* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789353171537
  • Edition : 2
  • Publishing Year : MARCH 1956
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 188
  • Language : MARATHI
  • Category : LITERATURE
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
PUROSHOTTAM SHREEPAT KALE (VAPU KALE’S FATHER), HAS WRITTEN THIS BOOK SOMEWHERE IN THE 1940-50S. HE WAS AN ARTIST BY NATURE. HE WOULD COLOUR THE DRAPES REQUIRED DURING DRAMAS, LOOK AFTER THE UPSTAGE, OFFSTAGE AND COSTUMES. HE WORKED WITH KESHAVRAO BHOSALE’S LALITKALADARSHA DRAMA COMPANY. THOUGH AN ARTIST, HE HAD EQUAL COMMAND OVER WORDS AND WRITING. PUSHREE, AS HE WAS FONDLY KNOWN AS, HAS ALSO PORTRAYED AN APT WORD-PICTURE OF MANY ARTISTS. HE HAD AN IMMENSE STORE OF STORIES AND MEMORIES OF THESE EMINENT PERSONALITIES. HIS INNOVATIVE STYLE HAS MADE THE CONTENT READABLE AND INTERESTING. IT ALSO ALLOWS US TO TAKE A ROUND THROUGH THE PAST OF DRAMA AND THEATER.
‘ललितकलेच्या सहवात’ हे पुस्तक पुरुषोत्तम श्रीपत काळे (‘वपुं’चे वडील) यांनी विसाव्या दशकाच्या पूर्वार्धात (४०-५० दशकात) लिहिले आहे. ते स्वत: चित्रकार होते. केशवराव भोसले यांच्या ‘ललितकलादर्श’ नाटक मंडळीत ते पडदे रंगविणे, नैपथ्यरचना अशी कामे करीत. चित्रकार असूनही शब्दांवर आणि एकूणच लेखनकलेवर त्यांची हुकमत होती, हे पानोपानी जाणवते. सुमारे ऐंशी वर्षांहून अगोदरच्या काळात मराठी भाषेवर संस्कृतचा प्रभाव होता. शब्दोच्चार आणि लेखनही अनुनासिक होते. अशा काळात लिहिलेले असूनही त्यांची शब्दरचना लालित्यपूर्ण आहेच, शिवाय आशयघन आणि वास्तवदर्शी आहे. हा ‘ललितकलादर्श’चा छोटेखानी इतिहासच म्हणता येईल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#LALITKALECHA SAHWASAT# PS KALE# BABURAO PENDHARKAR#BHALCHANDRA PENDHARKAR# #RAMKRUSHNABUVA VAZE# ANNA KIRLOSKAR# KESHVRAO SHITUT# NARAYANRAO RAJHANS (BALGANDHARVA)# LALITKALADARSH NATAK MANDALI# GANDHARVA NATAK MANDALI #ललितकलेच्या सहवासात# पु श्री काळे-#ललितकलादर्श नाटक मंडळी#गंधर्व नाटक मंडळी# केशवराव भोसले#बापूराव पेंढारकर# नारायणराव राजहंस (बालगंधर्व)# रामकृष्णबुवा वझे#अण्णा किर्लाेस्कर# केशवराव शितूत#भालचंद्र पेंढारकर# मानापमान# सौभद्र#राक्षसी महत्त्वाकांक्षा#सत्तेचे गुलाम#वधूपरीक्षा#श्री#शारदा# ऑपेरा हाउस...
