* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GODS OWN OFFICE:HOW ONE MAN WORKED FOR A GLOBAL GIANT FROM HIS VILLAGE IN KERALA
  • Availability : Available
  • Translators : SUNITA KATTI
  • ISBN : 9789387789531
  • Edition : 1
  • Publishing Year : MAY 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 204
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
JAMES JOSEPH WAS IN HIS LATE THIRTIES, WELL ENSCONCED IN HIS JOB AS A DIRECTOR WITH MICROSOFT, WHEN HE DECIDED TO TAKE A FAMILY VACATION IN ALUVA, KERALA. HIS SIX-YEAR-OLD DAUGHTER TASTED A JACKFRUIT FROM A TREE IN THEIR OWN YARD AND REMARKED, DADDY, THIS IS SO DELICIOUS. I WISH I COULD EAT THE FRUITS FROM THIS TREE EVERY YEAR. PART MEMOIR, PART HOW-TO, THIS IS HIS AMAZING STORY OF STARTING OUT FROM THE BACKWATERS OF KERALA, BECOMING A CORPORATE CAPTAIN IN AMERICA AND THEN FINDING A WAY TO HAVE A SUCCESSFUL CAREER WHILE WORKING OUT OF HIS VILLAGE IN KERALA. THIS BOOK ALSO CONTAINS TIPS AND TECHNIQUES FOR ANYONE FRUSTRATED WITH LIVING IN CITIES. HOW DO YOU SET UP A HOME OFFICE? HOW DO YOU INTEGRATE WITH THE LOCAL COMMUNITY? WHERE DO YOUR KIDS GO TO SCHOOL? HOW DO YOU CONVINCE YOUR COMPANY TO GIVE YOU THIS OPPORTUNITY? GODS OWN OFFICE MAY WELL INSPIRE YOU TO TRANSFORM YOUR LIFE.
" नोकरी करणाऱ्या विशेषत: मोठ्या पदावर नोकरी करणाऱ्या लोकांचा बराचसा वेळ ऑफिसच्या कामात जातो. त्यात ऑफिसमध्ये जाणं आणि परत घरी येणं या वेळेचाही समावेश असतो. ऑफिस घरापासून लांब असेल, तर जाण्या-येण्यात माणूस दमून जातो. त्याला कुटुंबासाठी वेळ देता येत नाही. तो अन्य कोणत्या गोष्टींचा आस्वाद घेऊ शकत नाही; पण घरात बसून जागतिक दर्जाच्या कंपनीबरोबरही किती सहजपणे काम करता येतं, याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे – ‘देवाजीचं ऑफिस’ हे पुस्तक. जेम्स जोसेफ यांनी या पुस्तकाद्वारे स्वत:चे अनुभव लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. इंग्लंडसारख्या ठिकाणी शिक्षण घेऊन, इंग्लंड, अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये चांगल्या कंपनीत उच्च पदावर काम केल्यानंतर जोसेफ यांना भारतात केरळमध्ये आपल्या मूळ गावी परतावे, असे वाटू लागले. म्हणून त्यांनी त्यासाठी काय पूर्वतयारी केली, आपल्या छोट्याशा गावातून त्यांनी काम कसे सुरू केले, त्यात येणाऱ्या अडचणी गृहीत धरून त्यावर मात करण्यासाठी काय उपाययोजना केल्या, त्यांच्या निसर्गसंपन्न गावातील त्यांचं दैनंदिन, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक जीवन कसं आहे इ. बाबींचं निवेदन जोसेफ यांनी या पुस्तकातून केलं आहे. हे पुस्तक म्हणजे तंत्रज्ञानाच्या युगात स्वत:चं भावविश्व कसं जपावं आणि ते व्यापक कसं करावं, याचंही जाता