* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: DOLLAR BAHU
 • Availability : Available
 • Translators : UMA KULKARNI
 • ISBN : 9788177667455
 • Edition : 16
 • Weight : 150.00 gms
 • Pages : 160
 • Language : Translated From KANNADA to MARATHI
 • Category : FICTION
 • Available in Combos :SUDHA MURTY AND N. R. MURTY COMBO BOOKS
Quantity
THIS COUNTRY IS WEIRD. IT IS A HUGE AND COLOURFUL COBWEB. THERE ARE JOBS HERE, MACHINES HERE, MECHANISMS HERE, HAPPINESS, TREASURES, DOLLARS, YOU WILL FIND EVERYTHING HERE. OUR PEOPLE FALL PREY TO THE LUXURY. BUT ONCE THEY REACH HERE, THEY ARE UNABLE TO TURN BACK. OUR COUNTRY ALSO HAS NOTHING TO CALL THEM BACK. OUR COUNTRY HAS THOUSANDS OF WINDOWS TO GO OUT, BUT NOT SINGLE DOOR TO CALL THEM BACK THROUGH, TO TAKE THEM IN. YOU WILL NOT BE ABLE TO IMAGINE THE LIFE THERE. ARE THOSE PEOPLE HAPPY WHO END UP BUYING ONLY IN SALES AND WHO KEEP ON MULTIPLYING THE DOLLAR WITH THE CURRENT RATE OF RUPEE? THERE THEY EARN THOUSAND DOLLARS AND WORK IN VERY ORDINARY CIRCUMSTANCES, BUT THEY PRETEND TO EARN 40 THOUSANDS AND TRY TO PROTECT THEIR VANITY. WE GO OVER THERE TO EARN DOLLARS, FOR THAT WE LEAVE EVERYTHING THAT WE ARE A PART OF, OUR PEOPLE, OUR RELATIVES, OUR ORIGIN, WE FACE THE HARSH WEATHER THERE BUT WE NEVER BECOME A PART OF THEIR LIFE. NONE OF THE INDIANS UNDERSTAND HOW COSTLY THIS DOLLAR IS FOR US. WE ARE CAUGHT UP IN THE MARSHY BUSINESS OF DOLLARS. THERE WE GET A MUCH BETTER JOB THAN WE DESERVE. THERE IS NO POLITICS OF LANGUAGE, CASTE ETC. WE CAN WORK IN A HAPPY ENVIRONMENT WITH A CONTENTED MIND. IF I LEAVE EVERYTHING AND COME BACK THEN I WILL BE VERY DEPRESSED.
फार विचित्र आहे हा देश! ते एक रंगीबेरंगी कोळ्याचं जाळं आहे. तिथे नोकऱ्या आहेत, यंत्रतंत्र आहे. सुख संपत्ती आहे, डॉलर्स आहेत. आपली माणसं त्यातल्या कशाला तरी बळी पडून तिथं जातात पण माघारी यायला जमत नाही. तिथून जावं असा आपला देशही नाही. तिथून बाहेर पडण्यासाठी शेकडो खिडक्या आहेत, पण आत बोलावणारा एकही दरवाजा नाही. तिथल्या जीवनाची तुम्हाला कल्पना नाही. सेलमध्ये खरेदी करायची आणि डॉलरला चाळीसनं गुणायचं! असं जगणारी मंडळी सुखी असतात काय? तिथं हजार डॉलर्समध्ये सामान्य काम करत राहायचं आणि इथं चाळीस हजार रुपये पगार मिळतो असं सांगून भाव खायचा. तिथं डॉलर मिळविण्यासाठी आम्ही आपली माणसं, घरदार सगळं सोडून, तिथल्या थंडीवाऱ्याला तोंड देत राहतो, पण तिथल्या समाजाचं अविभाज्य अंग होऊ शकत नाही. फारच महाग पडतो हा डॉलर! पण हे भारतात कुणालाही समाजात नाही. पैशाच्या दलदलीत सापडलोय आम्ही! आमच्या लायकीपेक्षा फार उत्तम नोकरी मिळते तिथे. जाती, भाषा यांचं राजकारण नाही तिथे. सुखानं आपलं आपण काम करू शकतो. तिथलं सगळं सोडून मी इथं आलो तर आलो तर आणखी दु:खी होईन.`