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA 12-04-2019

    ‘ललितकलादर्श’ इतिहासाचा धांडोळा... पुरुषोत्तम श्रीपती काळे (पु.श्री. काळे) हे उत्कृष्ट नेपथ्यकार म्हणून ओळखले जातात. नेपथ्यकार म्हणून त्यांच्या नावावर ४२ नाटके, २१ चित्रपट आणि असंख्य लॅण्डस्केप जमा आहेत. ‘ललितकलादर्श मंडळी’ या नाट्यसंस्थेसाठी आणि राकमल चित्रमंदिर या चित्रपट संस्थेसाठी त्यांनी नेपथ्यकार म्हणून काम केले होते. याच पुश्रींनी मराठी रंगभूमीच्या इतिहासात महत्त्वाचे योगदान असलेल्या ‘ललितकलादर्श’ या नाट्यसंस्थेच्या इतिहासाचा धांडोळा या पुस्तकात घेतला आहे. ‘ललितकलादर्श मंडळी’ची स्थापना हुबळी येथे १ जानेवारी १९०८ मध्ये झाली. सुरुवातीच्या मालकवर्गात गणेश विनायक वीरकर, मारुतीराव पवार-गोंधळी, बाळकृष्णपंत मादुसकर, कृष्णराव पवार, दत्तोपंत निईकर, केशव विष्णू बेडेकर, दत्तोपंत भोसले आणि केशवराव भोसले ही आठ मंडळी होती. सुरुवातीची अडीच-तीन वर्षे कंपनीने हुबळी, बेळगाव, सांगली, मिरज, कोल्हापूर या भागात दौरे केले. १९१० मध्ये कंपनीतील समान भागीदारीची योजना संपुष्टात येऊन फक्त केशवराव आणि दत्तोपंत भोसले हे दोघेच कंपनीचे मालक राहिले. ललितकलादर्शने सुरुवातीला सौभद्र, रामराज्यवियोग, मृच्छकटिक, शारदा, गोपीचंद, मुद्रिका आणि अक्षविपाक अशी सात नाटके सादर केली होती. १९१४ मध्ये जमखिंडीकर मंडळी संस्थेत काम करणाऱ्या व्यंकटेश बळवंत पेंढारकर ऊर्फ बापूराव पेंढारकर या अभिनेत्यांना केशवरावांनी ललितकलादर्शमध्ये बोलाविले आणि ‘शारदा’ नाटकातील नटीची भूमिका करून पेंढारकर यांनी ललितकलादर्शमध्ये कारकीर्दीस केलेली सुरुवात ‘ललितकलादर्श’च्या ‘शहाशिवाजी’ या नाटकासाठी पुश्रींनी दोन मोठे प्लॅटसीन आणि दोन कव्हरचे पडदे रंगविण्याचे केलेले काम, नावाप्रमाणे एक आदर्श कंपनी होण्यासाठी केशवराव भोसले यांनी केलेले प्रयत्न, नाट्यसंस्थेत नेपथ्य, गायन, अभिनय तसेच उत्तमोत्तम नाटके रंगभूमीवर आणण्यात त्यांनी घेतलेली मेहनत, संस्थेने सादर केलेली ‘हाच मुलाचा बाप’, ‘संन्याशाचा संसार’, ‘शहाशिवाजी’, ‘शिक्का कट्यार’, ‘वधुपरीक्षा’ आदी नाटके, ललितकलादर्शमध्ये कोणी नवा पाहुणा आला की त्याच्या नावापुढे लागणारी ‘मामा’ ही उपाधी, कंपनीतील वातावरण, ‘ललितकलादर्श मंडळी’चे संस्थापक आणि एक मालक केशवराव भोसले, भोसले यांच्यानंतर ‘ललितकलादर्श’चे उत्तराधिकारी बापूराव पेंढारकर आणि बापूरावांनंतर ‘ललितकलादर्श’ची धुरा सांभाळणारे भालचंद्र पेंढारकर आदींच्या आठवणींना काळे यांनी उजाळा दिला आहे. महात्मा गांधी यांनी १९२१ मध्ये एक कोटी रुपयांचा लोकमान्य टिळक स्वराज्य फंड जमा करण्याचा संकल्प केला होता. त्यासाठी मुंबईतून ‘गंधर्व’ आणि ‘ललितकलादर्श’ या दोन कंपन्यांनी एकत्र येऊन ‘मानापमान’ या नाटकाचा संयुक्त प्रयोग सादर केला होता. मराठी नाट्यसृष्टीच्या इतिहासात गाजलेल्या या संयुक्त मानापमानचा प्रयोग ८ जुलै १९२१ रोजी मुंबईत बालीवाला थिएटर येथे झाला. नाटकात केशवराव भोसले हे ‘धैर्यधर’ तर बालगंधर्व ‘भामिनी’ झाले होते. रात्री साडेसात वाजता सुरू झालेला नाटकाचा प्रयोग रात्री अडीच वाजता संपला, अशी आठवणही काळे सांगतात. केशवराव भोसले यांच्या निधनानंतर ललितकलादर्शच्या ‘सत्तेचे गुलाम’ या नाटकाला मिळालेला प्रचंड यश आणि त्यानंतर ‘तुरुंगाच्या दारात’ला मिळालेले अपयशही ते मांडतात. पुस्तकातील परिशिष्टांमध्ये ललितकलादर्शमधील नटवर्ग आणि अन्य कलावंत, व्यवस्थापक, संवादिनीवादक, तबला वादक, रंगमंच व्यवस्थापक, संवादिनीवादक, तबलावादक, रंगमंच व्यवस्थापक, चित्रकार, लेखक, दिग्दर्शक, संगीत कलाकार, रंगपट आणि कपडेपट सांभाळणारी मंडळी याची माहिती देण्यात आली आहे. तसेच पुस्तकात केशवराव भोसले, वीर वामनराव जोशी, व्यंकटेश बळवंत ऊर्फ बापूराव पेंढारकर, भा.