* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SANDHIKAL
  • Availability : Notify Me
     
  • ISBN : 9788184982718
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 372
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SHRIRAMA, A CHILD JUST 10 YEARS LIVING IN VELANI, A SMALL VILLAGE IN KONKAN. HIS FATHER LOOKS AFTER THE TEMPLE OF LORD VELANESHWARA. HE HAS LOST HIS MOTHER AND NOW HIS FATHER LEAVES HIM AT THE DOORSTEPS OF GURUJI, THE ONE WHO IS FAMOUS FOR TEACHING VEDAS AND UPANISHADS TO HIS PUPILS. HIS FATHER THEN MARRIES ANOTHER WOMAN. SHRIRAMA HAS A FLAIR FOR MATHS AND LOVES TO STUDY. HE PERSUADES HIS GURUJI TO ALLOW HIM TO COMPLETE HIS MATRICULATION EXAMS. BUT BEFORE HIS RESULTS ARE DECLARED HE HAS TO RETURN TO VELANI AS HIS FATHER DIES. THEREAFTER, SHRIRAMA GOES THROUGH LOTS OF PAIN AND TROUBLE TO COMPLETE HIS EDUCATION. WHEN HE FIRST GOES TO GURUJI’S ASHRAM, HE MEETS DEVI. HE LOVES HER FROM DAY ONE. HE WAITS FOR HER THROUGHOUT HIS LIFE. BUT WHEN SHE FINALLY MEETS HIM, SHE IS NO MORE THE DEVI THAT HE HAD BEEN KNOWING. SHE IS NO MORE PURE. ON THE CONTRARY, SHE HAS LEARNT THE WAY TO ENCASH HER BODY TO SATISFY THE MALE LUST AND IN RETURN TO GET THE BENEFITS. IT IS SHRIRAM’S PURE LOVE DEVOID OF ANY LUST THAT CHANGES HER ATTITUDE TOWARDS LIFE. DO THEY LEAD A HAPPY LIFE THEREAFTER?
``गुरुजी, लौकिक जीवनात अशांतता... पारलौकिक जीवनाच्या अस्तित्वाविषयी खात्री नाही. कुणी तरी सांगतंय म्हणून विश्वास ठेवण्याइतका अडाणीपणा नाही. जगण्या-मरण्यातली गूढता उकललेली नाही. परंपरेनं सांगितलेल्या गोष्टींवर निश्चित विश्वास नाही. या विचारांनी गांगरून, गोंधळून गेले आहेत सारे. निश्चित मार्ग दिसत नाही; असलेल्या मार्गांनी केलेली निराशा लपत नाही. संधिकालाची अवस्था आहे गुरुजी... संक्रमणकाळी साऱ्या विचारप्रणाली निर्णायक उत्तर देण्यात असमर्थ ठरल्या आहेत. समष्टीला त्यांची खात्री नाही; पण समोर दुसरा मार्गही दिसत नाही. काळाच्या विचित्र धारेवरून प्रवास सुरू आहे. आता निश्चितता हवी आहे. गूढता संपायला हवीय. सगळे अर्थ स्पष्ट व्हायला हवेत. स्थिरता हवी.`` श्रीराम बोलायचा थांबला.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SANDHIKAL #SANDHIKAL #संधिकाल #FICTION #MARATHI #MILINDGADGIL #मिलिंदगाडगीळ "
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more