* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: J.R.D. TATA LETTERS
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788184984583
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 560
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : LITERATURE
Quantity
Buying Options:
  • Print Books:
CONTAINED IN THESE PAGES IS THE CORRESPONDENCE OF A MAN WHO FOR THE MAJOR PART OF HIS LIFE WAS AT THE HELM OF AFFAIRS OF THE HOUSE OF TATA, ONE OF THE LARGEST INDUSTRIAL GROUPS IN INDIA, AND HAS LEFT AN INDELIBLE IMPRESSION ON THE COUNTRY`S ECONOMIC & SOCIAL LIFE. J.R.D. TATA WAS A PROLIFIC LETTER-WRITER, AND THIS FIRST-TIME COMPILATION OF SOME THREE HUNDRED OF HIS LETTERS REVEALS VARIOUS FACETS OF HIS PERSONALITY, HIS RELATIONSHIPS WITH PEOPLE, THE PROJECTS HE WAS INVOLVED IN, HIS VIEWS ON ISSUES, HIS KINDNESS, FORTHRIGHTNESS AND SENSE OF HUMOUR, HIS CONCERNS AS A CITIZEN, THE VALUES HE LIVED BY, AND HIS PERSONAL INTERESTS. THE RANGE AND DEPTH OF HIS INTERESTS AND CONCERNS ARE REFLECTED IN THE HUGE CROSS-SECTION OF PEOPLE THESE LETTERS ARE ADDRESSED TO: FAMILY MEMBERS, HIS COLLEAGUES IN TATA, BUSINESS ASSOCIATES, MINISTERS AND BUREAUCRATS, FRIENDS IN INDIA AND ABROAD, AS WELL AS OTHERS WHO WERE NOT KNOWN TO HIM. J.R.D. TATA’S LETTERS BRING TO LIFE THE ACHIEVEMENTS OF A TWENTIETH CENTURY LEGEND.
सध्याच्या वेगवान जगात ‘ई-मेल्स’, ‘सेलफोन्स’ अशांसारख्या तत्पर संपर्कमाध्यमामुळे जग जवळ आणले आहे; पण एकेकाळी मुख्यत्वे ‘पत्रं’ या माध्यमातून संपर्क साधला जात असे. पत्रांतून कामांच्या तपशिलांखेरीज आपुलकी व जवळीकही साधली जात असे. शिवाय ही ‘पत्रं’ त्या एका विशिष्ट कालखंडाचा दस्तऐवज बनून इतिहास अभ्यासकांना व भावी पिढ्यांना मार्गदर्शक ठरत असत. ‘पत्रं’ हा कायमस्वरूपी माहितीस्रोत असतो. या पुस्तकातली सुमारे ३०० पत्रं इतिहासाचा अनमोल ठेवा आहेत. ‘जे.आर.डी. टाटा’ या विलक्षण व्यक्तिमत्त्वाच्या चिकित्सक लेखणीतून उतरलेली ही विविध विषयांना स्पर्श करणारी ‘पत्रं’ तत्कालीन सामाजिक, राजकीय, आर्थिक, औद्योगिक अशा अनेक क्षेत्रांचं दर्शन घडवतात आणि विसाव्या शतकातील एका महान, बहुआयामी व्यक्तित्वाचं अनेकपदरी अंतरंग उलगडून दाखवतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #J.R.DTATAYANCHIPATRE #J.R.D.TATALETTERS #जेआरडीटाटायांचीपत्रं #LITERATURETRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUPRIYAVAKIL #सुप्रियावकील #EDITORARVINDMAMBRO "
Customer Reviews
  • Rating StarChowkidar Devdutt Kamat

