* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MY JOURNEY TRANSFORMING DREAMS INTO ACTIONS
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788184985634
  • Edition : 5
  • Publishing Year : SEPTEMBER 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 168
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : MEMOIR
  • Available in Combos :DR. A. P. J. ABDUL KALAM COMBO SET - 4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MY JOURNEY: TRANSFORMING DREAMS INTO ACTIONS IS THE LIFE STORY OF INDIA`S ELEVENTH PRESIDENT, DR. A. P. J. ABDUL KALAM, WHO STARTED OFF AS AN INSIGNIFICANT LITTLE BOY RAMESWARAM, BUT ENDED UP BECOMING THE PRESIDENT OF THE COUNTRY, BESIDES BEING A BRILLIANT SCIENTIST AS WELL. THE BOOK PORTRAYS THE STRUGGLE THAT DR. KALAM HAD TO ENDURE, AS HE CLIMBED THE LADDER OF SUCCESS IN LIFE. HE SPEAKS AT LENGTH ABOUT EACH AND EVERY INDIVIDUAL WHO IMPACTED HIS LIFE, DURING HIS FORMATIVE YEARS AS A CHILD AND EVEN WHEN HE WAS A YOUNG ADULT. HE SPEAKS ABOUT THOSE WHO WERE THE CLOSEST TO HIM, SUCH AS HIS FATHER, WHO LOVED GOD DEEPLY. HE ALSO TALKS ABOUT HIS MOTHER AND HER KINDNESS. APART FROM HIS PARENTS, HE SPEAKS ABOUT HIS MENTORS, WHO MOLDED HIS THOUGHTS AND DIRECTED HIS ACTIONS. MY JOURNEY: TRANSFORMING DREAMS INTO ACTIONS IS A BOOK THAT OFFERS YOU MANY EMOTIONAL ACCOUNTS BY DR. KALAM, WHICH SPEAK OF HIS LIFE IN A SMALL TOWN BY THE BAY OF BENGAL. HE TELLS HIS READERS ABOUT THE MANY TIMES WHEN HE WOULD FEEL DEJECTED IN LIFE AND WAS ON THE VERGE OF GIVING UP. HE MENTIONS THAT HE GAINED STRENGTH IN THOSE TIMES FROM SPIRITUALITY AND CERTAIN BOOKS. ALL IN ALL, THE BOOK GIVES YOU VALUABLE AND FIRST-HAND INFORMATION ON LIFE ITSELF.
देशातील नामवंत शास्त्रज्ञ व ज्येष्ठ विचारवंत डॉ. कलाम यांच्या जीवनयात्रेतील स्फूर्तिदायी आठवणी... रामेश्वरमच्या सागरतीरावरील अल्लडवयीन मुलगा ते भारताच्या राष्ट्रपतीपदी विराजमान होणारा बुद्धिमान शास्त्रज्ञ व थोर विचारवंत... या दरम्यानची डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जीवनयात्रा म्हणजे दृढनिश्चय, धाडस, चिकाटी आणि सर्वोत्कृष्टतेचा ध्यास यांचा विलक्षण मिलाफ आहे. या जीवनयात्रेदरम्यानच्या आठवणी, भेटलेली माणसं, ठळक प्रसंग त्यांनी या पुस्तकातून वाचकांसमोर उलगडले आहेत. त्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणार्‍या व्यक्ती, त्यांचे जिवलग, मार्गदर्शक, गुरू या सगळ्यांबद्दल त्यांनी अतिशय प्रेमानं व आपुलकीनं लिहीलं आहे. आयुष्यात या स्थानावर पोहोचताना त्यांनी केलेला त्याग, संघर्ष आणि जिद्द यांच्या वाटचालीची कहाणी वाचताना वाचक भारावून जातो. ही विलक्षण जीवनयात्रा मार्गदर्शक, स्फूर्तिदायी आणि प्रेरक आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #INDOMITABLE SPIRIT#A.P. J.ABDULKALAM #ADAMYAJIDDA #SUPRIYA VAKIL #सुप्रियावकील #अदम्य जिद्द #MAZI JIVAN YATRA# MY JOURNEY TRANSFORMING DREAMS INTO ACTIONS #TURNING POINTS #अंजनी नरवणे #ANJANI NARAWANE"
