* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GHACHAR GHOCHAR
  • Availability : Available
  • Translators : APARNA NAYAGAONKAR
  • ISBN : 9789387789920
  • Edition : 1
  • Publishing Year : JULY 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 132
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"WHEN AN IMPOVERISHED BUT CLOSE-KNIT FAMILY UNDERGOES AN ALMOST MIRACULOUS CHANGE IN FORTUNE, OLD AND TRUSTED CERTAINTIES ARE UNDERMINED: ALLEGIANCES AND DESIRES REALIGN, A MARRIAGE COLLAPSES, AND TENSIONS BUILD UNSTOPPABLY TOWARDS A DEVASTATING CONFLICT. IN THIS TRANSFORMATIVE NOVEL BY THE ACCLAIMED KANNADA WRITER VIVEK SHANBHAG, A FAMILY’S UNEXPECTED ASCENT FROM AN ANT-RIDDEN SHACK TO MIDDLE-CLASS LIVING SKILFULLY PEELS AWAY THE VENEER OF AN ASPIRATIONAL SOCIETY. THE FAMILY’S WORLD BECOMES “GHACHAR GHOCHAR’—A NONSENSE PHRASE THAT, TO THE RESTLESS, UNNAMED NARRATOR OF THE BOOK, COMES TO MEAN SOMETHING ENTANGLED BEYOND REPAIR. TOLD IN CLEAR COMPELLING PROSE, AND UNDERSCORED BY WARMTH AND HUMOUR, GHACHAR GHOCHAR IS A CAPTIVATING AND UNSETTLING STORY ABOUT THE SHIFTING MEANING—AND CONSEQUENCES—OF FINANCIAL GAIN IN CONTEMPORARY INDIA. IT IS A FABLE FOR MODERN LIVING THAT WILL RESONATE EVERYWHERE. "
हातातोंडाशी गाठ असलेल्या पण एका अनामिक धाग्यात बांधलेल्या एका एकत्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती एखादा चमत्कार व्हावा तशी बदलते तेव्हा, अनेक जुनीनवी गृहीतं मागे पडतात. इच्छा आणि नाती बदलतात, एक विवाह मोडतो, आणि विनाशक शेवटाकडे जाणारा तणाव निर्माण होतो, जो थोपवणं अशक्य असतं. मुंग्यांचा बेसुमार त्रास असलेल्या घरातून मध्यमवर्गीय सुरक्षित घरात जाणाऱ्या कुटुंबाच्या माध्यमातून सांपत्तिक प्रगतीकडे डोळे लावून बसलेल्या समाजाचं आतलं चित्र, विख्यात कन्नड लेखक विवेक शानभाग यांच्या बदलांचा ठाव घेणाऱ्या या कादंबरीतून स्पष्ट होतं. या कुटुंबाचं विश्वच घाचरगोचर होऊन जातं. इतरांसाठी हा शब्द निरर्थक असला तरी, या कादंबरीच्या अस्वस्थ, निनावी सूत्रधारासाठी ते दुरुस्त करण्यापलिकडचं काहीतरी होऊन जातं. स्पष्ट, वाचत राहावी अशी शैली, त्यासोबतच नर्मविनोदाची पखरण, आणि माणसांमधला ओलावा असलेली ही घाचरगोचर नावाची गोष्ट. सध्याच्या भारतात श्रीमंत होण्याचा अर्थ आणि त्याचे परिणाम यांचे बदलते संदर्भ उलगडून दाखवते. आधुनिक जगण्याच्या या कहाणीचे पडसाद इतरत्रही जाणवतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#VIVEK SHANBHAG# APARNA NAYAGAONKAR# GHACHER GHOCHAR#विवेक शानभाग# अर्पणा नायगावकर# घाचरघोचर
Customer Reviews
  • Rating StarRam Jagtap- Maharashtra Dinmaan

    ‘घाचर-घोचर’ ही अनुवादित कादंबरी मध्यमवर्गाच्या ‘नैतिक र्‍हासा’चं ‘गुह्यदर्शन’ घडवते! गेल्या सहा वर्षांत भारतातल्या कुठल्या प्रादेशिक भाषेतलं पुस्तक हिंदीसह इतर अनेक प्रादेशिक भाषांमध्ये अनुवादित झालं आणि त्याचा इंग्रजी अनुवाद होऊन ते अगदी आंतरराष्ट्ीय पातळीवरही नावाजलं गेलं? या प्रश्नाचं उत्तर ‘घाचर-घोचर’ असंच द्यावं लागेल. कथाकार, कादंबरीकार व नाटककार विवेक शानभाग हे कन्नडमधले एक नावाजलेले लेखक आहेत. त्यांचे आजवर पाच कथासंग्रह, तीन कादंबर्‍या आणि दोन नाटकं प्रकाशित झाली आहेत. ‘घाचर-घोचर’ ही त्यांची जेमतेम 118 पानांची कादंबरी कन्नडमध्ये डिसेंबर 2015 मध्ये प्रकाशित झाली. तिचा लगोलग इंग्रजीमध्ये अनुवाद झाला. 