SUDHIR GADGIL

About Author

Birth Date : 24/11/1950


GRADUATES OF COMMERCE WITHOUT TAKING THE TRADITIONAL ROUTE; JOURNALISM, THEATER AND TV ARE THE MEDIUMS OF CHOICE FOR BUSINESS. MODERATOR CREATED A DISTINCT IDENTITY BY HOSTING PROGRAMS, TALK SHOWS, INTERVIEWS. FROM AMERICA TO MAURITIUS, HE BECAME KNOWN AS THE FIRST PROFESSIONAL IN MARATHI TO MODERATE VARIOUS INTERNATIONAL GATHERINGS TO LOCAL MEETINGS.

वाणिज्य शाखेचे पदवीधर असून पारंपरिक मार्ग न निवडता; पत्रकारिता, रंगमंच आणि टीव्ही या माध्यमांची व्यवसायासाठी निवड. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन, टॉक शो, मुलाखती घेणे यांद्वारे सूत्रसंचालक ही वेगळी ओळख निर्माण केली. अमेरिकेपासून मॉरिशसपर्यंत विविध आंतरराष्ट्रीय मेळाव्यांपासून स्थानिक सभा संमेलनापर्यंत सूत्रसंचालन करणारा मराठीतील पहिला व्यावसायिक अशी ओळख निर्माण केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंपासून उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर, अभिनेत्री माधुरी दीक्षित ते चित्रकार मकबूल फिदा हुसेन, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले ते व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण अशा विविध क्षेत्रातील २८०० नामवंत व्यक्तींच्या रंगमंचावर, दूरदर्शनवर, टॉक शो-चॅट शोमध्ये मुलाखती घेण्याचा उच्चांक केला. सकाळ, सामना, केसरी, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, लोकमत, तरुण भारत, ऐक्य अशा विविध दैनिकांमधून तसेच साप्ताहिक मनोहर, तेजस्वी, चित्रलेखा, लोकप्रभा या नियतकालिकांमधून स्तंभलेखक, बातमीदार, पुरवणीसंपादक असा वृत्तपत्रक्षेत्रातला ३५ वर्षांचा अनुभव. मुक्काम , मुद्रा , लाइफस्टाइल , ताजंतवानं आणि झगमगती दुनिया या पुस्तकांचे लेखन. माध्यम रत्न पुरस्कार (२००१), आचार्य अत्रे पुरस्कार (२००२), दूरदर्शन सूत्रसंचालक, म.टा. सन्मान पुरस्कार (२००३), ग. दि. मा. पुरस्कार (२००४) अशांसारख्या अनेक पुरस्कारांचे मानकरी.
Sort by
Search by Discount
Show per page
Items 1 to 1 of 1 total
33 %
OFF
LIFE STYLE Rating Star
Add To Cart INR 220 INR 147

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more