No Records Found
No Records Found
Keywords
#SUDHA MURTY #N.R.NARAYANA MURTY #LEENA SOHONI #UMA KULKARNI #WISE & OTHERWISE #GOSHTI MANSANCHYA #PUNYABHUMI BHARAT #THAILIBHAR GOSHTI #SUKESHINI AANI ITAR KATHA #BAKULA #AYUSHYACHE DHADE GIRAVTANA #AAJICHYA POTADITALYA GOSHTI #MAHASHWETA #DOLLAR BAHU #SAMANYATALE ASAMANYA #PARIGH #PITRURHUN #ASTITVA #HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA #TEEN HAJAR TAKE #SARPACHA SOOD #GARUDJANMACHI KATHA #TRISHANKU #A BETTER INDIA A BETTER WORLD #NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA #सुधा मूर्ती #एन.आर.नारायण मूर्ती #लीना सोहोनी #उमा कुलकर्णी #वाइज अँड अदरवाइज #गोष्टी माणसांच्या #पुण्यभूमी भारत #थैलीभर गोष्टी #सुकेशिनी #बकुळा #आयुष्याचे धडे गिरवताना #आजीच्या पोतडीतल्या गोष्टी #महाश्वेता #डॉलर बहू सामान्यांतले असामान्य #परीघ पितृऋण #अस्तित्व #हरवलेल्या मंदिराचे रहस्य #तीन हजार टाके #सर्पाचा सूड #गरुडजन्माची कथा #त्रिशंकू #अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड : नारायण मूर्ती #नारायण मूर्ती : मूल्यं जपणारं एक अद्वितीय आयुष्य
Customer Reviews
 • Rating StarSonali Dighe

  खुप सुंदर आहे पुस्तक. आपल्या कडच्या लोकाना अमेरिकन जीवनशैली चे खुप आकर्षण आहे पन तेथील वस्तुस्तीथी या पुस्तका तून समजते.