2018 मध्ये ती हिंदीमध्येही अनुवादित झाली. याशिवाय नेपाळी, बंगाली, कोंकणी अशा भारतीय भाषांमध्येही तिचे अनुवाद प्रकाशित झाले आहेत. प्रख्यात नाटककार दिवंगत गिरीश कार्नाड यांनी या कादंबरीचं दै. ‘इंडियन एक्सप्रेस’च्या 13 फेब्रुवारी 2016च्या अंकात ‘ङर्ळींळपस ळप झीशीशपीं ढशपीश’ या नावानं परीक्षण लिहिलं आहे; तर ‘न्यू यॉर्क टाइम्स’ या अमेरिकन आणि ‘द गार्डियन’ या ब्रिटिश वर्तमानपत्रानं ‘2017 मधील सर्वशेष्ठ दहा पुस्तकां’मध्ये तिची निवड केली आहे. एवढंच नाही तर आजवर सुकेतू मेहता, कॅथरीन बू, निलंजना एस. रॉय, रचना सिंग, सत्यव्रत के. के. उमा महादेवन, केशव गुहा, पंकज मिशा, पारुल सेहगल, डेबारा स्मिथ, लॉरीन स्टेन, प्राज्वल पराजुली, एलिन बॅटरर्सी, सॅम सॅक्स, अमित चौधुरी, एलिझाबेथ कुरुव्हिला, इयन जॅक अशा अनेक नामवंत लेखकांनी देश-विदेशातल्या इंग्रजी प्रसारमाध्यमांमध्ये तिची परीक्षणं लिहिली आहेत. सुकेतू मेहता आणि कॅथरीन बू या सुप्रसिद्ध लेखकांनी तर विवेक शानभाग यांची तुलना ‘चेकव्ह’शी केलीय. तर या ‘कन्नड चेकव्ह’ची ही कादंबरी जुलै 2018 मध्ये मराठीतही अनुवादित झालीय. अपर्णा नायगांवकर यांनी तिचा अनुवाद केला असून तो मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलाय. हा मराठी अनुवाद अतिशय चांगला आहे आणि कादंबरी तर खरोखरच भन्नाट आहे. आचार्य अत्रे एकदा तेंडुलकरांचं नाटक पाहायला गेले होते. ते पाहून झाल्यावर ते तेंडुलकरांना म्हणाले, ‘नाटक कसं हवं? तर त्याने प्रेक्षकांच्या नरडीचा अक्षरक्ष: घोट घेतला पाहिजे.’ तेंडुलकरांच्या ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ या नाटकासारखी ‘घाचर-घोचर’ ही कादंबरी आपल्या नरडीचा अक्षरक्ष: घोट घेते. अतिशय हळुवारपणे ती आपला गळा पकडते आणि मग तो हळुहळू आवळत जाते. त्यामुळे इथंच वैधानिक इशारा दिलेला बरा. तुम्ही मध्यमवर्गीय असाल आणि तुम्हाला आपला सुखातला जीव नेहमीप्रमाणेच दु:खात घालायची इच्छा नसेल, तर तुम्ही या कादंबरीच्या वाट्याला जाऊ नये हे उत्तम. करकोचा जसा अचूक नेम धरून मासा पकडतो आणि मग चोच बाहेर काढून त्या माशानं जीवाच्या आकांतानं केलेली तडफड थांबण्याची वाट पाहतो, आणि ती थांबली की, त्याला गट्टम करतो, ही कादंबरी नेमकी तसंच करते. या कादंबरीचा निवेदक तुम्हाला तुमच्या सुरक्षित, आत्ममग्न आणि बेफिकीर जगातून पाहाता पाहाता उचलतो आणि बाहेर काढतो. आणि तेच जग तुम्हाला तटस्थपणे दाखवतो. त्यानंतरचा जीवघेणा अनुभव तुम्हाला अनुभवून पाहायचा असेल तरच तुम्ही या कादंबरीच्या वाट्याला जाऊ शकता. या कादंबरीचा विषय तसा सामान्य आहे. 1990 नंतर, विशेषत: 2000 नंतर आणि खासकरून 2014 नंतर सातत्यानं ज्याच्यावर टीका होतेय, त्या मध्यमवर्गातल्या एका कुटुंबाची ही कथा आहे. पण ती ‘रामायणा’सारखी नाही, तर ‘महाभारता’सारखी (मध्यमवर्गीय) जीवनाचं विराटरूपदर्शन घडवणारी आहे. थेटच सांगायचं तर ‘नेकीनं नोकरी आणि टुकीनं संसार’ करणार्‍या बंगळुरूमधल्या एका कुटुंबाची ही कहाणी आहे. आधी नैतिकता हाच जगण्याचा स्थायीभाव असलेल्या या कुटुंबाचं नोकरीकडून व्यवसायाकडे स्थलांतर होतं.. पण या कादंबरीची गंमत या कथानकात नसून ते कसं सांगितलंय, यात खर्‍या अर्थानं दडलेली आहे. या कादंबरीचा निवेदक (मुलगा) आपल्या कुटुंबाची कथा स्वत:पासून सांगायला सुरुवात करतो. मग वडील, आई, बहीण, काका आणि बायको अशी तो सांगत राहतो मध्येमध्ये फ्लॅशबॅक घेत. ही संपूर्ण