहाणी आहे ! असे असतानाही तटस्थपणे केलेले चित्रण फार वाखाणण्याजोगे आहे ! मेग, ज्यो,बेथ आणि ॲमी ह्या चार बहिणी,त्यांची आई,त्यांचा लॉरी नावाचा मित्र,त्याचे आजोबा आणि पुढे उत्तरार्धात त्यांची विस्तारणारी कुटुंबे आणि क्षितिजे यांचे प्रत्ययकारी वर्णन लेखिका करते ह्या प्रत्येकीच्या स्वभावांत वैविध्य आहे.पण,प्रत्येकीला बांधून ठेवणारा एक प्रेमाचा अदृश्य धागा आहे,जो कोणालाही एकमेकांपासून तुटू देत नाही,आपल्याला समृद्ध करतो ! तिसरी बहीण बेथ हीचा अपमृत्यू,त्यातून ज्योला आलेले एकाकीपण आणि त्यातून तिचे सावरणे,शिवाय लॉरीचा प्रेमभंग,ॲमीला होणारी आपल्या मर्यादांची जाणीव या घटनांनी पुस्तकाला वेगळेच लावण्य प्राप्त करून दिले आहे. शांताबाईंनी केलेला अनुवाद, हा मूळ पुस्तकापेक्षाही रमणीय उतरला आहे.कित्येक ठिकाणी तर तो अनुवाद न वाटता स्वतंत्र लेखन वाटावे,इतका सुभग झाला आहे ! अतिशय कौटुंबिक पातळीवरची, ज्यांत फार काही भडकपणा नाही ,भव्यता नाही,जी कोणत्याही विचारसरणीचे मंडन वा खंडण करीत नाहीत, कोणाही नेत्याचे उदात्तीकरण अथवा अधोदर्शन करीत नाहीत अशी पुस्तके समाजास खरेच आवश्यक असतात का,याचा विचार अंती क्रमप्राप्त ठरतो.निदान,प्रत्येक गोष्ट आणि माणूस "विचारसरणीच्या" कसोटीवर तोलून पाहणाऱ्या समाजात तर हा विचार फारच आवश्यक ठरतो.आजूबाजूचे दाहक,भेदक आणि स्पर्धात्मक वास्तव पाहिले,की अशा पुस्तकांच्या असण्याची आवश्यकता ठसते.ह्याही कादंबरीत,प्रेम,वात्सल्य,राग,हिंसा,कटुता,विद्वत्ता,नष्टचर्य आदी साऱ्या भावना आहेत, पण ह्या भावना कोठेही भडक अथवा तामस प्रकाराने दर्शविलेल्या नाहीत तर या सर्वच भावनांना स्थैर्याची किनार आणि स्थिरबुद्धित्वाची गरिमा आहे. हल्ली,आपल्या भावना प्रचंड उथळ झाल्या आहेत,समाजातील झुंडशाही टोकाची वाढली आहे.हे वास्तव कोणाही सूज्ञ माणसास अस्वस्थ करेल असेच आहे,ह्यात जराही शंका नाही.अशा वेळेस ही पुस्तके जग इतके उदात्त,सात्विक,गरिमामय आणि द्वेषशून्य असू शकते,हे ठसविण्यासाठी निःसंशय आवश्यक असतात ! "दैवदत्त प्रतिभा आणि केवळ चलाख बुद्धी यांत जमीनअस्मानाचे अंतर आहे, पण अनेकांना याची जाणीव असत नाही.विशेषतः महत्त्वाकांक्षी तरुण पुरुषांना आणि स्त्रियांना हा फरक कळण्यास फार वेळ लागतो." आणि "प्रेम लादता येत नाही" हे दोन विचार,आपल्या मनावर पुस्तक खाली ठेवताना ठसतात.आपल्यालाही हे पुस्तक समृद्ध करो,अशी आशा ! ...Read more