    सध्याच्या वेगवान जगात ‘ई-मेल्स’, ‘सेलफोन्स’ अशांसारख्या तत्पर संपर्कमाध्यमामुळे जग जवळ आणले आहे; पण एकेकाळी मुख्यत्वे ‘पत्रं’ या माध्यमातून संपर्क साधला जात असे. पत्रांतून कामांच्या तपशिलांखेरीज आपुलकी व जवळीकही साधली जात असे. शिवाय ही ‘पत्रं’ त्या एा विशिष्ट कालखंडाचा दस्तऐवज बनून इतिहास अभ्यासकांना व भावी पिढ्यांना मार्गदर्शक ठरत असत. ‘पत्रं’ हा कायमस्वरूपी माहितीस्रोत असतो. या पुस्तकातली सुमारे ३०० पत्रं इतिहासाचा अनमोल ठेवा आहेत. ‘जे.आर.डी. टाटा’ या विलक्षण व्यक्तिमत्त्वाच्या चिकित्सक लेखणीतून उतरलेली ही विविध विषयांना स्पर्श करणारी ‘पत्रं’ तत्कालीन सामाजिक, राजकीय, आर्थिक, औद्योगिक अशा अनेक क्षेत्रांचं दर्शन घडवतात आणि विसाव्या शतकातील एका महान, बहुआयामी व्यक्तित्वाचं अनेकपदरी अंतरंग उलगडून दाखवतात. भारताच्या घडणीत स्वातंत्र्यपूर्ण आणि स्वातंत्र्योत्तर काळात टाटा उद्योग समूहाचे स्थान कोणालाही नाकारता येणार नाही. जमशेटजी टाटांपासून रतन टाटांपर्यंत प्रत्येकाने आपल्या औद्योगिक साम्राज्य वाढीबरोबर भारताच्या नवनिर्माणाचा विचार केला होता. भारतरत्न जे आर. डी. टाटा हे पहिलेच उद्योगपती आहेत, की ज्यांना भारत सरकारने भारताच्या औद्योगिक प्रगती व हवाई सेवेबद्दल भारतरत्न ही उपाधी देऊन त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान केला. जे. आर. डी. टाटा यांची ही पत्रे पाच भागात विभागली आहेत. व्यक्तिगत, स्वातंत्र्याच्या दिशेने आणि नंतर विमानसेवा. लोकांना सांभाळताना शहर देश त्यापलीकडे सुप्रसिद्ध व्यक्ती आणि मित्र. ही पत्रे जे. आर. डी. टाटांनी आपल्या आयुष्यात लिहिलेल्या चाळीस हजार पत्रांतून रुसी लाला या त्यांच्या सहकाऱ्याने निवडली. यातील ३०० पत्रे या पुस्तकात आहेत. दोराबजी टाटा यांनी विद्यार्थीदशेत आपल्या मुलावर पत्रातून जो संस्कार केला. त्यामुळेच हा उद्योगपती भारतरत्न झाला. जे. आर. डी. टाटांनी आपल्या वडिलांनी उत्तर दिले आहे. मी व्यवसायात प्रवेश केल्यानंतर तुम्ही माझ्याविषयी असमाधानी असणार नाही, कारण मी उद्योगपतीचे गुण दाखवून देईन. पुढे आणि पुढे तुम्हाला माझा अतिशय अभिमान वाटेल. जे. आर. डी. टाटांनी आत्मविश्वासानी दिलेल्या उत्तरातच त्यांच्या व्यावसायिक यशस्वितेचे रहस्य अहो. जे. आर. डी. टाटा यांना जमशेदपूरच्या कारखान्यात साधा मेकॅनिक म्हणून वडिलांनी लावले. ब्रिटिश ऑफिसर त्याचे मार्गदर्शक होते. जे. आर. डी. टाटांनी फ्रेंच सैन्यात काम करून सैनिकी शिस्तही लावून घेतली होती. जे. आर. डी. टाटा झोरास्ट्रीयन असूनही अंधविश्वासी नव्हते, ते म्हणतात, माझी परमेश्वरावर श्रद्धा आहे पण मानवनिर्मित बाबींवर अथवा सगळ्या अवडंबरांवर आणि धर्मगुरूंनी शोधून काढलेल्या विधी संस्कारावर नाही. जे. आर. डी. टाटांनी असंख्य मित्रांना पत्रे लिहिली. या मित्रांमध्ये पारशी, इंग्रज आणि पत्रकार अधिक आहेत. छोट्या छोट्या गोष्टीतही त्यांना रस होता. डॉ. गज्जर यांना कुत्र्यांच्या त्रासापायी त्यांना पत्र लिहावे लागले. तुमच्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. मला शांततेची गरज आहे. मी स्वत: श्वानप्रेमी आहे. हे पत्र अत्यंत मिश्किल भाषेत लिहिले आहे. जे. आर. डी. टाटा अनेक हॉटेलमध्ये राहत. हॉटेल मालकांनाही सूचना लिखित स्वरूपात पाठवत. दूरध्वनी सेवा याबद्दल त्यांची तक्रार असायची. ते सुमंत मूळगावकर यांना लिहितात, की आपल्या कारखान्यातील स्वच्छतागृह किमान दर्जाच्या खूप खालच्या स्तरावर आहे. गाड्या खरेदी करतानाही जेथे गाडी खरेदी