* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789353173562
  • Edition : 1
  • Publishing Year : DECEMBER 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 164
  • Language : MARATHI
  • Category : LITERATURE
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ACHARYA ATRE WAS WELL KNOWN FOR HIS VARIOUS ACHIEVEMENTS AND ENDEAVOURS AND TRUELY A VERSETILE VISIONARY WHOSE PASSION FOR MAHARASHTRA IS REVEALED THROUGH HIS CONTRIBUTION TO THE SAMYUKTA MAHARASHTRA MOVEMENT. IT IS UNANIMOUSLY BELIEVED THAT SAMYUKTA MAHARASHTRA MOVEMENT IS HIS CROWNING GLORY AND IS A UNIC EXAMPLE OF A LITERARY WRITER FIGHTING FROM THE FRONT WITH HIS ``PEN AND HIS ORATORY`` FOR THE FOUNDATION OF A UNIFIED STATE. DURING THE SAMYUKTA MAHARASHTRA MOVEMENT HE TRAVELLED WHOLE OF MAHARASHTRA AND WAS A ``MAN ON HIS HEALS`` THAT IS WHY LATE HOUNARABLE PRESIDENT SARVAPALLI RADHAKRISHNAN OFFERED HIS CONDOLENCES BY SAYING ``ACHARYA ATRE WAS NOT ONLY WRITER BUT FIGHTER TOO.`` HOWEVER, EVEN EARLIER HE WAS A FREQUENT VISITOR TO ALL PLACES IN MAHARASHTRA. A STUDY OF HIS LIFE AND WORKS REVEALS AN AMAZING JOURNEY IN THE FAR AND WIDE STRETICH OF PRESENT MAHARASHTRA, BESIDES HIS BIRTH PLACE SASWAD (NEAR PUNE), HIS CULTURAL KARMABHUMY PUNE AND HIS MEDIA AND POLITICAL STRIDES FROM MUMBAI. THIS HELPED UNIFYING THE CITIES AND THE CULTURES OF THE URBAN AND THE RURALS. HE WAS THE MOST FAVOURED ORATOR AND CHIEF GUEST FOR EVERY FUNCTION AND EVERY EVENT, IN THE PUBLIC LIFE OF THE PEOPLE, WHO INVITED HIM FROM FAR OF PLACES AND BEING EXTREMELY SOCIAL AND LOVER OF PEOPLE HE WOULD ATTEND MANY PLACES AND THUS HE TRAVELLED TO THE VARIOUS PARTS OF MAHARASTRA. HE THUS KNEW THE PECULARITIES AND PRACTICES OF ALL AS MUCH AS HE WAS SUCCESSFUL IN LIVING HIS CHARISMA AND HIS THOUGHTS TO INSPIRE THE MILLIONS. HE BECAME A PART OF EVERY INDIVIDUAL`S DREAM. THE BOOK CAPTURES THIS JOURNEY AND PROVIDES AN INSIGHT IN THE MAKING OF THE VISIONARY AND HIS INDELIBLE IMPRINT ON THE MASSES.
