* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THE NO.1 LADIES` DETECTIVE AGENCY INTRODUCED THE WORLD TO THE ONE AND ONLY PRECIOUS RAMOTSWE - THE ENGAGING AND SASSY OWNER OF BOTSWANA`S ONLY DETECTIVE AGENCY. TEARS OF THE GIRAFFE, MCCALL SMITH`S SECOND BOOK, TAKES US FURTHER INTO THIS WORLD AS WE FOLLOW MAMA RAMOTSWE INTO MORE DARING SITUATIONS ... AMONG HER CASES THIS TIME ARE WAYWARD WIVES, UNSCRUPULOUS MAIDS, AND THE CHALLENGE TO RESOLVE A MOTHER`S PAIN FOR HER SON WHO IS LONG LOST ON THE AFRICAN PLAINS. INDEED, MMA RAMOTSWE`S OWN IMPENDING MARRIAGE TO THE MOST GENTLEMANLY OF MEN, MR J.L.B. MATEKONI, THE PROMOTION OF MMA`S SECRETARY TO THE DIZZY HEIGHTS OF ASSISTANT DETECTIVE, AND THE ARRIVAL OF NEW MEMBERS TO THE MATEKONI FAMILY, ALL BREW UP THE MOST HUMOROUS AND CHARMINGLY ENTERTAINING OF TALES. * TEARS OF THE GIRAFFE WAS SELECTED AS ONE OF THE GUARDIAN`S TOP TEN
दहा वर्षांपूर्वी घडलेल्या एका अपघाती मृत्यूसंबंधीची केस–प्रेश्यसच्या आत्तापर्यंतच्या कारकीर्दीतील सर्वांत कठीण, गुंतागुंतीची केस... एक विशीतला अमेरिकन तरुण बोट्स्वानातून अचानक, काहीही मागमूस न ठेवता नाहीसा होतो. सर्व प्रकारे शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा लागत नाही. हे समजल्यानंतर पोलीस ती केस कायमची बंद करून टाकतात. प्रेश्यस ती का आणि कशी उलगडते हे वाचूनच पाहायला हवं... व्यावसायिक आघाडीवर यशस्वीपणे, दमदारपणे पुढे जात असताना तिच्या वैयक्तिक जीवनातही काही खळबळजनक घटना घडत असतात... नव्या जबाबदा-या अनपेक्षितपणे अंगावर कोसळत असतात. अर्थात, तिच्या मदतीसाठी दोन हक्काचे हात, नव्हे जीवनभराची साथ तिला लाभणार असते, ती जे. एल. बी. मातेकोनींच्या रूपात... व्यवसायानं मेकॅनिक ! त्यांचा नेहमी संबंध येतो तो निर्जीव गाड्यांशी, त्यातील यंत्रभागांशी, इंजिनांशी! ...पण प्रेश्यसमध्ये आणि त्यांच्यात एक मोठं साम्य असते. दोघांच्या हृदयात माणुसकीचा ओलावा आहे... त्यामुळेच कधीकधी ते गोत्यातही येत असतात. प्रेश्यसची व्यावसायिक वाटचाल वाचकांना कधी हसवते, कधी अंतर्मुख करते, तर काही वेळा वाचकांची मनं हेलावून सोडते. गुंतागुंतीच्या केसेसचा उलगडा नेहमीच २±२·४ या पद्धतीनं करता येत नाही. त्यासाठी वेगळ्या अंगानं विचार करावा लागतो. `सापभी मरे और लाठीभी ना टूटे...` अशी हुशारी प्रेश्यस वापरते, तेव्हा तिच्यातील नैतिक सामर्थ्याची, तिच्यावर केल्या गेलेल्या संस्कारांची मनापासून दाद द्यावीशी वाटते. शीर्षकापासूनच या पुस्तकाचं वेगळेपण जाणवतं... ही गोष्ट आहे त्या वेगळ्या स्त्रीची, जिच्यात क्वचित प्रसंगी तुम्हाला तुमचं प्रतिबिंबही दिसेल...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TEARSOFTHEGIRAFFE #TEARSOFTHEGIRAFFE #टिअर्सऑफजिराफ #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #NEELACHANDORKAR #नीलाचांदोरकर #ALEXANDERMCCALLSMITH #अलेक्झांडरमॅक्कॉलस्मिथ