कादंबरी घटना-प्रसंग आणि त्यांच्या केंद्रस्थानी असलेले कुटुंबसदस्य या पद्धतीनं पुढे जात राहते. पण ती शेवटपर्यंत आपली सहजपणाची लय सोडत नाही. ज्याला ‘अँटी हिरो’ असं सर्वसाधारणपणे म्हटलं जातं, तसा या कादंबरीचा निवेदक आहे. पण तो नायक नाही. ही कादंबरी नायकप्रधान नसून समूहप्रधान आहे. तिची सुरुवात निवेदकाच्या ‘कबुलीजबाबा’पासून होते. पण हे सांगताना निवेदक ज्या लयीत, ज्या भाषेत आणि ज्या प्रकारे निवेदन करतो, ते कमाल आहे! त्यात शब्दांची उधळमाधळ नाही, चिंतननामक गोष्टीचा बडेजाव नाही, भाष्याचा सोस नाही आणि उपमा, प्रतिमा, अलंकार यांचा तर जवळपास मागमूसही नाही. भारतीय मध्यमवर्गाची भाषा त्याच्या जगण्या-वागण्यासारखीच ‘डबल स्टँडर्ड’वाली असते, तिचा आव मात्र ‘फर्स्ट स्टँडर्ड’चा असतो. पण या कादंबरीचा निवेदक मध्यमवर्गाचा प्रतिनिधी असूनही त्याची भाषा तशी नाही. ती अतिशय धारदार, तीक्ष्ण आहे. ती अचूक लक्ष्यभेद करत राहते. अशी या कादंबरीची कितीतरी वैशिष्ट्यं सांगता येण्यासारखी आहेत. तिचं शीर्षकच पहा ना. ‘घाचर-घोचर’ हा शब्द कुठल्याही कन्नड शब्दकोशात नाही. त्याचा वापर फक्त बोलीभाषेत केला जातो. त्याचा अर्थ आहे ‘गडबडगुंडा वा गुंता’. निवेदक एकेक घटना-प्रसंग सहजपणे सांगत जातो, तसतसा हिमनगाच्या टोकाखालचा एकेक भाग उघड होऊ लागतो. त्यातला भेदकपणा इतका अंगावर येतो की, कधी कधी वाचता वाचता मध्येच थांबावं लागतं. निवेदक एकाबद्दल सांगत सांगत पुढे जातो, तेव्हा आपण त्यालाच ‘दोषी’ मानायला लागतो, तोवर निवेदक दुसर्‍याची गोष्ट सांगायला लागतो आणि आपण आधीच्यावरचा ‘दोषारोप’ त्याच्यावर थोपवू लागतो, तोच निवेदक तिसर्‍याबद्दल बोलायला लागतो. आता हाच असणार ‘कलमुहाँ’ या विचाराला आपण येतो, तोच निवेदक चौथ्यावर जातो. त्यावरून पाचव्यावर. थोडक्यात एखाद्या थरारक सिनेमासारखा पाठशिवणीचा खेळ सुरू राहतो कादंबरीभर. आणि तोही अवघ्या 118 पानांत. सामूहिक पापक्षालन ही काही आपली परंपरा नाही. त्यातही भारतीय मध्यमवर्गाची तर नाहीच नाही. मागे वळून पाहण्याची, थोडं थांबून विचार करण्याची आणि स्वत:ला चार प्रश्न खडसावून विचारण्याची क्षमता गमावून बसलेल्या भारतीय मध्यमवर्गाची ‘सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही’ अशी अवस्था होऊन बसलीय. स्वातंत्र्यपूर्वकाळात उदयाला आलेला आणि तेव्हापासून सातत्यानं वाढत राहिलेला, 1990 नंतर तर झपाट्यानं वाढलेला हा मध्यमवर्ग 2014 नंतर कुठल्या थराला गेलाय, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. ही कादंबरीही पापक्षालन करत नाही. ना निवेदक करतो, ना इतर कुटुंबसदस्य. उलट या कुटुंबातला प्रत्येक जण वेळ प्रसंगी नैतिकतेचे हवाले देतो, स्वातंत्र्याचं गाणं गातो आणि आपल्या कृत्याचं समर्थनही करतो. पण कुणीच कुणाला जाब विचारू धजत नाही, कुणीच कुणाजवळ प्रामाणिकपणे सत्य कबूल करत नाही, कुणीच कुणाला कशाबद्दलही अडवत नाही. सगळे जण सामूहिकपणे आपल्या सत्त्वाची, प्रामाणिकपणाची, नैतिकतेची, विश्वासाची आणि परस्परसंवादाची हत्या करत राहतात. ‘स्मृतिचित्रे’ या मराठीतल्या ‘क्लासिक’ मानल्या जाणार्‍या आत्मचरित्राची सर्वांत मुख्य वैशिष्ट्यं आहेत – लेखिकेची शहाणीव आणि कुठलाही आडपडदा नसलेलं रोखठोक जगणं-वागणं-बोलणं. त्यामुळे साध्या साध्या घटना-प्रसंगांतून अतिशय उत्तम प्रकारची विनोद निर्मिती होते आणि त्या घटना-प्रसंगांमधून मानवी जगण्याची कितीतरी ‘दर्शनं’ पाहायला मिळतात! ‘घाचर-घोचर’ ही सुद्धा क्लासिक म्हणावी अशीच कादंबरी आहे. पण तिच्यामध्ये