महाराष्ट्रातील कोल्हापूर, कऱ्हाड, रत्नागिरी, वाई इ. शहरांशी-गावांशी, तसेच बेळगाव, गोवा, इंदूर इ. महाराष्ट्रेतर ठिकाणांशी आचार्य अत्रे यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध आला. त्यातून राजकीय, ऐतिहासिक, साहित्यिक संचित घडत गेले. त्या संचिताचं आणि अत्रे यांच्या व्यक्तिमत्त्वाचं समग्र दर्शन घडविणारं पुस्तक आहे ‘आचार्य अत्रे : बारा गावचं पाणी.’ १९४६मध्ये बेळगावात झालेल्या साहित्य संमेलनात आचार्य अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्राचा मांडलेला ठराव, गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी झिजवलेली लेखणी, गोव्यातील काही ठिकाणी घेतलेल्या सभा, कोल्हापूरशी आणि वि. स. खांडेकरांशी असलेलं त्यांचं जिव्हाळ्याचं नातं, बाबा कदम आणि शिवाजी सावंतांना त्यांनी दिलेलं प्रोत्साहन, रत्नागिरीच्या साहित्य संमेलनापासून सुरू झालेला अत्रे-फडके वाद इ. अनेक महत्त्वपूर्ण घटनांनी, व्यक्तींनी गजबजलेलं हे पुस्तक आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#आचार्यअत्रेबारागावचेपाणी #अ‍ॅडबाबूरावकानडे #कोल्हापूरनव्हेकलापूर #सातारामराठ्यांचीगादी #वाईदक्षिणकाशी #गोदातीरआणितरंगनाशिक # मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #ACHARYAATREBARAGAVCHEPANI #ADVBABURAOKANADE #KOLHAPURNAVHEKALAPUR #SATARAMARATHYANCHIGADI #VAIDAKHSHINKASHI #GODATIRANITARANGNASHIK #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 23-02-2020

    आचार्य अत्रे आणि विविध गावं यांच्या नात्याचा वेध... आचार्य अत्रे म्हणजे महाराष्ट्राचं अष्टपैलू व्यक्तिमत्व. साहित्य, नाटक, चित्रपट, पत्रकारिता, वक्तृत्व, राजकारण, शिक्षण, समाजकारण आदी विविध पैलूंद्वारे त्यांनी आपली वेगळी छाप उमटवली आहे. महाराष्ट्राच ‘सांस्कृतिक राजदूत’ अशीच त्यांची ओळख होती. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, नाट्य संमेलन, साहित्य संमेलन, व्याख्यानं, चित्रीकरण, नाटकांचे दौरे आदी कारणांमुळे पायाला भिंगरी लावल्यासारखा त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. इतकंच काय; पण देश-परदेशांतही ते अनेकदा गेले. या निमित्त त्यांचा विविध शहरांशी-गावांशी संबंध आला. त्यातून त्यांचे अनेक ठिकाणांशी ऋणानुबंध जुळले. नेमक्या या नात्यांचा वेध अ‍ॅड बाबुराव कानडे यांनी ‘आचार्य अत्रे - बारा गावचं पाणी’ या पुस्तकांद्वारे घेतला आहे. बेळगाव, गोवा, रत्नागिरी, कोल्हापूर, कऱ्हाड, सातारा, वाई, तुळजापूर, पुणे, मुंबई, नगर, औरंगाबाद, नागपूर, दिल्ली आदी शहरांशी आचार्य अत्रे यांचे नातेसंबंध यात उलगडून दाखवण्यात आले आहेत. ‘बेळगाव - महाराष्ट्राचे हृदय’ या लेखात बेळगावविषयी वाटणारी आत्मियता आणि जिव्हाळा आहे. सन १९४६ मध्ये तिथं झालेल्या साहित्य संमेलनाद्वारे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचं रणशिंग अत्रे यांनी फुंकलं. ‘बेळगाव महाराष्ट्राचे हृदय आहे आणि मुंबई मस्तक आहे,’ असं म्हणत एखाद्या शूर शिलेदारासारखं लेखणी आणि वाणीद्वारे आचार्य अत्रे यांनी केलेल्या रोमहर्षक लढ्याचं वर्णन यात आहे. महाराष्ट्राच्या मर्मबंधातली ठेव म्हणून गोव्याला ओळखलं जातं. गोव्यावर अत्रे यांचं नि:स्सीम प्रेम