* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: MY PATH LEADS TO TIBET
 • Availability : Available
 • Translators : VANDANA ATRE
 • ISBN : 9788184985160
 • Edition : 2
 • Publishing Year : NOVEMBER 2013
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 220
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : MEMOIR
Quantity
Buying Options:
 • Print Books:
DEFYING EVERYONE`S ADVICE, ARMED ONLY WITH HER RUDIMENTARY KNOWLEDGE OF CHINESE AND TIBETAN,SABRIYE SET OUT TO DO SOMETHING ABOUT THE APPALLING CONDITION OF THE TIBETAN BLIND, WHO SHE LEARNED HAD BEEN ABANDONED BY SOCIETY AND LEFT TO DIE. ON HORSEBACK THROUGHOUT THE COUNTRY, SHE SOUGHT THEM OUT, DEVISED A BRAILLE ALPHABET IN TIBETAN, EQUIPPED HER CHARGES WITH CANES FOR THE FIRST TIME, AND SET UP A SCHOOL FOR THE BLIND. HER EFFORTS WERE CROWNED WITH SUCH SUCCESS THAT HUNDREDS OF YOUNG BLIND TIBETANS, INSTILLED WITH A NEWFOUND PRIDE AND AN EDUCATION, HAVE NOW BECOME SELF-SUPPORTING. A TALE THAT WILL LEAVE NO READER UNMOVED, IT DEMONSTRATES ANEW THE POWER OF THE POSITIVE SPIRIT TO OVERCOME THE MOST DAUNTING ODDS. AUTHOR BIOGRAPHY:SABRIYE WAS BORN IN 1970 NEAR BONN. WHEN SHE WAS TWO YEARS OLD SHE WAS DIAGNOSED WITH A RETINAL DISEASE THAT CAUSED HER TO GO BLIND AT THE AGE OF 13. SHE TOOK UP TIBETAN STUDIES, SOCIOLOGY, AND PHILOSOPHY, AND IS CURRENTLY RUNNING A SCHOOL FOR THE BLIND IN LHASA. IN 2000, SHE RECEIVED THE NORGALL PRIZE OF THE INTERNATIONAL WOMEN`S CLUB. EDITORIAL REVIEWS WHEN TENBERKEN, WHOSE BATTLE WITH RETINAL DISEASE LEFT HER BLIND AT AGE 13, WAS IN HER 20S, SHE STUDIED TIBETAN CULTURE AT THE UNIVERSITY OF BONN. FRUSTRATED BY THE AWKWARD CHARACTER-RECOGNITION MACHINERY SHE HAD TO USE TO READ TIBETAN MATERIALS, SHE DEVISED A TIBETAN BRAILLE ALPHABET, SO THAT ONCE TRANSLATED, WORKS COULD BE DIRECTLY READABLE BY THE BLIND. WHAT FOLLOWED SEEMED NATURAL TO HER: SHE`D GO TO TIBET AND START A SCHOOL TO TEACH THIS BRAILLE TO BLIND TIBETAN CHILDREN. TRAVELING ON HORSEBACK OVER TREACHEROUS MOUNTAIN PASSES, SLEEPING IN RAT-INFESTED HUTS AND DEALING WITH SELF-INTERESTED CHARITABLE BUREAUCRACIES, TENBERKEN MANAGED TO KEEP HER HUMOR AND COURAGE. SHE SUCCEEDED IN ESTABLISHING A SCHOOL, AND HER ORGANIZATION, "BRAILLE WITHOUT BORDERS" CONTINUES THE LITERACY MISSION IN OTHER COUNTRIES.
