* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SIX MACHINE
  • Availability : Available
  • Translators : DEEPAK KULKARNI
  • ISBN : 9789387789944
  • Edition : 1
  • Publishing Year : JULY 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 304
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"CHRIS GAYLE IS THE ONLY MAN TO HAVE EVER HIT A SIX OFF THE FIRST BALL OF A TEST MATCH. BUT THEN PRODUCING THE IMPOSSIBLE IS AN EVERYDAY ACT FOR THE WEST INDIES LEGEND: THE FIRST MAN TO SMASH AN INTERNATIONAL T20 CENTURY, THE FIRST TO HIT A WORLD CUP 200, THE FASTEST CENTURY IN THE HISTORY OF THE GAME. HE HAS HIT TWICE AS MANY T20 SIXES AS ANY OTHER MAN AND SCORED TWO TEST TRIPLE CENTURIES. ALL THIS IS DELIVERED WITH CRICKET`S BIGGEST BAT AND AN EVEN BIGGER SMILE. OFF THE PITCH, MILLIONS FOLLOW HIM ON INSTAGRAM AND TWITTER TO CATCH A GLIMPSE OF A GLOBE-TROTTING LIFE SPENT IN NIGHTCLUBS AS MUCH AS NETS, HOT-TUBS AS OFTEN AS HELMETS AND PADS. HE PLAYS LATE, PARTIES LATER, DEMOLISHES A KING-SIZE PILE OF PANCAKES AND THEN STROLLS OUT TO MANGLE ANOTHER HAPLESS BOWLING ATTACK. BUT DO WE REALLY KNOW HIM? DO WE KNOW WHAT TOOK A SHY, SKINNY KID FROM A CRAMPED TIN-ROOFED SHACK IN THE DUSTY BACK STREETS OF KINGSTON, SHARING A BED WITH THREE BROTHERS AND STEALING EMPTY BOTTLES TO BUY FOOD, TO THE VERY TOP OF THE CRICKET WORLD - WITHOUT LOSING HIMSELF ALONG THE WAY? OUTRAGEOUS AND UTTERLY ORIGINAL, THIS UNPUTDOWNEABLE MEMOIR WILL LEAVE YOU REELING. WELCOME TO THE WORLD OF THE SIX MACHINE. "
"कसोटी सामन्यातील पहिल्याच चेंडूवर षट्कार ठोकणारा ख्रिस गेल हा एकमेव फलंदाज आहे. पण अशा अनेक गोष्टी सहज शक्य करून दाखवणं, हा वेस्ट इंडिजच्या या महान खेळाडूच्या रोजच्या जीवनाचाच एक भाग झालाय. आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात पहिलं शतक झळकवण्याचा मान ख्रिस गेलकडे जातो. विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेत त्यानेच प्रथम २०० धावा काढल्या. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत जलद शतक करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. टी२० क्रिकेट सामन्यात कोणत्याही फलंदाजाने मारलेल्या षट्कारांपेक्षा, त्याने दुप्पट षट्कार लगावले आहेत आणि कसोटी क्रिकेटमध्येही त्याने दोन तडाखेबंद त्रिशतकं काढलेली आहेत. हे सर्व विक्रम करताना त्याच्या हातात क्रिकेटमधील सर्वांत वजनदार बॅट होती आणि चेहऱ्यावर सदा फुलणारं हास्य होतं. जगभर प्रवास करणाऱ्या ख्रिस गेलचे इन्स्ट्राग्राम व ट्विटरवर लाखो चाहते आहेत. आपल्या लाडक्या क्रिकेटपटूच्या धडाकेबाज फलंदाजीची व नाइटक्लबमधील त्याच्या धमाल मस्तीची एक तरी झलक पाहायला-ऐकायला मिळावी यासाठी त्याचे चाहते कायम उत्सुकतेने वाट पाहत असतात. खेळपट्टीवर टिच्चून उभा राहत तो दीर्घ काळ फलंदाजी करतो, रात्रभर पार्टीत मौज करतो; दुसऱ्या दिवशी दुपारी उशिरा उठून प्रथम एका मोठ्या पॅनकेकचा फडशा पाडतो आणि मग दुर्दैवी गोलंदाजांची दुर्दशा करण्यासाठी पुन्हा मैदानात पाऊल ठेवतो. किंगस्टनच्या धुळीनं भरलेल्या रस्त्याच्या टोकाला, पत्र्याचं छप्पर असलेल्या एका घरात राहणाऱ्या, आपल्या तीन भावांबरोबर एकाच बिछान्यावर झोपणाऱ्या व पोटाची सोय करण्यासाठी रिकाम्या बाटल्या बाजारात विकणाऱ्या एका लाजऱ्याबुजऱ्या मुलाला, क्रिकेट जगतातील उच्च स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले, याची कथा. ही कथा केवळ एका असामान्य क्रिकेटपटूची नाही, तर विषमता व भेदभावाविरुद्ध झगडणाऱ्या, शून्यातून आपलं स्वतंत्र विश्व निर्माण करणाऱ्या व हे सर्व करताना आपलं स्वत्व हरवू न देणाऱ्या एका लढवय्याची आहे. "
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#SIX MACHINE #CHRIS GAYLE# DEEPAK KULKARNI#सिक्स मशिन# ख्रिस गेल# टॉम फोर्डायिस# अनुवाद दीपक कुळकर्णी# ल्युकास# केनसिंग्टन क्लब# रोलिंग्टन टाऊन# मिस हॅमिल्टन# सबीना# वर्ल्ड बॉस# गेट्टी# केविन मरे# डडली # मिशेल,व्हॅनक्लिव्ह #पोपॉय
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL (SAPTRANG) 26-05-2019

    खिस गेल : तो बिनधास्त बोलतो, वागतो, खातो, पितो आणि खेळतोही. त्याचं लेखनही तसंच आहे. तो स्वत:लाच ‘युनिव्हर्स बॉस’ म्हणवून घेतो. त्याला माहीत आहे, की तो भारी आहे आणि हे सगळं जगाला खुलेपणानं सांगायलाही तो कचरत नाही. त्याला न्यूनगंड शिवलेलाही नाही. तो दिखुलास आहे. विक्षिप्त आहे आणि हे सगळं तो पुस्तकाला मान्य करतो. त्याच्या टोलेबाजीसारखंच त्याचं ‘सिक्स मशिन’ नावाचं आत्मचरित्रही एकदम तोडीस तोड आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 28-10-2018

    क्रिकेटमधील लढवय्याची आत्मकथा... क्रिकेटविश्वातील वेस्ट इंडिजचा सर्वांत स्फोटक फलंदाज आणि फलंदाजांना चकवणारा चतुर गोलंदाज खिस गेल याने लिहिलेले तितकेच तडाखेबाज आत्मचरित्र ‘सिक्स मशिन’ हे पुस्तक म्हणजे क्रिकेटरसिकांसाठी वाचनाची पर्वणी आहे. किंगस्टनच्ा धुळीने भरलेल्या रस्त्याच्या टोकाला, पत्र्याचं छप्पर असलेल्या एका घरात राहणाऱ्या, आपल्या तीन भावांसोबत एकाच बिछान्यावर झोपणाऱ्या व पोटाची सोय करण्यासाठी रिकाम्या बाटल्या बाजारात विकणाऱ्या एका लाजऱ्याबुजऱ्या मुलाला जागतिक कीर्तिध्वजावर पोहोचण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले, हे यातून समजते. ‘आय डोन्ट लाइक क्रिकेट... आय लव्ह इट’ असं आपल्या जीवनाचं ब्रीदवाक्य बनविणाऱ्या आणि ते भरभरून जगणाऱ्या या खेळाडूला जाणून घेण्यासाठी हे धक्कादायक आत्मकथन नक्कीच वाचायला हवे. ...Read more

  • Rating StarLOKPRABHA 24-08-2018

    क्रिकेटमधला मस्त कलंदर!... काही व्यक्तिमत्त्वेच अशी असतात, की त्यांनी केलेल्या काही गोष्टी या फक्त त्यांनाच शोभून दिसतात. अशा व्यक्ती आयुष्यभर वादग्रस्त ठरतात, किंबहुना वादांशी त्यांचे अतूट नाते असते. त्यात त्यांना विशेष वावगे वाटत देखील नाही. मी आह हा असा आहे, पटत असेल तर समजून घ्या, नाही तर मी माझ्या शैलीत जगू देणाऱ्या दुसऱ्या जगात जायला मोकळा, अशी ‘स्वच्छंद’ जीवनशैली जगलेल्या आणि जगणाऱ्या मोजक्या व्यक्तिमत्त्वांमध्ये जगातला सर्वाधिक खतरनाक सलामीचा फलंदाज म्हणून जगविख्यात झालेल्या खिस गेलच समावेश होतो. जे करायचे ते मनापासून आणि भरभरून. मग ते क्रिकेटवरचे