* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GOKARNICHI PHULE
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664928
  • Edition : 7
  • Publishing Year : JULY 1993
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 116
  • Language : MARATHI
  • Category : LITERATURE
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS BOOK HIGHLIGHTS 5 KNOWN FIGURES AND INCLUDES REVIEWS ON 3 TOPICS : 3 PERSONS OF THE 5 MENTIONED ABOVE ARE NOT VERY WELL KNOWN BUT THE QUALITIES THEY POSSESS ARE VERY EXCLUSIVE. THEY CAN BE COMPARED ONLY TO THE MEDICINAL PLANT FOUND IN FORESTS. THESE MEDICINAL PLANTS ARE NEITHER EASILY AVAILABLE NOR MUCH INFORMATION ABOUT THEM IS AT HAND. THEY ARE FOUND MOSTLY BY SHEER COINCIDENCE. BUT THOSE WHO ARE LUCKY ENOUGH TO FIND THEM ARE BLESSED BY THEIR QUALITIES. IN THE SAME WAY KHANDEKAR HAS BEEN INDEBTED BY SUCH CHARACTERS IN HIS REAL LIFE. KHANDEKAR SAYS "INDEED I AM VERY LUCKY TO HAVE THESE PERSONS IN MY LIFE. I AM TEMPTED TO SAY SO.` THE OTHER TWO SKETCHES ARE THAT OF WELL KNOWN CONTEMPORARY LITTERATEUR. THE REVIEWS INCLUDE THAT OF DRAMAS BY KOLHOTKAR, USHA PRABHA (STORIES BY SHRI MANJREKAR) AND MARATHI CHITRAKATHA. THESE ARE DETAILED LITERARY REVIEWS. WE ARE SURE THAT KHANDEKARS FAN CLUB WILL ENTHUSIASTICALLY WELCOME THIS COLLECTION.
श्री. वि. स. खांडेकरांच्या या पुस्तकात पाच व्यक्तिरेखा आणि तीन रसग्रहणे यांचा समावेश करण्यात आला आहे. या पाच व्यक्तींपैकी तीन जगाला तशा अज्ञात असल्या, तरी गुणांच्या दृष्टीने त्या मुळीच उपेक्षणीय नाहीत. या व्यक्तींची तुलना रानावनांत आढळणाऱ्या झाडपाल्यांच्या औषधांशीच करता येईल. ही औषधे तशी सहज उपलब्ध नसतात. त्यांच्याविषयी पुरेशी माहितीही हाताशी नसते; पण योगायोगाने ज्यांना ती लाभतात, त्यांना त्यांचे गुण अचूक पटल्याशिवाय राहत नाहीत. खांडेकरांच्या मनात या व्यक्तींविषयी केवळ कृतज्ञतेचीच भावना आहे. खांडेकरांच्याच शब्दात सांगायचे, तर `...ही माणसे मला भेटली, हे आपले मोठे भाग्य, असे म्हणण्याचा मोह मला अनिवार होतो.` उरलेली ना. सी. फडके आणि ग. त्र्यं. माडखोलकर या दोघां समकालीन साहित्यकारांची मनोज्ञ व्यक्तिचित्रे आहेत. पुस्तकाच्या उरलेल्या अध्र्या भागात `कोल्हटकरांची नाटके`, `उष:प्रभा ` (श्री. मांजरेकर यांचा कथासंग्रह) आणि `मराठी चित्रकथा ` ही तीन वाङ्मयीन आणि विस्तृत अशी गुणग्राहक रसग्रहणे समाविष्ट केली आहेत. श्री. खांडेकरांचे वाचक या संग्रहाचे उत्स्फूर्त स्वागत करतील अशी खात्री आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #गोकर्णीची फुले
Customer Reviews
  • Rating StarSushil Kale