वि. वरेरकर, नानासाहेब फाटक, कृष्णाजी प्रभाकर, खाडिलकर, काही नाटकातील देखावे यांची छायाचित्रे आहेत. नाट्य, चित्रपट, चित्रकला या क्षेत्रात यश आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असलेली अनेक दिग्गज मंडळी पुश्रींच्या सहवासात आली. त्यांचे गुण-दोषही काळे यांनी परखडपणे मांडले आहेत. ‘‘ललितकलादर्श’ या नाट्य संस्थेचा इतिहास, आठवणी आणि किस्से आणि पर्यायाने मराठी रंगभूमीचा एक काळ या पुस्तकात उलगडला आहे. मूळ पुस्तक १९५६ साली प्रकाशित झाले होते. नुकतीच या पुस्तकाची दुसरी आवृत्ती आल्यामुळे हा नाट्येतिहास वाचण्याची संधी वाचकांना मिळाली आहे. – शेखर जोशी ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
विजय भास्कर, अमरावती

*दुर्दम्य : दहा कोटीत एक असा अजब ऑफिसर* *प्रामाणिकपणाचा दर्प, माणुसकीचा स्पर्श आणि एकाकी आयुष्याची कहाणी. काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, आपल्या कामाचा आणि जगण्याचा ठसा उमटवतात; पण त्यांना एका शब्दात चांगलं किंवा वाईट ठरवणं कठीण अतं. त्यांच्या स्वभावातील विरोधाभासच त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात. ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे जी. बी. देशमुख यांचं पुस्तक अशाच एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतं. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात सुमारे पंचवीस वर्षे सहकारी म्हणून अनुभवलेले सी. व्ही. कृष्णन एकनाथानन, म्हणजेच एकनाथन, यांचं व्यक्तिचित्र लेखकाने कोणताही कृत्रिम मुलामा न देता रेखाटलं आहे. त्यांच्या कठोर शिस्तीमागची तत्त्वनिष्ठा, विचित्र वाटणाऱ्या सवयींमागची भूमिका आणि एकाकीपणाच्या आड दडलेली माणुसकी उलगडत जाते. त्यामुळे हे केवळ एका अधिकाऱ्याचं चरित्र राहत नाही; ते माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न ठरतं. *पहिली भेट : हात मागे घेतला!* ४ जुलै १९८८. चंद्रपूरहून अमरावतीला बदली होऊन आलेल्या लेखकाची एकनाथन यांच्याशी पहिली भेट. उंच, धिप्पाड आणि गंभीर व्यक्तिमत्त्वाच्या या अधिकाऱ्यांसमोर लेखकाने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत एवढंच म्हटलं— “So you are reporting today. Okay.” या कोरड्या प्रतिसादातून त्यांच्या स्वभावाची पहिली झलक दिसते. मात्र, पुढे लेखकाने दिलेल्या टंकलेखनाच्या कामाची अचूकता पाहून आणि तो मेजर पी. के. बापट यांच्याकडे काम करून आल्याचं समजल्यावर एकनाथन म्हणाले— “Only a military man can carve out such workers. I am impressed.” कडक शिस्तीचा आग्रह धरणारा हा अधिकारी गुणवत्तेची दखल घ्यायलाही तितकाच तत्पर होता. पहिल्या भेटीत हात मागे घेणारा माणूस कामातील गुणवत्तेसमोर मात्र मनमोकळेपणाने दाद देतो. इथूनच या व्यक्तिमत्त्वातील विरोधाभासांची रंजक ओळख सुरू होते. *दोन रुपये चाळीस पैशांतून दिसलेलं तत्त्वज्ञान* एका व्यापाऱ्याकडून चुकून दोन रुपये चाळीस पैसे जास्त घेतले गेल्याचं लक्षात आल्यानंतर एकनाथन यांनी ती रक्कम परत करण्यासाठी स्वतःचे शंभर रुपये खर्च करून माणूस पाठवला. रक्कम छोटी होती; पण हिशेबातील तत्त्व मोठं होतं. त्यांच्या दृष्टीने पैशाची किंमत त्याच्या रकमेवर नव्हे, तर तो योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याच्या