 • Rating StarPallavi Pathak

  लुईसा मे अल्काॅट याअमेरिकन लेखिकेने लिहिलेल्या“ Little Women “ व “Good Wives “ या दोन पुस्तकांचा एकत्रित अनुवाद म्हणजे ज्येष्ठ लेखिका शांताबाई शेळके यांचे “चौघीजणी “ हे पुस्तक. लुईसाने हे पुस्तक आपल्या बालपणीच्या अनुभवांवरून चितारले आहे . त्यातल्या ार बहिणी मेग, ज्यो , बेथ अॅमी आणि त्यांची आई मिसेस मार्च. मिस्टर मार्च रणभूमीवर गेलेले आहेत व मिसेस मार्च सैनिकांसाठी काम करत आहेत.मिसेस मार्च ही प्रेमळ पण शिस्तप्रिय , मुलींच्या भल्यासाठी प्रसंगी कठोर होणारी व जीवनमूल्यांवर नितांत श्रद्धा असणारी स्त्री. मुलींनी सद्गुणी, सद्वर्तनी असावे ,व्यक्तिमत्व उत्तम घडवावे आणि समाजाचे प्रेम व आदर संपादन करावा यासाठी ती प्रयत्नशील आहे .मेग ही देखणी, विनयशील व सौम्य स्वभावाची मुलगी . ज्यो हे कदाचित लेखिकेचेच प्रतिरूप असावे .कृश, सावळी , धडपडी , स्पष्टवक्ती आणि लेखनवाचनात रूची असणारी .बेथ लाजाळू , भाबडी , गाण्याची आवड असणारी व स्वत:च्याच विश्वात रमणारी. तर धाकटी अॅमी अगदी परीकथेतली परी ! सोनेरी केस , निळे डोळे , किंचित हट्टी , उच्चभ्रू समाजात वावरण्याची हौस असणारी .शेजारी राहणारे वृद्ध मि. लाॅरेन्स , त्यांचा खोडकर नातू लॅारी . लाॅरीला आईवडील नसल्यामुळे तो एकाकी आहे . त्याची मार्च मुलींशी गट्टी जमते .त्याचे शिक्षक मि. ब्रुक व मेग यांचे हळुवारपणे प्रेम फुलत जाते .ज्योची साहित्यक्षेत्रातली धडपड , तिचे व लाॅरीचे जिवाभावाचे मैत्र , तिचा मनस्वी स्वभाव , आयुष्यात काहीतरी भव्यदिव्य करण्याची तिची आंतरिक इच्छा , तिला भेटलेले प्रोफेसर भाअर ! साधी सरळ कष्टाळू बेथ लहान वयातच स्कार्लेट फिव्हर होऊन खंगत जाते .मोठ्या धैर्याने मृत्यूला सामोरी जाते . छोटी अॅमी आंट कॅरोल बरोबर युरोप सहलीला जाते नि परत येते ती आमूलाग्र बदलूनच !भाषा , भूषा ,अभिरूची , विचारसरणी , रितीरिवाज या सर्वच बाबतीत अव्वल असे आपल्या बालमैत्रिणीचे आकर्षक रूप लाॅरीला मोहित करते व खानदानी लाॅरेन्स कुटुंबाला साजेशी वधू मिळते .प्राप्त झालेल्या पिढीजात ऐश्वर्याचा विनियोग करून गरीब पण गुणसंपन्न लोकांना सहाय्य करण्याचा अॅमी निश्चय करते .आंट मार्च मृत्यूपूर्वी तिचे मोठे फार्महाऊस ज्यो ला देते . मुळातच ऊत्तम शिक्षिका असणारी ज्यो प्रोफेसर भाअरांच्या मदतीने तेथे तिच्या कल्पनेनुसार एक निवासी शाळा काढते. उत्तम व्यक्तीचित्रण,सहजसुंदर संवाद , हृद्य कौटुंबिक प्रसंग , कोवळ्या वयातील उत्कट भावना , भविष्याची स्वप्ने , दैनंदिन समस्या यांचे हे अतिशय हृदयस्पर्शी आणि सहज सच्च्चे चित्रण !शांताबाईंच्या ओघवत्या रसाळ भाषाशैलीमुळे अनुवाद कमालीचा रंजक झाला आहे . नकळतपणे हे पुस्तक उच्च नीतिमूल्ये व समाधानी शांत जीवनशैली यांचे संस्कार वाचकांवर घडवते तेही अगदी सहजपणे !! ...Read more