    पुरुषाला माहेर असते का?तीन-चार वर्षापूर्वी या प्रशनाचे उत्तर देण्याऐवजी मी तो नुसता हसलो असतो. `बायकांना मिशा असतात का ? या वात्रट प्रश्नापेक्षा त्याची किंमत मी अधिक मानली नसती.पण आज? आज मला खरोखरच वाटते -पुरुषालाही माहेर असते.स्त्री कितीही प्रौढ झाल तरी तिला मधूनमधून जशी आपल्या माहेराची आठवण होते ,तश्या पुरुषालाही त्याच्या माहेरच्या मधुर स्मृती कधी हुरहुर लावीत असतात.या दोघांच्या माहेरात एक फरक आहे मात्र ! स्त्रीच्या माहेराच्या साऱ्या गॉड आठवणी बालपणाभोवती पिंगा घालीत असतात.उलट पुरुषाच्या माहेरच्या कल्पना त्याच्या ऐन तारुण्यातल्या काळाभोवती गुंगत राहतात. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    भावपूर्ण व्यक्तिचित्रांचा संग्रह... कै. वि. स. खांडेकर यांचे नाव माहीत नसलेला मराठी माणूस विरळाच! प्रस्तुत ‘गोकर्णीची फुले’ हा त्यांनी रेखाटलेल्या काही व्यक्तिचित्रांचा संग्रह. मी काही म्हटले याचे कारण, या पुस्तकात ५ व्यक्तिचित्रे असून ३ रसग्रहणात्म लेख आहेत. गोकर्णीची फुले ही कोठेतरी कोपऱ्यात फुलतात. त्यांना ना रस, ना गंध पण त्यांना रंग मात्र विविध असतात. चित्रविचित्र मयुरांनी उभारलेले पिसारे एकमेकांत मिसळून जावेत तसं ह्या गोकर्णीच्या फुलाचं रूप असतं. त्यांचा पांढारा, निळा, जांभळा असा संमिश्र रंग फार आकर्षक असतो. अशा प्रकारच्या सामान्य व्यक्ती त्यांना आयुष्यात भेटल्या. अशा गोकर्णीच्या फुलासारख्या व्यक्तींची चित्रे खांडेकरांनी या संग्रहात रेखाटली आहेत. या संग्रहात तीन सामान्य व्यक्तींची चित्रे वाचकाला वाचावयास मिळतील. अप्पा नाबर हे त्यातील पहिले व्यक्तिचित्र. शिरोडे हे खांडेकरांचे माहेर. आप्पा नाबर म्हणजे दुसरे तुकारामबुवाच. त्यांचे सर्व जीवन इतरांच्या करीता ते जगले. आप्पांना संतान नव्हते, पण शिरोड्यातील सर्व मुलांवर त्यांनी अपत्यवत प्रेम केले. खांडेकरांनाही त्यांच्यामुळे दिशा गवसली. शिक्षण व सामाजिक कार्यास त्यांनी वाहून घेतले होते. सामान्यातील असामान्यत्व. खांडेकरांनी बरोबर टिपले आहे. उत्कट भावना हा आप्पा नाबरांच्या आयुष्याचा आत्मा होता. आज आप्पा ह्या जगात नाहीत म्हणून लेखकाने खंत व्यक्त केली आहे. दुसरे व्यक्तिचित्र आहे सावंतवाडीच्या पंगु बाळकृष्ण कुडाळकरांचे. शरीराने पंगु पण हसत खेळत मृत्यूशी झुंज देणारे. अशिक्षित पण विलक्षण साहित्यप्रेमी. मनाने निकोप, लढाऊ वृत्तीचे, आशावादी व समाजाशी समरस होणारे हे व्यक्तिमत्त्व खांडेकरांच्या सदैव स्मृतीत राहणारे. तिसरे व्यक्तिचित्र आहे स्वत:च्या सावत्र आईचे. खांडेकर हे आपल्या काकांच्या मांडीवर दत्तक गेलेले होते. त्यांच्या ह्या दत्तक (सावत्र) आईने त्यांच्यावर अथांग वात्सल्याने प्रेम केले. अशी ही तीन गोकर्णीची फुले. ह्या संग्रहात सुप्रसिद्ध कादंबरीकार प्रा. ना. सी. फडके व टीकाकार ग. त्र्यं. माडखोलकर यांची व्यक्तिचित्रे येतात. त्यांचे स्वरूप थोडेसे प्रासंगिक आहे. १९४० साली फडके रत्नागिरी येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. तेव्हा हा परिचयपर लेख लिहिला आहे. मानेची विशिष्ट हालचाल व त्यातून व्यक्त होणारा अभिमान लेखकाने सुरेख टिपला आहे. कलेसाठी कला ह्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा उगमसुद्धा त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्विातच दिसून येतो. प्रा. फडके हे आधुनिक मराठी कादंबरीचे ‘जादूगार’च होते. जनसामान्यांत विलक्षण लोकप्रियता लाभलेले ते ललितलेखक होते असा गौरव खांडेकरांनी केला आहे. सुप्रसिद्ध