प्रामाणिकपणावर ठरत होती. नियम पाळताना ते कोणतीही तडजोड करत नसत. मात्र, कर्मचाऱ्याचा न्याय्य लाभ असेल, तर त्याला मंजुरी देण्यासही ते मागेपुढे पाहत नसत. नियमभंग करणाऱ्यांसाठी कठोर आणि हक्कासाठी पात्र असणाऱ्यांसाठी तत्पर, ही त्यांच्या कार्यपद्धतीची दोन टोकं होती. त्यांची वक्तशीरपणाची कल्पनाही विलक्षण होती. उशिरा येणं चुकीचं; पण वेळेच्या खूप आधी येणंसुद्धा शिस्तीच्या चौकटीबाहेरचं! “Before time is also not the right time.” या भूमिकेतून त्यांच्या नियमप्रियतेचा अतिरेक जाणवतो; पण त्याच वेळी प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःची एक काटेकोर चौकट असणारा माणूसही दिसतो. *शिस्तीच्या पोलादी चौकटीमागचा माणूस* एकनाथन यांची शिस्त कधी कधी इतरांना विक्षिप्तपणाच्या जवळ जाणारी वाटे. स्फोटक कारखान्यातील सुरक्षानियमांचं काटेकोर पालन असो किंवा बंदुकीच्या हाताळणीतील खबरदारी, नियम म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नव्हेत, अशी त्यांची धारणा होती. पण या कठोरतेला दुसरी बाजूही होती. कार्यालयातील शिपाई पत्नी-मुलांसह त्यांच्या वातानुकूलित दालनात झोपलेला आढळला. अशा वेळी कारवाई होईल, अशी अपेक्षा असताना एकनाथन यांनी त्याला विचारलं, “तुम हमारे चेंबर मे सोता?” या प्रश्नात नियम मोडल्याची जाणीव होतीच; पण त्याहून आधी दुसऱ्या माणसाच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यांच्या स्वभावातली ही माणुसकी मोठ्या भाषणांतून नव्हे, तर अशा छोट्या प्रसंगांतून व्यक्त होते. म्हणूनच त्यांचं व्यक्तिचित्र एकरेषीय होत नाही. *एकटेपणाचा स्वीकार की त्याची किंमत?* एकनाथन यांनी अविवाहित राहणं, मोजक्याच वस्तूंमध्ये आयुष्य घालवणं, दूरचित्रवाणी-रेडिओपासून दूर राहणं आणि सामाजिक समारंभ टाळणं पसंत केलं. स्वतःच्या अवकाशाबाबत ते अत्यंत आग्रही होते. नातेसंबंधांच्या गर्दीपेक्षा एकांत त्यांना अधिक जवळचा वाटत होता. मात्र, आयुष्याच्या उत्तरार्धात आजारपणाने त्यांची शारीरिक स्वायत्तता हिरावून घेण्यास सुरुवात केली. कर्करोगावरील उपचारांसाठी केरळला गेल्यानंतर भावाच्या घरी राहणंही त्यांना अवघड वाटलं. आपल्यामुळे भावाच्या कुटुंबाला गैरसोय होऊ नये, या विचाराने त्यांनी हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमान आणि स्वावलंबन यांची ही भूमिका समजण्यासारखी असली, तरी तिची किंमत एकटेपणाच्या रूपाने मोजावी लागते. लेखकाने दिलेल्या वडिलांच्या जुन्या पलंगावर अखेरच्या काळात त्यांना आधार मिळाला, हा तपशील मनाला स्पर्शून जातो. आयुष्यभर व्यवहारात काटेकोर राहिलेल्या एकनाथन यांनी त्या पलंगाचा स्वीकार केला. काही नाती शब्दांनी नव्हे, तर अशा साध्या कृतींनी व्यक्त होतात. २०१९ मध्ये मोठ्या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी लेखकाला म्हटलं— “Is this life, Deshmukh? I have to struggle for reaching even upto toilet.” आणि त्यानंतरची त्यांची विनंती अधिक बोलकी होती— “Try to come more frequently. I know it is a long distance. But I need to talk to someone like you with whom I can interact.” जगापासून अंतर राखणाऱ्या माणसालाही अखेरीस संवादाची गरज भासते. दुसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालं. आयुष्यभर स्वावलंबनाचा आग्रह धरणाऱ्या या माणसाच्या शेवटच्या शब्दांत मात्र सोबत हवी असल्याची साधी, मानवी ओढ होती. *दहा कोटीत एक हीच खरी ओळख* एकनाथन यांच्यात दोष नव्हते, असं लेखक सांगत