 • Rating StarArchana Netke Bansode

  प्रेम या विषयावर आवडलेलं साहित्य

 • Rating StarDAINIK TARUN BHARAT 06-05-2007

  नातेसंबंधांच्या विविध रूपांचे दर्शन... ‘डॉलर बहू’ ही सुधा मूर्तींची मूळ कन्नड कादंबरी उमा कुलकर्णी यांनी अनुवादित केलेली– ‘अमेरिकेतील जीवन म्हणजे रंगीबेरंगी कोळ्याचं जाळं. तिथे नोकऱ्या आहेत. यंत्र तंत्र आहे, डॉलर्स आहेत. आपली माणसं त्यातल्या कशाला ती बळी पडून तिथं येतात, पण माघारी जायला जमत नाही. पैशाच्या म्हणजे डॉलरच्या दलदलीत सापडतात. फारच महाग पडतो हा डॉलर. पण भारतात कुणालाही ते समजत नाही.’ या कादंबरीतील चंद्रूच्या तोंडून लेखिका आपली खंत व्यक्त करते. इस्रो कंपनीत नोकरी करणारा इंजिनिअर चंद्रू कंपनीतर्फे अमेरिकेला जातो. पहिल्याच भेटीत या देशावर, तिथल्या समृद्धीवर भाळतो. डॉलरमधल्या मंत्रशक्तीने खेचला जातो. त्यामुळे कंपनीचं ट्रेनिंग संपल्यावर भारतात परत न जाता आपल्या मित्रांप्रमाणेच ‘स्किप’ करून मिनिसीटामधल्या ग्रीनकार्ड मिळवून देणाऱ्या कंपनीत नोकरी धरतो. कंपनीनं दिलेलं ट्रेनिंग. बाँड यांचा भंग करून ‘पळपुट्या’ मनोवृत्तीचा चंद्रू शेवटी ग्रीनकार्ड मिळवून अमेरिकेत स्थिरावतो. दरम्यान त्याच्या धाकट्या भावाचं– गिरीशचं लग्न होतं. गिरीशची पत्नी विनिता हिच्यावर चंद्रूचं एकतर्फी प्रेम असतं. पण ग्रीनकार्डच्या मोहापायी त्याला विवाहासाठी भारतात जाणं शक्य झालेलं नसतं. एकटेपणाला कंटाळून चंद्रू भारतात येतो आणि त्याच्या आईने गौरम्माने ठरविलेल्या सर्वसामान्य तरी अतिश्रीमंत मुलीशी लग्न करतो. डॉलर मिळविणाऱ्या चंद्रूवर त्याची आई गौरम्मा भुललेली असते. आंधळेपणामुळे तिला जवळ असलेल्या गिरीश– विनिताचा सरळ, साधा स्वभाव रुचत नाही. ती त्यांना तुच्छतेने वागवते. चंद्रूच्या वडिलांची– शामण्णाची ती पत्रास ठेवत नाही. सुनेच्या बाळंतपणाच्या निमित्ताने गौरम्माची अमेरिका-वारी होते आणि भ्रमाचा भोपळा फुटतो. अमेरिकेतील कुटुंबांच्या समस्येची जटिलता, एकटेपणामुळे सहज व्यसनात अडकणारी मुलं, गौरम्माच्या पैशाच्या लोभाला ओळखून दुटप्पी वागणारी सून-जमुना अशा अनेक गोष्टींमुळे गौरम्मांचे डोळे उघडतात. तरीही भारतीय समाजात किमान स्थान नसलेल्या व्यक्ती अमेरिकेत राहून डॉलर मिळवून आयुष्याला चांगलं वळण देऊ शकतात, हेही त्यांना समजतं. कथेचा हा पट विणलाय परस्परविरोधी स्वभावाच्या चंद्रू गिरीश, विनिता-जमुना, गौरम्मा-शामण्णा अशा जोड्यांनी गेल्या पंधरा वीस वर्षातील बदलतं जग, व्यवसायासाठी मुलांनी परदेशी स्थायिक होणं तिथल्या जीवनपद्धतीशी जुळवून जवळजवळ एकलकोंडं आयुष्य स्वीकारण, भारतीय नातेवाईकांशी त्यांची नाळ तुटणं या अपरिहार्य वास्तवातील भयानकता यातून स्पष्ट होते. घटनांची वेगवान रचना तसेच नातेसंबधांची विविध रूपे, कादंबरीतून स्पष्ट होतात. ‘डॉलर फार महाग पडतो.’ हे सत्य समजून अमेरिकेहून भारतात परतणाऱ्या गौरम्मांचा प्रवास मनाला चटका लावतो. तरीही बरेच प्रश्न अनुत्तरित राहतात. -मेधा मराठे ...Read more

