* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: A PRISONER OF BIRTH
 • Availability : Available
 • Translators : LEENA SOHONI
 • ISBN : 9788184983159
 • Edition : 3
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 592
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : FICTION
Quantity
IF DANNY CARTWRIGHT HAD PROPOSED TO BETH WILSON THE DAY BEFORE, OR THE DAY AFTER, HE WOULD NOT HAVE BEEN ARRESTED AND CHARGED WITH THE MURDER OF HIS BEST FRIEND. AND WHEN THE FOUR PROSECUTION WITNESSES ARE A BARRISTER, A POPULAR ACTOR, AN ARISTOCRAT AND THE YOUNGEST PARTNER IN AN ESTABLISHED FIRM’S HISTORY, WHO IS GOING TO BELIEVE HIS SIDE OF THE STORY? DANNY IS SENTENCED TO TWENTY-TWO YEARS AND IS SENT TO BELMARSH PRISON, THE HIGHEST SECURITY JAIL IN THE LAND, FROM WHERE NO INMATE HAS EVER ESCAPED. BUT EVERYONE HAS UNDERESTIMATED DANNY’S DETERMINATION TO SEEK REVENGE AND BETH’S RELENTLESS QUEST TO WIN JUSTICE . . .
डॅनी कार्टराईटने बेथ विल्सनला लग्नाची मागणी आदल्या दिवशी किंवा दुस-या दिवशी घातली असती, तर त्याच्यावर आपल्या जिवलग मित्राचा खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला नसता आणि त्याला अटकसुद्धा झाली नसती. जेव्हा फिर्यादी पक्षाकडून चार नामांकित साक्षीदार आणण्यात येतात : एक बॅरिस्टर, एक लोकप्रिय अभिनेता, एक उच्चकुलीन प्रतिष्ठीत व्यक्ती आणि एक नावाजलेल्या फर्ममधला तरुण, धडाडीचा पार्टनर... तेव्हा तुमची बाजू कोर्टात कोण ऐकून घेणार? डॅनीला बावीस वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा होते. त्याला बेलमार्श तुरुंगात पाठवण्यात येतं. देशातल्या सर्वांत जास्त कडक सुरक्षाव्यवस्थेसाठी प्रसिद्ध असलेला हा तुरुंग! आजवर कोणताही कैदी तिथून पळून जाऊ शकलेला नाही. पण डॅनीच्या अंतर्यामी एक आग भडकलेली आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्याची आग. ती आग त्याला जाळते आहे; पण याची किंचितही कल्पना स्पेन्सर क्रेग, लॉरेन्स डेवनपोर्ट, जेराल्ड पेन आणि टोबी र्मोिटमर यांना नाही. डॅनीला साथ आहे त्याच्या प्रेयसीची, बेथची. डॅनीच्या नावाला लागलेला कलंक धुवून काढण्यासाठी तिनेही न्यायालयाची दारं ठोठावलेली आहेत. सच्चा दिलाच्या या प्रेमिकांच्या अथक प्रयत्नांनी अखेर त्या चौघांना पळता भुई थोडी होते. जिवावर उदार होऊन अखेर रणांगणातून पळ काढावा लागतो. `केन आणि एबल` नंतरची तेवढीच जबरदस्त, वाचकांची मती गुंग करणारी, शेवटच्या पानापर्यंत वाचकांच्या मनाचा ताबा घेऊन त्यांना खिळवून टाकणारी ही कादंबरी!

Keywords
Customer Reviews
 • Rating StarMADHAVI DESHPANDE

  मस्तच आहे . तीनवेळा वाचलं आहे मी.

 • Rating StarEknath Marathe

  खूप वेगवान कथानक आहे. अगदी गुंग करून टाकते व प्रत्येक पानाला उत्कंठा वाढतच जाते ! अमेझॉन कींडल वर इबुक 40 रूपयात मिळाले होते. सध्याची किंमत 103.95 पैसे आहे !

 • Rating StarKIRAN BORKAR

  न केलेल्या खुनाची शिक्षा म्हणून डॅनीला वीस वर्षाची जन्मठेप झालेली आहे. तो निरपराध आहे याची खात्री त्याची प्रेयसी बेथला आहे .कारण तिच्यासमोरच ती घटना घडली आहे आणि ज्याचा खून केल्याचा आरोप आहे तो डॅनीचा प्रिय मित्र बर्नि हा तिचा भाऊच आहे . ते तिघे साखरुडा होताच एका हॉटेलात जेवायला जातात तेव्हा तिथे असलेल्या चारजणांशी त्यांची बाचाबाची होते आणि त्याचे पर्यवसान बर्निच्या खुनात होते . पण ते चारही जण नावाजलेले असतात . ते अक्कलहुषारीने डॅनीलाच अपराधी सिद्ध करतात . वरच्या कोर्टातही डॅनीचे अपील फेटाळले जाते . तुरुंगाच्या कोठडीत निक आणि बिल हे कैदी त्याच्या सोबतीला असतात . आता केवळ तुरुंगातून पळून जाऊन स्वतःचे निर्दोषत्व शाबीत करणे हाच एकमेव पर्याय डॅनीसमोर आहे . डॅनीची तुरुंगातून सुटका कशी होते ....?? त्यासाठी त्याला कोण मदत करतो ....?? डॅनी खरे अपराधी पुराव्यासहित जगासमोर आणेल का ..?? कोण त्याला मदत करेल ...??? यासर्वाची उत्तरे पाहिजे असल्यास पुस्तक वाचवेच लागेल . जेर्फी आर्चर यांनी अतिशय उत्कंठावर्धक पुस्तक लिहिले आहे . त्यांनी स्वतः काही काळ तुरुंगात काढला असल्यामुळे तेथील जीवनाचे अतिशय बारकाईने वर्णन केले आहे. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BETTER
BETTER by DR.ATUL GAWANDE Rating Star
DAINIK LOKMAT 18-08-2019

शल्यविशारदाचं चिंतन... वैद्यकीय क्षेत्रातील कामाचा दर्जा सुधारण्याबाबत बरेचदा नामवंत लोक क्रीडापटूंचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवतात. चिकाटी, परिश्रम, मेहनत, सराव आणि अचूकपणा यांचे यथोचित समतोल या क्रीडापटूंमध्ये पाहायला मिळतो. पण प्रत्येक गोष्टीचं ज्ञान े केवळ कुठल्यातरी परिणामावर अवलंबून राहून कसे मिळवता येईल. त्यासाठी अवचित अतिप्रसंगाचे होणारे आगमनदेखील तितकाच महत्त्वाचा भाग असतो. जीवन-मरणाच्या सीमारेषेवर असलेल्या जीवाची घालमेल अत्यवस्था यांना सामोरे जाताना तुम्हाला अचूक आणि तितकाच विनाविलंब निर्णय घ्यायचा असतो. तो अनुभव थरारक व जीवनाच्या परिभाषेवर डॉक्टरांचे महत्त्व अधोरेखित होते. अतुल गवांदे लिखित ‘बेटर’ हे पुस्तक एका शल्यविशारदाचं गुणवत्तेबाबतचं चिंतन आहे. ...Read more