* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662993
  • Edition : 9
  • Publishing Year : FEBRUARY 1989
  • Weight : 120.00 gms
  • Pages : 140
  • Language : MARATHI
  • Category : LITERATURE
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WE ALL HAVE A GIFT OF THINKING AND EXPRESSING, FEW OF US HAVE THE CAPACITY OF PUTTING THOUGHTS INTO WORDS, BUT THE CAPABILITY TO EXPRESS CORRECTLY AND EFFECTIVELY IS POSSESSED RARELY; VA PU IS ONE OF SUCH RARE PEOPLE. HE IS THE MOST FAMOUS, LOVED AND SOUGHTAFTER WRITER IN THE HISTORY OF MARATHI LITERATURE. A WRITER ALWAYS HAS A STORE OF EXPERIENCES WITHIN HIM, EAGER TO COME OUT; AWAITING A VENT. NOT ALL OF THEM ARE PUT INTO WORDS. YET, MANY OF THESE EXPERIENCES MEET US AS STORIES OR DRAMAS OR POETRY OR NOVEL; SOME OR THE OTHER FORM OF LITERATURE. SOMETIMES, SOME EXPERIENCES REFUSE TO APPEAR IN THE RECOGNIZED FORMS; BUT THE URGE TO APPEAR COMPELS THEM TO COME OUT IN SOME AESTHETIC FORM, INNOVATIVE IN PRESENTATION, UNIQUE IN STYLE, EXCLUSIVE IN NATURE. THE WORK INCLUDED UNDER THIS TITLE "NIMITTA` WHICH MEANS STIMULUS COMES UNDER THE ABOVE MENTIONED CRITERIA. THEY ALL BEAR THE SALIENT FEATURES OF VA PU`S WRITINGS. THEY HAVE CERTAINLY ADDED TO THE TREASURE OF MARATHI LITERATURE HIGHLIGHTING HIM AS A PROMINENT AUTHOR.
आजचे सर्वाधिक लोकप्रिय मराठी लेखक वपु. काळे यांच्या लेखनाचा हा एक आगळावेगळा संग्रह. लेखकाच्या मनोविश्वात अनंत अनुभव खदखदत असतात. स्वतःला शब्दरूप घेण्यासाठी आसुसलेले असतात. त्यांतील काही कथारूप घेतात, काहींच्या कादंबया होतात, काहींच्या कविता, तर काही नाट्यरूपानं सामोरे ठाकतात. काही अनुभव मात्र असे असतात, की त्यांना असलं काही रूप घेता येत नाही. मग काही ‘निमित्ता’नं त्यांना वाचा फुटते आणि ते स्वतःचाच एक स्वतंत्र; परंतु ललित आकार घेतात. अशा अनुभवांचा हा एक गुच्छ आहे : ‘निमित्त.’ रूढार्थानं असो, नसो; वपु. काळ्यांची स्वतःची ठसठशीत नाममुद्रा उमटलेले हे ललितबंधच आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 25-06-1991

    लघुकथेचे स्वरूप आलेले लेख… ‘‘साहित्याकडे मी सहलीसारखंच पाह्यलं... तरी सहल हेच जसं आपलं जीवन होऊ शकत नाही, तसंच साहित्याचं आणि माझं झालं आहे,’’ असे व. पु. काळे यांनी लिहिले आहे. त्यावरून या लेखकाचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही स्पष्ट होतो. अशा तऱ्हने जीवनाला हसतमुखाने सामोरे जाऊन जमेल तसे लेखन केल्याने त्याच्या लेखनात निर्मल प्रसन्नता, निरागस वृत्ती आणि निकोप आशावाद यांचा प्रत्यय येतो. वरील अवतरण प्रस्तुत लेखकाच्या ‘साहित्याचे माझ्या जीवनातील स्थान’ या ‘निमित्त’ या लेखसंग्रहातील लेखातून उद्धृत केले आहे. ‘निमित्त’ या संग्रहात आत्मकथनात्मक लेख, ललितलेख आणि समकालीन समाजातील समस्यांचे हलके- फुलके विवरण करणारे लेख मिळून एकूण पंचवीस लेख समाविष्ट करण्यात आले आहेत. मार्मिक आणि भावमधुर लेखकाचा पिंड मूलत: कथाकाराचा असल्यामुळे सर्व लेखांना लघुकथेचे स्वरूप प्राप्त होते. ते लघुकथेसारख्या आकृतिबंधापासून साकार होतात. नर्म विनोदयुक्त लेखनशैली हा या लेखांचा विशेष होय. ही लेखनशैली अंशत: मार्मिक आणि मोठ्या प्रमाणात भावमधुर झाली आहे. जीवन हे दोष शोधून काढण्यासाठी, निराशेने कुढत राहण्यासाठी