लहानपणी दृष्टिपटलाला झालेल्या आजारामुळे सॅब्रिए टेनबर्केन अंध होते, मात्र स्वत:ला वचन देते की, ‘आपले अंधत्व कधीही अपंगत्व ठरणार नाही, किंबहुना आपण तसे घडू द्यायचे नाही!’ चिनी आणि आशियाई संस्कृतीचा अभ्यास करत असताना तिबेटमधील अंध मुलांची दारुण स्थिती सॅब्रिएला समजल्यावर तिला धक्काच बसतो! ती निर्णय घेते – नाकारलेल्या, धिक्कारलेल्या आणि हीन दर्जाची वागणूक मिळणा-या तिबेटमधल्या अंध मुलांना मदत करण्याचा! निष्ठा आणि निर्धार एवढ्याच पुंजीवर ती एकहाती तिबेटी भाषेत ब्रेल बाराखडी तयार करते... अगदी मोजक्या मुलांसह ल्हासात अंधांसाठी पहिली शाळा उघडते... अर्थातच तिला यासाठी असंख्य समस्यांवर धैर्याने मात करावी लागते... आणि एका छोट्या प्रयत्नापासून सुरू झालेल्या या प्रयोगरूपी बीजाचे सर्व वयोगटातील अंधांसाठी काम करणा-या एका भव्य संस्थारूपी वटवृक्षात रूपांतर होते.... काळोखाचे जग उजळून टाकणा-या सॅब्रिएची ही तेजोमय कहाणी!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TIBETCHYAVATEWAR #MYPATHLEADSTOTIBET #तिबेटच्यावाटेवर #MEMOIR #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VANDANAATRE #वंदनाअत्रे #SABRIYETENBERKEN "
Customer Reviews
 • Rating StarSiddharth Bonde

  तिबेट च्या वाटेवर या पुस्तकाच्या माहिती मला या आपल्या ग्रुप वरूनच मिळाली होती. नुसते तिबेट वाचून पुस्तक लगेच मागवलं सुधा , पण थोडीशी निराशा झाली. माझ्या मनात असं होते की तिबेट म्हणेच काहीतरी गूढ साहित्य, तिथलं लामा त्यांची जीवन पद्धती धर्म वैगरे वाचयला मिळेल. पण जसे पुस्तकं उघडल तसे लक्षात आले की ही तर एका परदेशी अंध मुलीची कहाणी आहे. नाराजीने वाचायला सुरुवात केली आणि खरेच काम सांभाळून 4 दिवसात पुस्तकं वाचून संपवलं. खूप प्रेरणादआयी कहाणी आहे सब्रिये ची.. जर्मनी मधील अंध मुलगी ती तिबेट भाषा शिकते , माहीत असताना ही की हे शिकून पुढे काही फारसे भवितव्य नाही म्हणजे उदरनिर्वाह चालणार नाही. तरी जिद्दीने शिकते का ? तिला काही तरी कार्य तिबेट मधील अंध मुलासाठी करायचं असते. जिद्दीनं पेटलेली ती एकटी तिबेट ला जाते. अंध मुलांसाठी तिबेटी भाषेचं ब्रेल लिपी काढते. तिथे आलेले तिला चागले , वाईट अनुभव. तिबेट म्हणजे सरकार चीन चे च... लाल फितीत व नोकर शाहीत अडकलेले तिचे काम. अंध लोक म्हणजे निरुपयोगी माणसे असा समाजात जाऊन केलेलं तिचे काम. प्रशासन कडून होणारा त्रास, आतिशय खडतर हवामान, मदत करू पाहणाऱ्या कडून नंतर दिलेला त्रास, स्व देश जर्मनी तून बंद झालेलं अनुदान. त्यातून तिने काढलेला मार्ग व निराश न होता तिने ल्हासा तील उघडलेली शाळा. देव दुता प्रमाणे नेहमी उभा असलेला तीच मित्र पौल. सब्रिय अंध असून ही तिने केलेलं काम आणि तिची अंध लोकं बद्दलची आत्मीयता... कालांतराने तिला मिळालेले यश, प्रसिध्दी, जग भर झालेलं नाव. नंतर तिचं अंध मुले पुढे शिकून त्यांनी केलीली प्रगती , कोणी संस्था प्रमुख, कोणी दुकान चालवले, कोणी परदेशी उच्च शिक्षण घेतलं. सर्व शक्य झालं सब्रुये मूळे. असा थक्क करणारा तिचा प्रवास आतिषय प्रेरणादायी आहे. ...Read more

 • Rating StarDAINIK SAMANA 05-01-2014