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKPRABHA 17-04-2015

    फोटोवरून घेतलेला रहस्याचा शोध… एडिनबर्ग येथील ‘वैद्यकीय कायदा’ विषयाचे प्राध्यापक असलेल्या अलेक्झांडर मॅक्काल स्मिथ या स्कॉटिश लेखकाची ‘नंबर वन लेडिज डिटेक्टिव्ह एजन्सी’ ही अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. ‘टिअर्स ऑफ द जिराफ’ हे याच मालिकेतील नीला चांदोकर यांनी अनुवाद केलेलं दुसरं पुस्तक होय. जगभरातील चाळीस भाषांमध्ये अनुवाद झालेली ही मालिका, आपल्याला आफ्रिका खंडातील बोट्स्वाना या जगावेगळ्या देशात नेऊन तेथील जीवनाचं दर्शन घडवते. वेगळया देशातील वेगवेगळी पात्रे आणि कथांमधील विषय वैविध्यामुळे ही कथामालिका वाचकांना विशेष आवडते. गुप्तहेरगिरीविषयी काहीही व्यावसायिक ज्ञान नसलेली प्रेश्यस रामोत्स्वे तिच्यातील अंगभूत हुशारीच्या जोरावर अनेक गुंतागुंतीच्या केसेस सोडवते. तिच्यातील अंतःप्रेरणा लोकांना बोलतं करण्याची कला आणि त्यांच्यावर मनापासून प्रेम करण्याची वृत्ती या स्वभावामुळे तिला कोणत्याही प्रकारच्या क्लिष्ट केसेस सोडवण्यास मदत होते. या पुस्तकातील कथानक दक्षिण आफ्रिकेतील बोट्स्वाना या भागात घडते. एक विशीतील अमेरिकन तरुण अचानकपणे नाहीसा होतो. अनेक प्रकारे शोध घेऊनही त्याचा काहीच ठावाठिकाणा लागत नाही. शेवटी हताश होऊन पोलीस ती केस बंद करतात, परंतु त्यांची आई मिसेस कार्टिन ही खूप अस्वस्थ असते. त्याच्या मृत्यूची बातमी समजल्यापासून ती सतत माहिती काढून त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करते, परंतु काहीच हाताला लागत नाही. त्याचा मृतदेह बघेपर्यंत तो मेला आहे या ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवायला तिचे मन तयार नसते. खरंतर ही घटना दहा वर्षांपूर्वी घडलेली असते, पण केवळ मुलगा मायकल हा अचानक नाहीसा झाला म्हणजेच तो मेलाच असेल असे कसे काय समजावे? हा एकच प्रश्न तिला सतत सतावत असतो. म्हणून या घटनेची उकल करण्याची विनंती मिसेस कार्टिन प्रेश्यस रामोत्स्वेकडे करते. दहा वर्षांपूर्वी घडून गेलेल्या घटनेचे धागेदोरे शोधून काढणे ही खरोखर अशक्यप्राय गोष्ट असते. तरी पण एका आईचे दुःख ऐकून प्रेश्यस रामोत्स्वे यांचे काळीज हेलावते आणि भिडस्तपणाच्या स्वभावापायी मिसेस कार्टिनना काहीतरी मदत करायला हवी असे वाटून प्रेश्यस भावनेच्या भरात केस स्वीकारते. जे. एल. बी. मातेकोनी या गॅरेज मालकाशी प्रेश्यस रामोत्वेचे लग्न ठरते. मातेकोनींच्या घरातील दुष्ट प्रवृत्तीची लबाड स्वार्थी कामवाली बाई लॉरेन्स पेको हिला हे लग्न होऊ द्यायचे नसते. कारण या लग्नानंतर कामवालीची गरज नसल्यामुळे तिला हे काम सोडून दुसरीकडे जावे लागणार असते. त्याचबरोबर मातेकोनींच्या गैरहजेरीत मित्रांबरोबर चालणारी तिची ऐयाशी बंद