* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KESHAVSUT : KAVYA ANI KALA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662054
  • Edition : 4
  • Publishing Year : 1956
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 192
  • Language : MARATHI
  • Category : LITERATURE
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
  • Discount : RAJBHASHA DIVAS(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
KESHAVSUT IS KNOWN AS THE FATHER OF MODERN MARATHI POETRY. HE USHERED A RENAISSANCE IN MARATHI POETRY BY WRITING ABOUT THEMES OF LOVE, PATRIOTISM, FREEDOM AGAINST THE CASTE SYSTEM, CELEBRATION OF SELF-EXPRESSION, AND BEAUTY. KESHAVSUT’S CONTRIBUTION TO MARATHI POETRY IS INCREDIBLE. V.S.KHANDEKAR APTLY PENNED OUT FEATURES OF HIS POETRY & HIS CONTRIBUTION IN THIS BOOK.
‘...तुमच्याआमच्या क्षणभंगुर अनुभूतीतले सौंदर्य टिपून घेण्याचे आणि त्याला चिरंजीव रूप देण्याचे सामथ्र्य केशवसुतांच्या प्रतिभेत आहे. जीवनाच्या उगमापासून मुखापर्यंत स्वैर संचार करण्याचे साहस तिने प्रकट केले आहे. विशाल मानवी संसार ज्या खोल पायावर उभारला गेला आहे, त्याचा वेध जितक्या अचूकपणे तिने घेतला आहे, तितक्याच समर्थपणे तिने त्याच्या अंतिम मूल्यांचाही आविष्कार केला आहे. हा संसार सर्व बाजूंनी काव्याने वेढला गेला आहे, एवढेच नव्हे, तर बाह्यत: खडकाळ भासणाNया त्याच्या अंतरंगातूनही काव्याचे अमृतझरे वाहत आहेत, याची जाणीव त्यांनी पदोपदी प्रकट केली आहे. केशवसुतांच्या कवितेने तुमच्याआमच्या— जगातल्या प्रत्येक माणसाच्या— किती तरी मुक्या सुखदु:खांना बोलायला लावले आहे आणि आंधळ्या प्रीतीला व पांगळ्या आकांक्षांना लीलेने आशेच्या शिखरावर चढवले आहे. माळरानावर उपेक्षित स्थितीत पडलेल्या शिलेवरला अदृश्य, पण अद्भुत लेख ती वाचते, पायांखाली तुडवल्या जाणाNया अंगणातल्या रांगोळीतले उदात्तत्व ती जाणते आणि अज्ञाताच्या पडद्यामागे लपलेल्या जीवनरहस्याचे अंधूक तरी दर्शन घडावे, म्हणून ती तडफडते. ती जितकी आत्मनिष्ठ तितकीच विश्वप्रेमी, जितकी हळवी तितकीच बंडखोर, जितकी उदास तितकीच उदात्त, जितकी करुण तितकीच कठोर आहे. ती मनुष्याच्या आत्म्याची िंकचित ओबडधोबड, पण अतिशय सजीव अशी प्रतिमा आहे...’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #केशवसुत :काव्य आणि कला
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 09-08-1998

    ‘केशवसुत : काव्य आणि कला’ या वि. स. खांडेकर संपादित पुस्तकाची पहिली आवृत्ती १९५६ साली निघाली होती. आता ही दुसरी आवृत्ती आलेली आहे. लेखक किंवा कवी जसजसा जुना होत जातो, तसतसे त्यांच्याकडे कळत नकळत तरुण वाचकांचे दुर्लक्ष होण्याचा संभव असतो. सर्वसामान्यवाचक वर्तमानकाळांत रंगलेला असतो. जुन्या अभिजात साहित्याशी त्याची ओळख नसू शकते. म्हणून जुने श्रेष्ठ साहित्य सामान्य वाचकांपर्यंत नेण्याच्या उद्देशाने खांडेकरांनी ‘आगरकर : व्यक्ती आणि विचार’ तसेच ‘वा. म. जोशी : व्यक्ती आणि विचार’ ही पुस्तके संपादित केली होती. त्यानंतरचे त्यांचे ‘केशवसुत : काव्य आणि कला’ हे तिसरे पुस्तक आहे. खांडेकरांनी केशवसुतांच्या कवितांपैकी ६५ कविता या पुस्तकात समाविष्ट केलेल्या आहेत. काही कवितांच्या सरसतेच्या दृष्टीने संक्षेप केलेला आहे. केशवसुतांनी मराठी कवितेला नवीन वळण लावताना जे विविध प्रयोग केले, त्याची कल्पना यावी म्हणून काव्य गुणांच्या दृष्टीने मध्यम असलेल्या काही कवितांचाही समावेश करण्यात आलेला आहे. खांडेकरांच्या प्रस्तावना अभ्यासपूर्ण असतात, पण विद्वज्जड नसतात. तसेच काही पुस्तकांची प्रस्तावना वाचनीय आहेत. वैशिष्ट्यपूर्णही आहेत. सर्वसामान्य वाचकाला या कवीच्या कवितेपर्यंत आपल्याला पोचवायचे आहे, याचे भान ठेवूनच खांडेकरांनी ही वेधक प्रस्तावना लिहिलेली आहे. केशवसुतांच्या कवितेची विविध अंगांनी ओळख करून देताना ज्या पद्धतीने विवेचन ते करत जातात की वाचकाला त्या त्या क्षणी मूळ कविताच वाचण्याचा मोह व्हावा. प्रस्तावनेच्या दुसऱ्या भगात केशवसुतांच्या चरित्रविषयक संदर्भाचे उल्लेख खांडेकरांनी कलेले आहेत. केशवसुतांच्या मानी स्वभावाचे त्यांच्या संसाराचे, वात्सल्य भावनेचे उल्लेख करून पुढे ते म्हणतात, ‘‘त्यांचे कवित्व हाच कलावंत या नात्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून घेण्याचा सर्वात सुलभ आणि विश्वसनीय मार्ग आहे.’’ १८८६ साली शालेय वयात लिहिलेल्या ‘कविता आणि कवी’ एकूणच मराठी कवितेला नवे वळण देणाऱ्या कवितेपासून १९०३ मध्ये लिहिलेल्या ‘प्रतिभा’ या कवितेपर्यंत केशवसुतांच्या मनाचा एकच ध्यास दिसून येतो तो म्हणजे कवितेबाबतची नवी दृष्टी. लोकांच्या पचनी पडावयास हवी. खांडेकरांनी या संबंधात अनेक कवितांची उदाहरणे देऊन हे स्पष्ट केले आहे. काव्यनिर्मिती हाच आपल्या जीवनाचा प्रधान हेतू मानणाऱ्या अस्सल कलावंताचा हा ध्यास होता. केशवसुतांच्या या ध्यासात आत्मनिष्ठा आहे. या माधवराव पटवर्धनांच्या आक्षेपालाही त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो; परंतु तो अपुरा, अर्धवट सोडल्यासारखा वाटतो. केशवसुतांची आत्मनिष्ठा, स्त्री-पुरुष प्रीतीचे चित्रण, निसर्ग कविता, सामाजिक कविता, केशवसुतांची आध्यात्मिकता, भाषाशैली, कल्पकता की कल्पनाचमत्कृती अशा विविध मुद्यांच्या अंगाने कवी केशवसुतांच्या काव्यकलेचा खांडेकरांनी वेध घेतलेला आहे. रसिकांना आणि अभ्यासकांना केवळ सहाय्य नव्हे, तर कवितेकडे पाहण्याची दृष्टी देणारे हे पुस्तक आहे. केशवसुतांच्या कवितेच्या अभ्यासकाला कवितेचे अंतरंग उलगडून दर्शविणारे हे पुस्तक निश्चितच लक्षणीय वाटावे. परिशिष्टात शब्दार्थ व टीपाही दिलेल्या आहेत. विद्यार्थीदशेतील वाचकाला अभ्यासकाला त्याची निश्चितच गरज भासते. कवितेचे वृत्त, जाती इत्यादी गोष्टींचेही उल्लेख उपयुक्त आहेत. केशवसुतांच्या आत्निष्ठ तितक्याच विश्वप्रेमी, हळव्या, तितक्या बंडखोर, उदास तितक्याच उदार करुण तितक्याच कठोर कवितेची ‘खांडेकरी मीमांसा’ हे कवितेसारखेच तितक्याच मोलाची ! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो