* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DWIKHANDITO
  • Availability : Available
  • Translators : VILAS GITYE
  • ISBN : 9789386342065
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 516
  • Language : Translated From BENGALI to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
  • Available in Combos :TASLIMA NASREEN COMBO SET - 13 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DWIKHANDIT IS A THIRD PART OF BANGLADESHI AUTHOR TASLIMA NASREEN’S MEMOIR. IT CONTAINS MAINLY HER LIFE IN THIRTY’S & EXPERIENCES SHE HAD AS AN AUTHOR & DOCTOR. TASLIMA NASREEN’S LIFE IS FULL OF CONTROVERSIES, SUFFERING & BATTLE FOR RIGHTS. SHE PUTS HER MEMORIES IN WORDS IN HER MEMOIR. THIS BOOK NOT ONLY TALKS ABOUT TASLIMA’S LIFE, BUT IT PORTRAITS SITUATION OF WOMEN IN ISLAM.
तसलिमा नासरिन या मूळ बांगलादेशी लेखिकेच्या आत्मचरित्राचा तिसरा भाग ‘द्विखंडित.’ या भागात तसलिमांच्या सत्तावीस ते तीस वर्षांपर्यंतच्या वयाची कहाणी आहे. एक साहित्यिक व डॉक्टर म्हणून त्यांना आलेले अनुभव त्यांनी या भागात सांगितले आहेत. चांगल्या अनुभवांबरोबर आलेले वाईट अनुभवही त्यांनी खूपच स्पष्टपणे मांडले आहेत. त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य असणारा सडेतोड व स्पष्टपणा आत्मचरित्र वाचताना जागोजागी जाणवत राहतो. त्यांचे लेखन, त्यात आलेले अडथळे, कौटुंबिक वातावरण, लेखनाला झालेला विरोध, समर्थन, पुरस्काराचे राजकारण त्यांच्या लेखनाचे नेत्यांनी केलेले राजकारण सनातनी समाजातून होणारी टीका अशा सर्व अनुभवांतून जात असताना त्यांची मानसिक स्थिती त्यांनी मांडली आहे. त्यांना स्त्रियांच्या दुरवस्थेविषयी वाटणारी आस्था, त्यातून त्यांनी स्त्रीस्वातंत्र्यासाठी केलेले लिखाण, इस्लामवर त्यांनी बेधडकपणे केलेली टीका यामुळे बांगलादेशात त्यांच्याविरुद्ध वातावरण निर्माण झाले. त्यांच्या पुस्तकांवर बंदी, निषेध, मोर्चे... अगदी त्यांचे शिर उडवण्यासाठी इनामही घोषित करण्यात आले; परंतु त्यांनी आपले लिखाण मात्र सुरूच ठेवले. रुग्णसेवा कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडत राहिल्या. जीवनाकडून त्यांच्या असणाऱ्या अपेक्षा, स्वप्न यांच्या पूर्तीसाठी प्रयत्नशील राहिल्या. वैयक्तिक व वैचारिक स्वातंत्र्याला मान देणाऱ्या तसलिमा नासरिन यांचे आत्मचरित्र वाचकाला प्रत्येक पान वाचण्यासाठी उत्सुक करते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
TASLIMA NASREEN #BANGLADESH #NATIONAL RELIGION #ISLAM #YASMIN #DHAKA #SHANTI NIKETAN #LFTAAR PARTY #AANAND BAZAR #PATRIKA #SAKAL KAVITA PARISHAD #AVAKASH NIRVACHIT KALAM, GOLLA CHOOT, COULARA, VILAS GEETE
Customer Reviews
  • Rating StarSAPTAHIK SAKAL 02-09-2017