पडणार असते. यासाठी खूप विचारांती ही पेको बाई पे्रश्यसविरुद्ध एक कट रचते; परंतु या कटात ती ज्या मित्राची मदत घेते तो तिचा डाव तिच्यावरच उलटवतो, त्यामुळे तिला पोलीस कोठडीची हवा खावी लागते. अश प्रकारे मातेकोनी आणि प्रेश्यस यांच्यातील पेकोबाईचा अडसर दूर होतो. अनेक ठिकाणी चौकशी करत, त्या-त्या गावी जाऊन बराच प्रवास करत एक एक दुवा शोधून दुसऱ्या दुव्यापर्यंत पोचत, प्रेश्यस रामोत्स्वे मायकेलच्या मृत्यूचा छडा लावते. ती त्याच्या घराला भेट देते, तेव्हा तिला एक जुना फोटो तिथे सापडतो. त्या फोटोच्या आधारे घटनेची उकल करत, फोटोतील माणसापर्यंत पोचते. त्याला शाब्दिक धमकी देऊन त्याच्याकडून गुन्हा वदवून घेते. त्यावर विश्वास न ठेवता पुन्हा घटनास्थळाला भेट देते. त्यानंतर त्याने सांगितलेल्या कथेतील दुसऱ्या स्त्रीला ही प्रत्यक्ष जाऊन भेटते. तिच्याकडूनही त्याने सांगितल्या प्रकाराची खात्री करून घेते. केवळ इथपर्यंत प्रकरणाचा छडा लागला म्हणून केस सोडून न देता माणुसकीच्या नात्याने त्या स्त्रीला मिसेस कार्टिनला भेटण्यास येण्याची विनंती करते. त्या स्त्रीचे नाव कार्ला असते. तिचे मायकेलवर प्रेम असते व तिला मायकेलपासून एक मुलगा झाला असतो. सरतेशेवटी मिसेस कार्टिन व कार्ला यांची प्रेश्यसच्या ऑफिसमध्ये भेट होते. कार्ला मायकेलच्या बाबतीत घडलेली घटना सविस्तर रूपाने मिसेस कार्टिनना सांगते. आता आपल्या मुलाच्या मृत्यूवर त्यांचा विश्वास बसतो, पण त्याचबरोबर छोटासा मायकेल जो त्यांचा नातू असतो, त्याला पाहून आनंदही होतो. प्रेश्यस तिची अशील असलेल्या मिसेस कार्टिनला देण्यासाठी एका गरीब बाईकडून एक वेतकामाची टोपली विकत घेते. या टोपलीत ‘जिराफांच्या अश्रूंचे’ रहस्य दडले आहे. ज्याच्यामुळे पुस्तकाला ‘टिअर्स ऑफ द जिराफ’ असे नाव दिले गेले आहे. हे नाव देण्यामागे काय कल्पना आहे व त्यामध्ये काय भाव आहे हे वाचकांनी स्वतःच वाचावे. जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी मनुष्य स्वभावातील साधर्म्य आढळते. त्यामुळेच या कथेतील नावे, गावे, प्रांत वेगवेगळे असले तरी या वेगळेपणाच्या भिंती आपोआप गळून पडतात व ही गोष्ट कधी आपली होऊन जाते ते कळतच नाही. अतिशय शिताफीने उलगडलेली या कथेतील रहस्य खरंतर प्रत्यक्ष वाचण्यात जास्त मजा आहे. प्रेश्यसची या कथेतील वाटचाल वाचकाला शेवटपर्यंत कथानकाशी खिळवून ठेवते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
हेमंत कान्हे, अमरावती.

जी.बी.देशमुख ह्यांच्याद्वारे लिखित `दुर्दम्य` हे पुस्तक सत्य घटनांवर प्रस्तुत केलं गेलं असून, मनोगत तसेच संपूर्ण पुस्तक वाचतांना अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. एकंदरीत हे पुस्तक जबरदस्त आहे. लेखकाच्या लेखनक्षमते विषयी लिहावं तेवढं कमीच आहे. लेखकासह्या साहित्य कृतीकरीता मनापासून सॅल्युट. ...Read more

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more