KHUSHWANT SINGH

About Author

Birth Date : 02/02/1915
Death Date : 20/03/2014


A LAWYER, JOURNALIST, NOVELIST AND POLITICIAN, KHUSHWANTINSAG WAS BORN IN HADALI, PUNJAB (NOW IN PAKISTAN). HE STUDIED LAW FROM DELHI AND LONDON. AFTER EIGHT YEARS AS A LAWYER IN THE LAHORE COURT, HE WORKED AS A JOURNALIST AT THE INDIAN EMBASSY IN 1947 AND AT THE ALL INDIA RADIO IN 1951.

वकील, पत्रकार, कादंबरीकार व राजकारणी अशी विविध क्षेत्रे गाजविणाऱ्या खुशवंतिंसग यांचा जन्म पंजाबमधील हदाली (आता पाकिस्तानात) येथे झाला. त्यांनी आपले कायद्याचे शिक्षण दिल्ली व लंडन येथून घेतले. लाहोर कोर्टात आठ वर्षे वकिली केल्यावर १९४७ मध्ये भारतीय दूतावासात, तर १९५१ मध्ये ऑल इंडिया रेडिओ येथे पत्रकार म्हणून कामगिरी बजावली. त्यानंतर युनेस्कोच्या मास कम्युनिकेशन विभागातही त्यांना पाठविण्यात आले. वरील दोन विभागांतील कामाने त्यांना साहित्य क्षेत्राकडे-लेखनाकडे जाण्यास उद्युक्त केले. १९५६ मध्ये भारत सरकारतर्फे योजना नावाचे नियतकालिक सुरू करून त्याचे संपादकत्वदेखील निभावले. यानंतर द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, नॅशनल हेरल्ड व हिदुस्थान टाइम्स ही नियतकालिकेही त्यांनी बाजारात आणली. भारत सरकारतर्फे पद्मभूषण देऊन (१९७४) त्यांना गौरविले गेले; परंतु (१९७८) ऑपरेशन ब्लू स्टार अंतर्गत लष्करी फौजा अमृतसरच्या गुरुद्वारात घुसविल्याच्या निषेधार्थ त्यांनी तो पुरस्कार परत केला. त्यांना २००७ मध्ये पद्मविभूषण देऊन नावाजले गेले. वयाच्या ९९ व्या वर्षी त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. उपरोधपूर्ण, विनोदी, धर्मनिरपेक्ष; परंतु झोंबणारे थेट भाष्य असणाऱ्या लेखनासाठी, व कवितेविषयी प्रेम असणारे म्हणून ते कायम लक्षात राहतात.
Sort by
Search by Discount
Show per page
Items 1 to 5 of 5 total
33 %
OFF
KHUSHWANT SINGH COMBO SET - 4 BOOKS Rating Star
Add To Cart INR 875 INR 586
33 %
OFF
MAZYA AAYUSHYAAT AALELYA STRIYA ANI ... Rating Star
Add To Cart INR 180 INR 121
33 %
OFF
MRUTYU MAZYA UMBARTHYASHI Rating Star
Add To Cart INR 195 INR 131
33 %
OFF
SEX, SCOTCH & SCHOLARSHIP Rating Star
Add To Cart INR 250 INR 168
33 %
OFF
THE COMPANY OF WOMEN Rating Star
Add To Cart INR 250 INR 168

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more