प्रेम असो, तडाखेबंद खेळी अन फटक्यांवर जडलेला जीव असो की फटाकड्या मुलींचा संग असो. दोन्ही खेळच आहेत आणि ते तितक्याच मनमोकळ्या पद्धतीने खेळायचे, त्यात लपवाछपव कशाला? असा त्याच्या लेखी सरळ-साधा जीवनमार्ग असलेल्या खिसच्या जीवनाचे बालपणापासूनचे रंग ‘खिस गेल सिक्स मशीन’ या पुस्तकातून वाचकांसमोर येतात. जमैकातील किगस्टनमधला त्याचा जन्म आणि त्याच्या बालपणाचे अनेकानेक किस्से या पुस्तकात आहेत. सात सावत्र भावंडांमध्ये खिस सहावा. या सहा क्रमांकाशी खिसचे नाते जन्मापासूनच जे चिकटले ते अजतागायत कायम आहे. जगभरातील बहुतांश मैदानावर षटकारांचा पाऊस पाडलेल्या गेलला त्यामुळेच ‘सिक्सर्सचा बादशहा’ ही उपाधी मिळाली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्याच षटकातील पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकण्याचा एकमेवाद्वितीय पराक्रमदेखील केवळ त्याच्याच नावावर आहे. तसेच कसोटीत दोन त्रिशतके झळकवलेल्या जगातील केवळ चार फलंदाजांमध्ये त्याचा समावेश आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर ब्रायन लारापेक्षा जास्त शतके आहेत. हे सारं काही असलं तरी त्याचा जन्म जणू ट्वेन्टी-२०च्या युगासाठीच झाला असावा, अशीच त्याची शैली आहे. या प्रकारात सर्वाधिक धावा, धावांची सर्वाधिक सरासरी, सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आणि कुणाही एका खेळाडूने मारलेल्या षटकारांच्या दुपटीहून अधिक षटकार गेलच्या नावावर जमा आहेत. या प्रकारातील पहिले शतकदेखील गेलच्याच नावावर आहे. जगातील पाचही खंडांतील सोळा संघांकडून तो खेळत आलाय आणि अजूनही खेळतो. प्रत्येक महिन्यात जगातल्या कुठल्या लीगमध्ये खेळायचे, त्याचे वेळापत्रकदेखील ठरून गेले आहे. अनेक संघांमधून खेळत असल्याने त्याला अनेकदा संघसहकाऱ्यांची नावेदेखील माहिती नसतात. मग त्यावर त्याने शोधून काढलेला उपाय म्हणजे ‘काय ब्रो कसा आहेस?’ असे म्हणत संवाद साधणे. तसेच त्या खेळाडूने त्याच्या नावाचा शर्ट अंगात घातल्यावर त्याच्या पाठीवरील नाव वाचून त्याला नावाने हाक मारण्याचे फंडे त्याने मोठ्या गमतीशीर शैलीत सांगितले आहेत. अनेक संघांकडून खेळण्यामुळे कुणी त्याला ‘भाडोत्री सैनिक’ म्हणून डिवचण्याचा प्रयास केला तरी तो चिडत नाही. तुम्ही मला काहीही म्हणा. मी जिथे जाईन तिथे खेळाचा आनंद लुटतो. तसाच तेथील खान-पान आणि नाइट लाइफचादेखील, असे त्याचे त्यावरचे उत्तर असते. रात्री उशिरापर्यंत, किंबहुना सकाळपर्यंत पार्टी करायची, मनसोक्त नाचत नाइट क्लबमध्ये धमाल करायची. दुसऱ्या दिवशी उशिरा म्हणजे जवळपास दुपारीच उठून मग दिवसाला प्रारंभ करायचा, अशी जीवनशैली जीवनाच्या यशस्वितेच्या टप्प्यात उपभोगत असलेल्या गेलचा भूतकाळ मात्र खूप विपरीत आणि विपन्नावस्थेतील होता, किंबहुना या यशापूर्वीच्या काळात क्रिकेटच्या ध्यासापोटी गेलने किती अतोनात कष्ट घेतले, त्याचेदेखील वर्णन पुस्तकात सविस्तर आले आहे. किगस्टन मैदानाच्या भिंतीलगतच असलेले त्याचे ते पत्र्याचे छोटे घर, घरात भावंडांच्या दाटीवाटीत झोपायलादेखील न पुरणारी जागा, अपुरे अन्न, कधी तरी खिसमससारख्या सणासुदीला मिळणारी मांसाच्या तुकड्यांची मेजवानी असे दारिद्र्यातील बालपण सांगतानादेखील कुठेही सहानुभूती मिळवण्याचा किंवा त्यातून