जाता मार्गदर्शन करून जातं. जोसेफ यांची पत्नी डॉक्टर आहे. त्यामुळे तिला व्यवसायाबरोबरच सेवाभावही जपता येतो. त्यांच्या पत्नीची डॉक्टरीची पदवी परदेशातील असल्यामुळे भारतात प्रॅक्टिस सुरू करण्यात तिला आलेले अडथळे आणि त्या अडथळ्यांवर जोसेफ यांनी केलेली मात, याचाही उल्लेख या पुस्तकात आला आहे. त्यांच्या मुलींचं शालेय जीवन, जोसेफ यांचं कौटुंबिक जीवन याचंही अगदी हलक्याफुलक्या शैलीत ते वर्णन करतात. त्यांच्या कामाच्या संदर्भातील जे जे उल्लेख या पुस्तकात आले आहेत, त्यावरून एकच गोष्ट लक्षात येते, की घरातून काम करताना ते कुठेही ढेपाळत नाहीत. उलट त्यांचा कामाचा वेग वाढलेला आहे. घरातून काम करताना कोणत्या गोष्टींची दक्षता घ्यावी, घरातून काम करतानाही आपल्या सहकाNऱ्याशी कसं जोडलेलं रहावं, याबद्दलही ते सांगतात. प्रगत तंत्रज्ञानामुळे जगभरातील लोकांशी बसल्या जागी संपर्क साधून काम कसं करता येऊ शकतं, हे या पुस्तकावरून समजतं. घरातून काम करतानाही ऑफिसइतक्याच कार्यक्षमतेने काम केलं पाहिजे, असा मूलमंत्रही या पुस्तकातून मिळतो. एकूणच, घरातून काम करतानाचं तुमचं व्यावसायिक जीवन आणि कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक जीवन कसं असतं, याचं अगदी साध्या, सोप्या भाषेत निवेदन या पुस्तकात केलं आहे. मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्याना (विशेषत: मॅनेजर लेव्हलच्या) अशी घरातून काम करण्याची सोय उपलब्ध करून दिली, तर परदेशस्थ भारतीय परत भारतात येऊ शकतात, अशी सूचनाही जोसेफ यांनी केली आहे. जोसेफ यांनी या पुस्तकात सुरुवातीला नमूद केलं आहे, ‘मोठा मासा बनून मोठ्या जलाशयात राहणं आणि लहान मासा बनून लहान तलावात राहणं, या दोन्ही गोष्टी मनाला सारखंच समाधान देतात. पहिली गोष्ट आपल्या व्यावसायिक बुद्धीला आव्हान देऊन संतुष्ट करते आणि दुसरी गोष्ट आपल्या भावनाप्रधान मनाला संतुष्ट करते.’ या दोन्ही गोष्टींचा उत्तम समन्वय जोसेफ यांनी साधला आहे आणि त्यांच्यासारखं काम करणाऱ्यासाठी ते एक उदाहरण आहेत. "

No Records Found
No Records Found
Keywords
#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#GOD’S OWN OFFICE# JAMES JOSEPH# CHENNAI# PIRAVOM ROAD# SAN FRANCISCO# A GREAT PRESIDENT# SHIVARATRI# TOM FRIEDMAN# KERALA# TURTLE# MINDA INDUSTRIES# 3M # GLOBAL MANAGER# WARWICK# US# SUPPLY CHAIN# VIENNA# UK# MICROSOFT #गॉड्स ओन ऑफिस# देवाजीचं ऑफिस# जेम्स जोसेफ# सुनीता कट्टी# पिरवोम रोड# सॅन फ्रान्सिस्को# केरळ# थोर राष्ट्रपती# शिवरात्र# टॉम फ्रीडमन# कासव# उंच उडी# आधारफळी# मिंडा इंडस्ट्रीज# थ्री एम. कंपनी# जागतिकीकरण# ग्लोबल मॅनेजर# व्हिएन्ना# अमेरिका# व्हिसा# बूट कॅम्प# सप्लाय चेन कन्सलटंट# वॉरविक# इंग्लंड# मायक्रोसॉफ्ट
Customer Reviews
  • Rating StarShrikant Adhav

