* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SANSMARANE
  • Availability : Available
  • ISBN : 9788171618309
  • Edition : 5
  • Publishing Year : 1990
  • Weight : 50.00 gms
  • Pages : 148
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :SHANTA SHELKE COMBO SET - 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A COLLECTION OF THE ARTICLES BY SHANTABAI. SHE HAS APPRECIATED VARIOUS STORIES BY VARIOUS AUTHORS. SHE WRITES HER VIEWS ABOUT `CHANGING`, THE AUTOBIOGRAPHICAL ARTICLE BY THE FAMOUS ACTRESS LEEV ULMAN. SHE ALSO DESCRIBES THE VERY OLD AUTOBIOGRAPHICAL NOVEL `DAIVLEELA` BY A MARATHI AUTHOR. SHE HAS WRITTEN ABOUT GANDHIJI, MADHAV JULIEN, TAMBE, Y. G. JOSHI, SHARATCHANDRA PUNARVASU, AND G. D. MADGULKAR. SHE DOES NOT SPARE HERSELF. SHE WRITES ABOUT HER WRITING IN DETAIL. SHE DESCRIBES THE WAY THROUGH WHICH SHE GOT FAMILIAR WITH THE SANSKRIT DRAMA `UTTAR RAM CHARIT`. SHE ALSO JOTS DOWN ABOUT THE BOOKS SHE READ AT THE VERY TENDER AGE.THESE ARTICLES WILL SHOW THE READERS THE VARIOUS PLACES IN THE FIELD OF LITERATURE OF WHICH THEY WERE NOT AWARE TILL TODAY. ALL THESE ARTICLES REVEAL SHANTABAI`S LOVE FOR LITERATURE AND HER CURIOSITY ABOUT IT.
शांता शेळके यांच्या समृद्ध भावजीवनाशी वाचकांना सलगी साधू देणारा लेखसंग्रह. शांताबाईंचा हा आणखी एक लेखसंग्रह. इथे लिव उलमन या नामवंत चित्रपटतारकेच्या `चेंजिंग` या आत्मकथनाचे रसग्रहण आहे. त्याप्रमाणे `दैवलीला` या अगदी जुन्या काळातील एका मराठी लेखिकेच्या आत्मनिवेदनपर कादंबरीचा हृद्य परिचय आहे. गांधीजी आणि माधव जुलियन, तांबे आणि य.गो.जोशी, शरदचंद्र पुनर्वसू आणि ग. दि. माडगुळकर अशा भिन्न भिन्न प्रकारच्या व्याक्तीन्विशायीचे लेखन इथे आहे. त्याप्रमाणे आपल्या स्वतःच्या वेगवेगळ्या लेखानाबाद्दळी शांताबाई इथे मनमोकळेपणाने लिहितात. " उत्तर रामचरित " या सुप्रसिद्ध संस्कृत नात्याकृतीशी आपली हळूहळू होत गेलेली ओळख जशी त्यांनी इथे रसाळ पाने सांगितली आहे. त्याप्रमाणे बाळपणी वाचनात आलेल्या नाना प्रकारच्या पुस्तकांबद्दलही त्यांनी इथे निवेदन केले आहे. साहित्य आणि जीवन डोहोन्बाद्धाल्चे शांताबाईंचे उत्कट कुतूहल आणि त्यांची सर्वस्पर्शी रसिकता यांचा उत्तम प्रत्यय " संस्मरणे " मधील लेखांमधून वाचकांना येईल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#आंधळी#कॅथरिन ओवेन्स पिअर#कादंबरी# शान्ता ज.शेळके#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#THE HELENKELLERSTORY #CATHERINEOWENSPEARE #SHANTAJ.SHELKE #ANDHALI #ANDHALYACHE DOL #ANOLAKH #ANUBANDH #CHAUGHIJANI #GAVATI SAMUDRA #GONDAN #KAVITA SMARANATALYA #KINARE MANACHE #LEKHAK ANI LEKHANE #MEGHDUT #NIMITTA NIMITTANE #PAVSAAADHICHAPAUS #PURVASANDHYA #RANGRESHA #RESHIMREGHA #SANGAVESEVATALEMHANUN #SANSMARNE #SUVARNAMUDRA #VARSHA
Customer Reviews
  • Rating StarManasi Swapnil Javal

    संस्मरणें .. शांत शेळके यांनी लिहलेलं हे पुस्तक त्यांच्या वेगवेगळ्या लेखांचा संच आहे .. साहित्यप्रेम काय असते याचा एक उत्तम नमुना हे पुस्तक आहे .. वाचन माणसाला किती प्रगल्भ , समृद्ध आणि समाधानी बनवत हे जाणवलं हे पुस्तक वाचून .. त्यांनी या पुस्तात व्यक्ती आणि साहित्य यांच्या वेगवेगळ्या अनुभवनाचे तरल चित्रण केले आहे .. साधी आणि सरळ भाषाशैली हे एक विशेष आहे या पुस्तकाचे .. सगळे लेख जणू शांताजी आपल्याला सांगतच आहेत असे वाटते .. पाऊलवाटा आणि जुनीओळख हे लिखाण साहित्याची ओळख कशी झाली, वाचनाची आवड , दिशांहीन वाचन याबद्दल आहे .. ना झालेल्या भेटी मध्ये एका साहित्यकाला भेटण्याची ओढ इतकी सुंदर वर्णिली आहे जणू आपण पण त्यास भेटावे असेच वाटते .. गांधी माझे माझ्यापुरते यात असामान्य व्यक्तींचा सामान्य व्यक्तींवर काळात नकळत कसा परिणाम होतो हे दाखवून दिले आहे .. कवितांबद्दल असलेली त्यांची आत्मिक ओढ , अनुवाद करताना मूळ लेखक व कविला त्यांनी किती समजून घेतले ते समजते .. बेथ या लेखात एका साधारण मुलीमधले साधेपण त्यांना कसे भुरळ घालते , माझ्या कवितांची जन्मकथा हाही एक सुंदर लेख आहे .. त्यातील कवितेच्या ओळी मोहक आहेत .. एक गाव आठवणीतले यातून आपण सुद्धा आपल्या बालपणातल्या उन्हाळी सुट्टीत गावी जातो असेच वाटते .. ज्या कोणाला ललित लिखाण वाचायला आवडते त्याने हे पुस्तक जरूर वाचावे .. ...Read more

  • Rating StarSAPTAHIK SINHASAN 07-03-1999

    शांता शेळके यांच्या समृद्ध भावजीवनाशी वाचकांना सलगी साधू देणारा लेखसंग्रह... शांता शेळके यांच्या ‘संस्मरण’ या पुस्तकातील आठवणींचा खजिना सर्वात जास्त वाचकांना दिपवून टाकील तो त्यांच्या कमालीच्या नितळ आत्मीय शैलीमुळे! शांताबाई प्रत्यक्ष आपल्याशी मोकळेणानं बोलत आहेत, आपल्या अंतरीच्या सुख-दु:खात आपल्याला जीवाभावाच्या मित्राप्रमाणे सामील करुन घेत आहेत, आपल्याशी बरोबरीच्या नात्याने संवाद साधत आहेत, असे वाचकाला पानोपानी वाटत राहते आणि त्या सलगीची भूलही पडते. या पुस्तकात शांताबार्इंनी आपल्या वाचनाच्या वेडाबद्दल सांगितले आहे, आपल्या घरच्या पुस्तक संग्रहाबद्दल सांगितले आहे. नाट्यवेडाबद्दल, स्त्रियांच्या ओव्या-लोकगीते-गाणी यांच्याबद्दल सांगितले आहे. आपल्या पाठांतराच्या शक्तीचे अनेक दाखले देऊन वाचकांना चकित करून सोडण्याचा विडाच त्यांनी उचलला आहे. कांदबरी या प्रकारात थोडीफार प्रयोगशीलता दाखवूनही हा एक आपल्याला न जमलेला वाङ्मय प्रकार आहे, याची कबुली दिली आहे. काव्याचा अनुवाद करताना जो आनंद मिळाला त्याचेही काही नमुने दिले आहेत. चिनी कविता आणि जपानी हायवूâ यांचे अनुवाद करताना कोणकोणत्या अडचणी आल्या यांचीही माहिती दिली आहे. हिमवर्षात ही चँग वू चिएन या चिनी कवीची कविता शांताबार्इंनी तिचा अनुवाद असा केला आहे. मी तुला दिलेला लाल भडक गुलाब तू खुशाल धुळीत पडू दिलास मी तो