* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BARBALA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177669626
  • Edition : 3
  • Publishing Year : APRIL 2008
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 252
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
I NEVER THOUGHT OF MYSELF AS A PROSTITUTE. THERE WAS A CORNER IN MY MIND, WHERE I HAD INSTALLED MY OWN IMAGE, WHICH WAS VERY PURE, UNTOUCHED. IT WAS THE IMAGE OF AN ARTIST. I ALWAYS WANTED TO CHERISH IT, TAKE CARE OF IT. WAS IT POSSIBLE? OUTWARDLY, EVERYONE WAS TRYING TO TAKE ADVANTAGE OF MY SITUATION. THE MALE MEMBERS ALWAYS SEEM TO GET THE SIGNAL THAT I AM AN EASY TARGET AND CAN BE CRUSHED BY ANYBODY, ANYHOW. WHAT WORST WAS YET GOING TO HAPPEN TO ME NOW? NOTHING HAD GONE RIGHT. EVERYTHING HAD GONE WRONG. ALL WRONG DEEDS HAVE ALREADY BEEN DONE. THE WORST HAD ALREADY HAPPENED IN MY CASE. BUT I WAS PREPARED FOR EVERYTHING. I DID NOT WANT TO COMPROMISE WITH THE HUNGER MY CHILDREN WOULD SUFFER FROM. I WANTED IT NOWHERE IN MY SIGHT. I WANTED A GOOD LIFE FOR MY CHILDREN. NO, I WAS NOT PLANNING VERY BIG EVENTS OR CAREERS FOR THEM. MY EXPECTATIONS WERE VERY MEAGER, STILL HOW MUCH WOULD I LIVE? AND, HOW WOULD I LIVE?
मी स्वत:ला वेश्या समजत नव्हते. माझ्या मनाच्या कोप-यात मी स्वत:ची एक प्रतिमा हळुवार जपली होती. बाहेरून मला कोणीही ओरबाडलं, रक्तबंबाळ केलं तरी त्या प्रतिमेला मी प्राणपणाने जपणार होते. ती प्रतिमा एका कलाकाराची होती. मनस्वी कलाकाराची. पण मला हे जमणार होतं का? पुरुषांना जणू माझा वास यायचा, की ही अशी बाई आहे, जिला आपण चिरडू शकतो, वापरू शकतो. माझ्याबाबत घडूनघडून काय घडणार होतं? काय घडायचं राहिलं होतं? जे काय घडायचं ते घडो; पण मला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत नको होती. मुलांच्या आयुष्याची नासाडी नको होती. अपेक्षा खूप मोठ्या नव्हत्या पण जे आयुष्य होतं तसंच सुरू राहिलं असतं तर मी किती काळ जिवंत राहू शकले असते? कशा अवस्थेत जिवंत राहू शकले असते?
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VAISHALIHALDANKAR #वैशालीहळदणकर #BARBALA #बारबाला #AUTOBIOGRAPHY"
Customer Reviews
  • Rating StarAvinash Pandit

