* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IT WAS LIKE ANY OTHER DAY ON THE ANNA UNIVERSITY CAMPUS IN CHENNAI. I HAD DELIVERED A LECTURE VISION TO MISSION AND THE SESSION GOT EXTENDED FROM ONE HOUR TO TWO. I HAD LUNCH WITH A GROUP OF RESEARCH STUDENTS AND WENT BACK TO CLASS. AS I WAS RETURNING TO MY ROOMS IN THE EVENING THE VICE- CHANCELLOR, PROF. A. KALANIDHI, FELL IN STEP WITH ME. SOMEONE HAD BEEN FRANTICALLY TRYING TO GET IN TOUCH WITH ME THROUGH THE DAY, HE SAID. INDEED, THE PHONE WAS RINGING WHEN I ENTERED THE ROOM. WHEN I ANSWERED, A VOICE AT THE OTHER END SAID, THE PRIME MINISTER WANTS TO TALK WITH YOU ... SOME MONTHS EARLIER, I HAD LEFT MY POST AS PRINCIPAL SCIENTIFIC ADVISER TO THE GOVERNMENT OF INDIA, A CABINET-LEVEL POST, TO RETURN TO TEACHING. NOW, AS I SPOKE TO THE PM, ATAL BIHARI VAJPAYEE, MY LIFE WAS SET FOR AN UNEXPECTED CHANGE. TURNING POINTS TAKES UP THE INCREDIBLE KALAM STORY FROM WHERE WINGS OF FIRE LEFT OFF. IT BRINGS TOGETHER DETAILS FROM HIS CAREER AND PRESIDENCY THAT ARE NOT GENERALLY KNOWN AS HE SPEAKS OUT FOR THE FIRST TIME ON CERTAIN POINTS OF CONTROVERSY. IT OFFERS INSIGHT NOT ONLY INTO AN EXTRAORDINARY PERSONALITY BUT ALSO A VISION OF HOW A COUNTRY WITH A GREAT HERITAGE CAN BECOME GREAT IN ACCOMPLISHMENT, SKILLS AND ABILITIES THROUGH EFFORT, PERSEVERANCE AND CONFIDENCE. IT IS A CONTINUING SAGA, ABOVE ALL, OF A JOURNEY, INDIVIDUAL AND COLLECTIVE, THAT WILL TAKE INDIA TO 2020 AND BEYOND AS A DEVELOPED NATION.
चेन्नईतील अण्णा विद्यापीठाच्या आवारातला नेहमीसारखाच एक दिवस. माझे ‘संकल्पना ते ध्येय’ ह्या विषयावरचे व्याख्यान संपले होते आणि ते एक ऐवजी दोन तास चालले होते. संशोधनाचे काम करत असणा-या काही विद्याथ्र्यांबरोबर मी दुपारचे जेवण घेतले आणि परत वर्गाकडे गेलो. संध्याकाळी माझ्या खोलीवर परत जात होतो, तेव्हा विद्यापीठाचे उपकुलगुरू प्रो. ए. कलानिधी बरोबरच आले. ते म्हणाले की, ‘कोणी तरी फोनवरून दिवसभर तुमच्याशी तातडीने संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते.’ आणि खरोखरीच; मी खोलीत पाऊल टाकले, तर फोन वाजतच होता. मी फोन उचलला, तेव्हा पलीकडच्या व्यक्तीने सांगितले, ‘‘पंतप्रधानांना आपल्याशी बोलायचे आहे.’’ काही महिन्यांपूर्वी ‘भारत सरकारचा प्रमुख शास्त्रीय सल्लागार’ ह्या केंद्रीय मंत्रिपदाच्या समकक्ष जागेचा राजीनामा देऊन मी अध्यापनाच्या कामावर परत रुजू झालो होतो. आत्ता जेव्हा मी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींशी बोलत होतो, तेव्हा माझे आयुष्य एका अनपेक्षित बदलाच्या टप्प्यावर होते. ‘टर्निंग पॉइंट्स’मधील कलाम यांची अशक्य वाटणारी कथा, ‘विंग्ज ऑफ फायर’ जेथे संपते, तेथून पुढे सुरू होते. ह्या कथेत त्यांच्या कारकिर्दीतल्या आणि राष्ट्रपतिपदाच्या कालावधीतल्या कोणाला फारशा ठाऊक नसलेल्या, काही विवादास्पद घटनांबद्दलच्या अनेक बारीकसारीक गोष्टी प्रथमच समोर येतात. यातून एका असामान्य व्यक्तिमत्त्वाचे अंतरंग तर समजतेच; पण प्रयत्न केले, चिकाटी ठेवली आणि आत्मविश्वास असला, तर अनेक सिद्धी मिळवून, कौशल्ये आणि सामथ्र्ये मिळवून महान वारसा असलेला हा देश पुन्हा महान कसा होऊ शकेल, त्याची संकल्पनाही मिळते. सर्वांत विशेष म्हणजे, ही गाथा आहे एका व्यक्तीने स्वत: आणि इतरांना बरोबर घेऊन केलेल्या प्रवासाची – जो प्रवास भारताला २०२०पर्यंत आणि नंतरही एक ‘विकसित राष्ट्र’ म्हणून उभे करेल.