केली त्यांनाही ते सल्ला देत. पडदे कसे लावावेत. लॅक्मेचे क्रीम कसे असावे या संबंधात ते सूचना करीत होते. जे. आर. डी. टाटांना चित्रकलेची अत्यंत आवड होती. ते त्याचे उत्कृष्ट रसग्रहण पिलू पोचखानवाला यांना लिहिलेल्या पत्रात करतात. पाँडेचरीच्या ऑरोविलमध्ये राहताना डॉ. करणसिंगांना ते सूचना करतात. सर अरविंदो आणि माताजी यांचे विश्वस्त परदेशी अगर कायदाविषयक शिक्षण नसणारे असू नयेत. जे. आर. डी. टाटा आपल्या बंगल्यात होम वर्कशॉप चालवून स्वत:चा उदरनिर्वाह करत. टाटा कंपनीतून फार कमी पगार घेत. त्यांनी आपल्या होमवर्कशॉपमधून विक्री केलेली आहे. ज्यांना व्यायामाची आवड होती, पी. सी. सेन यांना वेटलिफ्टिंगबाबत काही मंत्र देतात. हा व्यायाम प्रकार पाठदुखीचा होऊ नये अशाच पद्धतीने करावा. पंडित जवाहरलाल नेहरूंना १९४७ मध्ये पत्र लिहिताना त्यांनी पंडितजींच्या नेतृत्वाची प्रशंसा करताना लिहिले, ‘‘स्वातंत्र्याची धगधगती मशाल सदैव उत्तुंग धरणारी व्यक्ती भारताच्या प्रथम पंतप्रधानपदी विराजमान होत आहे, याचा मला आनंद आहे.’’ महात्मा गांधींच्या मृत्यूनंतर त्यांनी ही जागतिक शोकांतिका मानली. गांधीजींचे जीवन शांतता, सहिष्णुता व सलोख्यासाठी होते हे नमूद केले. जे. आर. डी. टाटा आपल्या उद्योग समूहात कामगार मालक संबंधाबाबत अधिक माणुसकी दाखवत. त्यांनी आपल्या युनियन विषयक पत्रात लिहिले आहे. प्रत्येक कर्मचारी सदस्याने माणुसकीच्या नात्यानं वागायला शिकल्याखेरीज आपण कधीही सुयोग्य वातावरण निर्मिती घडवू शकणार नाही. व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांना काय वाटतं हे जाणून घेण्याची तसदी घेतली पाहिजे. ‘आपण जर बहुसंख्य कर्मचारी आणि कामगारांमध्ये विश्वास निर्माण केला असता, की व्यवस्थापन पगाराशी संबंधित वाटाघाटीऐवजी, त्यांच्या व्यक्तिगत बाबी सहानुभूतीपूर्वक आणि समजुतीने हाताळणे व त्यांच्या प्रश्नाबाबत मनापासून रस दाखविला तर व्यवस्थापन विरोधी भावना त्यांच्यात निर्माण होणार नाही. टाटा उद्योग समूह विकसित होण्यास कर्मचाऱ्यांचा वाटा ते नाकारत नसत. सेवानिवृत्त होणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वहस्ताक्षरात जे. आर. डी. टाटा पत्र लिहून त्यांनी टाटा समूहाच्या केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत. या पुस्तकात अशी बरीच पत्रे आहेत, की ज्यात त्यांनी अधिकाऱ्यापासून चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांपर्यंत त्यांच्या निरोपांना शुभेच्छा दिल्या आहेत. जे. आर. डी. टाटा यांचे सर्वात मोठे दु:ख त्यांना मुरारजीभाई देसाई यांनी दिलेली वागणूक खूप दुखवून गेली. मुरारजीभाई देसाई यांनी त्यांच्या हवाईसेवेची कदर केली आणि हेही कबूल केलं, की तुम्ही कॉर्पोरेशनची जबाबदारी केल्यानंतर तरुण खांद्यावर सोपवाल असं मला वाटलं होतं. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांच्या हवाई सेवेबद्दल त्यांना लिहिलेल्या पत्रात सांगितले आहे, तुम्ही एअर इंडियाचे केवळ अध्यक्षच नव्हता तर त्यांचे संस्थापक व संगोपनकर्ताही होता. आम्हाला तुमच्या हवाईसेवेचा अभिमान आहे. तुमच्यामुळेच एअर इंडियाने आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घेऊन सर्वोच्च स्थान पटकावलं. ही पत्रं दाखवतात की भारतीय विमान वाहतुकीचे जनक जे. आर. डी. टाटा हे होते. जे. आर. डी. टाटांनी कृष्णमाचारी, जयप्रकाश नारायण, बीजू पटनाईक, राजगोपालचारी यांना लिहिलेल्या पत्रात त्यांच्या जीवनमूल्यांचा परिचय होतो. त्यांनी महात्मा गांधींच्या विश्वस्त कल्पनेप्रमाणे जगणे पसंत केले. जे. आर. डी. टाटांनी या देशाच्या वाढत्या लोकसंख्येवर खूप विचार केला होता. त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना, पोलीस आयुक्तांना, टेलिफोन डायरेक्टरना लिहिलेल्या पत्रात आपली मुंबईबद्दलची आस्था व्यक्त केली आहे. जे. आर. डी. टाटा यांनी लिहिलेल्या पत्रातून एका उद्योगपतीचा आब, मोहकता, सखोलता व आपुलकी व्यक्त होते. आपले हृदय, आपली विचारधारा, औद्योगिक दृष्टी त्यांनी व्यक्त केली आहे. आपण असं म्हणू भारताच्या अर्थकारणात जे घडलं - त्यांनी आभाळाला स्पर्श केला आणि त्याच्या गालावर स्मित फुलले त्यांनी दोन्ही बाहू पसरले आणि त्यात अवघे विश्व सामावले माणूस आणि संस्था यातून जे भव्य दिव्य घडलं, ते त्यांच्या दूरदृष्टीमुळे.... प्रत्येक छोट्या मोठ्या उद्योगपतींनी जे. आर. डी. टाटा आणि भारतातल्या असंख्य उद्योगपतींची चरित्रे व पत्रव्यवहार आपल्या ग्रंथालयात ठेवलाच पाहिजे. नकळत मागचा वारसा आपल्याला समजत जातो. वयाच्या ३४ व्या वर्षी टाटा समूहाचा हा नेता ५२ वर्षे काम करीत होता. वयाच्या ८९ व्या वर्षी टाटांनी जगाचा निरोप घेतला. जगाचा निरोप घेतानाही त्यांच्या डोळ्यात चमक होती. हा माणूस शेवटचा श्वास घेताना म्हणाला, परमेश्वराला या देशातील ८० कोटी जनतेची काळजी व्हायची आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA SATARA 8-3-2015

    भारताच्या घडणीत स्वातंत्र्यपूर्ण आणि स्वातंत्र्योत्तर काळात टाटा उद्योग समूहाचे स्थान कोणालाही नाकारता येणार नाही. जमशेटजी टाटांपासून रतन टाटांपर्यंत प्रत्येकाने आपल्या औद्योगिक साम्राज्य वाढीबरोबर भारताच्या नवनिर्माणाचा विचार केला होता. भारतरत्न जे आर. डी. टाटा हे पहिलेच उद्योगपती आहेत, की ज्यांना भारत सरकारने भारताच्या औद्योगिक प्रगती व हवाई सेवेबद्दल भारतरत्न ही उपाधी देऊन त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान केला. जे. आर. डी. टाटा यांची ही पत्रे पाच भागात विभागली आहेत. व्यक्तिगत, स्वातंत्र्याच्या दिशेने आणि नंतर विमानसेवा. लोकांना सांभाळताना शहर देश त्यापलीकडे सुप्रसिद्ध व्यक्ती आणि मित्र. ही पत्रे जे. आर. डी. टाटांनी आपल्या आयुष्यात लिहिलेल्या चाळीस हजार पत्रांतून रुसी लाला या त्यांच्या सहकाऱ्याने निवडली. यातील ३०० पत्रे या पुस्तकात आहेत. दोराबजी टाटा यांनी विद्यार्थीदशेत आपल्या मुलावर पत्रातून जो संस्कार केला. त्यामुळेच हा उद्योगपती भारतरत्न झाला. जे. आर. डी. टाटांनी आपल्या वडिलांनी उत्तर दिले आहे. मी व्यवसायात प्रवेश केल्यानंतर तुम्ही माझ्याविषयी असमाधानी असणार नाही, कारण मी उद्योगपतीचे गुण दाखवून देईन. पुढे आणि पुढे तुम्हाला माझा अतिशय अभिमान वाटेल. जे. आर. डी. टाटांनी आत्मविश्वासानी दिलेल्या उत्तरातच