उचलला आता तो पांढराफटक दिसत होता त्या एका निमिषात आपल्या प्रितीवर हिमवर्षाव झाला होता. लालभडक गुलाबाप्रमाणे आपल्या प्रेमाची दिलेली हाक प्रियकराने नाकारली आणि तो गुलाब खाली जमिनीवर टाकला या त्याच्या नकारात्मक भूमिकेवर निसर्गानेही जणू हिम वर्षाव करून शिक्कामोर्तब केले. त्या फुलाला पांढरेफटक रुप देऊन, ‘पांढऱ्या कपाळाची’ हा संकेतही येथे भारतीय पार्श्वभूमीवर आणखी एक अर्थाचा पदर या शब्दयोजनेला देऊन जातो. हायकू तीन ओळींचा असतो. शांताबार्इंनी त्यांचे अनुवाद करताना कधी कधी चार ओळीही वापरल्या. उदा. एकेक चार ओळी वेड भरविले कसले चंद्रा शेजारच्या उरी? खुळा रात्रभर बसला होता वाजवीत बासरी! ज्ञानेश्वरांची एक ओवीही त्यांना हासकूसारखी वाटते तीही त्यांनी दिली आहे. कमळावर भ्रमर पाय ठेवती हळुवार कुचंबैल केसर इया शंका।। अनुवाद करताना अनेक प्रश्न त्यांना पडतात. अडचणी जाणवतात. त्याबद्दल त्या म्हणतात, ‘अनुवाद शब्दश: करावा की भावानुवाद करावा? कधी कधी शब्दश: अनुवाद करण्यापेक्षा मूळ कवितचा आत्मा (स्पिरिट) शब्दातून व्यक्त करणे जास्त आवश्यक असते. आपण आपल्या भाषासरणीत पक्क रुजलेले असतो. वेगळ्या भाषेतील कविता मराठीत अनुवादित करताना आपली भाषा मोडणे आवश्यक ठरते, पण हे नेहमी जमतेच असे नाही. संस्कृतमधील समासप्राचुर्यामुळे थोड्या जागेत खूप काही सांगितलेले असते. मराठीत त्या वृत्तांत तेवढा आशय आणणेच शक्य नाही. मेघदूतसारख्या काव्याचा समश्लोकी अनुवाद करणे जवळजवळ अशक्यच आहे. अनुवाद का करावेसे वाटतात? कधी कधी मूळ कविता अगदी आपलीच वाटते. मनात येते, अरे हे तर सारे माझेच! मग ती खंत निवारण्यासाठी त्या कवितेचा मराठीत अनुवाद करावा, असे वाटते. प्रसंगी त्या कवितेत आपले स्वत:चेही आपण खूप घालतो. मग तो मुक्त किंवा स्वैर भावानुवाद होतो. आपल्या काही कवितांच्या जन्मकथाही त्या सांगतात. नॅशनल जिऑग्रॉफिक हे मासिक चाळताना गडद निळा समुद्र आणि त्यातून वर आलेले हिरवेगार वनराईने नटलेले एक देखणे चिमुकले बेट असे चित्र त्यांना दिसते. त्या मंत्रमुग्ध होतात. आपण त्या बेटावर उभ्या आहोत असे त्यांना वाटते आणि एकदम कवितेच्या ओळी सुचतात.’ निळा निळा समुद्र आणि बेट पाचुचे मध्ये तिथेच मी, तिथेच मी मनात कोणीसे वदे उभा समोर वृद्ध माड हालवीत झावळी जळात गाई अप्सास उदास धून सावळी! पुराण शिंपल्यामधून गाज तीच ये पुन्हा तलात खोल जागल्या अनंत जन्मीच्या खुणा रितेच हात राहिल स्मृति कितीक वेचुनी निळा निळा समुद्र गूढमिटूनी जाय लोचनी कविता अशा प्रकारे चित्रे पाहून सुचतात, विशिष्ट स्थळे पाहून सुचतात, काही व्यक्तींमुळे सुचतात. कवितेवरुनही सुचतात. प्रतिमांवरुन सुचतात. माणसामाणसातले तुटलेले संबंध, परस्परांशी जवळीक साधताना येणारे अपयश - शब्द व स्पर्श यांच्या मर्यादा - या सर्वांमुळेही कविता सुचतात. पूर्वी आपल्या कविता वर्णनपर, स्पष्टिकोणात्मक असत, आता त्या प्रतिमेच्या आश्रयाने निर्माण होतात असे त्या म्हणतात. ‘परंतु प्रत्यक्ष निर्मितीचा भाग बराचसा बहेतुक आणि गुढताच