टीकाकार ग. त्र्यं. माडखोलकर यांची आपली ओळख व मैत्री कशी झाली हे खांडेकरांनी सांगितले आहे. त्यांच्या सर्व कादंबऱ्यांचा परामर्ष घेऊन ते मानवी मनाचा शोध घेण्यात कसे चतुर होते हे विशद केले आहे. चिकित्सकपणा व निर्भय वृत्ती ही त्यांची खास वैशिष्ट्ये. त्यांचा उल्लेख ‘टीकाकार’ कादंबरीकार असा केला जातो तो किती योग्य आहे हे खांडेकरांनी सांगितले आहे. हे दोन्ही लेख खास परिचयात्मक स्वरुपाचे वाटतात. तर अशी ही ५ व्यक्तिचित्रे या संग्रहात येतात. रसग्रहणात्मक लेख यातील ३ लेख रसग्रहणात्मक स्वरूपाचे आहेत. सुप्रसिद्ध साहित्यिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना खांडेकर गुरुस्थानीच मानीत. कोल्हटकांच्या सर्व नाटकांचा परामर्ष ह्या ४० पानांच्या प्रदीर्घ लेखात खांडेकरांनी घेतला आहे. कल्पनारम्य सामाजिक नाटके हे त्यांचे खास वैशिष्ट्य. इतर नाटककारांच्या नाटकांशी खांडेकरांनी केलेली तुलना मोठी मार्मिक आहे. मधूनच काही आठवणींचा समावेशही केलेला आहे. त्यांचे भाषाप्रभुत्व, संगीताचा व्यासंग, विषयांची नवविधता याविषयी चर्चा करून त्यांची काही नाटके यशस्वी का होऊ शकली नाहीत यावर खांडेकरांनी अचूक बोट ठेवले आहे. सामाजिक सुधारणेकडे त्यांचे अधिक लक्ष होते. आगरकरांच्या विचारांचा त्यांच्या मनावर सखोल परिणाम झालेला दिसतो. त्यांची नाटके स्वतंत्र व सौंदर्यवादी आहेत. ‘मराठी नाटकांत सुधारणा घडवून आणणाऱ्या प्रत्येक प्रतिभासंपन्न नाटककाराने सादर अध्ययन करावे इतकी त्यांची नाटके नि:संशय योग्यतेची होती.’ असा गौरवपर उल्लेख करून त्यांनी ही लेखमाला संपविली आहे. उष:प्रभा व मराठी चित्रकथा समकालीन गुणवान कथालेखक श्री. मांजरेकर यांच्या ‘उष:प्रभा’ ह्या एकुलत्या एक कथासंग्रहाचे रसग्रहण ‘उष:प्रभा’ ह्या लेखात केले आहे. ‘नवे कुत्रे’, ‘सौंदर्य’ व ‘चिंतेचे चुंबन’ ह्या कथांचा खास उल्लेख करावयास हवा. मानवी मनाचा लपंडाव, त्यांची आंदोलने, दुबळी भावविश्वता व प्रीतीवरही मात करणारा त्यांचा अहंकार– हे मांजरेकरांचे आवडते कथाविषय होते. अतिरंजित कारुण्याकडे त्यांची विशेष ओढ होती. त्यांच्या बहुतेक कथा शोकात्म आहेत. ह्या गुणवान लेखकाला प्रकाशकांनी व वाचकांनी योग्य प्रोत्साहन न दिल्यामुळे त्यांचे कथालेखन थांबले याबद्दल खांडेकरांनी खंत व्यक्त केली आहे. ह्या पुस्तकातील शेवटचा लेख ‘मराठी चित्रकथा’ ह्या केवळ चित्रकथांचा आढावा घेणारा लेख वाटतो. काही काळ मराठी चित्रपटांनी निश्चित गाजवला. पण आता गल्लाभरू व हिंदी चित्रपटांचे अंधानुकरण होऊ लागल्यामुळे मराठी चित्रकथांच्या भविष्याबद्दल खांडेकरांनी चिंता व्यक्त केली आहे. तर असा हा संग्रह. खरं म्हणजे हा संग्रह १९४४ साली प्रसिद्ध झाला होता. तो कोल्हापूरच्या मोघे प्रकाशनाने त्याचा कुठेही उल्लेख करू नये. हे खरोखरच अजब वाटते. रसग्रहणात्मक लेखांऐवजी आणखी २।३ व्यक्तिचित्रांचा समावेश करून उत्कृष्ट व्यक्तिरेखांचा संग्रह प्रसिद्ध करणे अधिक उचित झाले असते. -डॉ. गं. वि. नेर्लेकर ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

PRATIKSHA
PRATIKSHA by RANJEET DESAI Rating Star
Mahesh Muley