No Records Found
No Records Found
Keywords
"#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #INDOMITABLE SPIRIT#A.P. J.ABDULKALAM #ADAMYAJIDDA #SUPRIYA VAKIL #सुप्रियावकील #अदम्य जिद्द #MAZI JIVAN YATRA# MY JOURNEY TRANSFORMING DREAMS INTO ACTIONS #TURNING POINTS #अंजनी नरवणे #ANJANI NARAWANE"
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA 23-12-2012

    राष्ट्रपतीपदाची वाटावळणे!... ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना २००५ साली अनपेक्षितपणे राष्ट्रपतीपदाची संधी चालून आली. या पाच वर्षांच्या काळात त्यांनी देशातल्या कितीतरी तरुणांशी संवाद साधला. त्या काळातले काही अनुभव, भाषणे यांचा समावेश ‘टर्निंग पॉइंट्स’ पुस्कामध्ये करण्यात आला आहे. कलाम यांनी आपल्या एक पानी प्रस्तावनेत म्हटले आहे, ‘माझ्या आयुष्याबद्दलच्या लेखनातून अनेक भारतीयांच्या चिंता, अडचणी, आणि आकांक्षा यांचा प्रतिध्वनी उमटतो. मीही त्यांच्यासारखेच शिडीच्या अगदी खालच्या पायरीपासून आयुष्य सुरू केले.’ पण हे अनुभवपर पुस्तक त्यापुढेही जाते. या पुस्तकात एकंदर चौदा प्रकरणे आहेत. परिशिष्टामध्ये कलाम यांची एक मुलाखत आणि त्यांनी ध्येयसिद्धीसाठी मांडलेली एक योजना यांचा समावेश आहे. हे सर्व लेखन कलाम यांनी राष्ट्रपती असतानाच्या काळात केले आहे. ‘भारताचे गुणगान मी केव्हा गाऊ शकेन?’ या पहिल्याच लेखात कलाम यांनी राष्ट्रपती भवनातील शेवटच्या दिवसाविषयी लिहिले आहे. त्यानंतर अण्णा विद्यापीठात केलेले एक भाषण आहे. तिसऱ्या प्रकरणाचे शीर्षक आहे, ‘माझ्या आयुष्यात बदल घडविणारे सात महत्त्वाचे टप्पे’. ‘एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट’मध्ये वरिष्ठ साहाय्यक, ‘डिफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी’मध्ये संचालक, १९९८ मध्ये केलेल्या अणुचाचण्या, भारत सरकाचा शास्त्रीय विषयांचा सल्लागार, अण्णा विद्यापीठामध्ये तंत्रज्ञानाचा प्राध्यापक आणि राष्ट्रपती हे ते सात टप्पे. राष्ट्रपती असतानाच्या काळात कलाम यांना काही निर्णय घ्यावे लागले, त्या अनुभवावर आधारित लेखाला त्यांनी ‘विवादास्पद निर्णय’ असे शीर्षक दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेले कैदी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करतात. त्यावर कलाम यांनी कसा निर्णय घेतला याचा अनुभव वाचण्यासारखा आहे. याशिवाय युपीए-१ च्या वेळी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राष्ट्रपती भवनात कलाम यांच्याकडे गेल्या, तेव्हा त्यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करण्याला कलाम यांची तयारी होती, पण सोनिया गांधींनीच डॉ. मनमोहनसिंग यांचे नाव पंतप्रधानपदासाठी सुचवले. ही आपल्यासाठी चकित करणारी बाब होती असा खुलासा कलाम यांनी केला आहे. या विषयावर आजवर खूप उलटसुलट मते व्यक्त झाली आहेत. अनेक आक्षेप घेतले गेले आहेत. पण प्रत्यक्षात काय घडले ते पहिल्यांदाच या पुस्तकाच्या माध्यमातून कलाम यांनी जाहीर केले आहे. हा खुलासा खूपच महत्त्वाचा आहे. आपल्याला राष्ट्रपतीपदाच्या काळात दोन गोष्टींनी समाधान दिले, असे कलाम यांनी ‘राष्ट्रपतीपदानंतर...’ या प्रकरणात लिहिले आहे. ती म्हणजे आपण विद्यार्थ्यांमध्ये असलेली निराशा आणि उदासिनता काही प्रमाणात घालवली आणि त्यांना प्रोत्साहित केले. त्यामुळे भारताच्या प्रगतीचा वेग उंचावण्यास मदत झाली, असे त्यांनी लिहिले आहे. शिकवणे आणि संशोधन करणे या दोन्ही गोष्टी कलाम यांना आवडतात. ते राष्ट्रपतीपदी होते तेव्हा त्यांनी आपल्यापरीने मुलांना शिकवण्याचे काम केले. संशोधन हा तर त्यांचा जीवनधर्मच आहे. या सर्व लेखांमध्येही कलाम यांची दृष्टी, देशाविषयीची तळमळ, नम्रता, ऋजुता आणि त्यांची सचोटी जाणवते. कलाम यांचा दुर्दम्य आशावाद आणि तरुणांविषयीचा विश्वास हे पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. राष्ट्रपतीपदी असताना कलाम यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी जो संवाद साधला, चिकाटीने विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले आणि त्यांच्यापुढे मोठी स्वप्ने ठेवली, त्याची ही कहाणी आहे. पण याचबरोबर राष्ट्रपती असताना काळात घडलेल्या काही विवादास्पद घटनांबद्दलचे त्यांच्या बाजूचे तपशील त्यांनी या पुस्तकातून पहिल्यांदाच जाहीरपणे व्यक्त केले आहेत. ते तपशीलच इतके बोलके आहेत की त्यावर वेगळ्या भाष्याची गरजच राहत नाही. ते जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे. -प्रतिनिधी ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
साधना साप्ताहिक ३ ऑगस्ट २०२४ ... अशोक राणे

सुनंदा अमरापूरकर यांनी त्यांचं `खुलभर दुधाची कहाणी` हे आत्मकथन पाठवलं तेव्हा `आता हे वाचायचं केव्हा` असा प्रश्न सर्वप्रथम मनाशी आला. देणेकरी दाराशी ठाण मांडून बसावेत तशी अनेक पुस्तकं, कोणी कोणी पाठवलेल्या त्यांच्या फिल्म्स आणि माझे सतराशे साठ व्याप सोर असताना कसा वेळ काढायचा? माझं सबंध आयुष्य सिनेमा, तो आकाराला आणणारे दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ञ, त्यांच्या निर्मितीमागच्या प्रेरणा आणि त्यांच्यातला माणूस याचा शोध घेण्यात गेलं. एका गोष्टीचं कुतूहल होतं आणि ते म्हणजे या सर्वांच्या पलीकडे असलेलं, परंतु क्वचितच कळलेलं असं त्यांच्या कुटुंबातल्याच व्यक्तीने वर्णिलेलं अमरापूरकरांचं चरित्र ! सगळी व्यवधानं बाजूला ठेवून सुनंदा अमरापूरकरांचं आत्मकथन वाचायला हे कुतूहल पुरलं. मनोगतातलं पहिलंच वाक्य आहे... `मी या आठवणी का लिहिल्या ?` ...