 • Rating StarANGHA BAPAT

  अतिशय सुंदर पुस्तक .स्वैरानुवाद आहे दोन्ही पुस्तकांचा एकत्र . कधीतरी मळभ आले मनावर किंवा निरुत्साही वाटू लागले की घायचे पुस्तक हातात अन त्या चौघी बहिणींपैकी एक होऊन जायचे . प्रत्येकीत स्वतःला शोधण्यात मजा येते .. करून पहा !!☺️

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

PARVA
PARVA by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
Veerashri Vaidya - Karandikar

#पर्व #डॉ_एस_एल_भैरप्पा दैवी चमत्कार , शाप , वर या महाभारतातील गोष्टीना फाटा देत त्यावेळी घडलेल्या घटना , प्रसंग ,परिस्थिती त्याचा वस्तूनिष्ठ अर्थ लावून डॉ भैरप्पा यांनी `पर्व` लिहिले आहे आहे. महत्वाच्या मुख्य पात्रांना माणूस म्हणून मांडले आहे.यासाठी महाभारतातील प्रसंग जिथे जिथे घडले तिथे त्यांनी भेटी दिल्या. अनेक अपरिचित रूढी, परंपरा त्यांना दिसून आल्या ,ज्या महाभारत कालीन जीवनात होत्या. कादंबरीमागील लेखकाचा अभ्यास ,तर्कसुसंगत विश्लेषण अगदी प्रस्तावनेपासून दिसून येते. मूळ महाभारत फार परखड आहे ,ते कोणाचेच गुण -दोष लपवत नाही, अगदी भगवान श्रीकृष्णाचे सुद्धा. व्यासांनी सगळ्या पात्रांबद्दल तटस्थपणे लिहिले आहे. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित डॉ भैरप्पांनीही नेमका हाच तटस्थपणा कादंबरीतही कायम ठेवला आहे. कोणत्याही एकाच व्यक्तीवरचे लिखाण म्हणजे त्याच्या दृष्टीकोनातून पूर्ण महाभारत बघण्यासारखे होते. यातून त्या पात्राबद्दल गुणांचे उदात्तीकरण आणि त्यामुळे दोष झाकोळणे हे होतेच , पण समग्र वाचले तर कळते महाभारत ग्रे शेड चे आहे , प्रत्येकाचे गुण-दोष असणारे. `पर्व ` ने ही हेच सूत्र कायम राखले आहे. महाभारताच्या व्यक्तिरेखांबाहेर जाणारी वेगळी अशी कोणीही व्यक्ती नाही असे म्हणतात. अगदी खरे आहे. महाभारत हे चिरंतन आहे. आपण सगळेच दैनंदिन आयुष्यात त्यातले कुठले ना कुठले पात्र जगत किंवा वठवत असतो. कधी भीष्म , कधी धृतराष्ट्र तर कधी कृष्ण सुद्धा ! पात्र चांगले किंवा वाईट असं न बघता, ते जे वागले , त्यांनी जे निर्णय घेतले - त्याचे परिणाम कसे झाले ? आपल्याला त्यांच्याकडून अपेक्षित असलेले असे योग्य निर्णय कोणते होते ? तसे योग्य निर्णय आपण दैनंदिन आयुष्यात वेळ आली तर घेतो का ? , घेऊ शकतो का ? याचे चिंतन हेच त्यातून हाती येणारे सार आहे असे मला वाटते . हे नाही जमलं तरी किमान, परीक्षण करून वागणें हे आपल्या हाती नक्कीच आहे. उमा कुलकर्णी यांच्या उत्तम अनुवादामुळे मराठी भाषेत `पर्व` आपल्यापर्यन्त नेमकेपणाने पोहोचले आहे. महाभारत काळे वा पांढरे नाही तर ग्रे शेड चे आहे. म्हणजे कुठलीच व्यक्ती पूर्ण चांगली किंवा पूर्ण वाईट नाहीये त्यात. दुर्दैवाने आपल्याला वाचताना पचत नाही ते. एकच रंग बघायला आणि समजायला सोपा असतो. म्हणूनही काहींना `पर्व ` रुचत नाही. © वीरश्री वैद्य - करंदीकर ...Read more

VAISHAKH
VAISHAKH by RANJEET DESAI Rating Star
Chetan Koli

खूप मस्त आहे हे पुस्तक... छोट्या कथा आहेत, पण लालित्यपूर्ण आहेत.