    लेखिकेची संघर्षकथा... बांगलादेशातील महिलांच्या प्रश्नांसाठी आवाज उठविणाऱ्या, त्यासाठी प्रसंगी धर्माच्या विरोधात लेखन करणाऱ्या, त्यातून मूलतत्त्ववादी तसेच सरकारचा रोष ओढवून घेऊन अनेक जीवघेण्या संकटांना सामोरे गेलेल्या प्रसिद्ध, पण वादग्रस्त लेखिका तसलिमा नसरीन यांनी आपल्या सत्तावीस ते तीस वर्षे वयापर्यंतच्या आयुष्यातील घडामोडी ‘द्विखंडीत’ या पुस्तकात शब्दबद्ध केल्या आहेत. त्यांच्या ‘अमार मेयेबेला’ या आत्मकथनाचा हा तिसरा भाग आहे. विलास गीते यांनी त्याचा अनुवाद केला आहे. धर्मविरोधी, पुरुषद्वेष्टी अशी संभावना करत तस्लिमा यांच्याविरोधात बांगला देशात जी आंदोलने झाली, जो विरोध झाला, त्याचे सविस्तर वर्णन पुस्तकात आहे. त्यांच्या विरोधात निघालेले मोर्चे, दैनिके, नियतकालिकांमधून त्यांच्याविरोधात प्रसिद्ध झालेले लेख, मशिदीत नमाजानंतर त्यांना होणारी शिवीगाळ, त्यांचा खून करण्याचा निघालेला फतवा या साऱ्याला तोंड देत तस्लिमा कणखरपणे उभ्या राहिल्या. अर्थात काही साहित्यिकांनी, वृत्तपत्रांनी त्यांची बाजू उचलून धरली, पण तरीही देशभरातून होणारा विरोध प्रखर होता. या साऱ्या कालखंडात त्यांच्या खासगी जीवनातही अनेक घडामोडी घडल्या. त्यांच्या धर्मविरोधी लेखनाला तसेच मुक्त जगण्याला वडिलांचा मोठा विरोध होता. त्यातून तस्लिमा स्वतंत्र राहू लागल्या. वडील आणि त्या यांच्यामध्ये आईची होणारी फरपट, बहीण यास्मीन हिचे रवींद्र संगीताचे वेड, वडिलांचा रोष सहन न झाल्याने तिचे घर सोडून जाणे, तिने तडकाफडकी केलेले लग्न, पहिला पती रुद्र याच्याशी घटस्फोट घेतल्यानंतरही तस्लिमा यांना त्याच्याविषयी वाटणारे प्रेम, ममत्व, त्याच्या कवितांविषयीचा आदर, रुद्रचा मृत्यू, रुद्रनंतर त्यांच्या आयुष्यात आलेले पुरुष आणि त्यांच्याशी असलेले नाते, या विषयी लेखिकेने मोकळेपणाने कथन केले आहे. सांस्कृतिक उपक्रम, साहित्यिक गप्पा, कवी संमेलने, पुस्तकजत्रा यांच्या वर्णनांमधून लेखिकेने बांगलादेशातील साहित्य विश्वाची सफरही घडवून आणली आहे. हे पुस्तक केवळ आत्मकथन नाही तर त्या काळातील बांगला देशातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे चित्रणही यात वाचायला मिळते. -नयना निर्गुण ...Read more

  • Rating StarShabdruchee May 2017

    अस्वस्थ समाजाचा जाहीरनामा... तसलिमा नासरीन बांगलादेशी कादंबरीकार, स्तंभलेखक, कवी आणि स्त्रीवादाच्या ठाम पुरस्कर्त्या. द्विखंडित हे नासरीन यांच्या आत्मकथन मालिकेतील तिसरं पुस्तक. आमार मेयेबेला आणि उधाण वारानंतरचा हा भाग. नासरिन यांनी 1994 मध्ये बांलादेश सोडलं . मुलतत्ववादाला कडाडून विरोध आणि मानवतावादाच्या पुरस्कारानं तसलिमा यांचं नाव जागतिक पातळीवर गाजलं. पण या प्रसिद्धीच्या मागे तीव्र संघर्षाची पार्श्वभूमी आहे. जिचा प्रत्यय द्विखंडित वाचताना येतो. या आत्मकथनात नासरिन यांच्या सामाजिक जीवनसोबत कौटुंबिक भोवताल