आणि मला चट्‌कन थोर अभिजात अभिनेत्री इंग्रीड बर्गमन हिचं `माय स्टोरी` आठवलं. तिनेही अशीच सुरुवात केलीय. तिची मुलं म्हणाली, `तुझ्या आयुष्याविषयी कुणी तरी तिखटमीठ लावून काहीबाही लिहील, त्याआधी तूच सारं खरं मोकळेपणानं सांगून टाक. तिने जाडजूड ग्रंथात अभिनेत्री म्हणून तिचा सारा प्रवास कसलाही आडपडदा न ठेवता सविस्तर सांगितला. सुनंदाताईंचं पुस्तक आणि त्यातलं हे पहिलं वाक्य वाचताना मला हे का आठवावं? त्यांची पहिली ओळख म्हणजे नाट्य-चित्रसृष्टीतला एक मोठा अभिनेता, दिग्दर्शक सदाशिव अमरापूरकर यांच्या पत्नी आणि अलीकडचा परिचय म्हणजे एक उत्तम अनुवादकर्त्या. तर आता त्या आपल्या प्रसिद्ध नवऱ्याविषयी काय आणि कसं सांगतात, त्याचबरोबर त्यांचं वैवाहिक सहजीवन, एकूणच त्यांचं कौटुंबिक जीवन कसं उलगडून दाखवतात याचं कुतूहल होतं. मुख्य म्हणजे त्यांची मध्यमवर्गीय पार्श्वभूमी आणि सदाशिव अमरापूरकरांना मुंबईत स्थैर्य लाभेपर्यंत नगरसारख्या छोटया शहरातला त्यांचा वावर यातून पुढला सारा अचंबित करणारा प्रवास त्या का मांडतात याचीही उत्सुकता मनात होतीच, अमरापूरकर कुटुंबाचा प्रवास हा केवळ नगर ते मुंबई नव्हता. एखाद्या नवख्या नटाने रंगमंचाच्या अंधाऱ्या अवकाशात प्रवेश करावा आणि अचानक त्याच्यावर सर्व अंगांनी प्रखर प्रकाशझोत यावा, त्याचे डोळे इतके दिपून जावेत की त्याला ते नीट उघडून सभोवताल पाहता येऊ नये असाच काहीसा अनुभव या कुटुंबाने घेतला आहे. प्रायोगिक वे व्यावसायिक रंगभूमी हे स्थित्यंतर तसं फार तर कनिष्ठ ते उच्च मध्यमवर्गीय याच काहीशा परिचित अवकाशातलं; परंतु हिंदी सिनेमातली प्रसिद्धी तर भिरभिरावून टाकणारी. ते अंगावर घेत, वागवत या कुटुंबाने कशी वाटचाल केली हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. एवढी प्रचंड प्रसिद्धी आणि वलय लाभूनही अमरापूरकर कधी फिल्मी झाले नाहीत हे वाटतं तितके सोपे नाही. `खुलभर दुधाची कहाणी यातून ते उलगडणार होते... वाचायला सुरुवात केल्यावर ते खूप तपशीलवार आणि पसरटही वाटलं. पण वाचत गेलो तसतसं लक्षात आलं की, सुनंदाताईंनी चितारलेला परिसर तप‌शिलातल्या काही फरकाने आपलाही आहे. आपणच प्रत्यक्ष जगलेले, पाहिलेल वाचतो आहोत. साठ-सत्तर वर्षांपूर्वीच्या आमच्या शाळकरी वयापासून वाचलेल्या साहित्यातून हेच सर्व पाहत आलोय. आपल्या मुलांच्या आणि नातवंडाच्या पिढीला तर हा काळ अवकाश सर्वस्वी अपरिचित. हे त्यांच्यासाठीही आहे. आजच्या नव्या पिढीला 2000 चा चित्रपट जुना वाटतो, तेव्हा त्याआधीच्या त्यांच्या आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांच्या सिनेमाशी आपण जसा त्यांचा परिचय करून देतो तसंच आहे हे. शिवाय या कथनाच्या नायिकेने पुढे अपरिहार्य असं जे वळण गाठलं आहे, त्यासाठी हे आवश्यकच आहे. संथ लयीत सुरू झालेलं आणि काहीसं रेंगाळल्यासारखं वाटणारं गाणं उत्तरोत्तर हलक्याशा द्रुत लयीत समेवर यावं असं हे आत्मकथन आहे. तरीही पूर्वार्धावर थोडे अधिक संपादकीय संस्कार झाले असते, तर आवश्यक असणाऱ्या संथ लयीला रेंगाळावं लागलं नसतं. `प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते` या प्रसिद्ध उक्तीच्या