    DEVAJICHE OFFICE by James Joseph केरळमधल्या खेड्यातून मायक्रोसॉफ्टच राष्ट्रीय पातळीवरचं काम करणाऱ्या जेम्स जोसेफ या अवलियानं त्याची कहाणी या पुस्तकात मांडली आहे. वर्क फ्रॉम होम हि कल्पना हळूहळू रुजत असताना जॅम्सनं केरळमधल्या खेडेवजा शहरात जाण्याचानिर्णय घेतला. वेगवेगळे अडथळे पार ाडत त्यानं तिथून काम केलं. त्या सगळ्या अनुभवांविषयी त्यानं लिहिलं आहे. दोन भिन्न गोष्टी अशा प्रकारे सांधत असताना उध्दभवणाऱ्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं याबाबत काही कानमंत्रही त्यानं दिले आहेत. विशेषतः माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत असलेल्याना पुस्तक रंजक वाटेल.व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनाचा समतोल साधण्यासाठी मार्गदर्शन करणारं पुस्तक... नोकरी करणाऱ्या, विशेषत: मोठ्या पदावर नोकरी करणाऱ्या लोकांचा बराचसा वेळ ऑफिसच्या कामात जातो. त्यात ऑफिसमध्ये जाणं आणि परत घरी येणं या वेळेचाही समावेश असतो. ऑफिस घरापासून लाब असेल, तर जाण्या-येण्यात माणूस दमून जातो. त्याला कुटुंबासाठी वेळ देता येत नाही. तो अन्य कोणत्या गोष्टींचा आस्वाद घेऊ शकत नाही; पण घरात बसून जागतिक दर्जाच्या कंपनीबरोबरही किती सहजपणे काम करता येतं, याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे जेम्स जोसेफ यांचं ‘गॉड्स ओन ऑफिस’ हे पुस्तक. ‘देवाजीचं ऑफिस’ या शीर्षकासह त्याचा अनुवाद केला आहे सुनीता कट्टी यांनी. जेम्स यांना पाच भावंडं. ते सहावे. ते दोन वर्षाचे असताना त्यांच्या आईला कॅन्सर झाला आणि त्याच वेळेला वडिलांना अपघात होऊन ते कोमात गेले; पण तीन महिन्यांनंतर ते कोमातून बाहेर आले. जेम्स यांच्या आईचं मात्र निधन झालं. आईच्या निधनानंतर त्यांच्या वडिलांनी सहाही मुलांना वसतिगृहात ठेवलं. जेम्सच्या आईच्या माहेरच्या नातेवाईकांनी या सहाही भावंडांना भक्कम मानसिक आधार दिला. जेम्स इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होते तेव्हा त्यांच्या वडिलांना परत अपघात झाला आणि ते कोमात गेले; मात्र या वेळेला ते कोमातून बाहेर येऊ शकले नाहीत. त्यांचा मृत्यू झाला. जेम्सची आणि त्यांच्या पत्नीची ओळख कशी झाली आणि त्यांचं लग्न कसं झालं, याबद्दलही त्यांनी लिहिलं आहे. आपल्या मुलींबद्दलही ते बोलतात. एकूण त्यांचं विवाहपूर्व जीवन असो किंवा विवाहानंतरचं, त्यांच्या कुटुंबाशी असलेले त्यांचे घट्ट स्नेहबंध जाणवत राहतात. आपल्या गावाविषयीची, तेथील लोकांविषयीची त्यांची आपुलकी लक्षात येते. जेम्स यांनी या पुस्तकाद्वारे स्वत:चे अनुभव लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. इंग्लंडसारख्या ठिकाणी शिक्षण घेऊन, इंग्लंड, अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये चांगल्या कंपनीत उच्च पदावर काम केल्यानंतर जोसेफ यांना भारतात केरळमध्ये आपल्या मूळ गावी परतावे, असे वाटू लागले. म्हणून त्यांनी त्यासाठी काय पूर्वतयारी केली, आपल्या छोट्याशा गावातून त्यांनी काम कसे सुरू केले, त्यात येणाऱ्या अडचणी गृहीत धरून त्यावर मात करण्यासाठी काय