नाही. त्यांच्या कठोरतेचा अतिरेक, सामाजिक अलिप्तता आणि विचित्र वाटणाऱ्या सवयी लपवण्याचाही प्रयत्न करत नाही. यामुळेच हे व्यक्तिचित्र अधिक विश्वासार्ह बनतं. एखाद्या माणसाचं मोठेपण सिद्ध करण्यासाठी त्याला निर्दोष ठरवण्याची गरज नसते. निवृत्तीपूर्वी एकनाथन यांनी लेखकाला विचारलं होतं, आपण गेल्यानंतर लोक आपल्याला चांगलं म्हणतील की वाईट? त्यावर लेखकाने दिलेलं उत्तर या पुस्तकाच्या शीर्षकाचा अर्थ उलगडतं— “I won`t tell people as to whether he was a good man or bad man, but whenever such reference comes I would certainly say that he was a man one in ten crore!” ‘दहा कोटीत एक’ ही उपाधी म्हणजे एखाद्या माणसाला देवत्व देणं नव्हे. ती त्याच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची, तत्त्वांशी असलेल्या निष्ठेची आणि सहज वर्गीकरणात न मावणाऱ्या स्वभावाची नोंद आहे. एकनाथन यांचं व्यक्तिमत्त्व समजून घेताना ‘अंतरंगीचे आभाळ : एक काव्यवर्तुळ’ या काव्य संग्रहातील ‘माणसातले सुंदर गुण’ ही कविता आठवते. “संकट येता कुणाचा हात पुढे सरतो; नाव न विचारता माणूस माणसाला धरतो.” एकनाथन यांच्या आजारपणात लेखकाने केलेली मदत आणि चंदूभाऊ पवार यांनी दाखवलेली माणुसकी या ओळींना जगण्याचा संदर्भ देतात. माणुसकी नेहमी गोड शब्दांतूनच व्यक्त होते असं नाही. कधी ती एखाद्याच्या हक्कासाठी ठामपणे उभी राहते, कधी चुकीच्या गोष्टीला विरोध करते, तर कधी आजारी माणसाच्या एकटेपणात त्याला संवादाची सोबत देते. एकनाथन यांच्यातील गुण आणि मर्यादा दोन्ही समजून घेताना ही कविता माणसाकडे पाहण्याची एक खिडकी उघडते. कारण माणसातले सुंदर गुण गाजावाजा करून येत नाहीत; ते एखाद्या कृतीतून, एखाद्या स्पर्शातून किंवा दुसऱ्याच्या दुःखापाशी थांबण्यातून प्रकट होतात. कवितेच्या शेवटच्या ओळींत म्हटल्याप्रमाणे— “माणूस जपता माणूस— अंतरी उघडे आभाळ.” कदाचित एकनाथन यांच्या आयुष्याकडे पाहण्याची हीच एक दृष्टी असू शकते. त्यांच्या सगळ्या स्वभाववैशिष्ट्यांशी सहमत न होताही त्यांच्यातील माणूस समजून घेणं, हीच या पुस्तकाची आणि त्यातून मिळणाऱ्या अनुभवाची खरी कमाई आहे. जी. बी. देशमुख यांनी आठवणींच्या आधारे उभं केलेलं हे व्यक्तिचित्र वाचकाला एका प्रश्नासमोर उभं करतं—माणसाला त्याच्या गुणदोषांच्या बेरजेतून समजून घ्यायचं, की त्याच्या संपूर्ण जगण्याच्या संदर्भात? ‘दुर्दम्य’ हे पुस्तक एका अजब अधिकाऱ्याची गजब गोष्ट सांगतं; पण त्याचबरोबर शिस्त, स्वाभिमान, माणुसकी आणि एकटेपणा यांच्या सीमारेषांवरही विचार करायला लावतं. काही माणसं आपल्याला आवडतात म्हणून लक्षात राहत नाहीत; ती आपल्याला विचार करायला भाग पाडतात म्हणून लक्षात राहतात. एकनाथन हे त्यापैकीच एक. माणसाला समजून घेण्याची, त्याच्या गुणदोषांसह त्याच्याकडे पाहण्याची आणि माणुसकीच्या अर्थाचा नव्याने शोध घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे पुस्तक अवश्य वाचावं. कारण काही पुस्तकं केवळ एका व्यक्तीची ओळख करून देत नाहीत; ती आपल्याला माणसांकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात. हे पुस्तक त्यापैकीच एक. ..... विजय भास्कर , अमरावती ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
नरेंद्र तायडे, अमरावती

*दुर्दम्य* पुस्तक आज हाती घेतलं, शेवट कधी झाला कळलंच नाही. अक्षरशः डोळे पाणावले कधी गदगद हसुन तर कधी गहिवरून *खरंच* दहा करोडात एक होता एकनाथन अप्रतिम शब्दप्रपंचाने घडले व्यक्तीदर्शन... ...... नरेंद्र तायडे, अमरावती