Customer Reviews
  • Rating Starसुनील वळसे-दुबई

    मित्रहो, अपयश हा यशाचा पहिला मार्ग आहे हें आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलो आहोत. टॉम वॅटसन म्हणतात कि तुमचे प्रयत्न असफल होत असतील तर तुम्ही दुप्पट वेगाने प्रयत्न करा. प्रत्येक थोर व्यक्तींची कथा ही अपयशाचीही कथा असते. मग ह्या थोर लोकांचे वेगळेपण काय सते? ही माणसे प्रत्येक अपयशातून बोध घेऊन पुन्हा जोमाने उभी राहतात. माणसाला दोन गोष्टी हुशार बनवतात वाचलेली पुस्तके आणि भेटलेली माणसे. आज पहिल्याच पुष्पामध्ये मी परिचय करून देणार आहे माझ्या सगळ्यात आवडत्या पुस्तकाचे आणि ते म्हणजे डॉ.एपी जे अब्दुल कलाम यांनी लिहिलेले "माय जर्नी " या पुस्तकाविषयी. हे पुस्तक पहिले घेण्याचे कारण म्हणजे जेव्हा जेव्हा मी आयुष्यामध्ये नाउमेद झालो किंवा आपला ट्रॅक सुटतो आहे असे मला वाटायला लागले, त्यावेळी या पुस्तकाने मला नेहमी जगण्याची ऊर्जा आणि स्वप्न पाहण्याची ताकद दिली. आणि म्हणून हे पुस्तक मला नेहमी जीवनाचा साथीदार वाटते. लेखिका सुप्रिया वकील यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद खूप सुंदर भाषाशैलीमध्ये केलेला आहे. चला तर जाणून घेऊ, या पुस्तका विषयी. भारताचे अकरावे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे नाव अवघ्या जगाला सुपरिचित आहे. भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील आपल्या अतुल्य योगदानाद्वारे त्यांना जगाच्या क्षितिजावर नावारूपाला आणलं. “ माझी जीवन यात्रा “ हे एपीजे अब्दुल कलाम यांचे जीवन चरित्र आहे. डॉक्टर अबुल पाकिर जैनुलब्दीन कलाम यांचा जन्म तामिळनाडूतील रामेश्वर येथे झाला. मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये त्यांनी “एरोनॉटिकल इंजीनियरिंग” चा अभ्यास केला. भारताचा पहिला उपग्रह अंतराळात पाठवण्यासाठी चा प्रक्षेपक “SLV-3” तयार करण्यात त्यांनी महत्वाची कामगिरी बजावली आणि त्या प्रक्षेपकाद्वारा १९८० मध्ये "रोहिणी" उपग्रह प्रक्षेपित केला. या त्यांच्या कामगिरीमुळे भारताचा "स्पेस क्लब" मध्ये प्रवेश झाला . त्यानंतर भारताची महत्वाची क्षेपणास्त्रे तयार करून ती कार्यान्वित करण्यात आली आणि १९९८ मध्ये भारतात अणू चाचण्या घडविण्यात ही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. देशातील अग्रणी शास्त्रज्ञ तसेच "टेक्नोलॉजी इन्फोर्मेशन आणि फॉरकास्टिंग अँड असेसमेंट कौन्सिल"चे अध्यक्ष म्हणून पाचशे तज्ञांच्या मदतीने टेक्नॉलॉजी विजन २०२०, तयार करून एक प्रगत राष्ट्र म्हणून भारतामध्ये बदल घडवून