* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TYANCHYA SINDROMCHI KATHA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184980417
  • Edition : 2
  • Publishing Year : SEPTEMBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 172
  • Language : MARATHI
  • Category : MEMOIR
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A TRUE STORY. IT DESCRIBES THE G. B. SYNDROME IN DETAIL. THIS SYNDROME HAS ATTACKED THE BHAGWAT FAMILY TWICE, FIRST THE MOTHER OF THE FAMILY AND THEN THE SON OF THE FAMILY. THE DAUGHTER-IN-LAW OF THE FAMILY HAS DESCRIBED THE SIGNS OF THE SYNDROME IN DETAIL WITH WHOLE AND SOLE INTENTION OF INFORMING PEOPLE, PRESENTING THE PERFECT PICTURE OF THIS CRITICAL ILLNESS. G.B. SYNDROME IS AN ILLNESS WHICH ATTACKS THE IMMUNITY POWER OF THE PATIENT MAKING IT DISASTROUS FOR THE PATIENT. THE VIRUS OF THIS DISEASE STARTS WITH THE NERVES, SLOWLY TURNING ITS ATTENTION TOWARDS VICTIM`S TOES, LEGS, FINGERS, HANDS, LUNGS AND THEN THE TRACHEA ITSELF. THIS DISEASE IS VERY RARE. ONE PERSON IN 2-3 LAC PEOPLE IS AFFECTED WITH THIS DISEASE. THIS BOOK DESCRIBES THE EXPERIENCE OF THE BHAGWAT COUPLE. EVEN THOUGH, IT WAS MR. BHAGWAT WHO WAS THE VICTIM, MRS. BHAGWAT WAS THE SILENT PARTICIPANT OF ALL THAT WAS GOING AROUND. SHE WAS SEEING HIS PAIN, AND SUFFERING ALONG WITH HIM. TOGETHER, THEY BOTH FACED THE UPS AND DOWNS OF THE DISEASE, THE MENTAL AND PHYSICAL STRESSES, THEIR EVERLASTING BOND, THE STRENGTHENING OF THEIR RELATIONSHIP.... MRS. BHAGWAT HAS VERY SENSIBLY DESCRIBED ALL THIS IN HER WORDS, IN A NARRATIVE MANNER.THIS BOOK DOES NOT JUST GIVE DETAILS OF THE DISEASE; ON THE CONTRARY, IT GIVES US AN INSIGHT, COMPELLING US TO THINK MORE ABOUT OUR SELF, INWARDLY AND OUTWARDLY.
स्वत:ची रोगप्रतिकारक शक्ती स्वत:साठीच घातक ठरवणारा आजार म्हणजे जीबी सिंड्रोम! मज्जातंतू हळूहळू निकामी करून या आजाराचा विषाणू बोटं, पाय, हात आणि पुढेपुढे फुफ्फुसं आणि श्वासनलिकेवरही हल्ला करतो. लाखामागे केवळ दोन-तीन जणांना होणारा असा हा आजार! चारुदत्त भागवतांना अशा आजाराने पछाडल्यानंतर त्याच्याशी झगडताना ते व त्यांची पत्नी कल्पना यांना आलेले अनुभव, तीव्र मानसिक चढ-उतार आणि त्यातून वाढीला लागलेली श्रद्धा यांचे संवेदनक्षम चित्रण कल्पना चारुदत्त भागवत यांनी या कथनातून केले आहे. म्हणूनच निव्वळ भयंकर आजाराच्या पुढे जाऊन हे कथन वाचकाला शरीर-मनाबद्दल अधिकाधिक प्रगल्भ करते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #KALPANACHARUDATTA #TYANCHYASYNDROMCHIKATHA #MEMOIR #त्यांच्यासिंड्रोमचीकथा"
Customer Reviews
  • Rating StarSAPTAHIK SAKAL 10-4-2010