गुरफटलेला असतो’ असेही त्यांना वाटते. अनेक कविता व गीते अर्धवट सुचतात आणि मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात पडून राहतात. त्या पूर्ण कधी होतील - हे कळत नाही, त्यांची साद पुन्हा कधी येते याची केवळ वाट बघायची असते असे त्यांना वाटते. ‘घोडेगाव’ या गावी त्यांचे आजोबा सबरजिस्ट्रार होते. त्या गावातले आपले घर, आपले शेजारी, नायकांच्या घरची पुस्तके, उंच धिप्पाड, टोप पदरी लुगडे नेसलेली हौसा मावशी (मुली आहेत पण मुलगा नाही हे तिचे दु:ख), घोडेगावातली शेवटची दिवाळी या सर्वांच्या आठवणी सांगून शांताबाई म्हणतात, ‘एखाद्या सुंदर स्वप्नासारखे घोडेगाव माझ्या आयुष्यात आले आणि स्वप्नांसारखेच ते पुन्हा अदृश्य झाले.’ याशिवाय कथाकार य. गो. जोशी, गीतकार ग. दि. माडगूळकर, कवी माधव ज्युलियन, शशिकांत पुनर्वसू, भा. रा. तांबे यांची कविता, लिव उलमनचे आत्मकथन (चेंजिग) यांच्यावरही शांताबाईनी भरभरून लिहिले आहे. आपल्या आणि माधव ज्युलियन याच्या वयात खूप अंतर आहे आणि माधव ज्युलियन यांना आपण पाहिलेले नाही असे सांगूनही शांताबाई त्यांच्याबद्दल वाटणारे ममत्व प्रकट करतात. ‘त्यांच्या काव्यात्मक, तडफदार, मानी व्यक्तिमत्वाचे एक सुंदर अपार्थिव चित्र मनात तयार झाले. ते चित्र अजूनही अभंग, निर्मळ, अकलंकित आहे. तरुण, स्वप्नाळू, भावूक वयात माधव ज्युलियन हे मला नि:संकोच प्रीतीचा निर्भय आविष्कार करणाऱ्या, स्त्रियांचा कैवार घेणाऱ्या, अन्यायाविरुद्ध तडपेâने झुंजणाऱ्या एखाद्या मध्ययुगीन शूर शिलेदारासारखे वाटत, आज मला ते तसे वाटत नाहीत... आजचा शब्द वापरायचा तर ते त्यांच्या काळातले आऊसायडर होते, त्यांचे हे रूप मला विशेष आवडते, जवळचेहि वाटते... आजही त्यांच्या कविता मी वाचते. जुन्या धुंदीचा, ध्येयवादाचा, स्वप्नरंजनाचा आनंद अनुभवते.’ ‘’‘साहित्य आणि नितिमत्ता’ या लेखात शांताबाई कलावंतांच्या नैतिक अनैतिकतेचे निकष वेगळे आहेत असे म्हणून नैतिक व लैगिक प्रमादांपेक्षा त्याचे चरित्र्य त्या कलात्मक निकषांवर ठरवणे योग्य आहे. असे प्रतिपादन करतात. सर्जनाची ऊर्मी, तीव्र कल्पनाशक्ती... यामुळे त्याच्या काही शारीर गरजा इतरांपेक्षा अधिक मोठ्या असतात याची निदान जाणीव ठेवणे तरी आवश्यक आहे. शारीर गोष्टीशी निगडीत असणाऱ्या आपल्या नीतिकल्पना या कालसापेक्ष, परिवर्तनशील असतात. त्यामुळे त्यावरून कलावंतांचे चारित्र्य जोखणे योग्य नाही. साहित्यनिष्ठा आणि कलेची अव्यभिचारी साधना या गोष्टी त्यांच्या लैंगिक प्रमादापेक्षा श्रेष्ठ मानायला हव्या असा त्यांच्या प्रतिपादनाचा आशय. महात्मा गांधीजींची आपल्या बालमनात निर्माण झालेली तेजोमूर्ती पुढे प्रसंगानुरूप कशी अधिकाधिक तेजस्वी होत गेली आणि त्यांच्या हत्येने विलक्षण व्याकुळ मन:स्थिती झाली, त्याचा हृदयस्पर्शी आलेख ‘गांधीजी माझे, माझ्यापुरते’ या लेखात शांताबार्इंनी काढला आहे. एकूणच शांताबार्इंच्या भावविश्वाशी वाचकांना जवळीक साधू देणारा हा सगळा ऐवज आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more