हे सगळं उलट्या पद्धतीनं घडतं. निवेदकाकडे शहाणीव आहे, पण त्याचं जगणं-वागणं सत्त्वहीन. स्वत:सह इतरांबद्दलचे साधे साधे प्रसंग तो सांगतो, त्यातून ‘कॉमिक-ट्रॅजेडी’ निर्माण होते. कॉमेडी कुणाचीही होऊ शकते, तशीच ट्रॅजेडीही. पण ‘कॉमिक-ट्रॅजेडी’ मात्र अध:पाताच्या प्रपातात सापडल्याशिवाय घडून येत नाही. हा प्रपात इतका जबदरस्त असतो की, तो एकट्यादुकट्याला थोपवता येत नाही. परिणामी सगळेच त्याच्या कचाट्यात सापडतात. या कादंबरीतल्या कुटुबाचंही नेमकं तसंच होतं. सगळेच जण सामूहिकपणे शहाणपणाची हत्या करत राहतात! असं का होतं? तर ‘घाचर-घोचर’ अर्थात गडबडगुंत्यामुळे. तो गुंता नात्यांचा आहे, केलेल्या त्यागाचा आहे, भोगलेल्या दारिद्रयाचा आहे, सहन केलेल्या मानसिक त्रासाचा आहे, परस्परांवरील अवलंबित्वाचा आहे, एकमेकांकडून असलेल्या अपेक्षांचा आहे आणि आपापल्या सोयीचाही आहे. त्यामुळे ही कादंबरी मध्यमवर्गाच्या दांभिकतेचा, कृतक जगण्याचा, खोट्या प्रतिष्ठेचा, भीतीपोटी येणार्‍या एकोप्याचा, गहिर्‍या जखमेवर थातुरमातुर मलमपट्टी करण्याच्या वृत्तीचा, जगाचा उद्धार करण्याच्या पण स्वत:ला एक प्रश्नही न विचारण्याच्या मानसिकतेचा, हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे लागण्याच्या स्वभावाचा, अभावग्रस्त भूतकाळातील जगण्यावर उथळ वर्तमानाचा उतारा शोधणार्‍या संस्कृतीचा आणि मध्यमवर्गीय ‘शहामृगी’पणाचा एकेक पापुद्रा कुठलंही भाष्य न करता उलगडून दाखवते. भारतीय मध्यमवर्ग टीकेनं खंतावतो आणि संकटानं अस्वस्थ होतो. पण करतो काय, तर टीका करणार्‍याला उडवून लावतो आणि संकटात आपल्या कुटुंबाचा ‘एकोपा’ दाखवतो. पण त्याला टीकेकडे ‘सद्हेतू’ आणि संकटाकडे ‘संधी’ म्हणून पाहता येत नाही. कारण तसं केलं की, त्याच्या आत्ममग्न मश्गुलतेच्या चिरफळ्या होतात. आणि ते होऊ देण्याची त्याची कुठल्याही परिस्थितीत तयारी नसते. त्यामुळे तो वादळाचा सामना सामूहिकपणे वाळूत डोके खुपसून करतो आणि वादळापूर्वीच्या व वादळानंतरच्या शांततेत बेफिकीरपणे आपला-आपला जगत राहतो. भारतीय मध्यमवर्ग आंधळ्या धृतराष्ट्रासारखा आहे. त्याच्याकडे हजार हत्तींचं बळ आहे, पण तारतम्य नाही. त्याच्याभोवती भारतातलं विद्यमान राजकारण आणि संपूर्ण बाजारपेठ फिरत राहतेय, पण त्याच्याकडे विवेक नाही. जगातली प्रत्येक सेवा-सुविधा केवळ आपल्यासाठीच ‘प्रोव्हाईड’ केली जातेय, असा त्याचा गैरसमज झालेला आहे. अशा समाजाची झेप आपल्या पावलांपलीकडे सहसा जात नाही. त्यामुळे त्याला तुम्ही एकोणिसाव्या शतकातल्या कृतिशील आणि उत्तरदायी मध्यमवर्गाची कितीही उदाहरणं सांगा; त्याला मात्र संघर्ष, अभाव आणि सचोटी यांतच आयुष्य व्यतीत केलेल्या आधीच्या पिढ्यांना धुडकावून लावण्यातच भूषण वाटतं. त्यागाची तर त्याला फार म्हणजे फारच अ‍ॅलर्जी आहे. ‘बुद्धिजीवी’ असलेला, पण ‘बुद्धिवादी’ नसलेला हा वर्ग ‘व्यक्तिवादा’चा फार भोक्ता असतो. त्यामुळे त्याला ‘व्यक्तिस्वातंत्र्य’ ही संकल्पना खूप आवडते. पण तारतम्य, विवेक, आत्मसंयम, चिंतन-मनन यांचा मात्र मनस्वी तिटकारा असतो. अशा या मध्यमवर्गाला ‘घाचर-घोचर’ ही कादंबरी त्याचा भेसूर चेहरा आणि रक्ताळलेले हात दाखवण्याचं काम करते. कदाचित त्यामुळेच महाराष्ट्रातला मध्यमवर्ग या कादंबरीच्या वाट्याला गेला नसावा. आणि समजा गेलाच तर तेंडुलकरांच्या ‘शांतता! कोर्ट चालू आहे’मधल्या बेणारेबाईंच्या ‘हे शरीर सगळा घात करतं’ या चालीवर ‘हा पैसा सगळा घात करतो’ अशी सम गाठू शकतो. पण ही कादंबरी केवळ पैशाला, सुबत्तेला किंवा कुणाही एकाला दोषी