पलीकडे इथे काहीतरी आहे. ही नायिका इथे केवळ एवढ्याच भूमिकेत नाही. ही भूमिका पार पाडताना तिने सर्व प्रकारे गांगरवून टाकणाऱ्या परिस्थितीतही स्वतःला जपलं, स्वतःमधल्या गुणांना जमेल तसं आणि तेवढं खतपाणी घालत जोपासलं आणि आपली म्हणून एक ओळख निर्माण केली. ज्या संपूर्णतः अकल्पित, अनपेक्षित जबाबदाऱ्या येऊन पडल्या, त्या लीलया पार पाडत तिने आपलं व्यक्तिमत्त्व जपलं. `मीच एकटीने सारं पहायचं` असा सतत तक्रारखोर धोशा लावत एखादी कर्कशा झाली असती; परंतु सुनंदाताईंचं तसं झालं नाही. म्हणून पुस्तक वाचून झाल्यावर फोनवर मी त्यांना एवढंच म्हणालो, `माउली, कुठून गं इतकी ऊर्जा आणलीस?` 1950 चं दशक, त्याआधीचा आणि नंतरचाही काळ तसा गरिबीचा आहे. समाजाच्या सर्व थरांत अभावग्रस्तता आहे. कसला अभाव आहे याचीही त्या काळ अवकाशाला जाण नाही. आहे ते गोड मानून घेत जगण्याचा हा काळ. या सामाजिक स्तराखाली असाहाय्यपणे जगणारा एक वर्ग आहे. त्याचीही वास्तपुस्त करण्याची गरज या वातावरणात आहे. परंतु सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे संस्कारक्षम घडण्याची, घडविण्याची, अभावग्रस्तता तिथे महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्या या नायिकेला हे पर्यावरण लाभलं आहे. त्यांचे वडील मुलं लहान असतानाच गेले. नंतर घरही गेलं आणि मुलांना घेऊन आईला देवळात राहावं लागलं. आहे त्या परिस्थितीतून वाट काढावी या धारणेत सभोवतालच्या सुसंस्कृत वातावरणाचाही मोठा आधार होता. ते सारं मुळातून वाचण्यासारखं आहे. यात गरिबीतले दिवस, हलाखी, अभावग्रस्तता यांपेक्षा हे संस्कार सर्वांत महत्त्वाचे आहेत हे सहजपणे अधोरेखित केलेले आहे. वर ज्या ऊर्जेचा उल्लेख केलाय ती इथूनच सुनंदाताईंना मिळाली आणि म्हणूनच यशस्वी नवन्याच्या पाठीशी उभ्या राहताना त्या स्वतः सर्वप्रकारे यशस्वी ठरल्या आहेत. त्यांच्या आणि अमरापूरकरांच्या कथेला कुठून कुठे नेऊन ठेवणारं वळण शाळा-कॉलेजच्या वयातच आलं. नाटक ! अमरापूरकर म्हणजे नाटक आणि नाटक म्हणजे अमरापूरकर असं हे रसायन होतं. सुनंदाताईही नगरच्या त्या छोट्या नाट्यअवकाशात मनापासून वावरत होत्या. सोबत, साथ होती अमरापूरकरांची. परंतु हा माणूस स्वतःमधल्या रंगकर्मीत इतका खोलवर बुडालेला होता की, जिच्या तो प्रेमात पडलाय; तिलाही नाटकाची आवड आहे; नोंद घेण्याजोगे कलागुण आहेत, तिच्यातला कलावंत घडविण्यात मात्र त्याने रस दाखविला नाही. इतकंच नाही तर पुढे मुंबईत यश मिळविल्यानंतर, बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाल्यानंतरही सुनंदाताईंनी `यशस्वी पुरुषामागे...