उपाययोजना केल्या, त्यांच्या निसर्गसंपन्न गावातील त्यांचं दैनंदिन, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक जीवन कसं आहे इ. बाबींचं निवेदन जोसेफ यांनी या पुस्तकातून केलं आहे. हे पुस्तक म्हणजे तंत्रज्ञानाच्या युगात स्वत:चं भावविश्व कसं जपावं आणि ते व्यापक कसं करावं, याचंही जाता जाता मार्गदर्शन करून जातं. जोसेफ यांची पत्नी डॉक्टर आहे. त्यामुळे तिला व्यवसायाबरोबरच सेवाभावही जपता येतो. त्यांच्या पत्नीची डॉक्टरीची पदवी परदेशातील असल्यामुळे भारतात प्रॅक्टिस सुरू करण्यात तिला आलेले अडथळे आणि त्या अडथळ्यांवर जोसेफ यांनी केलेली मात, याचाही उल्लेख या पुस्तकात आला आहे. त्यांच्या कामाच्या संदर्भातील जे जे उल्लेख या पुस्तकात आले आहेत, त्यावरून एकच गोष्ट लक्षात येते, की घरातून काम करताना ते कुठेही ढेपाळत नाहीत. उलट त्यांचा कामाचा वेग वाढलेला आहे. घरातून काम करताना कोणत्या गोष्टींची दक्षता घ्यावी, घरातून काम करतानाही आपल्या सहकाऱ्याशी कसं जोडलेलं रहावं, याबद्दलही ते सांगतात. प्रगत तंत्रज्ञानामुळे जगभरातील लोकांशी बसल्या जागी संपर्क साधून काम कसं करता येऊ शकतं, हे या पुस्तकावरून समजतं. घरातून काम करतानाही ऑफिसइतक्याच कार्यक्षमतेने काम केलं पाहिजे, असा मूलमंत्रही या पुस्तकातून मिळतो. या पुस्तकाच्या शेवटी जेम्स यांनी घरातून काम करायची इच्छा असेल तर कोणत्या गोष्टी तपासून घ्याव्यात याचं मार्गदर्शन केलं आहे. एकूणच, घरातून काम करतानाचं तुमचं व्यावसायिक जीवन आणि कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक जीवन कसं असतं, याचं अगदी साध्या, सोप्या भाषेत निवेदन या पुस्तकात केलं आहे. मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्याना (विशेषत: मॅनेजर लेव्हलच्या) अशी घरातून काम करण्याची सोय उपलब्ध करून दिली, तर परदेशस्थ भारतीय परत भारतात येऊ शकतात, अशी सूचनाही जोसेफ यांनी केली आहे. जोसेफ यांनी या पुस्तकात सुरुवातीला नमूद केलं आहे, ‘मोठा मासा बनून मोठ्या जलाशयात राहणं आणि लहान मासा बनून लहान तलावात राहणं, या दोन्ही गोष्टी मनाला सारखंचसमाधान देतात. पहिली गोष्ट आपल्या व्यावसायिक बुद्धीला आव्हान देऊन संतुष्ट करते आणि दुसरी गोष्ट आपल्या भावनाप्रधान मनाला संतुष्ट करते.’ या दोन्ही गोष्टींचा उत्तम समन्वय जेम्स यांनी साधला आहे आणि त्यांच्यासारखं काम करणाऱ्यांसाठी ते एक उदाहरण आहेत. साधी, सोपी आणि ओघवती भाषा हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य ठरावं. अर्थातच त्याचं श्रेय जेम्स यांच्याबरोबर सुनीता कट्टी यांनाही द्यायला हवं. तेव्हा घरातून काम करण्याच्या या प्रसन्न अनुभवाचे साक्षीदार व्हायला सगळ्यांना नक्कीच आवडेल ज्यांना घरातून काम करायची इच्छा आहे त्यांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. ...Read more

  • Rating Starसकाळ २९.०७.२०१८