अतिशय सुंदर पुस्तक, आयुष्य जगताना खूप काही हरवले आहे वाटते पण हे पुस्तक नव्याने जगायला आणि आहे ती परिस्थिती स्वीकारायला वाटा शोधायला नवीन प्रेरणा देते, सध्या समाजाची स्थिती बदलली असताना स्त्रियांना आणि त्यांच्या भावनांचा विचार करण्यासाठी नैतिकता जागेकरण्याला हे रणजीत देसाई लिखित पुस्तक खूपच महत्त्वाचे ठरेल... ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
विजय भास्कर, अमरावती

*दुर्दम्य : दहा कोटीत एक असा अजब ऑफिसर* *प्रामाणिकपणाचा दर्प, माणुसकीचा स्पर्श आणि एकाकी आयुष्याची कहाणी. काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, आपल्या कामाचा आणि जगण्याचा ठसा उमटवतात; पण त्यांना एका शब्दात चांगलं किंवा वाईट ठरवणं कठीण अतं. त्यांच्या स्वभावातील विरोधाभासच त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात. ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे जी. बी. देशमुख यांचं पुस्तक अशाच एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतं. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात सुमारे पंचवीस वर्षे सहकारी म्हणून अनुभवलेले सी. व्ही. कृष्णन एकनाथानन, म्हणजेच एकनाथन, यांचं व्यक्तिचित्र लेखकाने कोणताही कृत्रिम मुलामा न देता रेखाटलं आहे. त्यांच्या कठोर शिस्तीमागची तत्त्वनिष्ठा, विचित्र वाटणाऱ्या सवयींमागची भूमिका आणि एकाकीपणाच्या आड दडलेली माणुसकी उलगडत जाते. त्यामुळे हे केवळ एका अधिकाऱ्याचं चरित्र राहत नाही; ते माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न ठरतं. *पहिली भेट : हात मागे घेतला!* ४ जुलै १९८८. चंद्रपूरहून अमरावतीला बदली होऊन आलेल्या लेखकाची एकनाथन यांच्याशी पहिली भेट. उंच, धिप्पाड आणि गंभीर व्यक्तिमत्त्वाच्या या अधिकाऱ्यांसमोर लेखकाने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत एवढंच म्हटलं— “So you are reporting today. Okay.” या कोरड्या प्रतिसादातून त्यांच्या स्वभावाची पहिली झलक दिसते. मात्र, पुढे लेखकाने दिलेल्या टंकलेखनाच्या कामाची अचूकता पाहून आणि तो मेजर पी. के. बापट यांच्याकडे काम करून आल्याचं समजल्यावर एकनाथन म्हणाले— “Only a military man can carve out such workers. I am impressed.” कडक शिस्तीचा आग्रह धरणारा हा अधिकारी गुणवत्तेची दखल घ्यायलाही तितकाच तत्पर होता. पहिल्या भेटीत हात मागे घेणारा माणूस कामातील गुणवत्तेसमोर मात्र मनमोकळेपणाने दाद देतो. इथूनच या व्यक्तिमत्त्वातील विरोधाभासांची रंजक ओळख सुरू होते. *दोन रुपये चाळीस पैशांतून दिसलेलं तत्त्वज्ञान* एका व्यापाऱ्याकडून चुकून दोन रुपये चाळीस पैसे जास्त घेतले गेल्याचं लक्षात आल्यानंतर एकनाथन यांनी ती रक्कम परत करण्यासाठी स्वतःचे शंभर रुपये खर्च करून माणूस पाठवला. रक्कम छोटी होती; पण हिशेबातील तत्त्व मोठं होतं. त्यांच्या दृष्टीने पैशाची किंमत त्याच्या रकमेवर नव्हे, तर तो योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याच्या प्रामाणिकपणावर ठरत होती. नियम पाळताना ते कोणतीही तडजोड करत नसत. मात्र, कर्मचाऱ्याचा न्याय्य लाभ असेल, तर त्याला मंजुरी देण्यासही ते मागेपुढे पाहत नसत. नियमभंग करणाऱ्यांसाठी कठोर आणि हक्कासाठी पात्र असणाऱ्यांसाठी तत्पर, ही त्यांच्या