DEEPA PORE

About Author

Birth Date : 22/09/1976


DEEPA PORE, WHO LOVES READING, WAS BORN IN WAI. SHE GRADUATED IN CHEMISTRY FROM THE S.P.COLLEGE IN PUNE, FOLLOWED BY ADVANCED COMPUTER DIPLOMA. SHE IS CURRENTLY WORKING AS A TEACHER IN PRIVATE CLASSES AND HER CHILDRENS STORIES HAVE BEEN PUBLISHED IN IMPORTANT DIWALI ISSUES AND MAGAZINES. EDUCATION : B.SC. (CHEMISTRY) SHE HAS BEEN WORKING AS A TEACHER IN GYANGANGA ENGLISH MEDIUM SCHOOL PUNE FOR THE LAST 8 YEARS.

वाचनाची आवड असलेल्या दीपा पोरे यांचा जन्म वाई येथे झाला. त्यांनी पुण्यातील स.प. महाविद्यालय येथून केमिस्ट्रीतून पदवी संपादन केली असून त्यानंतर अ‍ॅडव्हान्स कॉम्प्युटर डिप्लोमा केला आहे. त्या सध्या खासगी क्लासेसमध्ये शिक्षिका म्हणून काम करत असून त्यांच्या बालकथा महत्त्वाच्या दिवाळी अंकांतून व मासिकांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. शिक्षण : बी.एस.सी. (केमिस्ट्री) गेली ८ वर्षें ‘ज्ञानगंगा इंग्लि मीडियम स्वूÂल’ पुणे येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
DNYANADA NIBANDHMALA Rating Star
Add To Cart INR 110

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोहोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ...Read more

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
मिलिंद रोहोकले

फारच छान आहे