    केरळमधल्या खेड्यातून मायक्रोसॉफ्टच राष्ट्रीय पातळीवरचं काम करणाऱ्या जेम्स जोसेफ या अवलियानं त्याची कहाणी या पुस्तकात मांडली आहे. `वर्क फ्रॉम होम` हि कल्पना हळूहळू रुजत असताना जॅम्सनं केरळमधल्या खेडेवजा शहरात जाण्याचा निर्णय घेतला. वेगवेगळे अडथळे पार ाडत त्यानं तिथून काम केलं. त्या सगळ्या अनुभवांविषयी त्यानं लिहिलं आहे. दोन भिन्न गोष्टी अशा प्रकारे सांधत असताना उध्दभवणाऱ्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं याबाबत काही कानमंत्रही त्यानं दिले आहेत. विशेषतः माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत असलेल्याना पुस्तक रंजक वाटेल. ...Read more

  • Rating StarSHABDARUCHI - JULY 2018

    व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनाचा समतोल साधण्यासाठी मार्गदर्शन करणारं पुस्तक... नोकरी करणाऱ्या, विशेषत: मोठ्या पदावर नोकरी करणाऱ्या लोकांचा बराचसा वेळ ऑफिसच्या कामात जातो. त्यात ऑफिसमध्ये जाणं आणि परत घरी येणं या वेळेचाही समावेश असतो. ऑफिस घरापासून लाब असेल, तर जाण्या-येण्यात माणूस दमून जातो. त्याला कुटुंबासाठी वेळ देता येत नाही. तो अन्य कोणत्या गोष्टींचा आस्वाद घेऊ शकत नाही; पण घरात बसून जागतिक दर्जाच्या कंपनीबरोबरही किती सहजपणे काम करता येतं, याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे जेम्स जोसेफ यांचं ‘गॉड्स ओन ऑफिस’ हे पुस्तक. ‘देवाजीचं ऑफिस’ या शीर्षकासह त्याचा अनुवाद केला आहे सुनीता कट्टी यांनी. जेम्स यांना पाच भावंडं. ते सहावे. ते दोन वर्षाचे असताना त्यांच्या आईला कॅन्सर झाला आणि त्याच वेळेला वडिलांना अपघात होऊन ते कोमात गेले; पण तीन महिन्यांनंतर ते कोमातून बाहेर आले. जेम्स यांच्या आईचं मात्र निधन झालं. आईच्या निधनानंतर त्यांच्या वडिलांनी सहाही मुलांना वसतिगृहात ठेवलं. जेम्सच्या आईच्या माहेरच्या नातेवाईकांनी या सहाही भावंडांना भक्कम मानसिक आधार दिला. जेम्स इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होते तेव्हा त्यांच्या वडिलांना परत अपघात झाला आणि ते कोमात गेले; मात्र या वेळेला ते कोमातून बाहेर येऊ शकले नाहीत. त्यांचा मृत्यू झाला. जेम्सची आणि त्यांच्या पत्नीची ओळख कशी झाली आणि त्यांचं लग्न कसं झालं, याबद्दलही त्यांनी लिहिलं आहे. आपल्या मुलींबद्दलही ते बोलतात. एकूण त्यांचं विवाहपूर्व जीवन असो किंवा विवाहानंतरचं, त्यांच्या कुटुंबाशी असलेले त्यांचे घट्ट स्नेहबंध जाणवत राहतात. आपल्या गावाविषयीची, तेथील लोकांविषयीची त्यांची आपुलकी लक्षात येते. जेम्स यांनी या पुस्तकाद्वारे स्वत:चे अनुभव लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. इंग्लंडसारख्या ठिकाणी शिक्षण घेऊन, इंग्लंड, अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये चांगल्या कंपनीत उच्च पदावर काम केल्यानंतर जोसेफ यांना भारतात केरळमध्ये आपल्या मूळ गावी परतावे, असे वाटू लागले. म्हणून त्यांनी त्यासाठी काय पूर्वतयारी केली, आपल्या छोट्याशा गावातून त्यांनी काम कसे सुरू केले, त्यात