 • Rating StarDAINIK AIKYA 03-06-2007

  अमेरिकन श्रीमंतीचा भुल भुलैय्या… ‘डॉलर बहू’ ही सुधा मूर्ती यांची कादंबरी अनेक भाषांमध्ये अनुवादित झाली आणि तिच्यावर टेलिसीरियलही झाली आहे. अमेरिकेत सध्या भारतीय तरुण संगणकक्षेत्रात, माहितीतंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या संख्येने कार्यरत आहेत आणि त्यांा तेथे होणारी प्राप्तीही अमेरिकेतील उच्चश्रेणीतील वर्गाशी तुल्यबळ असल्याने, कोणालाही त्यांचा हेवा वाटावा. असे सध्याचे वातावरण आहे. अमेरिकेचे आकर्षण त्यामुळे सर्वांना वाटते. अमेरिकन विद्यापीठात प्रवेश मिळावा म्हणून दरवर्षी दीडदोन लाख पदवीधर मुलांचा प्रयत्न असतो. तेथे एम.एस. पीएच.डी. वगैरे पदव्या मिळाल्या की कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये बहुतेकांना नोकऱ्या मिळतात. चांगला पगार मिळू लागतो. अशा तरुणांशी लग्न होऊन अमेरिकेत वास्तव्य करता यावे असे स्वप्न कितीतरी तरुणी बाळगत असतात आणि अमेरिकेत गेल्यावर तेथील सुबत्तेच्या, समृद्धीच्या, सुखसोयींच्या भुलभुलैय्यात हरवून जाण्यात धन्यता मानतात. अमेरिकेत ग्रीनकार्ड मिळाले म्हणजे आयुष्याचे सार्थक झाले अशी भावना सर्वदूर दिसते. अमेरिकन जीवनशैली अंगवळणी पडली की भारतात परत येणे नकोसे वाटते. अशा जोडप्यांना होणारी मुलेबाळे लहानपणापासून अमेरिकन ढंगात वाढत राहिली तर विचारूच नका. भारतीय वातावरण, येथील अस्वच्छता, बेशिस्त, दारिद्र्य, गैरसोय वगैरे बघून हा देश आपला नव्हे, अशी त्यांची धारणा होते आणि भारताला कधीमधी धावती भेट देण्यापलीकडे त्यांचे मायभूमीशी काही नाते उरत नाही. अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या तरुणांशी लग्न करून ‘डॉलर बहू’ होण्याची स्वप्ने बघणाऱ्या तरुणींची कथा डॉ. सुधा मूर्ती यांनी ‘डॉलर बहू’ या कादंबरीत सांगितली आहे. अशा डॉलरबहूचे कौतुक सासरी-माहेरी सर्वांना वाटते. परंतु अमेरिकतले भारतीयांचे जीवन हे दुरून वाटते तितके गोंडस, ग्लॅमरस नसते; तेथे पगार वगैरे चांगला असला आणि जाती, भाषा, धर्म यांच्या राजकारणाचा जाच टाळून आपलं काम निर्वेधपणे करून चांगल्या प्रकारे जगणं शक्य असलं तरी अमेरिकेत आपण तसे उपरेच असतो आणि तसे एकाकीही असतो; अडीअडचणींच्या वेळीही मित्रमंडळी तेवढ्यापुरती मदतीला आली तरी आपले आपणच बघणे क्रमप्राप्त असते. आपले परिचित वर्तुळ आधारासाठी लागते. तेथील नोकरीमध्ये भरपूर काम करावे लागते; नोकरचाकर ठेवणे अशक्यप्राय असल्याने स्वत:च आपली सर्व कामे करणे भाग असते; अर्थात तेथील सुखसुविधांमुळे तेही जमणे अवघड जात नाही आणि तेथील त्या सुखसुविधा अंगवळणी पडल्यावर काही वर्षांनी पुन्हा भारतात येऊन येथे नव्याने आपले लागेबांधे निर्माण करून जम बसवणे हे मात्र अवघड वाटते... त्यामुळे तेथेच राहणे, दुय्यम नागरिक म्हणून जीवन व्यतीत करणे हेच भाग्योदय उरते. डॉ. सुधा मूर्ती यांनी अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांच्या