* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: WHATEVER YOU DO, DONT RUN
 • Availability : Available
 • Translators : MANDAR GODBOLE
 • ISBN : 9788184986242
 • Edition : 2
 • Publishing Year : JANUARY 2015
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 232
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : MEMOIR
Quantity
Buying Options:
 • Ebooks:
 • Print Books:
A HILARIOUS, HIGHLY ORIGINAL COLLECTION OF ESSAYS BASED ON THE BOTSWANA TRUISM: “ONLY FOOD RUNS!” WITH A NEW INTRODUCTION AND NEW MATERIAL FROM THE AUTHOR IN THE TRADITION OF BILL BRYSON, A NEW WRITER BRINGS US THE LIVELY ADVENTURES AND BITING WIT OF AN AFRICAN SAFARI GUIDE. PETER ALLISON GIVES US THE GUIDE’S-EYE VIEW OF LIVING IN THE BUSH, CONFRONTING THE WORLD’S FIERCEST TERRAIN OF WILD ANIMALS AND, MOST CHALLENGING OF ALL, MANAGING HERDS OF GAPING TOURISTS. PASSIONATE FOR THE ANIMALS OF THE KALAHARI, ALLISON WORKS AS A TOP SAFARI GUIDE IN THE WILDLIFE-RICH OKAVANGO DELTA. AS HE SERVES THE WHIMS OF HIS WEALTHY CLIENTS, HE OFTEN HAS TO STOP THE IMPULSE TO RUN AS FAR AWAY FROM THEM AS HE CAN, AS THESE TOURISTS ARE SOMETIMES MORE DANGEROUS THAN A PRIDE OF LIONS. NO ONE COULD MAKE UP THESE OUTRAGEOUS-BUT-TRUE TALES: THE YOUNG WOMAN WHO REJECTED THE RECOMMENDED SAFARI-FRIENDLY KHAKI TO WEAR A MORE “FASHIONABLE” HOT PINK ENSEMBLE; THE LOST TOURIST WHO HAPPENED TO BE DRUNK, HALF-NAKED, AND A MEMBER OF THE BRITISH ROYAL FAMILY; ESTABLISHING A REAL FRIENDSHIP WITH THE CONTINENT’S MOST VICIOUS ANIMAL; THE JAPANESE TOURIST WHO REQUESTED A REPEAT PERFORMANCE OF ALLISON’S BEING CHARGED BY A LION SO HE COULD VIDEOTAPE IT; AND SPENDING A CRAZY NIGHT IN THE WILD AFTER BLOWING A TIRE ON A TOUR BUS, REVEALING THAT ALLISON HAS AS MUCH GOOD-NATURED SCORN FOR HIMSELF. THE AUTHOR’S HUMOR IS EXCEEDED ONLY BY HIS LOVE AND RESPECT FOR THE ANIMALS, AND HIS GOAL IS TO LIMIT ANY NEGATIVE EXPOSURE TO HUMANS BY PLANNING TRIPS THAT ARE MINIMALLY INVASIVE—UNFORTUNATELY IT DOESN’T ALWAYS WORK OUT THAT WAY! NEW STORY: PEOPLE OFTEN ASK SAFARI GUIDES ABOUT THE EXPERIENCE THAT FRIGHTENED THEM THE MOST. IN THIS STORY PETER ALLISON TELLS OF THE TIME HE BECAME AWARE OF UNSEEN DANGER, AND KNEW THAT SOMEWHERE WITHIN METERS OF HIM WAS A HUNTING LIONESS. PETER ALLISON IS ORIGINALLY FROM SYDNEY, AUSTRALIA. HIS SAFARIS HAVE BEEN FEATURED IN NATIONAL GEOGRAPHIC, CONDE NAST TRAVELER, AND ON TELEVISION PROGRAMS SUCH AS JACK HANNA’S ANIMAL ADVENTURES. HE TRAVELS FREQUENTLY TO SPEAKING APPEARANCES, AND SPLITS MOST OF HIS TIME BETWEEN BOTSWANA, SYDNEY, AND SAN FRANCISCO.
जंगल हे ठिकाण असे असते जिथे तुम्ही जरा चुकीचे वागल्यास कोनाच्या तरी तोंडचा घास होऊ शकता! कारण या जंगलात असतात, घातक शिकारी प्राणी, चिडलेले हत्ती आणि जगातले सर्वात बेभरवशाचे प्राणी - म्हणजे, बेलगाम पर्यटक आणि अविचाराने धाडस करणारे सफारी गाईड! या सगळ्यांचे चित्रण लेखकाने या पुरतकात केले आहे. अंगावर धावून येणार-या सिंहाचा लेखकाने दोन वेळा कसा सामना केला, ब्रिटिश राजघराण्यातून आलेल्या झिंगलेल्या अर्धनग्न पर्यटकांचा रात्रीच्या अंधारात कसा शोध घेतला, पर्यटकांनी भरलेली लँडरोव्हर गाडी पाणघोडे असलेल्या जलप्रवाहात घेऊन गेल्यावर कशी तारांबळ उडाली, आणि आफ्रिकेतल्या सर्वात धोकादायक प्राण्याला त्याने आपला पाळीव प्राणी कसे बनवले, असे विविध अनुभव लेखक गोष्टीरूपात सांगतो. नर्मविनोदी शैलीतले हे अनुभव वाचताना कधी भीतीने अंगावर काटा उभा राहतो, तर कधी कधी हसून-हसून पुरेवाट होते, तर कधी डोळ्यात पाणी उभे राहते. चला तर, आफ्रिकेतल्या जंगलातली शब्दसफरी अनुभवायला!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SAFARIAFRIKETALI #WHATEVERYOUDODONTRUN #सफारीआफ्रिकेतली #MEMOIR #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #MANDARGODBOLE #PETERALLISON "
Customer Reviews
 • Rating StarDAINIK SAMANA 07-02-2016