आणण्यात त्यांचा पुढाकार होता. १९८१ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने , १९९० मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. २५ जुलै २००२ रोजी डॉक्टर कलाम भारताचे राष्ट्रपती बनले, ते देशाचे अकरावे राष्ट्रपती होते. "माझी जीवन यात्रा" मध्ये अब्दुल कलाम यांनी त्यांच्या ऐंशी वर्षांच्या आयुष्यातील, अगदी बालपणापासून ते वयाचा ऐंशीच्या टप्पा पार करेपर्यंतच्या काळातील काही खास आठवणी जागवल्या आहेत. या सगळ्या प्रवासात अनुभवांचे हे सगळे खंड वेचताना मी एक महत्त्वाची गोष्ट शिकलो आणि ती म्हणजे प्रत्येकाने आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर स्वप्न उराशी बाळगली पाहिजेत आणि मग ती साकार करण्यासाठी कठोर मेहनत घेतली पाहिजे. असं केल्यास यश दूर नाही. अब्दुल कलाम सांगतात ही स्वप्न म्हणजे आपल्याला झोपेत पडतात ती नव्हेत ही स्वप्न अशी असली पाहिजेत जी आपल्याला झोपच येऊ देणार नाहीत. या पुस्तकात त्यांनी आयुष्यात आजवर न लिहिलेल्या छोट्या छोट्या फारशा परिचित नसलेल्या गोष्टी लिहिल्या आहेत. त्यांच्या आई वडिलांच्या आठवणी लिहिल्या आहेत. ते सांगतात, त्यांच्या आई वडिलांनी जी मूल्य व नीतिमत्तेची जाणीव रुजवली ती त्यांनी शेवटपर्यंत आत्मसात केली. एकदा अब्दुल कलाम यांचे स्नेही प्रोफेसर अरुण तिवारी यांनी त्यांना एक वेगळाच प्रश्न केला, कलाम साहेब तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रवास एका वाक्यात कसे सांगाल ? त्यांच्या या प्रश्नावर त्यांनी काही वेळ विचार केला आणि म्हणाले, माझ्या आयुष्याबद्दल म्हणता येईल की भरभरून प्रेम लाभले लहान मुल...... संघर्ष.... आणखी संघर्ष.... दुःखाचे कढत अश्रू ..... मग आनंदाश्रू ........ आणि अखेर सुंदर व सुफल आयुष्य ..... पूर्ण चंद्रबिंब उमटताना पहावं तसं..... ! या पुस्तकाचा शेवट करताना कलाम साहेब म्हणतात कठोर परिश्रम, निष्ठा, अभ्यास आणि ज्ञान उपासना अनुकंपा आणि क्षमाशीलता या गोष्टी माझ्या जीवनात पायाभूत आहेत. या वैशिष्ट्यांची कहाणी मी जगाला अगदी मुळापासून सांगितली आहे. खरंतर कोणाचेही आयुष्य इतरांना सांगणे म्हणजे विचार व भावना यांचा खजिना खुला करणं असतं, जीवन नामक आश्चर्याला हे विचार व भावना झळाळी देत असतात या प्रक्रियेमध्ये जर या गोष्टींनी माझ्या वाचकांना स्वप्नांना पंख दिले त्यांच्या मनात स्वप्नांचे स्फुल्लिंग चेतवले तर देवाने मला जे आयुष्य दिलं त्यातही माझी छोटीशी भूमिका मी बजावली असे मी समजेल. माझी खात्री आहे हे पुस्तक प्रत्येकाला त्यांची स्वप्न जाणून घेण्यास व ती साकार करण्यासाठी परिश्रम करण्यास भाग पाडेल, आणि हे स्वप्नच त्यांना जागृत ठेवतील. धन्यवाद .... ...Read more

  • Rating StarSachin

    This book was very that do our inspire

  • Rating StarNEWS PAPAR REVIEW