जीवनाचे अनेक विध पैलू ‘डॉलर बहू’च्या माध्यमातून पेश केले आहेत. बंगोलरच्या जयनगर भागात राहणारे संस्कृतचे मास्तर शामण्णा. त्यांची पत्नी गौरम्मा. काटकसरीचा संसार. तीन मुलं. थोरला चंद्रशेखर इंजिनिअर. दुसरा मुलगा गिरीश बँकेत क्लार्क. बेताचा पगार. मुलगी सुरभी... चंद्रशेखर बंगलोरच्या हस्त्रो या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर. कंपनी त्याला अमेरिकेला एका वर्षासाठी पाठवते. अमेरिकेतील समृद्धीने तो चक्रावून जातो. दरम्यान त्याचा भाऊ गिरीश विवाहबद्ध होतो. त्याला पत्नी म्हणून मिळते ती धारवाडची विनिता... खरं तर धारवाडला बँकेत नोकरी करताना चंद्रशेखर तिच्या प्रेमात पडलेला होता. पण ते प्रेम अव्यक्तच राहिलेलं होतं.. विनिता आपली वहिनी म्हणून आपल्याच घरात आलेली बघून तो काहीसा उद्विग्न होतो; पण साडेतीन वर्षांनी भारतात तीन आठवड्यांच्या रजेवर आलेल्या चंद्रशेखरच्या लग्नाच्या दृष्टीने हालचाली सुरू होतात. तशातच कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूटमध्ये शिकवणाऱ्या सामान्य स्थितीतल्या गोपीच्या प्रेमात सुरभी पडते. गौरम्मा तिला या दरिद्री प्रेमाचा नाद सोडून दे असे सांगते. ‘अमेरिकेच्या हिशेबाने पाहिले तर शंभर डॉलरसुद्धा न मिळवणाऱ्या नवऱ्याशी संसार करताना तुझे हाल होतील..’ अशी भीती घालते. ‘मला अमेरिकेत नोकरी करणाराच जावई पाहिजे’ असे गौरम्मा सांगते. आईच्या स्वभावाची कल्पना असल्याने गिरीश गप्प बसतो. अमेरिकेतले एक स्थळ लग्न जुळवणाऱ्या दलालाकडून सुचवण्यात येते. ‘राजारामांचा मुलगा – शेखर अमेरिकेत असतो. हिऱ्यांच्या कुड्या, अमेरिकेचं तिकिट, दोन किलो चांदी, पन्नास तोळे सोनं, दिवसाचं चांगलं लग्न, योग्य तो मानपान... हुंडा अजिबात नको... अशा बेताच्या अपेक्षा असणारे हे स्थळ – गौरम्माला ठीक वाटते. राजाराम व शेखर सुरभीला बघायला येतात. ‘ही दरिद्री माणसं माझ्या मुलाला काय देतील – उगाच आमच्या मुलाचा वेळ फुकट घालवला’ असे राजारामांना वाटते. आठ वर्षांनी सुरभीपेक्षा मोठा असणारा शेखर – गिरीश शेखरबद्दल माहिती मिळवतो. तो एका अमेरिकन मुलींबरोबर रहात असतो. त्यामुळे सुरभीचे लग्न बँकेत नोकरी करणाऱ्या सुरेशशी ठरते. हैद्राबादमध्ये त्याचे घर असते... चंद्रशेखर लग्नासाठी दोन लाख रुपये पाठवतो... जमुनाच्या सोयीने लग्नाची तारीख ठरते. विनिताही मग मोकळेपणाने सांगते. ‘तुमच्या डॉलरनं आपल्या घराचा सत्यानाश केला. आम्ही काहीही केलं तरी अम्मा त्याची तुलना डॉलरशी करतात. लग्नाची तारीख ठरवतानाही केवळ जमुनेची सोय पाहिली. चंद्रशेखरला त्यातले सत्य जाणवते. पुढे जमुनेच्या बाळंतपणासाठी गौरम्मा अमेरिकेला जाते. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांच्या वेगवेगळ्या समस्या गौरम्माला लक्षात येतात. चंद्रशेखरचा मित्र वेंकटू यांची मुलगी तेरा वर्षांची. तिला तिच्या मित्रांचे येणारे फो. अमेरिकेन मुलीप्रमाणे डेटिंग करू लागला तर म्हणून त्याला वाटणारी काळजी... पद्माच्या बाळंतपणासाठी गौरम्मा जाते. तिला स्टेशनवर घ्यायला वत्सला येते. ती बिदरची. तिचा नवरा रुदेश हा म्हैसूरचा. अठ्ठावीस वर्षे ती अमेरिकेत राहत असते. वत्सलाचा मुलगा अशोक ड्रग्जच्या आहारी गेलेला... शिवाय मद्मपान.. मुलगा हाताबाहेर गेला याचं वत्सलेला दु:ख... गौरम्मा अशा अनेक जणींच्या हकीकती ऐकते. अमेरिकेतील भारतीयांच्या जीवनाबद्ददल, समस्याबद्दल तिला जे कळते त्यामुळे तिचे काही भ्रम दूर होतात. जमुना ही डॉलरबहू – पण तिच्या वर्तनातले काही दोष तिला जाणवतात. गिरीशची पत्नी विनिता हिच्यावर आपण अन्याय केल्याची भावना तिला सतावू लागते. अमेरिका म्हणजे दुरून डोंगर साजरे... गौरम्मा भारतात परत जायचे असे मुलाला सांगते. विनोद शहाची सोबत बघून चंद्रशेखर आईला बंगलोरला पाठवतो... बंगलोर विमानतळावर शामण्णा तिला घ्यायला येतात. गिरीश-विनिता आले नाहीत म्हणून गौरम्मा जरा खट्टू होते. ‘तू तुझ्या या सुनेचा सारखा पाणउतारा करायचीस. म्हणून मीच तिला धारवाडला जा म्हटले. तुझ्याबरोबर राहून ती डिप्रेशनमध्ये गेली असती. तुझ्या प्रत्येक पत्रात अमेरिकचं वैभव, कौतुक असायचं, विनिताबद्दल कधीच काही नसायचं...’ गौरम्मा म्हणते, ‘अमेरिकेला जाऊन माझे डोळे उघडले. तिथं गेल्यावर मला कळलं, मी किती भाग्यवान आहे. विनितेसारखी सून मला मिळाली आहे. एका परीने हा बोधकथा आहे. अमेरिकेबद्दल आकर्षण, अमेरिकेतील श्रीमंतीची भूल - यामुळे अनेक तरूण तिकडे जातात. तेथील जीवनात वेगळ्याच समस्या उद्भवतात. तेथील वेगळी जीवनप्रणाली... तिच्यामुळे आचारविचार बदलतात... तेथील वास्तव वेगळेच असते. आपली मूल्ये वा निकष गृहीत धरून अमेरिकेतील भारतीयांना दोष देण्यात अर्थ नाही. तेथील जीवनशी त्यांना मिळवून घ्यावे लागते. अमेरिकेमील श्रीमंतीमुळे डॉलरबहुचे कौतुक करताना आपल्या इतर सुनांची वा नातवंडाची अवहेलना करणे हा करंटेपणा आहे. अमेरिकेच्या भ्रमजलातून बाहेर काढण्याचा ‘डॉलरबहू’ या कहाणीद्वारे सुधा मूर्ती यांनी प्रयत्न केला आहे. गौरम्माच्या निरीक्षणातून आणि तिला भेटणाऱ्या भारतीयांच्या जीवनकहाण्यामधून तेथील समस्या, त्यातील न पटणाऱ्या गोष्टींशी करावी लागणारी तडजोड हे सर्व तिला जाणवते. आपल्या डॉलरबहूच्या वागण्यातील हिशेबीपणा तिला कळून येतो... आणि आपल्या घराची ओढ तिला लागते. सुधा मूर्ती यांची निवेदनशैली वेगवान असते. एकापुढे एक प्रसंग चित्रपटातील सीनप्रमाणे त्या ठेवत जातात. त्यातून वेगवेगळ्या कहाण्यांची मालिका नजरेपुढून तरळत जाते. काहीशा सनातनी, कर्मठ अशा गौरम्माच्या नजरेतून अमेरिकतील जीवनशैलीतील समस्यांचे आणि आधुनिकपणाचे दर्शन घडल्याने, त्यातील ताण अधिक तीव्र होतो... या जीवनशैलीशी आपली नाळ सहजी जळू शकणार नाही; नाइलाजाने ती जुळवून घ्यावी लागले आणि त्याची खंत कायम मनाला टोचत राहील असाच संदेश जणू त्या देत आहेत. ...Read more