कार्यपद्धतीची दोन टोकं होती. त्यांची वक्तशीरपणाची कल्पनाही विलक्षण होती. उशिरा येणं चुकीचं; पण वेळेच्या खूप आधी येणंसुद्धा शिस्तीच्या चौकटीबाहेरचं! “Before time is also not the right time.” या भूमिकेतून त्यांच्या नियमप्रियतेचा अतिरेक जाणवतो; पण त्याच वेळी प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःची एक काटेकोर चौकट असणारा माणूसही दिसतो. *शिस्तीच्या पोलादी चौकटीमागचा माणूस* एकनाथन यांची शिस्त कधी कधी इतरांना विक्षिप्तपणाच्या जवळ जाणारी वाटे. स्फोटक कारखान्यातील सुरक्षानियमांचं काटेकोर पालन असो किंवा बंदुकीच्या हाताळणीतील खबरदारी, नियम म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नव्हेत, अशी त्यांची धारणा होती. पण या कठोरतेला दुसरी बाजूही होती. कार्यालयातील शिपाई पत्नी-मुलांसह त्यांच्या वातानुकूलित दालनात झोपलेला आढळला. अशा वेळी कारवाई होईल, अशी अपेक्षा असताना एकनाथन यांनी त्याला विचारलं, “तुम हमारे चेंबर मे सोता?” या प्रश्नात नियम मोडल्याची जाणीव होतीच; पण त्याहून आधी दुसऱ्या माणसाच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यांच्या स्वभावातली ही माणुसकी मोठ्या भाषणांतून नव्हे, तर अशा छोट्या प्रसंगांतून व्यक्त होते. म्हणूनच त्यांचं व्यक्तिचित्र एकरेषीय होत नाही. *एकटेपणाचा स्वीकार की त्याची किंमत?* एकनाथन यांनी अविवाहित राहणं, मोजक्याच वस्तूंमध्ये आयुष्य घालवणं, दूरचित्रवाणी-रेडिओपासून दूर राहणं आणि सामाजिक समारंभ टाळणं पसंत केलं. स्वतःच्या अवकाशाबाबत ते अत्यंत आग्रही होते. नातेसंबंधांच्या गर्दीपेक्षा एकांत त्यांना अधिक जवळचा वाटत होता. मात्र, आयुष्याच्या उत्तरार्धात आजारपणाने त्यांची शारीरिक स्वायत्तता हिरावून घेण्यास सुरुवात केली. कर्करोगावरील उपचारांसाठी केरळला गेल्यानंतर भावाच्या घरी राहणंही त्यांना अवघड वाटलं. आपल्यामुळे भावाच्या कुटुंबाला गैरसोय होऊ नये, या विचाराने त्यांनी हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमान आणि स्वावलंबन यांची ही भूमिका समजण्यासारखी असली, तरी तिची किंमत एकटेपणाच्या रूपाने मोजावी लागते. लेखकाने दिलेल्या वडिलांच्या जुन्या पलंगावर अखेरच्या काळात त्यांना आधार मिळाला, हा तपशील मनाला स्पर्शून जातो. आयुष्यभर व्यवहारात काटेकोर राहिलेल्या एकनाथन यांनी त्या पलंगाचा स्वीकार केला. काही नाती शब्दांनी नव्हे, तर अशा साध्या कृतींनी व्यक्त होतात. २०१९ मध्ये मोठ्या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी लेखकाला म्हटलं— “Is this life, Deshmukh? I have to struggle for reaching even upto toilet.” आणि त्यानंतरची त्यांची विनंती अधिक बोलकी होती— “Try to come more frequently. I know it is a long distance. But I need to talk to someone like you with whom I can interact.” जगापासून अंतर राखणाऱ्या माणसालाही अखेरीस संवादाची गरज भासते. दुसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालं. आयुष्यभर स्वावलंबनाचा आग्रह धरणाऱ्या या माणसाच्या शेवटच्या शब्दांत मात्र सोबत हवी असल्याची साधी, मानवी ओढ होती. *दहा कोटीत एक हीच खरी ओळख* एकनाथन यांच्यात दोष नव्हते, असं