होतं. गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात अत्रे यांनी उडी घेतली. त्यासाठी त्यांची लेखणी ‘नवयुग’मधून आग ओकत होती. त्यांच्या वाणीला धार चढली होती. गोव्यासंबंधीच्या त्यांच्या भाषणांचा आणि लेखांचा एक मोठा ग्रंथ होईल, एवढं त्यांचं योगदान आहे. या साऱ्या बाबी गोव्यावरच्या लेखात आहेत. पुण्याविषयी अत्रे यांना मोठी आत्मीयता होती. नगरसेवकपदापासून ते लोकसभेपर्यंतच्या अनेक निवडणुका अत्रे पुण्यात लढले. भांबुर्डाचं शिवाजीनगर तर रे मार्केटचे महात्मा फुले मार्केट असं नामकरण करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. लोकसभेची निवडणूक पुण्यात ते हरले. त्याचवेळी विधनसभेची निवडणूक ते मुंबईतून जिंकले. त्यावेळी ‘आईने मारले; पण मावशीने तारले’ असे उद्गार त्यांनी काढले होते. पुण्याविषयी अशा अनेक आठवणी ‘पुणे- माझी आई - सांस्कृतिक कर्मभूमी’ या लेखात जागवल्या आहेत. आचार्य अत्रे यांचं कोल्हापूरशी नातं चित्रपटांमुळे आणखी दृढ झालं. ‘ब्रह्मचारी’, ‘वसंतसेना’, ‘महात्मा फुले’ या चित्रपटांसंदर्भातल्या अनेक आठवणी सांगितल्या आहेत. तसंच बाबुराव पेंढारकर, वि. स. खांडेकर, बाबा कदम, शिवाजी सावंत आदींविषयीच्या आठवणींनाही उजाळा ‘कोल्हापूर नव्हे कलापूर’ या लेखात देण्यात आला आहे. सासवडमध्ये अत्रे यांचं बालपण गेलं. त्यावेळच्या अनेक आठवणी, गंमतीजमती आहेत. उनाडक्या, चेष्टा, चकाट्या, नकला यांना ऊत आला होता. त्यावर ‘शक्ती आणि भक्तीचा संगम - सासवड जन्मभूमी’ या लेखात प्रकाश टाकण्यात आला आहे. ‘मी लहानसहान मंडळींशी मैत्री करत नसतो. खंडाळ्यांच्या डोंगर आणि मुंबईचा सागर हीच माझी खरी मित्रमंडळी,’ असं आचार्य अत्रे म्हणत. त्यामुळंच खंडाळा इथला राजमाची बंगला हे त्यांचं एक आवडतं ठिकाण होतं. इथं रंगलेल्या मैफली, नवोदित साहित्यकांचा मेळा, मान्यवरांच्या गाठीभेटी यामुळं हा बंगला अत्रे यांच्या जीवनात उत्साहाचा झरा होता. एका बंगल्याविषयीच्या आठवणी खूप रंजक झाल्या आहेत. आचार्य अत्रे यांचे अभ्यासक अशी अ‍ॅड. कानडे यांची ओळख आहे. खरं तर आचार्य अत्रे यांना ते आपलं दैवतच मानतात. त्याच अनुषंगानं त्यांनी हा लेखनप्रपंच केला आहे. अत्रे यांचा अनेक गावांशी - शहरांशी ऋणानुबंध जुळला. तिथल्या आठवणींना कानडे यांनी एका धाग्यात गुंफलं आहे, हा अतिशय स्तुत्य प्रयोग आहे. खरं तर ही गावंच आचार्य अत्रे यांच्या आठवणी सांगत आहेत, असा भास आपल्याला होतो, इतकं प्रत्ययकारी लेखन कानडे यांनी केलं आहे. मात्र, हे करत असताना आचार्य अत्रे यांच्याशी ज्यांचे वादविवाद झाले, त्यांनाही कानडे यांनी झोडपून काढलं आहे. अत्रे यांच्या नजरेतून त्यांनी पाहिलं असल्यामुळं हे झालं असावं, असं वाटतं. मात्र, त्यांनी हे टाळायला हवं होतं, असं वाटतं. अत्रे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांनी तर हे पुस्तक वाचावंच, शिवाय ज्यांना महाराष्ट्राची सांस्कृतिक चळवळ, संयुक्त महाराष्ट्र यांविषयी यांविषयी आत्मियता आहे, त्यांनीही हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे. अत्रे यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची ओळख आपल्याला या पुस्तकातून निश्चित होते, एवढं नक्की! – सु. ल. खुटवड ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more