कुणाच्याही मनात कणव निर्माण करण्याचा उद्देश जाणवत नाही. जे आहे, जसे होते तसे केवळ सांगण्याचा प्रामाणिकपणातूनच ते सारे उल्लेख आल्याचे दिसून येतात. स्वत:ची गोड छबी रंगवून दाखवण्यात त्याला अजिबात रस नाही. त्यामुळे दुसऱ्याच प्रकरणात त्याचे वर्णन करताना मी एक विचित्र आणि विक्षिप्त माणूस असल्याचे सांगून तो मोकळा होतो. तुम्ही मला ओळखता, असे तुम्हाला वाटत असेल, मात्र ते काही खरे नाही. तुम्ही मला ओळखूच शकत नाही. तुम्ही मला जाणून घेण्याचा प्रयासदेखील करू नका. माझं व्यक्तिमत्त्व खूप गुंतागुंतीचं आहे, हे तोच त्याच्याकडून सांगून मोकळा होतो. मी कधी गमतीजमती करतो, कधी शांतपणे बसून राहतो, कधी बुजरा बनतो, कधी बिनधास्त असतो, कधी माझ्या मिठास वाणीने सगळ्यांना खूश करायला पाहतो, तर कधी मनाची सर्व कवाडं बंद करून एकांतात राहतो. अशी आपलीच सर्व रूपं सांगून तो सगळ्यांना बुचकळ्यात पाडतो. त्याच्या आयुष्यातील कटू-गोड आठवणी, झालेले वादविवाद, मित्रांमधील हेवेदावे, बालपणातील बुजरा खिस हे गुलछबू पुरुष बनलेला खिस गेल असा प्रवास त्याने भारतीय नजरेतून पाहता जरा जास्तच मनमोकळ्या पद्धतीने उलगडून दाखवले आहेत. या जीवनचरित्रात गेल कधी त्याच्या आयुष्याचे तत्त्वज्ञान सांगतो, कधी क्रिकेटच्या डाव उभारणीच्या टिप्स देतो, कधी मुली-बायका पटवण्याच्या त्याच्या पूर्वायुष्यातील युक्त्या असं काहीही त्याच्या मनाला वाटेल तसे तो सांगतो. प्रत्येक कठीण प्रसंगी मोकळ्या हवेत जा, छाती भरून श्वास घे, स्वत:चं ध्येय निश्चित कर, मोकळ्या श्वासाबरोबर डोक्यातला राग विरून जाऊ दे अन् पुढे चल, हे त्याचे तत्त्वज्ञानदेखील तो अनेक ठिकाणी उद्धृत करतो. बालपणी भोगलेल्या दारिद्र्यामुळे जीवनात प्रचंड पैसा कमावण्याची इच्छा, स्वत:चे आलिशान घर, घरात आपल्या आईवडिलांसह सावत्र भावंडं आणि जिवलग मित्रांसाठी बांधलेल्या स्वतंत्र खोल्या, त्याच घरात त्याने उभारलेला आवडता डान्स बार असं सारं काही समरसून जगणाऱ्या गेलच्या आयुष्यातील बहुतांश प्रमुख घटनांचे मनोवेधक चित्रण पुस्तकात करण्यात आले आहे. खेळायचे ते जिंकण्यासाठी नव्हे, तर प्रेक्षकांना खूश करण्यासाठी आणि जगायचे ते आपल्याच मस्तीत असा कलंदरी खाक्या असलेल्या गेलच्या जीवनाचे आंतरबाह्य दर्शन घडवण्याचे काम या पुस्तकातून होते. तरीही त्याच्याच भाषेत सांगायचे झाल्यास हे माझे आयुष्य आहे, ते मी माझ्या पद्धतीने जगणार. आधी स्वत:ला खूश ठेवणार, मग इतरांना. शून्यातून आपले विश्व उभे केलेल्या एका असामान्य क्रिकेटपटूची आणि स्वत्व हरवू ने देणाऱ्या लढवय्या वृत्तीच्या खेळाडूचे हे आत्मकथन वाचताना मनात अनेक भावतरंग उमटतात. या पुस्तकातील एकमेव दोष म्हणजे संपूर्ण जीवनातील घटनाक्रम सांगताना तो कलासुसंगतपणे मांडला गेलेला नाही. गेलला ज्या आठवणी आधी आठवल्या त्या आधी आणि जे किस्से नंतर आठवले ते नंतर अशा अगदी मनमुक्त शैलीत त्याचा जीवनक्रम समोर येतो. मग वाचकाला त्यातील कालसंगती लावून घेण्यासाठी क्षणभर थांबून त्याची कलासंगती लावत बसावे लागते. बाकी पुस्तकातील गेलच्या बालपणीची छायाचित्रे, बालमित्र, त्याचे जुने घर, आई, वडील, प्रशिक्षक अशी छायाचित्रे वाचकाला मनमुराद आनंद देतात. – धनंजय रिसोडकर ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book