  प्रेरणादायी कहाणी… वयाच्या बाराव्या वर्षी दृष्टिपटलाला झालेल्या आजाराने सॅब्रिए यांची दृष्टी गेली. बॉन विद्यापीठात चिनी आणि आशियाई संस्कृतीचा अभ्यास करत असताना तिला तिबेटमधील अंधांची दारूण स्थिती समजली. त्यानंतर तिने तिबेटमध्ये जाऊन अंधांसाठी काम कर्याचा निर्णय घेतला. जगभरातील अंधांना विविध सेवा देणाऱ्या तसेच समुपदेशन करणाऱ्या ‘ब्रेल विदाऊट बॉर्डर’ या गटाची स्थापना सॅब्रिए आणि तिचा सहचर पॉल क्रोनेन बर्ग यांनी केली, तसेच हिंदुस्थानात केरळ येथील तिरुअनंतपुरम येथे ‘कांथारी’ ही संस्था स्थापन केली. तिला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तिबेटमधील अंध मुलांच्या आयुष्यात आशेचा किरण आणणाऱ्या लढाऊ वृत्तीच्या तरुण, अंध स्त्री ‘सॅब्रिए’ची प्रेरणादायक कहाणी ‘तिबेटच्या वाटेवर...’ मूळ लेखिका स्वतः सॅब्रिए टेनबर्केन, अनुवाद केलाय वंदना अत्रे यांनी. ‘तिबेटच्या वाटेवर...’ हे सॅब्रिए यांनी केलेले अनुभवकथन आहे. तिचा हा लढा आधी स्वतःच्या अपंगत्वाशी, अंधत्वाशी मग तिला पावलोपावली दया दाखवणाऱ्या समाजाशी आणि सर्वांत शेवटी आपल्या घरापासून कोसो दूर असलेल्या देशातील कर्मठ, अंधश्रदाळू समाजाशी स्वतःच्या अंधत्वावर मात करीत वैयक्तिक उत्कर्षाची स्वप्न बघणे तुलनेने खूप मोठे वाटावे, असे मोठे स्वप्न बघणाऱ्या ‘सॅब्रिए’ची कहाणी प्रथमदर्शनी अविश्वसनीय वाटावी अशी आहे. ज्या हिमालयातील थंड, निष्ठुर, शिखरांची आणि तशाच क्रूर दऱ्यांची डोळस माणसांना दहशत वाटते, त्या हिमालयात ही अंध स्त्री सहजतेने फिरते तेही पर्यटन म्हणून नव्हे तर अंध, असहाय मुलांचा शोध घेत. आपल्या अंधत्वाचा बाऊ न करता तिचे जास्त लक्ष आहे तो तिबेटमधील नैसर्गिक परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात आलेल्या अंधत्वाकडे, रोजच्या व्यवहारापासून दूर ठेवणाऱ्या समाजाकडे, असहायतेने जगणाऱ्या मुलांकडे. अशा या ‘सॅब्रिए’चा जीवन प्रवास, कार्यप्रणाली अनुवादित करावी असे ठरवून नुसते मराठी भाषांतर वंदन अत्रेंनी केलेले नाही तर त्या प्रत्यक्षात सॅब्रिए आणि पॉलला भेटल्या. हिंदुस्थानात त्रिवेद्रममध्ये जगभरातील अंध प्रौढांसाठी सुरू केलेले ‘कांथारी’ या आगळ्या-वेगळ्या व्यवसाय केंद्रात निसर्गरम्य पर्यावरणस्नेही वास्तूत सॅब्रिए आणि पॉलशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांना समजून घेतले आणि नंतर मराठी अनुवाद केला. यामुळे तो अधिक लक्षवेधी ठरतो. साधी, सोपी भाषाशैली, पण जिवंतपणा उभा करण्याची शब्दात ताकद असल्याचे ठायी ठायी जाणवते आणि म्हणूनच हा अनुवाद हृदय हेलावून टाकतो. काही तरी असच भक्कम कार्य आपणही करावं असं वाटत राहतं. हा वंदना अत्रेंचा भाषिक मोठेपणा आहे. सदर पुस्तकास लाभलेले चंद्रमोहन कुलकर्णी यांचे मुखपृष्ठ अप्रतिम. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
Dr. Aparna Patil

Just finished reading Anuwadatun Anusarjanakade....a very fine collection of experiences as a Translator which can be a bright guiding light for the beginners and also for them who are already into it...the technical part covered can prove as a textbok for translators...precise as well as comprehensive ..Pleasure reading it. ...Read more