    हे पुस्तक २००६ साली मी संपादित केले. १४०० पानांचे हस्तलिखित होते. त्यातील त्यावेळी न्यायप्रविष्ट असलेला भाग, अशिष्ट भाषा, व्यक्तींची नांवे, भडक प्रसंग वगळून मी ते २५० पानांपर्यंत आणले. मला ज्या ठिकाणी शंका होत्या त्याचे निरसन वर्षाने योग्य ठिकाणी चौकी करून केले. वर्षाने उत्तम प्रास्ताविक लिहिले. टाईम्स हाऊसमध्ये झालेल्या प्रकाशन समारंभात या पुस्तकाचे चूक कोणाची इ. न सांगता वक्त्यांनी योग्य मूल्यमापन केले. माझ्याकरता सांगायचे तर एक दाहक सामाजिक समस्या सांंगणारा दस्तऐवज प्रकाशित करण्यात माझा खारीचा वाटा होता. मी हस्तलिखित वाचायला सुरुवात केली तेव्हा तो शिव्यांचा शब्दकोश आहे, कामसूत्र आहे की बारबालेची गोष्ट आहे तेच कळेना. पत्नीच्या सूचनेवरून काळा मार्कर आणून बरबटलेला मजकूर काळा केला जेणे करून तो वाचता येणार नाही. सुनील मेहतांनी मला संपादन करायला पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. पुस्तक वाचल्यावर वैशालीने आपण चुकलो हे कबूल केले. जवळजवळ ३० बारबालांनी आमचे पुस्तक तुम्ही करा असा आग्रह धरला. संवेदनशील विषय कसा हाताळायचा हे मी शिकलो. माझ्या या प्लस पॉईंट्समध्ये भर पडली म्हणजे या विषयावरील वर्षाच्या व्याख्यानावेळी वहिनी, भावजी आणि पैठणी यात रमणारे कार्यक्रम सोडून व्याख्यानाला मोठ्या संख्येने आले. ...Read more

  • Rating StarSuhas Birhade

    बारबालेचं आत्मचरित्र- बारच्या झगमगाटीमागील धगधगीत वास्तव ``कुणी स्वखुशीने वेश्याव्यवसाय किंवा बारबाला बनत नाही`` हे आपण नेहमी ऐकतो. मग असं काय घडतं की मुली या अनैतिक व्यवसायाकडे वळतात. या प्रश्नाचे उत्तर खुद्द बारबाला असलेल्या वैशाली हळदणकरच्या आत्मरित्रातील मिळतं आणि बारच्या झगमगाटामागिल विदारक वास्तव उघड होतं. कलावंत वडील, अभिजन वर्गातील आई अशी पार्श्वभूमी असलेली मुलगी का बारबाला बनते, काय आय़ुष्यात घडतं ते पुस्तकात वाचायला मिळतं. अविश्वसनीय वाटावे असे प्रसंग एकामोगामाग एक उलगडत जातात. सिंगर पासून नबारबाला ते फ्री सर्व्हिस असा वैशालीचा प्रवास तिने प्रामाणिकपणे आणि उलगडला आहे. बारबालांवर अनेक सिनेमे, पुस्तकं आहेत. परंतु बारबालेचं आत्मचरित्र दुर्मिळच. बारबालांच जीवन कसं असतं, त्यांना कुठल्या कुठल्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं ते आत्मचरित्रातून कळतं. बारसंस्कृतीची इत्यंभूत माहितीही वाचकांना होते. वैशाली हळदणकराचं आयुष्य शोकांतिकाच. आत्मचरित्रात अनेक गोष्टी दडवलेल्या असतात. परंतु वैशालीने अगदी बेधडक सर्व काही लिहिलंय. पुरूषी मानसिकता, ढोंगी समाज दिसून येतो. अनेकदा अंगावर काटा यावा असे हे प्रसंग वाचायला मिळतात. मुंबईसह परदेशातील डान्सबार मध्ये वैशालीने काम केलं. तिच्या आय़ुष्यात आलेले पुरूष, तिच्यावर झालेले लैंगिक अत्याचार याची तिने कसलीही भीडभाड न बाळगता माहिती दिलेली आहे. वैशालीचं आत्मचरित्र तिचं असलं तरी ते बारबालांच्या जीवनावचा पट प्रातिनिधिक स्वरूपात उलगडतो. बारबालांची संघटना बांधणाऱ्या वर्षा काळे यांनी वैशालीला आत्मचरित्र लिहिण्यास प्रवृत्त केलं आणि एक माहितीपुर्ण दस्तावेज पुस्तकाच्या रुपात वाचकांना उपलब्ध झाला आहे. ...Read more

  • Rating StarManisha Rohit Joshi

    Khup sundar pustak ahe.. Must read..

  • Rating StarAtmaram Godbole

    वेगळ्या विश्वाची ओळख ...

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book