आणि मित्रपरिवाराच्या गोष्टीही भेटतात. शिप्रा सारख्या मैत्रिणीचं जगणं असो की सुहृदयचं आयुष्य असो, त्यांच्या जीवनाची मांडणी करतानाही नासरिना बांगलादेशातील जीवनाचे निरनिराळे पैलू मांडतात. स्वतःच्या आयुष्याचा आलेख मांडताना त्यांचं समाजभान कुठेही हरवत नाही. बांगलादेशातील समाजजीवनाचं वास्तव दर्शन द्विखंडितच्या पानापानातून स्पष्ट होतं. पहिल्याच प्रकरणात इथल्या कुटुंब नियोजनाच्या प्रक्रियेचं अस्वस्थ करणारं चित्रण दिसतं. यात कुटुंब नियोजनाविषयीची इस्लाममधली मानसिकता स्पष्ट होतेच. पण गरिबीच्या शहारे आणणाऱ्या व्यथाही दिसतात. निव्वळ थोड्या चिल्लर पैशासाठी आपलं मातृत्व पणाला लावणाऱ्या बायकांचं चित्रण हेलावून सोडते. त्या लिहितात. ‘एक हलक्या दर्जाची सुती साडी आणि एकशेवीस रुपयांसाठी त्यांची आयुष्यभर निःसंतान राहण्याची तयारी असते. मला समजली माझ्या देशाची गरिबी. मी शहारले. मी रडले.’ जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टींचं गहिरं आकलनही तसलिमा मांडतात. त्यांच्या आयुष्यातली संवेदनशील माणसं आणि त्यांचा मनोव्यापारही प्रत्ययाला येतो. नासरिन यांच्या देहात मुरलेली कवितेवरची श्रद्धा ‘तुला करु शकत नाही स्पर्श’ सारख्या प्रकरणात तीव्रतेनं व्यक्त होते. रुद्रच्या कवितांचे दाखले देताना नासरिन स्वतःच्या भावनांनाही नकळत वाट मोकळी करुन देतात. पण तसलिमांमधली कवियित्रीही यातल्या शब्दा-शब्दातून आपणास भेटते. त्यांच्या गद्यलेखनाच्या कथनशैलीतही कवितेचा प्रवाह अनुभवास येतो. रुद्रविषयी लिहिताना त्या स्वतःच्या आयुष्याकडे तटस्थपणे पाहतात. ते निरिक्षण त्या तितक्याच काव्यात्म पद्धतीनं रेखाटतात. त्या म्हणतात... रुद्रबरोबरच्या सुंदर सहजीवनाचं जे रम्य स्वप्न मी पाहिलं होतं, त्या स्वप्नाची राख माझ्या सर्वांगाला चिकटून राहिली होती. रुद्रबरोबर जीवन व्यतीत करणं शक्य नाही हे मला समजलं होतं, आम्ही आता एकमेकांकडे पाठ करून उभे आहोत हे मला उमजलं होतं. आता ती सारी राख, धूळ, काजळी धुऊन टाकून स्वच्छ व्हायला हवं हेसुद्धा कळत होतं. तरीही काळ जातच राहिला. दिवस भकास उन्हात भाजत राहिले, जळत राहिले, रात्री अंधारात नागिणीसारख्या फूत्कारत राहिल्या आणि मी स्वतःला घेऊन अंगणातल्या अडगळीसारखी बसून राहिले. या जीवनाला घेऊन नक्की कुठं जावं, कुठं गेल्यावर ‘नाही-नाही’ म्हणणारा भणाण वारा माझ्या दिशेनं वेड्यासारखा झपाटत येणार नाही, हे काही समजत नव्हतं. जीवन कधी फुलासारखं, तर कधी दगडासारखं वाटे. हे जीवन कधी माझ्या मानेवर येऊन बसलं मला समजलंच नाही. माझी मान, पाठ या जीवनाच्याच भारामुळे वाकून गेली. या जीवनाला मी नीट ओळखत नव्हते, हे जीवन माझंच होतं; पण माझं नव्हतं. यात जे काही पाणी होतं ते मी अनेक वर्षांपासून दुस-याच्या ओंजळीत ओतून दिलं, स्वतःच्या तहानेचा विचार क्षणभरही माझ्या मनात आला नाही. द्विखंडित वाचताना एका स्त्रीचा व्यक्ती ते