येणाऱ्या अडचणी गृहीत धरून त्यावर मात करण्यासाठी काय उपाययोजना केल्या, त्यांच्या निसर्गसंपन्न गावातील त्यांचं दैनंदिन, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक जीवन कसं आहे इ. बाबींचं निवेदन जोसेफ यांनी या पुस्तकातून केलं आहे. हे पुस्तक म्हणजे तंत्रज्ञानाच्या युगात स्वत:चं भावविश्व कसं जपावं आणि ते व्यापक कसं करावं, याचंही जाता जाता मार्गदर्शन करून जातं. जोसेफ यांची पत्नी डॉक्टर आहे. त्यामुळे तिला व्यवसायाबरोबरच सेवाभावही जपता येतो. त्यांच्या पत्नीची डॉक्टरीची पदवी परदेशातील असल्यामुळे भारतात प्रॅक्टिस सुरू करण्यात तिला आलेले अडथळे आणि त्या अडथळ्यांवर जोसेफ यांनी केलेली मात, याचाही उल्लेख या पुस्तकात आला आहे. त्यांच्या कामाच्या संदर्भातील जे जे उल्लेख या पुस्तकात आले आहेत, त्यावरून एकच गोष्ट लक्षात येते, की घरातून काम करताना ते कुठेही ढेपाळत नाहीत. उलट त्यांचा कामाचा वेग वाढलेला आहे. घरातून काम करताना कोणत्या गोष्टींची दक्षता घ्यावी, घरातून काम करतानाही आपल्या सहकाऱ्याशी कसं जोडलेलं रहावं, याबद्दलही ते सांगतात. प्रगत तंत्रज्ञानामुळे जगभरातील लोकांशी बसल्या जागी संपर्क साधून काम कसं करता येऊ शकतं, हे या पुस्तकावरून समजतं. घरातून काम करतानाही ऑफिसइतक्याच कार्यक्षमतेने काम केलं पाहिजे, असा मूलमंत्रही या पुस्तकातून मिळतो. या पुस्तकाच्या शेवटी जेम्स यांनी घरातून काम करायची इच्छा असेल तर कोणत्या गोष्टी तपासून घ्याव्यात याचं मार्गदर्शन केलं आहे. एकूणच, घरातून काम करतानाचं तुमचं व्यावसायिक जीवन आणि कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक जीवन कसं असतं, याचं अगदी साध्या, सोप्या भाषेत निवेदन या पुस्तकात केलं आहे. मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्याना (विशेषत: मॅनेजर लेव्हलच्या) अशी घरातून काम करण्याची सोय उपलब्ध करून दिली, तर परदेशस्थ भारतीय परत भारतात येऊ शकतात, अशी सूचनाही जोसेफ यांनी केली आहे. जोसेफ यांनी या पुस्तकात सुरुवातीला नमूद केलं आहे, ‘मोठा मासा बनून मोठ्या जलाशयात राहणं आणि लहान मासा बनून लहान तलावात राहणं, या दोन्ही गोष्टी मनाला सारखंच समाधान देतात. पहिली गोष्ट आपल्या व्यावसायिक बुद्धीला आव्हान देऊन संतुष्ट करते आणि दुसरी गोष्ट आपल्या भावनाप्रधान मनाला संतुष्ट करते.’ या दोन्ही गोष्टींचा उत्तम समन्वय जेम्स यांनी साधला आहे आणि त्यांच्यासारखं काम करणाऱ्यांसाठी ते एक उदाहरण आहेत. साधी, सोपी आणि ओघवती भाषा हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य ठरावं. अर्थातच त्याचं श्रेय जेम्स यांच्याबरोबर सुनीता कट्टी यांनाही द्यायला हवं. तेव्हा घरातून काम करण्याच्या या प्रसन्न अनुभवाचे साक्षीदार व्हायला सगळ्यांना नक्कीच आवडेल ज्यांना घरातून काम करायची इच्छा आहे त्यांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. –अंजली पटवर्धन ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more