` ची सर्व प्रकारची भूमिका यशस्वीपणे पार पाडल्यानंतर जेव्हा ऑफिसच्या नाटकात काम करायचं ठरवलं, तेव्हा यांनी त्यास ठाम नकार दिला. इथे पुस्तकातला एक प्रसंग आठवतो. नगरमध्ये नाटकाची तालीम चालली होती. अमरापूरकर खूप सिगरेट्स ओढतात म्हणून पाकीट लपवून ठेवण्यात आलं होतं. पण जसजशी तलफ अनावर होत गेली, तसतसे ते अस्वस्थ होत गेले. नाटकावरून त्यांचं लक्ष उडत चाललं होत. तेव्हा सुनंदाताईनी आपल्या पर्समध्ये लपवून ठेवलेल्या पाकिटातून दोन सिगरेट्स आणून दिल्या. हीच लग्ना आधीची प्रेयसी नंतर पत्नी, गृहिणीच्या भूमिकेतही त्याला असंच सांभाळते. अमरापूरकरांची नाट्यवेडापायी अडलेली त्यांची पदवी या पद‌वीधारक मुलीशी लग्न ठरल्यानंतर ते पूर्ण करतात. इथे लग्न पार पडतं आणि हे भाऊ म्हणतात, `मला पुण्यात राहून एम.ए. करायच आहे. ही बाई हो ला हो करते. नववधू म्हणून तक्रार करत नाही. शिक्षण पूर्ण करून नोकरी करणारी ही मुलगी नोकरीधंदा न करणाऱ्या मुलाशी लग्न करते. तो काळ आणि लहान गाव हे लक्षात घेतलं, तर कदाचित कल्पना येईल की किती अवघड होतं ते. यांचं भांडवल काय तर पिढीजात वाडा आणि व्यवसाय. बरं त्या व्यवसायात तरी सहभाग तर तोही नाही. दिवसरात्र एकच ध्यास. एकच नाद... नाटक पुढे मिळणारे अमाप यश आणि वैभव यांची काही अंशी तरी शक्यता आणवली असेल, तर तसंही काही नव्हतं. आपलं मानलं आणि निभावलं. असेल तर एक विचार मनाशी असेल आधार द्यायला, याची कलानिष्ठा सोळा आपणे सच ! तिथे अन्य गोष्टीला थारा नाही. ते मात्र खरंच होतं. अमरापूरकरांमधला अस्वस्थ रंगकर्मी त्यांना कायमचा मुंबईत घेऊन आला आणि मग सर्वाच्या वाट्याला येतो तसा स्ट्रगल करत ते आधी व्यावसायिक रंगभूमीवर अभिनेता, दिग्दर्शक म्हणून यशस्वी होता होता अनपेक्षितपणे सिनेमात जाऊन पोहोचले आणि `अर्धसत्य` नंतर रेस्ट इज द हिस्टरी असा पुढला प्रवास घडला. या आत्मकथनात तो तपशीलवार वाचायला मिळेलच. परंतु त्यात महत्त्वाचं आहे ते भाड्याच्या घरात पितळी स्टोव्ह आणून मुंबईतल्या संसाराला केलेली सुरुवात ते नंतर ऑडीसारख्या महागड्या परदेशी गाड्यांपर्यंत झालेला प्रवास... आणि त्याहीपेक्षा हे घबाड सहजपणे घेणं, हाताळणं, स्वतः सुनंदाताईंनी, अमरापूरकरांनी आणि त्यांच्या तीन मुलींनीही. एकीकडे हे वैभव आणि दुसरीकडे मध्यमवर्गीय साध्या राहणीचे संस्कार ! दस्तुरखुद्द अमरापूरकर तसेच होते, परंतु त्यांच्या प्रचंड बिझी शेड्यूलमध्ये घरच्या आघाडीवर निगुतीने सांभाळलं, निभावून नेलं ते सुनंदाताईंनी. बरं हे करता करता आपली नोकरीही सांभाळली. मुलींची शाळा- कॉलेज, त्यांची जडणघडण, इतर साऱ्या सांसारिक बाबी, अमरापूरकरांच्या वाढत्या उत्पन्नाचं व्यवस्थापन, त्यासाठी नेमावयाचा चार्टर्ड अकाउंटंट वगैरे. आणि हे सारं करताना जे जग कालपरवापर्यंत आपल्यापासून दूर होतं तिथे सहज शिरकाव करण्याची, तिथल्या स्टार मंडळींमध्ये बावरण्याची संधी असताना ते स्वतःहून दूर ठेवणं, आपल्या मुलींनाही त्याचं आकर्षण वाटणार नाही याची काळजी घेणं हे अवघड काम या माउलीने सहज केलंय. अशीच कमाल त्यांनी केली ती त्यांच्या आई, सासू- सासरे आणि अमरापूरकरांच्या घरातच असलेल्या आत्याबाई ताई यांच्या व्यक्तिरेखा, त्यांच्याशी असलेलं नातं आणि रोजचा संबंध