समाजजीवन असा पटच उलगडत जातो. तीव्र संवेदनशीलता, तितकचं गहिरं समाजभान यात प्रतिबिंबीत होतं. देश, समाज आणि स्वतःचं जगणं यांची सांगड घालताना गोंधळणाऱ्या प्रत्येकानं हे पुस्तक वाचायला हवं. तसलिमांच्या आयुष्यातील अनेक घटना या पुस्तकात साहित्यरुपात अवतरतात. या घटना निव्वळ एका स्त्रिच्या आयुष्यातील सर्वसामान्य घटना नाहीत. तर महिलांबाबत राबवण्यात येणारी धोरणं, त्यांच्या सुरक्षिततेविषयीची अनास्था अशा अनेक अनुषंगिक संदर्भातून मांडण्यात आलेला तो एका सामाजिक व्यवस्थेच्या निर्दयीपणाचा दस्तावेज वाटतो. द्विखंडितमधील प्रकरणाची नावंही तसलिमांच्या वादळी जीवनाची जाणीव देतात. ‘पारलैकिक गाजर’, ‘आम्ही अशाच वाहत जातो’, ‘गोल्लाछूटचा खेळ’, ‘पासपोर्ट जप्त’, ‘मानवरुपी सैतान’आणि ‘फतवा’सारखी प्रकरणे नासरीन यांनी अनुभवलेल्या संघर्षाचं इंत्यभूत चित्रण करतात. हे चित्रण अंगावर शहारे आणतं. अस्वस्थ करतं. अंतर्मूख करतं. आणि तथाकथित सामाजिक जडणघडणीबाबत नवे प्रश्नही उपस्थित करतं. या पुस्तकाच्या निमित्ताने मराठी वाचकांना स्त्रीवादी साहित्याच्या नव्या धाटणीचाही परिचय होईल, असा अनुवाद विलास गीते यांनी केला आहे. जागतिक पातळीवरील स्त्रीवादी साहित्यातील महत्त्वाचा दस्तावेज असणारे हे पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊसने मराठीत अनुवादित करुन मराठी वाचकांना मोठा ठेवा दिला आहे. एका मध्यमवर्गीय घरातील एका साधारण युवतीने कशा प्रकारे अनेक अडचणींना, संकटांना तोंड देत आपल्या आत्मशक्तीचा शोध लावला व ती अप्रतिम तसलिमा नासरिन बनली हे ‘द्विखंडित’ या पुस्तकात दिसते, हीच या पुस्तकाबाबतची महत्त्वाची गोष्ट आहे. या पुस्तकाचे ऐतिहासिक आणि सामाजिक मूल्य खूप आहे. केवळ विषयाच्या महत्त्वामुळेच नव्हे, तर प्रसादगुणानेही आत्मकथेच्या या भागाला आकर्षक आणि वाचनीय केले आहे... ‘द्विखंडित’ एकाच वेळी साहित्य, एका असामान्य महिलेची कहाणी व एक देश आणि समाज यांच्यामधल्या वादळाची कहाणी आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 07-05-2017

    तसलिमा नासरिन यांच्या आत्मचरित्राच्या तिसऱ्या भागाचा हा अनुवाद. तसलिमा यांनी वय वर्षं २७ ते ३० या काळातल्या घटना - घडामोडींवर लिहिलं आहे. त्यांच्या स्त्रीवादी लेखनाला आलेला वेग, त्यांचं स्तंभलेखन, कवितालेखन, कादंबरीलेखन आदी गोष्टींविषयी त्यांनी लिहिल आहे. ‘निर्बाचित कलाम’ हे पुस्तक आणि ‘लज्जा’ ही कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर बांगलादेशामध्ये तयार झालेलं वातावरण, इतर साहित्यिकांची त्यांच्याबद्दलची मतं, वेगवेगळे वाद, त्या त्या वेळच्या भावना अशा सर्व गोष्टींवर तसलिमा यांनी स्पष्टपणानं लिहिलं आहे. तत्कालीन घडामोडी त्या मांडत असतानाच एक साहित्यिक आणि व्यक्तिमत्त्व घडत जाण्याची प्रक्रियाही त्यातून उलगडत जाते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more