  आफ्रिकेतल्या जंगलातलं थ्रिल!... पर्यटन हा माणसाचा आवडता छंद. मनोरंजनासाठी तर माणसे प्रवास करतातच. पण निसर्ग, वन्यजीवन यांच्या बदलाचे कुतूहल, आकर्षण व प्रेमही त्याला असते. याच ओढीमुळे निसर्गप्रेमी वन्यजीवन सफारीस जात असतात. अशा निसर्गप्रेमींसाठी पीटरअ‍ॅलिसन लिखित व मंदार गोडबोले अनुवादित ‘सफारी आफ्रिकेतली’ हे पुस्तक मार्गदर्शक व रोमांचक अनुभव देणारे ठरेल. लेखकाने आफ्रिकेत वन्यजीवन सफारीसीठी गाईड म्हणून अनेक वर्षे काम केले. सुरुवातीस सिंहाला पाहून त्याची भीतीने गाळण उडाली होती. पण कुत्री अंगावर आली तरी पळून जाऊ नये ही लहानपणाची शिकवण त्यास पुढे उपयोगी पडली. पर्यटकांना जंगलात सफारीस नेण्यासाठी सफारींचा लॅण्डरोव्हर गाडी चालवण्यास लेखक शिकला. पर्यटकांना घेऊन जंगल सफारीस जाताना कित्येकदा सिंह, चित्ते, हत्ती, गेंडे, रेडे यासयाख्या रानटी व हल्लेखोर प्राण्यांना तोंड द्यावे लागते. एकदा हत्तीला उंदीर समजण्याची चूक लेखकाने केली होती. अशा काही चुका त्याच्या हातून नकळत झाल्या होत्या. प्रचंड रेड्याने हल्ला केल्यावर कशावर तरी उंच चढायचे किंवा जमिनीवर पडून राहायचे हे माहित नसल्याने लेखक धावपळीत बाभळीच्या दाट झुडपात पडला व त्यामुळे वाचला असे काही प्रसंग त्याच्यावर आले. पण त्याला स्वत:च्या जीवापेक्षा पर्यटकांची अधिक काळजी होती. त्याने प्रसंगावधान राखून त्यातून निभावून नेले. असे करताना मोठे धाडस करावे लागले. ते सारे भयंकर अनुभव लेखकाने सांगितले आहेत. एक उदमांजर व वॉर्टहॉग हे प्राणी पाळीव कसे बनले त्याची सुरसकथा लेखक सांगतो. अजिंक्य असलेल्या हत्ती बॅजर कोल्ह्याच्या आकाराच्या प्राण्यास गाईडही घाबरून असतात. एकदा सिंहाच्या कळपामागे जाण्यासाठी लेखकाने पाण्यातून, चिखलातून गाडी नेली. अखेर गाडी त्यात अडकली. सिंहाचा पाठलाग करण्याची मोठी चूक त्याने केली होती. लेखक पाण्यात उतरला तेव्हा मगरीपासून कशीबशी सुटका करून घेतली. कॅम्पवर जाऊन इतरांच्या मदतीने त्याने पर्यटकांची सुटका करून घेतली. असे अनेक प्रसंग, चुका घडल्या. पण तरी वरिष्ठांकडे त्याच्याबद्दल चांगले मत होत होते. वन्यजीवन सफारीचे, कठीण प्रसंगाचे वर्णन करताना लेखकाची हलकीफुलकी शैली असल्याचे जाणवते. काही वेळा हास्यास्पद प्रसंगही उद्भवले. बोटस्वानमधील अप्रतिम परिसरात वन्यजीवन तर आहेच, पण विविध प्रकारचे रंगाचे, विपुल संख्येने पक्षी पण आहेत. हा नवा छंद लेखकास जडला. पर्यटकांनाही प्राण्यांबरोबर पक्ष्यांच्या निरिक्षणास नेम लागला. कित्येक पर्यटकांना पक्षी निरिक्षणात विलक्षण रस असतो अशा पर्यटकांचे गट येत असतात. सफारीवर जाताना गाईड पर्यटकांना धोकादायक प्राण्यांची यादी व सूचनाही देतो. गाईड म्हणून रुळल्यानंतर अशा प्राण्यांचा मित्रच तो बनून जातो. पण तरीही कित्येकदा जिवावरच्या प्रसंगांना तोंड देताना, साहस करताना अत्यंत भीषण पद्धतीने आयुष्य संपू शकते याचीही जाणीव असते. लेखकालाही ही जाणीव होतीच तरी याच जीवनाची ओढ असल्याने त्याने ऑफिसमधील चाकोरीबद्ध नोकरी नाकारून आफ्रिकेत गाईड म्हणून पर्याय निवडला. आता फ्लोरिडातील आफ्रिका अ‍ॅडव्हेंचर कंपनी व सिडनीतील क्लासिक सफारी कंपनीद्वारे लेखक दरवर्षी आफ्रिकेस जातो.प्रस्तुत पुस्तक वाचून सफारी जीवन अनुभवण्याचा मोह पर्यटकांना होईल निश्चित. ...Read more

 • Rating StarMANOJ

  MAST

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more

RUCHIRA BHAG -2
RUCHIRA BHAG -2 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव वेलणकर