    सर्जनशील आणि चिंतनगर्भ दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या तीन पुस्तकांचा मराठी अनुवाद करण्याची संधी मिळाली. अनुवादाच्या निमित्ताने डॉ. कलाम यांचे उत्तुंग व्यक्तिमत्व समजून घेताना आलेले अनुभव विलक्षण आनंददायी आणि तितकेच प्रेरणादायी ोते... सन २००८ मध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचं Indomitable Spirit हे पुस्तक पुण्याच्या मेहता पब्लिशिंग हाऊस यांच्याकडून मराठी अनुवादासाठी माझ्याकडे आलं. डॉ. कलाम यांनी विविध प्रसंगी, विविध ठिकाणी केलेली भाषणे, संवाद, चर्चा यांचं हे संकलन वाचताना मी अतिशय भारावून गेले होते. रामेश्वराच्या सागरतीरापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंतच्या त्यांच्या प्रवासाचं लख्खं प्रतिबिंब असणाऱ्या या पुस्तकात त्यांच्या जीवनविषयक दृष्टिकोनाचे आणि चिंतनाचे सार आहे. या चिंतनशील विचारवंताच्या लेखणीतून उमटलेले शब्द मराठीत अनुवादित करणं हे माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचं असलं तरी त्यासोबत अर्थातच मोठी जबाबदारीही होती. विकसित भारताचे स्वप्न पाहणारा थोर द्रष्टा नेता, मूल्यप्रेमी, देशभक्त, सच्चा ज्ञानोपासक आणि कवीमनाचा शास्त्रज्ञ अशा अनेक रूपांत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम Indomitable Spirit या पुस्तकाच्या पानापानातून उलगडत गेले, भेटत गेले. त्यांचा साधेपणा, ऋजुता, त्याग, संघर्ष, जिद्द सारंच मनाला भिडत गेलं. त्यांच्या साध्या वाटणाऱ्या शब्दांच्या आशयघनतेमुळे आणि नेमकेपणामुळे अनुवादाचं काम अधिकच आव्हानात्मक होतं. त्यांच्या तळमळीच्या शब्दांना मी माझ्या कुवतीनुसार मराठीत आकार देत गेले आणि मराठी ‘अदम्य जिद्द’ तयार झालं. या पुस्तकाच्या आजवर सात आवृत्त्या झाल्या असून वाचकांचा या पुस्तकाला खूप चांगला प्रतिसाद लाभतो आहे. या पुस्तकासाठी वाचकांची बरीच पत्रे, फोन, मेसेज आले आहेत. अनेकजण प्रत्यक्ष भेटल्यावरही अभिप्राय देत असतात. अशावेळी त्यांचे भारावलेले शब्द ऐकले किंवा वाचले की डॉ. कलाम आणि मराठी वाचक यांच्यातील दुवा बनण्याचं भाग्य मला लाभलं आहे, याचा मला प्रत्येकवेळी नव्यानं आनंद होतो, अपार समाधान लाभतं. ‘अदम्य जिद्द’ नंतर २०१४ मध्ये त्यांचं ‘माय जर्नी’ हे दुसरं पुस्तक माझ्याकडं अनुवादासाठी आले. ‘अदम्य जिद्द’मुळं त्यांच्या लेखनशैली, विचारांशी आणि त्यांच्या कार्याशी परिचय घडलाच होता, त्यामुळे या अनुवादाला मी आनंदानं सुरुवात केली. सप्टेंबर २०१४ मध्ये ‘माझी जीवनयात्रा’, ‘स्वप्ने साकारताना’ या शिर्षकानं हे पुस्तक मराठीत आलं. डॉ. कलाम यांनी वयाच्या ऐंशीचा टप्पा पार करेपर्यंतच्या काळातील काही खास आठवणी या पुस्तकात जागवल्या आहेत. ‘या पुस्तकातील आठवणी माझ्या सर्व वाचकांना त्यांची स्वप्नं जाणून घेण्यास व ती साकार करण्यासाठी परिश्रम करण्यास भाग पाडतील. ही स्वप्नंच त्यांना जागृत ठेवतील’, असा त्यांना आशावाद होता. त्यांचं बालपण, तेव्हाची परिस्थिती, रामेश्वरम, सागराची गाज, आई-वडिलांची माया, बहिणीचं आणि तिच्या