नसून प्राप्त परिस्थितीतील दु:खातून आनंदाचे क्षण वेचून, निराग्रही वृत्ती जोपासून जास्तीत जास्त सुखा-समाधानाने जगण्यासाठी आहे, असा सुस्पष्ट ठसा या पुस्तकाच्या वाचनाने मनावर उमटतो. नर्म विनोद सोडून लेखकाचे तंत्र कोटीबाज, दिलखुलास विनोदाकडे झुकले की त्याच्याकडून ‘मी आणि सौ. च्या मैत्रिणी’सारखा लेख लिहिला जातो. हा लेख एक लघुकथाच आहे असे म्हटल्यास फारसे वावगे होणार नाही. ‘तो धुंद क्षण’, ‘रंग पुसू नका’, ‘वाईकर’, ‘इंद्रधनुष्य सूर्याचे, रंग चतुरंगचे’, ‘शादी किसीकी भी हो’ हे या संग्रहातील आणखी काही लघुकथा म्हणून वाचल्यास अधिक वेधक वाटतील असे लेख. आत्मकथनात्मक लेखातील ‘तो काळ सुखाचा’ आणि ‘माझे वाचक, माझे टीकाकार’ या लेखांचा प्राधान्याने निर्देश करावा लागेल. लेखक आपल्या शैशवावस्थेतील मुंबई-पुण्याच्या शालेय जीवनातील अनेकविध स्मृती असीम मन:पूर्वकतेने सांगतो, त्यामुळे तो लेख हृद्य झाला आहे. ‘माझे वाचक, माझे टिकाकार’ हासुद्धा या संग्रहातील एक महत्त्वपूर्ण लेख आहे. या लेखाला अधिक मूल्यवान मानण्याचे कारण असे की, येथे लेखक आपल्या लेखनाच्या प्रारंभकालापासून आपले वाचक आणि टीकाकार कोण होते ते बऱ्याच विस्ताराने निवेदन करतो. अनेक नामवंत साहित्यिकांनी त्याला कसे प्रात्याहित केले ते सांगून लेखकाने त्याचे वडील त्याच्या पहिल्यावहिल्या कथा वाचून एखादा शब्द बदलायला सांगत ती घटना कथन केली आहे. त्यांची ही चिकित्सक दृष्टी पुढे लेखकालाही प्राप्त झाली. तसेच, जाणकार समिक्षकांकडून त्याच्या कथालेखनावर केली गेलेली टिका लेखकाने निरभ्र मनाने आणि खिलाडू वृत्तीने स्वीकारली. चुकीची टीका करणाऱ्या समिक्षकांचाही त्याला कधी संताप आला नाही. उलट विलक्षण चातुर्याने त्यांची टीका कशी गैरलागू होती ते त्यांच्या निदर्शनास आणून दिले. ‘मोहनराव गेले’ या लेखातील कारुण्य हृदय हलविणारे आहे. मानवाशी चाललेला नियतीचा जीवघेणा खेळ लेखक सांप्रतच्या सामाजिक चौकटीच्या अनुबंधात निवेदन करतो. या लेखातील उपरोधाची धार विशेष लक्षणीय आहे. याउलट ‘पाकसिद्धी’ हा लेख एका वेगळ्या विनोदाचा मसाला सादर करतो. हा विनोद फार वरच्या दर्जाचा आहे असे मात्र नव्हे. टीकात्मक लेखन वर म्हटल्याप्रमाणे प्रचलित समाजरचनेतील समस्यांवर लेखकाने हलकी-फुलकी टीका केली आहे. ‘वृद्धाश्रम... सोय की संकट?’ हा लेख पाहा. परदेशातील ‘अ‍ॅथॉरिटी’ना देखील वृद्धाश्रम हे संकट वाटते हे सत्य लेखक येथे सिद्ध करुन दाखवतो. वृद्ध माणसे कौटुंबिक स्वास्थ्यासाठी घरातच हवीहवीशी वाटावयास हवीत. खरोखर, वृद्ध स्त्री-पुरुष हवेहवेसे वाटतील का? ‘जिचकार हे सांगते तर?’ या लेखात लेखक लोकल गाड्यांत स्त्रियांची मंगळसूत्रे खेचून नेणाऱ्या समाजवंâटकांवर अनिवार्य, सात्त्विक संतापानं लिहितो. ‘कुंकू ते हळदीकुंकू’मध्ये लेखक जुन्या जमान्यातील उत्कृष्ट मराठी चित्रपटांची थोरवी आपल्या खास विनोदी पद्धतीने कथन करतो, तर ‘म्युझिकसाठी’मध्ये संगीता जोशींच्या कवितांवर ‘मजेदार’ समिक्षा लिहितो. या लेखकाचे काही लेख स्पष्टपणे निरसतेकडेही झुकलेले आढळतात. ‘प्रिय सादिक - कोहळे’, ‘टुडे.... व्हाय?’ आणि ‘हा देश कुणाचा?’ या लेखात लेखक समाजावर टीकास्त्र उगारतो. समाजातील खोटेनाटेपणा, खोडसाळपणा यांवर त्याने टीका केली आहे. ती बव्हंशी सरळसोपटपणे व्यक्त झाल्याने कलात्मक वाटत नाही. तथापि, हे थोडेसे लेख सोडल्यास प्रस्तुत लेखकाचे बहुसंख्य लेख लघुकथेच्या तंत्रातून साकार झाल्यामुळे प्राय: रोचक बनले आहेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.