लेखक सांगत नाही. त्यांच्या कठोरतेचा अतिरेक, सामाजिक अलिप्तता आणि विचित्र वाटणाऱ्या सवयी लपवण्याचाही प्रयत्न करत नाही. यामुळेच हे व्यक्तिचित्र अधिक विश्वासार्ह बनतं. एखाद्या माणसाचं मोठेपण सिद्ध करण्यासाठी त्याला निर्दोष ठरवण्याची गरज नसते. निवृत्तीपूर्वी एकनाथन यांनी लेखकाला विचारलं होतं, आपण गेल्यानंतर लोक आपल्याला चांगलं म्हणतील की वाईट? त्यावर लेखकाने दिलेलं उत्तर या पुस्तकाच्या शीर्षकाचा अर्थ उलगडतं— “I won`t tell people as to whether he was a good man or bad man, but whenever such reference comes I would certainly say that he was a man one in ten crore!” ‘दहा कोटीत एक’ ही उपाधी म्हणजे एखाद्या माणसाला देवत्व देणं नव्हे. ती त्याच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची, तत्त्वांशी असलेल्या निष्ठेची आणि सहज वर्गीकरणात न मावणाऱ्या स्वभावाची नोंद आहे. एकनाथन यांचं व्यक्तिमत्त्व समजून घेताना ‘अंतरंगीचे आभाळ : एक काव्यवर्तुळ’ या काव्य संग्रहातील ‘माणसातले सुंदर गुण’ ही कविता आठवते. “संकट येता कुणाचा हात पुढे सरतो; नाव न विचारता माणूस माणसाला धरतो.” एकनाथन यांच्या आजारपणात लेखकाने केलेली मदत आणि चंदूभाऊ पवार यांनी दाखवलेली माणुसकी या ओळींना जगण्याचा संदर्भ देतात. माणुसकी नेहमी गोड शब्दांतूनच व्यक्त होते असं नाही. कधी ती एखाद्याच्या हक्कासाठी ठामपणे उभी राहते, कधी चुकीच्या गोष्टीला विरोध करते, तर कधी आजारी माणसाच्या एकटेपणात त्याला संवादाची सोबत देते. एकनाथन यांच्यातील गुण आणि मर्यादा दोन्ही समजून घेताना ही कविता माणसाकडे पाहण्याची एक खिडकी उघडते. कारण माणसातले सुंदर गुण गाजावाजा करून येत नाहीत; ते एखाद्या कृतीतून, एखाद्या स्पर्शातून किंवा दुसऱ्याच्या दुःखापाशी थांबण्यातून प्रकट होतात. कवितेच्या शेवटच्या ओळींत म्हटल्याप्रमाणे— “माणूस जपता माणूस— अंतरी उघडे आभाळ.” कदाचित एकनाथन यांच्या आयुष्याकडे पाहण्याची हीच एक दृष्टी असू शकते. त्यांच्या सगळ्या स्वभाववैशिष्ट्यांशी सहमत न होताही त्यांच्यातील माणूस समजून घेणं, हीच या पुस्तकाची आणि त्यातून मिळणाऱ्या अनुभवाची खरी कमाई आहे. जी. बी. देशमुख यांनी आठवणींच्या आधारे उभं केलेलं हे व्यक्तिचित्र वाचकाला एका प्रश्नासमोर उभं करतं—माणसाला त्याच्या गुणदोषांच्या बेरजेतून समजून घ्यायचं, की त्याच्या संपूर्ण जगण्याच्या संदर्भात? ‘दुर्दम्य’ हे पुस्तक एका अजब अधिकाऱ्याची गजब गोष्ट सांगतं; पण त्याचबरोबर शिस्त, स्वाभिमान, माणुसकी आणि एकटेपणा यांच्या सीमारेषांवरही विचार करायला लावतं. काही माणसं आपल्याला आवडतात म्हणून लक्षात राहत नाहीत; ती आपल्याला विचार करायला भाग पाडतात म्हणून लक्षात राहतात. एकनाथन हे त्यापैकीच एक. माणसाला समजून घेण्याची, त्याच्या गुणदोषांसह त्याच्याकडे पाहण्याची आणि माणुसकीच्या अर्थाचा नव्याने शोध घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे पुस्तक अवश्य वाचावं. कारण काही पुस्तकं केवळ एका व्यक्तीची ओळख करून देत नाहीत; ती आपल्याला माणसांकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात. हे पुस्तक त्यापैकीच एक. ..... विजय भास्कर , अमरावती ...Read more