पतीचं निःस्वार्थी प्रेम, आईच्या हातचं साधंसं, पण अमृततुल्य भोजन, तिच्या हातची गुळगुळीत वाटलेली मऊ, मलईदार चटणी, चक्रीवादळाचं तडाखे, अभ्यासात रुंदावू लागलेल्या कक्षा, स्टार विद्यार्थी, आठव्या वर्षापासून सुरू झालेले कष्ट आणि त्यानंतर एकेक टप्पा पार करीत राष्ट्रपती पदापर्यंतची वाटचाल. हे सगळं वाचताना आपण भारावून नाही गेलो तरच नवल! ‘अदम्य जिद्द’मध्ये त्यांनी त्यांचे शिक्षक, स्फुर्तिदायीदायी व्यक्तित्वं याच बरोबर विकसित भारताची उभारणी, चिरंतन मूल्ये, सर्जनशीलता, सुजाण नागरिकत्व अशा अनेक विषयांना अभ्यासपूर्ण स्पर्श करत त्यांच्यातील रसिक कवीमनाचे आणि अत्यंत संवेदनशील मूल्यनिष्ठ व्यक्तीचे दर्शन घडवले आहे. त्यांच्या या तळमळीचा, उत्साहाचा आणि सकारात्मकतेचा आपल्यालाही स्पर्श घडतो. डॉ. कलाम ‘बोले तैसा चाले’ चे मूर्तिमंत उदाहरण आहेत, असं ही पुस्तकं वाचताना पानोपानी जाणवत राहतं. त्यांनी ‘माझी जीवनयात्रा’मध्ये म्हटलंय, ‘आपण जेव्हा अडथळ्यांवर मात करायचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला आपल्यात दडून असलेलं धैर्य आणि लवचिकता लक्षात येते. तोवर कधीही आपल्याला आपल्यातलेच हे गुण कळलेले नसतात. ज्यावेळी आपल्याला अपयशाचा सामना करावा लागतो, त्याचवेळी आपल्यामध्ये हे गुण नेहमीच होते, हे लक्षात येतं. गरज असते ती फक्त हे गुण शोधण्याची आणि आयुष्यात पुढे वाटचाल करत राहण्याची!’ या दोन्ही पुस्तकात त्यांनी त्यांच्या यशापयशाची कहाणी, त्यातून शिकलेले धडे याबद्दल सांगताना विकसित भारताचं स्वप्नही रूजवलं आहे. अध्यात्म आणि विज्ञानाचा उत्तम मिलाफ घडवणारे चिंतनशील विचारवंत व शास्त्रज्ञ डॉ. कलाम या पुस्तकात म्हणतात ‘मी या सगळ्या गोष्टी का सांगतोय? माझा खूप वेगवेगळ्या विषयांशी व लोकांशी संबंध आला आहे. त्यामध्ये आयुष्याचा जवळपास प्रत्येक पैलू मी पाहिला आहे. हे मती गुंग करणारं आहे. कदाचित त्यामुळे हे सांगावं असं वाटत असेल की, मी या साऱ्यातून माझा रस्ता शोधला आहे आणि माझ्या या स्मरणयात्रेतून जर कुणा अशाच परिस्थितीतून जाणाऱ्या माणसांना जीवनातली लहरी वाटा-वळणं समजून घेण्यास मदत झाली, तर मला आपण फक्त स्वत:साठी जगलो असं न वाटता इतर असंख्य लोकांसाठी जगलो असं वाटेल.’ ‘माझी जीवनयात्रा’चा समारोप करताना त्यांनी म्हटलं आहे, ‘जर या गोष्टींनी माझ्या वाचकांच्या स्वप्नांना पंख दिले. त्यांच्या मनात स्वप्नांचे स्फल्लिंग चेतवले तर दैवाने मला जे आयुष्य दिलंय त्यामधली माझी छोटीशी भूमिका मी बजावली असं मी समजेन’ किती साधं, निगर्वी व्यक्तिमत्त्व आणि सर्वांनाच विचारप्रवृत्त करणारे व आदर्शवत असे अनमोल विचारधन! कलामसाहेब, तुमच्या कार्यातून, तुमच्या शब्दातून आणि विचारातून तुम्ही आमच्या मनात स्वप्ने, आदर्श आणि मूल्ये रूजवली आहेत. या साऱ्यातून तुम्ही सदैव आमच्यासोबत राहात असा मला विश्वास आहे. कलाम साहेब, सलाम!!! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more