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

Suhas Birhade

सूधा मूर्ती यांची पुस्तकं मला आवडतात. ती पुस्तके हलकी फुलकी असतात. जीवनात आलेले अनुभव लहान मोठ्या प्रसंगातून ते उलगडवून दाखवतात. स्वत:चे अनुभव सांगताना त्यात कुठे बडेजाव नसतो. हे अनुभव बरंच काही शिकवून जातात. "आयुष्याचे धडे गिरवताना" हे मूर्ती यांचे शाच पठडीतले एक पुस्तक. हे पुस्तक देखील एका दिवसात वाचून संपवलं. या पुस्तकात २३ लहान प्रकरणं आहेत. लेखिकेला विविध टप्प्यांवर भेटललेली माणसं काहीतरी शिकवून जातात. जी मरगळ दूर करते आणि जीवनाचे पैलू उलगडवून दाखवते. मेहता प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केलं असून लीना सोहोनी यांनी अनुवाद केला आहे ...Read more

AAVARAN
AAVARAN by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
Sushant Choudhary

तनिश्क ची जाहीरात ..... व माझ वाचून संपलेल कन्नड लेखक डॉ. भैरप्पा लिखीत व उमा कुलकर्णी यांनी अनुवादित केलेली "अवरण" कादंबरी संपवली व fb वर व्यक्त व्हायचा मोह अवरला नाही......तनिश्क च्या जाहीरातीवर केलेली टिका....पुरोगाम्यांना जिव्हारी लागत असेल तर ... अवरण वाचा मग react व्हा..... कधि कधि इतिहास पण वाचला पाहीजे व समजुन पण घेतला पाहीजे.... कादंबरीची नायिका "लक्ष्मी" उर्फ रझिया, तिचा नवरा "आमिर", दोघांचा धर्माच्या चालिरीती चे सिंमोलंघन करुन (लक्ष्मी ने बरका) लग्न केले.... लक्ष्मी चे वडील "अप्पाजी", त्यांची एकुलती एक कन्या.... आप्पाच्या तथाकथित बुरसटलेल्या विंचाराचा चक्का चूर करुन विवाह.... कादंबरीचा काळ १९९० नंतरचा विशेषतः बाबरी पाडल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राने सामाजिक सलोखा तयार करणे साठी अमीर वर Documentary बनवन्याचे काम सोपलेले असते....script लिहन्याचे काय रझियाचे.....पण हंपी चे भग्न अवशेश पाहून तिला अस्वस्थ होते व सत्याच्या शोधात जाते.... आप्पाजी वारतात त्यांचे तीस वर्षे कसलेही संबंध राहत नाहीत पण ती त्यांचे काही विधी करते व आप्पा नी जमा केलेली ग्रंथ संपदा अभ्यासते. बाबर, अकबर, हुमांयू, शहाजहान व औरंगजेबा.... मंदीरांचा झालेला विनाश व सरकारने चालवलेले इतिहास बदलाचे कारस्थान यांची संदर्भासाठी केलेली एकत्र गुंफण कादंबरीची परिणामकारकता वाढवते. एखाद्या ऐतिहासिक पात्राचे उद्दातीकरन कस केले जाते याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे म्हैसूर चा टिपू सुलतान त्याला राष्ट्र अभिमानी दाखवताना त्याने केलेल्या हिंदू समाजाच्या कत्तली तसेच त्याने हिंदुस्थानाला काफीरां (हिंदू ) पासून मुक्त करण्यासाठी अफगाणी सुलतानांना पाठवलेली आमंत्रण ह्याचा कुठेही उल्लेख नसने. ह्याचा संदर्भ देऊन केलेले लिखान अगदी मन सुन्न करुन सोडते..... संपूर्ण हिंदुस्थानचा समृद्ध धार्मिक, सांस्कृतिक वारसा, ज्ञानकेंद्रे आणि त्याचा चौदाव्या व त्या पुढील शतकापासून बाहेरील आक्रमकांकडून झालेला विध्वंस हा कादंबरीचा मुख्य गाभा आहे. धर्माच्या मागासलेल्या रुढी, परंपरा, दुराभिमान, अशिक्षित मनोवृत्ती आणि जीवनपद्धती, असहिष्णुता यावर नायिकेच्या तर्फे लेखक प्रहार करतात. तत्कालीन राजकारण, समृद्ध आणि सहिष्णु परंपरेचा स्वार्थासाठी इतिहास बदलण्याचा समकालीन पुरोगामी आणि बुद्धिवादी लोकांचा अट्टाहास, त्यासाठी झालेली एकजूट, वाचकांना चीड आणल्याशिवाय रहात नाही.पुरोगामी व सेक्युलर वद्यांच्या सनसनित चपराक, वर्षानुवर्षे चांगले दडपण्यासाठी चाललेले, जनकल्याणाचे सोनेरी आवरण घातलेले कपटी कारस्थान वाचकांसमोर उघड होते. बुद्धिवादी, सेक्युलर म्हणवणाऱ्या लोकांचा मुखवटा टराटरा फाडते. लेखकाने प्रत्येक गोष्टीची केलेली मांडणी हि संदर्भ घेऊन केलेली तसेच कादंबरी चे लिखान पूर्णतः सत्य संदर्भावर आधारलेली आहे. संदर्भ ग्रंथांची यादी कादंबरीत लेखकाने समाविष्ट केली आहे त्यामुळे कादंबरीला वास्तवाचा भक्कम आधार आहे. संदर्भ ग्रंथ वाचल्यावर तिची झालेली अवस्था व जगाला दाखवन्या साठी मुद्दाम हुन केलेले प्रयत्न ह्यात फार अंतर असते हे दाखवून देनारी कादंबरी. डॉ. भैरप्पा यांचे वाचलेले हे चौथे पुस्तक..... पर्व, सार्थ, तडा व अवरण.... प्रतेक पालकाने (विशेष करुन मुलींच्या पालकाने) अवश्य वाचावी अशी कादंबरी.... ॲड. सुशांत चौधरी, उच्च न्यायालय औरंगाबाद. ...Read more