यांविषयी लिहिताना. त्यातून त्या वेळचा काळ अवकाश आणि बदलता कौटुंबिक सामाजिक - पोतही सहजपणे दिसून येतो. सासरे म्हणजे घरातला अखेरचा शब्द हे मनाशी कायम मानलेलं. स्वीकारलेलं. परंतु एक वेळ अशी येते की, मागल्या पिढीतलं कुणी दुखावलं तरी त्याची क्षिती न बाळगता, नव्या पिढीला आपली वाट काढावी लागते. कारण तिच्या काळ - अवकाशाचा तो रेटा आहे. तो मागल्या पिढीला कळणे शक्य नाही. स्वतःचा विचार करण्याची ही प्रेरणा खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरते. आणखी एक नोंद घेण्याजोगी गोष्ट म्हणजे, स्वतंत्रपणे स्वतःचं आयुष्य घडवणारी तरुण मुलगी कट्टर पुरुषसत्ताक सासरी जाते, तेव्हा तो विरोधाभास पेलणं किती अवघड असतं याचंही उदाहरण इथे प्रस्तुत होतं. या दरम्यान वेगळा विचार करणारा, सर्वांना समजून घेणारा संवेदनशील नवराही मधूनच नवरेपणा गाजवतो, पण अशा वेळी `आम्ही यांच्यासाठी एवढं करतो ,पण आमच्याबद्दल काही वाटत नाही` असा तक्रारखोर विचार दूर सारत आपलं काम करत राहणं यासाठी साधनाच लागली असेल. `स्वतःची समजूत घातली यापेक्षा `परिस्थिती नीट समजून घेतली` हा मा हा मार्ग पत्करला की सोपं होतं. मन शांत होतं. कडवटपणा तर कणभर राहात नाही. सर्जनशीलता आणि मनाचा प्रसन्नपणा ताजा टवटवीत राहतो. आणि मग आपल्याला जे करावंस वाटते ते करता येतं. त्याचं व्यवस्थापन सुचतं, जस सुनंदाताईंना त्यांच्या अनुवादाच्या कामाच्या नियोजनात सुचलं. घर आणि एकूणच कुटुंबाचे सर्व करताना त्यांना त्यांच्या लेखनासाठी वेळच काढता येईना, तेव्हा पहाटे लवकर उठून त्यांनी निवांत दोन तास काढले आणि आपलं काम केलं. एवढंच नव्हे तर कॉलेज, अभ्यास हे चाळीसेक वर्षे मागे पडल्यानंतर पुन्हा त्या मुंबई विद्यापीठात हजर झाल्या आणि मायथोलॉजीवरच्या एक वर्षाच्या घनघोर अभ्यासक्रमात स्वतःला झोकून दिलं आणि त्यात उत्तम गुण मिळवून पासही झाल्या. वयाच्या या टप्प्यावर घरगुती जबाबदाऱ्यांत, लेकींच्या बाळंतपणाचीही एकीचं तिकडे अमेरिकेत भर पडली. आरंभी मी म्हटले तस `कुठून आणते ही ऊर्जा ही माउली...!` असं करता करता आता कुठे स्वतः साठी वेळ मिळतोय असं वाटेवाटेपर्यंत अमरापूरकरांचं शेवट गाठणारं आजारपण सुरू होतं. आता पुन्हा नव्याने सारं नियोजन, आता दिवसाचा प्रत्येक क्षण त्यांची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत राहण्यासाठी. अमरापूरकरांची कामं कमी होत चालली होती. जिथून आयुष्याची सुरुवात केली, तिथे जाऊन तिथल्या घरात दोघांनी पुढली वर्ष काढायची असं ठरवता ठरवता तोच सारा वेळ मुंबईत हॉस्पिटलमध्ये काढावा लागला. नगरला पोहोचला तो अमरापूरकरांचा निष्प्राण देह... `खुलभर दुधाची कहाणी` ही एका समजदार आणि कर्तृत्ववान स्त्रीची कहाणी आहे. त्या कहाणीतून मला जाणवलेलं तिचं व्यक्तिमत्त्व अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं आहे. सुनंदा अमरापूरकर यांना सलाम! ...Read more