त्यांच्या व्यावसायिक यशस्वितेचे रहस्य अहो. जे. आर. डी. टाटा यांना जमशेदपूरच्या कारखान्यात साधा मेकॅनिक म्हणून वडिलांनी लावले. ब्रिटिश ऑफिसर त्याचे मार्गदर्शक होते. जे. आर. डी. टाटांनी फ्रेंच सैन्यात काम करून सैनिकी शिस्तही लावून घेतली होती. जे. आर. डी. टाटा झोरास्ट्रीयन असूनही अंधविश्वासी नव्हते, ते म्हणतात, माझी परमेश्वरावर श्रद्धा आहे पण मानवनिर्मित बाबींवर अथवा सगळ्या अवडंबरांवर आणि धर्मगुरूंनी शोधून काढलेल्या विधी संस्कारावर नाही. जे. आर. डी. टाटांनी असंख्य मित्रांना पत्रे लिहिली. या मित्रांमध्ये पारशी, इंग्रज आणि पत्रकार अधिक आहेत. छोट्या छोट्या गोष्टीतही त्यांना रस होता. डॉ. गज्जर यांना कुत्र्यांच्या त्रासापायी त्यांना पत्र लिहावे लागले. तुमच्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. मला शांततेची गरज आहे. मी स्वत: श्वानप्रेमी आहे. हे पत्र अत्यंत मिश्किल भाषेत लिहिले आहे. जे. आर. डी. टाटा अनेक हॉटेलमध्ये राहत. हॉटेल मालकांनाही सूचना लिखित स्वरूपात पाठवत. दूरध्वनी सेवा याबद्दल त्यांची तक्रार असायची. ते सुमंत मूळगावकर यांना लिहितात, की आपल्या कारखान्यातील स्वच्छतागृह किमान दर्जाच्या खूप खालच्या स्तरावर आहे. गाड्या खरेदी करतानाही जेथे गाडी खरेदी केली त्यांनाही ते सल्ला देत. पडदे कसे लावावेत. लॅक्मेचे क्रीम कसे असावे या संबंधात ते सूचना करीत होते. जे. आर. डी. टाटांना चित्रकलेची अत्यंत आवड होती. ते त्याचे उत्कृष्ट रसग्रहण पिलू पोचखानवाला यांना लिहिलेल्या पत्रात करतात. पाँडेचरीच्या ऑरोविलमध्ये राहताना डॉ. करणसिंगांना ते सूचना करतात. सर अरविंदो आणि माताजी यांचे विश्वस्त परदेशी अगर कायदाविषयक शिक्षण नसणारे असू नयेत. जे. आर. डी. टाटा आपल्या बंगल्यात होम वर्कशॉप चालवून स्वत:चा उदरनिर्वाह करत. टाटा कंपनीतून फार कमी पगार घेत. त्यांनी आपल्या होमवर्कशॉपमधून विक्री केलेली आहे. ज्यांना व्यायामाची आवड होती, पी. सी. सेन यांना वेटलिफ्टिंगबाबत काही मंत्र देतात. हा व्यायाम प्रकार पाठदुखीचा होऊ नये अशाच पद्धतीने करावा. पंडित जवाहरलाल नेहरूंना १९४७ मध्ये पत्र लिहिताना त्यांनी पंडितजींच्या नेतृत्वाची प्रशंसा करताना लिहिले, ‘‘स्वातंत्र्याची धगधगती मशाल सदैव उत्तुंग धरणारी व्यक्ती भारताच्या प्रथम पंतप्रधानपदी विराजमान होत आहे, याचा मला आनंद आहे.’’ महात्मा गांधींच्या मृत्यूनंतर त्यांनी ही जागतिक शोकांतिका मानली. गांधीजींचे जीवन शांतता, सहिष्णुता व सलोख्यासाठी होते हे नमूद केले. जे. आर. डी. टाटा आपल्या उद्योग समूहात कामगार मालक संबंधाबाबत अधिक माणुसकी दाखवत. त्यांनी आपल्या युनियन विषयक पत्रात लिहिले आहे. प्रत्येक कर्मचारी सदस्याने माणुसकीच्या नात्यानं वागायला शिकल्याखेरीज आपण कधीही सुयोग्य वातावरण निर्मिती घडवू शकणार नाही. व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांना काय वाटतं हे जाणून घेण्याची तसदी घेतली पाहिजे. ‘आपण जर बहुसंख्य कर्मचारी आणि कामगारांमध्ये विश्वास निर्माण केला असता, की व्यवस्थापन पगाराशी संबंधित वाटाघाटीऐवजी, त्यांच्या व्यक्तिगत बाबी सहानुभूतीपूर्वक आणि समजुतीने