NEETA GADRE

About Author


FIRST AMONG LADY CANDIDATES IN GRADUATION EXAM AND THIRD IN SHIVAJI UNIVERSITY. M.A. IN SANSKRIT. (PUNE UNIVERSITY) B.J. (BACHELOR OF JOURNALISM) (PUNE UNIVERSITY) STORIES WRITTEN IN DIWALI ISSUES AND MANY POPULAR MAGAZINES. SERVED ON ALL INDIA RADIO FOR 32 YEARS. RETIRED AS PROGRAMME EXECUTIVE FROM MUMBAI AAKASHWANI IN 2009 WRITTEN AND PRESENTED MORE THAN 50 RADIO PLAYS AND FEATURES WON AAKASHWANI AWARD TWICE WROTE MORE THAN 150 STORIES PUBLISHED MORE THAN 13 BOOKS. THIRD EDITION OF MY BOOK ‘EKA SHWASACHE ANTAR’ IS PUBLISHED FORU UNIVERSITY PRIZES ACHIEVED IN M.A. B.A. AND B.J. TWO STAGE PLAYS PRESENTED ON THE STAGES MY STAGE PLAY ‘KHEL’ GOT ‘BEST SCRIPT PRIZE OF STATE GOVERNMENT OF MAHARASHTRA. MY FOUR BOOKS GOT BEST BOOK OF THE YEAR PRIZE INTERVIEWED MANY CELEBRITIES ON THE STAGE

पदवी परीक्षेत शिवाजी विद्यापीठात मुलींमध्ये सर्वप्रथम आणि विद्यापीठात तिसर्‍या क्रमांकावर येण्याचा मान. संस्कृत विषय घेऊन एम. ए. (पुणे विद्यापीठ) पत्रकारिता पदवीधारक (पुणे विद्यापीठ) विविध दिवाळी अंकांतून आणि अनेक लोकप्रिय मासिकातून सातत्याने लेखन. आकाशवाणीवर बत्तीस वर्ष नोकरी, मुंबई आकाशवाणीवरून कार्यक्रम अधिकारी म्हणून २००९ साली निवृत्त पन्नासहून अधिक नभोनाट्यांचं आणि रूपकांचं लेखन आणि सादरीकरण आकाशवाणी वार्षिक पुरस्कार – हा अखिल भारतीय गौरव पुरस्कार आहे – दोनदा प्राप्त दीडशेहून अधिक कथांचे लेखन एकूण आजपर्यंत तेराहून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली. एका श्वासाचं अंतर पुस्तकाची तिसरी आवृत्ती निघाली. एम.ए. बी.ए. पर्यंत संस्कृत विषयात सर्वप्रथम आल्याबद्दल तीन पारितोषिके प्राप्त. पत्रकारिता पदवी परीक्षेत विद्यापीठाचे एक पारितोषक. दोन नाटके रंगभूमीवर आली. खेळ या नाटकाला १९९५ मधील सर्वोत्तम नाट्यसंहिता लेखनाचा महाराष्ट्र शासनाचा राज्यपुरस्कार. अथांग या कथासंग्रहाला २००१चा कै.काकासाहेब गाडगीळ पुरस्कार कवयत्री शांता शेळके यांच्या हस्ते प्राप्त. अथांग या कथेला १९९७ चा महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे चा दि. अ. शोनटक्के पुरस्कार संभव या कथासंग्रहाला २००६ चा सर्वोत्कृष्ट पुस्तकाचा श्री. ज. जोशी पुरस्कार. सध्या एका पोर्टलवर ऑनलाईन स्फुटलेखन करते. ७० लेख प्रकाशित. अनेक लोकप्रिय कलाकारांच्या रंगमंचावर प्रकट मुलाखती घेतल्या.
Sort by
Search by Discount
Show per page
Items 1 to 2 of 2 total
48 %
OFF
JUST MARRIED, PLEASE EXCUSE Rating Star
Add To Cart INR 250 INR 130
33 %
OFF
THE SILENT FILM Rating Star
Add To Cart INR 399 INR 267

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more