ठरवून स्वत: नामानिराळं व्हायला साफ नकार देते. ती तुम्हाला (कधीकाळी मूठमाती दिलेल्या) तुमच्याच अंत:पुरात नेऊन उभी करते आणि तुमचाच चलत्-चित्रपट दाखवते. ती तुमच्याकडे प्रश्नांची उत्तरं मागत नाही की, चिंतनशिबिराचं आयोजन करायलाही सांगत नाही. ती फक्त तुम्हाला तुमच्या आचार-व्यवहारांचं ‘गुह्यदर्शन’ घडवते. तुमच्या अहंभावाला चूड लावण्याचं काम करते. हे फार जीवघेणं प्रकरण आहे! त्यामुळे आपल्या आयुष्याचं ‘घाचर-घोचर’ का होऊन बसलंय, हे जाणून घेण्याची इच्छा असलेल्या मध्यमवर्गीयांनीच आणि या वर्गात भविष्यात जाण्याची इच्छा-आकांक्षा-महत्त्वाकांक्षा असलेल्यांनीच या कादंबरीचा नाद करावा ...Read more

  • Rating StarRandhir Shinde

    मध्यंतरी सहज बोलताना आसारामने विवेक शानबाग यांच्या `घाचर घोचर` या छोटेखानी कादंबरीचा उल्लेख केला होता.काल सहज मिळवली. वेगळी वाटली. छोट्या अवकाशात मध्यमवर्गीय कुटुंबाचे भयस्वप्न सांगितले आहे. एका छोट्या कुटुंबाचा दुभंग प्रवास या कादंबरीतून कथन केला आह. काळवेगाने रचलेल्या आकांशा माणसाला कुठे घेऊन जाणार आहे याचे अस्वस्थ चित्र या कादंबरीत आहे. एकमेळीची नांदवणूक सांगणाऱ्या कुटुंब रचनेला घरघर लागल्याची कहाणी यात आहे. पैसा आणि अतिमहत्त्वकांक्षा माणसाला परकेपण,दुरावा आणि दुभंगपणाकडे घेऊन जात आहे काय, कादंबरीत कानडी कुटुंबाचा देखावा चांगला उभा केला आहे. तर अगणित मुंग्यांच्या प्रतिकाचा आणि घाचर घोचर या शब्दाचा खेळ चांगला रचला आहे. मेहता प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकाचा अनुवाद अपर्णा नायगावकर यांनी केला आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 23-09-2018

    मध्यमवर्गीय वृत्तीवर प्रकाश टाकणारं पृथक्करण... ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ने विवेक शानभाग यांच्या ‘घाचर घोचर’ या कन्नड कादंबरीचा मराठी अनुवाद नुकताच प्रसिद्ध केला आहे. अपर्णा नायगांवकर यांनी हा अनुवाद केला असून, बंगळुरूमध्ये वास्तव्य करणाऱ्या एका कुटुंबची गोष्ट यात वाचायला मिळते. एका निम्नमध्यमवर्गीय कुटुंबाची नवश्रीमंतात गणना होऊ लागते, तेव्हा त्या घरातील वातावरणात होणाऱ्या बदलाबरोबरच जीवनमूल्येही कशी अगदी सहजपणे बदलत जातात, हे या कादंबरीत लेखकाने मोठ्या मार्मिकपणे दाखविले आहे. ललित साहित्यात अभावानेच आढळणारा हलकेपणा असलेली ही कादंबरी. अगदी थोडक्यात पण कुशलतेने मांडलेली कथा, उपरोधाची किनार, कारुण्याची झालर आणि विनोदाचा तडका अशी मस्त जमून आलेली भट्टी म्हणजे ही कादंबरी. मध्यमवर्गामध्ये कोणतीही घटना घडली, की तिची परिणीती अस्वस्थतेत होते. या कादंबरीतील घरातली माणसं एकमेकांना घट्ट धरून आहेत, पण आपल्या अस्वस्थतेतची कारणमीमांसा शोधणं, एकमेकांशी यासंदर्भात चर्चा करणं यापासून ते दूर राहिलेले दिसतात. कादंबरीतून लेखकाने भारतीय कुटुंबाचे अनेक पदर उलगडले आहेत. मध्यमवर्गीयांच्या टिपिकल वृत्तीवर प्रकाश टाकणारं हे पृथक्करण आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BHARTIYA GANIKA
BHARTIYA GANIKA by DR.S.R. DESHPANDE Rating Star
डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके

मंडळी, कालच्या ऱ्हासचक्रानंतर मी विचार करत होते की आज काय? पुस्तकं तर काही वाचून ठेवली होती (म्हणजे वाचली आणि ठेवून दिली बाजूला... अक्षरशः). आत्ताची समोर आहेत ती. कदाचित त्यातलं एखादं उद्या घेईन. मध्ये अचानक या पुस्तकाची जाहिरात वाचली, अगदी गेल्या ठवड्यातली गोष्ट. उत्सुकता चाळवली. समूहात काहीतरी आगळं वेगळं पुस्तक घ्यावं हा विचार सतत मनात असतोच. तसं पुस्तक घरी येताच (जय amazon) चाळायला म्हणून बसले, आणि काय सांगू, हातात मार्कर कधी आलं, मी खुणा कधी केल्या, पुस्तक कधी संपलं... कळलंच नाही. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते... प्रेयर पुस्तकाला तुम्ही जो भरघोस प्रतिसाद दिलात, अनेकांनी ते विकत घेण्याचा विचार केला तेव्हाच सांगायचं होतं, पण राहिलं. ओळख करून दिलेलं पुस्तक पूर्णपणे वाचनीय असतं असं नाही. त्याचा बरचसं भाग बोजड असतो. पण ते नाही का, डेटिंगच्या काळात मुलगा मुलगी स्वतःमधलं केवळ उत्तम ते दाखवतात, तसं मला प्रेयर बद्दल वाटलं. आय मीन प्रेयर पुस्तकाबद्दल वाटलं आणि गणिका या पुस्तकाबद्दल मला नेमकं तेच वाटत आहे. ========== ‘भारतीय कामशिल्प’ या पुस्तकाचं लेखन करत असताना प्राचीन भारताच्या समाजजीवनाची माहिती देणारे अनेक संदर्भग्रंथ वाचण्यात येऊन लेखकांची उत्सुकता चाळवली गेली आणि जेव्हा या विषयावर मराठीत एकही परिपूर्ण संदर्भग्रंथ नाही हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी स्वतःच या पुस्तकाचं लेखन मनावर घेतलं. केवळ सनसनाटी विषय सवंगपणे हाताळला आहे असं कुठेही वाटत नाही. अतिशय अभ्यासपूर्वक लेखन आहे. सोबत जोडलेली संदर्भग्रंथांची यादी (एकूण संख्या ६४) पुरेशी आहे. गणिका आणि उर्वरित श्रेणी या शरीरविक्रय करतात, हा वैश्विक व्यवसाय आहे. कैक काळापासून या व्यवसायाला मान्यता मिळाली आहे आणि त्याची आवश्यकता वाटली आहे. प्राचीन काळात भारतीय गणिका यांना एक संस्कृती आणि दर्जा होता. नीतीनियम होते, ते पाळावे लागत होते. पुस्तकाची प्रकरणं – प्रास्ताविक, विदेशी गणिका, भारतीय साहित्यातील गणिका, गणिकेची प्रशिक्षण व वर्णन, गानिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने, विट, गणिकामाता, प्रियकराचा राग-रंग, कथांविषयी थोडेसे आणि कथा (या शेवटच्या प्रकरणात एकूण १३ कथा आहेत – अगदी सुरस आणि चमत्कारिक वाटाव्यात अशा, त्यांचा परिचय मी देणार....... नाही.) प्रास्ताविक – (नऊ पानांचं प्रकरण) कुटुंब किंवा विवाहसंस्था कधी आकाराला आले हे नक्की सांगता येत नसलं तरी स्त्री-पुरुष शरीरसंबंध हे आदिम असून ते पशु – पक्ष्यांप्रमाणेच जनन हेतुस्तव नैसर्गिक होते आणि राहतील. फलन हे स्त्रीदेहामध्ये होतं या जाणीवेतून तिला आदरस्थान प्राप्त झालं. सर्जनाची गूढ शक्ती धारण करणारी ती आदिमाया/माता/ अद्याशक्ती होय. जवळपास प्रत्येक धर्मात प्रजा, पशु आणि धान्य समृद्धीसाठी सुफलता विधी आहेत. भारतीय हिंदू धर्म शास्त्रीय ग्रंथांतून स्त्री पवित्र्याच्या कथा वाचायला मिळतात. पतीला परमेश्वर मानलं जाई. त्याही काळात गणिका हा व्यवसाय होता आणि त्याकडे सहिष्णू वृत्तीने पाहिलं जाई.राजे महाराजे त्यांचे पोशिंदे असतं. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया तिरस्काराला पात्र असत, पण गणिका नाही. त्यांना नगर भूषण, नगर अलंकार, नाग्त रत्न मानलं जाई. प्रसंगी, राजे त्यांचा सल्ला घेत. त्या बहुश्रुत असतं चौसष्ट कलांत पारंगत असतं. संभाषणचतुर, हुशार, समंजस, उदार, योग्य आदर राखणाऱ्या, विनयशील आणि अनुपम सौंदर्यवती असत. एखाद्या गणिकेमुळे त्या राज्याची कीर्ती वाढत असे. धार्मिक समारंभ, सामाजिक कार्यक्रम (विविध झुंजी, शर्यती), करमणुकीचे कार्यक्रम (जलक्रीडा, वनविहार), रंगमंचावर अभिनय, अशा नानाविध ठिकाणी त्यांची ठळक उपस्थिती असे. रथारूढ अथवा सिंहासनाधिष्ठ राजाला वारा घालणे, चवरी ढाळणे, छत्र धरणे अशी कामं त्या करत. त्यांच्याशी संबंध ठेवणं समाजमान्य होतं. प्रतिष्ठितांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक, अगत्यशील आणि स्नेहिल होता. मात्र, त्यांना कडक आणि कठोर नियम पालन करावे लागे.विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर ते पेशवाई संपेपर्यंतच्या काळात, मोगल राजवट येऊन गेली, ब्रिटीश वसवतवादाचा प्रसार सुरू झाला, समाज व्यवस्था बदलली, गणिका संस्कृतीला ओहोटी लागली. ब्रिटीशांचा अंमल सुरू झाल्यावर गणिका संस्था नष्ट होऊन वेश्या व्यवसाय वाढीला लागला. यामागे औद्योगिक क्रांती हे एक कारण आहे. वेश्यागमन निंद्य कृत्य मानलं जाऊ लागलं. तरुण अधिकाधिक सुशिक्षित होऊ लागला तसा शरीरसंबंधांपायी स्वास्थ्य गमवावं लागलं तर काय, हा विचार थोडाफार मूळ धरू लागला. आणि या शौकाची आसक्ती कमी झाली. चरितार्थाकरता पैसे मिळवण्यासाठी वेश्याव्यवसाय हादेखील विश्वसनीय आर्थिक व्यवसाय मानण्यात यावा असा निकाल १९११मध्ये युरोपियन न्यायालयाने दिला. विदेशी गणिका – (२७) बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतीत गणिकांचे पुरावे मिळतात. इजिप्त, बबिलोन, सिरीया, फिनिशिया, ही काही उदाहरणं. ग्रीस, इटली, भारत इथे त्यांना विशिष्ट दर्जा प्राप्त झाला. त्यांचेही प्रकार होते, सामान्य वेश्या अलेत्रय्डी, आणि सर्वोच्च म्हणजे हेटीअरा (या शब्दाचा अर्थ सोबती). काही हेटीअरा वादविवादपटू होत्या. क्लेप्सीड्रा हिच्या वक्तशीरपणामुळे तिला ते नाव मिळालं होतं त्याचा अर्थ जलघटिकापात्र असा होतो. थीओफ्रत्स याने इ.पू. ३७२ – २८७ या काळात ‘ऑन मरेज’ हा ग्रंथ लिहिला, याचा सविस्तर अभ्यास करून लिओंटीयम या हेटीअराने त्यावर प्रगल्भ टीका लिहिली. रोमन समाजात कोर्टीझन अस्तित्वात होत्या. पॉम्पेई इथे व्हिकोली बाल्कोन पन्सिली नावाच्या इमारतीत शेकडो रमणी वास करत. या संदर्भातली रतिक्रिडेची मूळ चित्रं पॉम्पेईन wall paintings म्हणून प्रसिद्ध असून ती इटलीच्या वस्तुसंग्रहालयात सुरक्षित आहेत. रोमन साम्राज्यात हेटीअरा ऐवजी कोर्टीझन शब्द रूढ झाला. युरोपात पंधरा-अठरा शतकांत कोर्टीझन आणि कलावंतीण यांना समाजात विशिष्ट स्थान आणि आदर मिळत होता. फ्रान्समध्ये सतराव्या शतकात रमणींची सत्कारगृहं (सलो) प्रसिद्ध होती. जपानमध्ये गै (कलात्मक क्षमता) आणि शा (व्यक्ती) यावरून गैशा ही संज्ञा रूढ झाली. त्यांच्यात अलंकारिक सुरावट, सौजन्य, निष्कपट, सुसंस्कृतपण असे. बाराव्या शतकापासून कार्यरत असलेली ही प्रथा इडो काळात (इ.स.१६००-१८६८) अधिक वाढीला लागली. ओकिया ही त्यांची निवासस्थानं होत. विसाव्या शतकात त्यांचं वर्चस्व राजकीय क्षेत्रात वाढीला लागलं. १९२०-३० मध्ये त्यांची संख्या साधारण ८० हजार होती, ती १९७०-८० दम्यान १७ हजार इतकीच उरली आहे. चीनमध्ये पूर्वी पीकिंग (बीजिंग) इथे सिंगसॉंग हाउस हा भाग राखीव होता. शांघाय इथे अत्यंत विलासी वारांगना गृहं आहेत. सिंगापूरमध्येगिटार गर्ल्स (पीपाचाई) या नावाने त्या ओळखल्या जातात. पाकिस्तानात त्या तवायफ, कान्जारी आणि गश्ती नावाने ओळखल्या जातात. आज मात्र सर्वत्र आमुलाग्र बदल झाला आहे. भारतीय साहित्यातील गणिका – (३२) संस्कृत, प्राकृत, पाळी भाषांत, हिंदू, बौद्ध, जैन वान्ग्मयात, त्यांचा उल्लेख आढळतो. त्या वैदिक काळात भारतात होत्या हे काही ऋचांवरून समजतं. (ऋचा १.१६७.