DR. ARVIND VAMAN KULKARNI

About Author

Birth Date : 04/07/1933
Death Date : 29/10/2003


DR. ARVIND VAMAN KULKARNI WAS A RENOWNED CRITIC, WRITER, POET. HIS DEVELOPMENT OF MARATHI PLAYWRITING TECHNIQUE - ETC. S. 1843 TO ETC. S. IN 1950, HIS PH.D. THESIS WAS AWARDED THE PARANJAPE PRIZE OF THE UNIVERSITY OF PUNE. HE TAUGHT MARATHI AT BRIHANMAHARASHTRA COLLEGE, PUNE, FERGUSSON COLLEGE AND JSM COLLEGE, ALIBAUG.

डॉ. अरविंद वामन कुळकर्णी हे नामवंत समीक्षक, लेखक, कवी होते. त्यांच्या ’मराठी नाट्यलेखन तंत्राचा विकास - इ. स. 1843 ते इ. स. 1950’ या पीएच.डी.च्या प्रबंधाला पुणे विद्यापीठाचे परांजपे पारितोषिक प्राप्त झाले होते. त्यांनी पुण्याच्या बृहन्महाराष्ट्र महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय आणि अलिबागच्या जेएसएम महाविद्यालयात मराठीचे अध्यापन केले. अनेक विद्यार्थ्यांना एम.फिल./पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले. अनेक विद्यापीठांमध्ये ते निमंत्रित प्राध्यापक म्हणून जात असत. विविध मासिकांतून त्यांनी साहित्यविषयक लेख लिहिले. विविध मंचांवरून त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने दिली. त्यांच्या नावावर सुमारे सतरा ग्रंथ आहेत. इतस्तत:, कविता रायाच्या, वाटेच्या, रूप अव्यक्ता फुटले यांसारखे कवितासंग्रह, साहित्यविचार सारखा भारतीय साहित्यशास्त्राबरोबरच साहित्याचा विविधांगाने अभ्यासपूर्ण वेध घेणारा ग्रंथ, मराठी नाट्यलेखन तंत्राची वाटचाल, विस्मरणात गेलेली नाटके यांसारखे नाट्यविषयक ग्रंथ इ. त्यांची ग्रंथसंपदा त्यांच्या लेखनाची वैविध्यपूर्णता दर्शवते. शरद जोशींबरोबर पंजाबात, भारतीय अर्थवादाचा क्रियाशील जनक, इ. पुस्तके हे त्यांच्या शेतकरी चळवळीतील सहभागाचे फलित होते. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्याबरोबर त्यांनी काम केले होते. ठाामीण साहित्य चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग होता. साहित्यकृतीची गरज ओळखून त्याप्रमाणे समीक्षा करणे आणि साहित्यकृतीतील दोषही परखडपणे दाखवून देणे, ही त्यांच्या समीक्षात्मक लेखनाची वैशिष्ट्ये होती. मानसशास्त्रीय समीक्षेला अधिक उपयोजित करण्यात ते अग्रस्थानी होते. इतस्तत:, कविता रायाच्या, वाटेच्या या त्यांच्या कविता संग्रहांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला. उपयोजित समीक्षा : लक्षणे आणि पडताळणी या ग्रंथासाठी त्यांना साहित्य परिषदेच्या रा. श्री. जोग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वर्धापन दिनी त्यांच्या नावाने नवोदितांना समीक्षेसाठी आणि कवितेसाठी आलटूनपालटून पुरस्कार दिला जातो. पाच हजार रुपयांचा हा पुरस्कार आहे. या वर्षीपासून कशिश या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी त्यांच्या नावाचा पुरस्कार दिला जाणार आहे. पंधरा हजार रुपयांचा हा पुरस्कार असेल. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे ते संस्थापक सदस्य होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या साहित्य पत्रिका या मासिकाचे काही काळ ते संपादक होते. त्यांच्या साहित्यातील योगदानाबद्दल त्यांचे नाव 1983च्या इंडियाज हूज हूमध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यांच्या घराजवळील चौकाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. 1975 च्या आणीबाणीला उघड उघड विरोध दर्शवणाऱ्या मोजक्या साहित्यिकांपैकी ते एक होते. समाजाशी नाळ जोडलेले ते एक व्यासंगी समीक्षक-कवी होते.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
UPYOJIT SAMIKSHA : LAKSHANE ANI PADT... Rating Star
Add To Cart INR 160

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more