हाताळणे व त्यांच्या प्रश्नाबाबत मनापासून रस दाखविला तर व्यवस्थापन विरोधी भावना त्यांच्यात निर्माण होणार नाही. टाटा उद्योग समूह विकसित होण्यास कर्मचाऱ्यांचा वाटा ते नाकारत नसत. सेवानिवृत्त होणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वहस्ताक्षरात जे. आर. डी. टाटा पत्र लिहून त्यांनी टाटा समूहाच्या केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत. या पुस्तकात अशी बरीच पत्रे आहेत, की ज्यात त्यांनी अधिकाऱ्यापासून चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांपर्यंत त्यांच्या निरोपांना शुभेच्छा दिल्या आहेत. जे. आर. डी. टाटा यांचे सर्वात मोठे दु:ख त्यांना मुरारजीभाई देसाई यांनी दिलेली वागणूक खूप दुखवून गेली. मुरारजीभाई देसाई यांनी त्यांच्या हवाईसेवेची कदर केली आणि हेही कबूल केलं, की तुम्ही कॉर्पोरेशनची जबाबदारी केल्यानंतर तरुण खांद्यावर सोपवाल असं मला वाटलं होतं. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांच्या हवाई सेवेबद्दल त्यांना लिहिलेल्या पत्रात सांगितले आहे, तुम्ही एअर इंडियाचे केवळ अध्यक्षच नव्हता तर त्यांचे संस्थापक व संगोपनकर्ताही होता. आम्हाला तुमच्या हवाईसेवेचा अभिमान आहे. तुमच्यामुळेच एअर इंडियाने आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घेऊन सर्वोच्च स्थान पटकावलं. ही पत्रं दाखवतात की भारतीय विमान वाहतुकीचे जनक जे. आर. डी. टाटा हे होते. जे. आर. डी. टाटांनी कृष्णमाचारी, जयप्रकाश नारायण, बीजू पटनाईक, राजगोपालचारी यांना लिहिलेल्या पत्रात त्यांच्या जीवनमूल्यांचा परिचय होतो. त्यांनी महात्मा गांधींच्या विश्वस्त कल्पनेप्रमाणे जगणे पसंत केले. जे. आर. डी. टाटांनी या देशाच्या वाढत्या लोकसंख्येवर खूप विचार केला होता. त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना, पोलीस आयुक्तांना, टेलिफोन डायरेक्टरना लिहिलेल्या पत्रात आपली मुंबईबद्दलची आस्था व्यक्त केली आहे. जे. आर. डी. टाटा यांनी लिहिलेल्या पत्रातून एका उद्योगपतीचा आब, मोहकता, सखोलता व आपुलकी व्यक्त होते. आपले हृदय, आपली विचारधारा, औद्योगिक दृष्टी त्यांनी व्यक्त केली आहे. आपण असं म्हणू भारताच्या अर्थकारणात जे घडलं - त्यांनी आभाळाला स्पर्श केला आणि त्याच्या गालावर स्मित फुलले त्यांनी दोन्ही बाहू पसरले आणि त्यात अवघे विश्व सामावले माणूस आणि संस्था यातून जे भव्य दिव्य घडलं, ते त्यांच्या दूरदृष्टीमुळे.... प्रत्येक छोट्या मोठ्या उद्योगपतींनी जे. आर. डी. टाटा आणि भारतातल्या असंख्य उद्योगपतींची चरित्रे व पत्रव्यवहार आपल्या ग्रंथालयात ठेवलाच पाहिजे. नकळत मागचा वारसा आपल्याला समजत जातो. वयाच्या ३४ व्या वर्षी टाटा समूहाचा हा नेता ५२ वर्षे काम करीत होता. वयाच्या ८९ व्या वर्षी टाटांनी जगाचा निरोप घेतला. जगाचा निरोप घेतानाही त्यांच्या डोळ्यात चमक होती. हा माणूस शेवटचा श्वास घेताना म्हणाला, परमेश्वराला या देशातील ८० कोटी जनतेची काळजी व्हायची आहे. तेव्हा त्यांनी माझी काळजी व्हावी किंवा माझ्या सोबत रहावं. अशी अपेक्षा मी कशी ठेवू शकतो? ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more