४ – अनेक पुरुषांशी सांग करणारी ती साधारणी). पंचचुडा अप्सरेपासून त्यांची उत्पत्ती झाली असं मानतात. महाभारत काळात त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. (राज, नागरी, गुप्त, देव आणि ब्रह्म असे पाच प्रकार होते). रामायणात फार स्थान नव्हतं. अमरकोश, महाभाष्य, वार्त्तिके, दशरूपक, कौटिलीय अर्थशास्त्र जातक कथा, पंचतंत्र, वेताळकथा, शुकबहात्तरी, गाथासप्तशती, अशा विविध ग्रंथांत त्यांचा उल्लेख आहे. कामसूत्र या ग्रंथात वात्सायनाने ‘वैशिक’ या प्रकरणात त्यांची माहिती दिली आहे. कथासरीत्सागर, राजतरंगिणी, शृंगारतिलक, सरस्वतीकंठभरणा, कलाविलास, मेघदूत, मृच्छकटिक, रत्नावली, नागानंदा, अशा नाटकांतून त्यांचा उल्लेख येतो. भारतात इ.पू. पहिल्या सहस्रकात ती प्रथा अस्तित्वात येऊन ब्रिटीशांच्या आगमनानंतर एकोणिसाव्या शतकात लोप पावली असावी असं समजलं जातं. गणिकेची प्रशिक्षण व वर्णन – (१६) गणिकेला बालपण जवळपास नव्हतच. वयाच्या सहा-सात वर्षापासून तिला घडवायला सुरुवात होत असे. त्यांच्या प्रशिक्षणात आचार, विचार, शिष्टाचार, विविध कला, खेळ, भाषा, वर्तन, सौंदर्यवर्धन, गायन, वादन, नृत्य, अलंकरण, शरीर सौष्ठव, बुद्धिवर्धन अशा प्रत्येक अंगाचा व्यापक विचार होता. काही हस्तकला शिकाव्या लागत. पाककला, सुगंधी द्रव्य निर्मिती, कामशास्त्र, प्रणायाराधन, हिकाव्म लागे. स्वसंरक्षण शिकावं लागे. गणिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने – (५) आधीच्या प्रशिक्षणात हाही एक महत्त्वाचा भाग होता. विट – (७) हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा इथे दिलेला अर्थ – शृंगाररस नायकानुचराप्रमाणे संपत्तीचा भोग न घेणारा किंवा जो आपल्या पैशाचा वापर कधी करत नाही, असं नाटकातलं लबाड, धूर्त पात्र. गणिका संस्थेत त्याच्या जोडीने वयस्य, अनुचर, धूर्त आणि डिंडिक ही पुरुष पात्र वावरतात. प्रतिवेशिनी ही गणिकेची शेजारीण. ती विश्वासातली. ती गणिकेसाठी विट आणि प्रियकर यांच्याशी संवाद साधते. गणिकामाता – (७) हे पात्र फार महत्त्वाच. तिला संरक्षित स्त्री, कुट्टनी किंवा कुट्टीनी म्हटलं जाई. तिचं काम शिस्त राखणे, थोडक्यात रेक्टर. कामकुजानांना आळा घालणं, गणिकांना खऱ्या प्रेमापासून वंचित ठेवणं. कामुकांचं मानसशास्त्र तिला मुखोद्गत. पुरुषांच्या गुणदोषाच्या’ आधारे अचूक आडाखे बांधत ती गणिकेला सल्ला देता. तिचा दबदबा असतो. ते नसती तर गणिका ही संस्था कधीच नामशेष झाली असती. कारण स्त्रिया या स्त्रिया असल्याने स्त्रीसुलभ भावनेनुसार गणिकागिरीत न रमता त्या केव्हाच संसाराला लागल्या असत्या. प्रियकराचा राग-रंग – (९) रग हे बारा छटांमधली काम आसक्ती असं म्हणता येईल. पुरुषाची मनोवृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव, गुणविशेष आणि खास करून राग-लोभ जाणून घेत गणिकेला त्याच्याशी वर्तन करावे लागते. कथांविषयी थोडेसे आणि कथा (४८) – ‘शृंगारमंजरीकथा’ हा राजा भोज रचित संस्कृत ग्रंथ असून त्यात स्त्री-पुरुष मनोवृत्ती दर्शन घडवणाऱ्या तेरा कथा आहेत. त्यापैकी काही जीर्ण, काही अपूर्ण आहेत. पैकी एक कथा वाचून दाखवते. संदर्भग्रंथ (४) सोबत फोटो दिले आहेत त्या पानांचे. या पुस्तकात आढळलेले सुंदर शब्द – गरती, लीलासहचारी, पृथुल (अर्थ कळला नाही अजून), रूपाजीवा, सूरसुंदरी परिचय फार लांबला. या विषयावरच्या इतक्या अभ्यासानंतर एखादा पेपर सहज देता येईल. परत अभिमानाने म्हणता येईल, ‘मा, मै फर्स्ट क्लास फर्स्ट आया!’ मनापासून धन्यवाद. माझी परिचय पाळी नसती तर मी हे पुस्तक वाचलंच नसतं. मजा आली मला वाचताना. तशी तुम्हालाही आली असेल अशी खात्री आहे. थांबते. ...Read more

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more