    ‘एका लढाईतील अनुभव’… अलीकडे प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकांकडे नजर टाकल्यास आरोग्यविषयावरील अनेक पुस्तके सध्या येत आहेत, हे जाणवते. आरोग्याची काळजी, विशिष्ट रोगाची माहिती, उपचारपद्धती, एखाद्या रोगावर मात केलेल्या रुग्णाचे अनुभवकथन, हॉस्पिटलची माहिती, डॉकटरांचे अनुभवकथन, डॉक्टरांनी राबविलेल्या एखाद्या प्रकल्पाची माहिती, शारीरिक व्याधींचा मनाशी असलेला संबंध, मनोविकार, मानसोपचार इत्यादी. अशा अनेक पुस्तकांद्वारा आरोग्याची काळजी, आरोग्याबद्दलची जाण, निरोगी जगण्याचे महत्व पटवून देण्याचे काम होत असल्याचे दिसते. ‘त्यांच्या सिंड्रोमची कथा’ हे कल्पना चारुदत्त यांनी लिहिलेले पुस्तक ‘जीबी सिंड्रोम’ या आजारावर आधारित आहे. मज्जातंतू हळूहळू निकामी करणारे या आजारातील विषाणू बोटं, पाय, हात आणि पुढे-पुढे फुप्फुसं आणि श्वासनलिकेवर हल्ला करतात. स्वत:ची रोगप्रतिकारक शक्ती स्वत:साठीच घातक ठरविणे, हे ‘जीबी सिंड्रोम’चे लक्षण! चारुदत्त भागवतांना अशा आजाराने पछाडल्यानंतर त्यांच्याशी झगडताना ते व त्यांच्या पत्नी कल्पना यांना आलेले अनुभव या पुस्तकात सांगितले आहेत. जरा, व्याधी आणि मृत्यू यांचे दर्शन झाल्यानंतर राजपुत्र सिद्धार्थाला सत्य शोधण्याचा, शाश्वताचा शोध घेण्याचा ध्यास लागला. संसारातून मुक्त होऊन तो कठोर साधना करु लागला. या साधनेतूनच त्याला संसारातील क्षणभंगुरता, क्षणिकता, सुख-दु:खे समे कृत्वा या ‘सम्यक दृष्टी’चा प्रत्यय आला, परंतु तो गौतम बुद्ध होता. सर्वसामान्य माणूस त्याच्या घरामध्ये आप्त-मित्रांमध्ये, अवती-भवती ‘जरा-व्याधी-मृत्यू’चे अनुभव घेतो. त्यातली सारी अनिश्चतता, रोकडा व्यवहार, तऱ्हेवाईक माणसे, भावनांचे चढते-उतरते आवेग, मनावरील प्रचंड ताण, रोजचे सुरळीत व्यवहार बिघडवून टाकणारी धावपळ, छोट्या-साध्या गोष्टींसाठीसुद्धा प्रसंगी वंचित राहणे, यांचा अनुभव घेतो. त्यातून त्याची जगण्याची समज वाढते. मनाचा कमकुवतपणा कमी होतो. जगण्याची अनिश्चितता, अर्थपूर्णता आणि निरर्थकता पाहण्यासाठी त्याचे मन सरावते. अखेरीस आपण आपल्यासहित इतरही ‘माणसंच’ आहोत याचा प्रत्यय आल्यानंतरची करुणा निर्माण होते. मग एका वेगळ्या संदर्भात महाभारताने कुंतीने श्रीकृष्णाकडे दु:ख का मागितले, याचे महत्व पटते. कल्पना चारुदत्त यांच्या अनुभव कथनामधून हे सारे आठवत राहते. ‘माझ्या मना बन दगड’ हे म्हणण्याआधी ‘मेणाहून मऊ’ असणारे वितळणारे, पाघळणारे मन स्वत:लाच सांभाळावे लागते. ओळखावे लागते. स्वत:च्या मनातील भावना-विचारांकडे त्रयस्थपणे पाहण्याची, स्वत:ला शोधण्याची गरज कल्पना चारुदत्त यांच्या कथनामधून ठळकपणे पुढे येते. रुग्ण आणि रुग्णाची काळजी घेणारे आप्त-मित्र यांच्या नात्याची कसाटी लागणे, रुग्णाचे जगणेच पणाला लागणे, डॉक्टरांचे निदान, हलगर्जीपणा, रुग्णाबददलचे डॉक्टरांनी आणि त्याच्या आप्त-सोबत्यांनी लावलेले अंदाज चुकवून रुग्णाचे प्रकृतीमान बिघडणे-सुधारणे हा साराच प्रकार जीवघेणा असतो. ‘येथे मनुष्यमात्राचे काय आहे’, असा निराशावादी सुरही मनात डोकावून जातो, पण साऱ्यावर मात करीत मनोबल, आत्मविश्वास स्वत:लाच प्राप्त करावा लागतो. आत्मबळ प्राप्तीचा मनाचा प्रवास कल्पना चारुदत्त यांच्या अनुभवातून उलगडतो. मानवी नात्यांचे कोवळे धागे, मानवी शरीराचे आजारपणात येणारे वेगळे ‘शरीरभान’, शरीराचे महत्वपूर्ण अस्तित्व जाणवणे, आपल्याकडून एरवी आपल्या शरीराची होणारी प्रचंड हेळसांड, आपल्या शरीराचा-मनाचा परस्परांशी होणारा अर्थपूर्ण संवाद ही सारी वैशिष्ट्ये या अनुभवकथनातून व्यक्त होतात. स्वमदत करण्यासाठी पुढे सरसावणे, आत्मबळ, आत्मसंरक्षण प्राप्तीसाठी स्वत:लाच कठोर, कणखर करणारे अनुभवकथन असे त्याचे वर्णन करता येईल. -रुपाली शिंदे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more