* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789353174163
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2020
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 352
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ARDHADASHAK NOVEL IS BASED ON THE LIFE OF THE STUDENTS WHO SPEND PRODUCTIVE YEARS OF THEIR LIFE IN JUST FOR PREPARING FOR THE COMPETITIVE EXAMS. TO CRACK A COMPETITIVE EXAMINATION IS DEFINITELY NOT AN EASY TASK. ARDHADSHAK IS ALSO A PERIOD OF TIME. THAT MEANS THE PERIOD OF FIVE YEARS. SOME LUCKY STUDENTS MANAGED TO CRACK THE COMPETITIVE EXAM IN LESS THAN FIVE YEARS , BUT MOST OF THE STUDENTS ARE NOT SO FORTUNATE. THIS IS THEIR STORY. YOU MAY FEEL DEPRESSIVE WHILE READING THIS NOVEL, BECAUSE IT IS CERTAINLY NOT INTERESTING TO KNOW THAT THE CIRCUMSTANCES IN WHICH STUDENTS STUDY, THEY OFTEN FACE FAILURE. THIS NOVEL DOES NOT INCLUDE HOW TO STUDY COMPETITIVE EXAMS OR WHAT TO DO FOR SUCCESS ETC. THERE ARE PLENTY OF BOOKS IN THE MARKET FOR THAT PURPOSE. THIS NOVEL IS A SMALL EFFORT TO HIGHLIGHT THE MENTALITY OF STUDENT STUDYING COMPETITION EXAMS. YOU CAN EXPERIENCE THEIR LIFE FOR SOME TIME AND FOR THOSE WHO HAVE EXPERIENCED EARLIER , A CHANCE TO REMEMBER THE OLD DAYS AGAIN !
‘अर्धदशक’ ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मुलांच्या जीवनावर आधारित कादंबरी आहे. स्पर्धा परीक्षांसाठी पुण्यात आलेला कादंबरीचा नायक मोहन, करमरकर मॅडमशी केलेली मैत्री त्याला गोत्यात आणते. एकूणच, मोहन आणि त्याचे मित्र पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू हे तीन अडथळे कसे पार करतात याचं वास्तव आणि उत्कंठावर्धक चित्रण करणारी ही कादंबरी आहे, जी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची मानसिकता अधोरेखित करते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #अर्धदशक #मिलिंदरमाकांतमहांगडे #मराठीसाहित्य #कादंबरी #यम्पीयस्सी #मोहननिकम #माधववाडा #थोपटेपाटलाचीखानावळ #शेवडेमामा #चौगुलेसाहेब #रघू #गौत्या #श्रीधरमोडक #करमरकरमॅडम #आसावरी #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50% #MADHAVWADA #THOPATEPATLACHIKHANAWAL #SHEVADEMAMA #CHAUGULESAHEB #RAGHU #GAUTYA #SHRIDHARMODAK #KARMARKARMADAM #ASAVARI
Customer Reviews
  • Rating Starमेघना पवार

    viral infection मुळे घरी असल्याने खुप दिवसांनी खर तर खुप वर्षानी एक कादंबरी हातात घेतली… ती म्हणजे लेखक मिलिंद महांगडे यांची अर्धदशक ! आणि त्याच दिवशी रात्री 2 वाजता संपवली…(दोन लेकरांच्या आईने घरात बसून हे करणे म्हणजे एक विक्रमच केला मला वाटते)...करण कादंबरी त्या दर्जाची आहे... वाचकाला खिळवून ठेवणारे आहे… लेखकाने घेतलेली grip सबंध कथेत सुटलेली नाही... शैली ओघवती आहे… सर्व प्रसंग,होस्टेल, त्यातल्या रूम, अभ्यासिका डोळ्यासमोर उभ्या राहतात आणि स्पर्धापरीक्षाचे वास्तव (चांगले आणि तितकेच वाइट् ही) लख्ख समोर उभे राहते.... डोळ्यात पाणी आणते… तसेच मित्रांच्या संवादच्या प्रसंगात खळखळून हसू सुद्धा येते...तिथेच लेखक जिंकतो. ...Read more

  • Rating StarSudhir Kamble

    Milind sir,you wrote true n ground reality picture of compitative exams. it will be very useful for every competitive exam candidate n I will suggest every student n their parent read this one. Keep it up.!

  • Rating Starदेवदत्त साबळे , संगीतकार

    आजच संध्याकाळी मी " अर्ध - दशक " वाचुन पूर्ण केले . खूप सुंदर . विषय अगदी ओघवत्या पध्दतीने मांडला आहे .वाचताना " पुढे काय " ही उत्सुकता कायम ठेवण्यात लेखक यशस्वी झालाय . विविध पात्रांची बोलीभाषा वेगळी असल्याने ती व्यक्तीमत्वं डोळ्यांसमोर उभी राहतात. विशेषतः कोल्हापूरी " असं काय करायलंय ? " किंवा खानदेशी " काय भौ ? " हे ... तसंच सगळी कादंबरी पुण्यात घडते . त्यामुळे तिथली स्थानं , गल्ल्या - बोळं , पुणेरी भषा , पुणेरी पाट्या .... अक्षरशः साक्षात पुणं डोळ्यासमोर येतं . बोलीभाषेतल्या म्हणी , रोजच्या जीवनातील उदाहरणं या मुळे आपण कादंबरी वाचत नसुन त्या सर्वाचा भाग असल्याची अनुभुती मिळते . खरोखर मिलिंद त्याच्या या प्रयत्नात अतिशय यशस्वी झाला आहे . त्याचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे . एक संवेदनशील " लेखक " म्हणून माझा त्याला एक खणखणीत सलाम !! त्याच्या पुढच्या प्रत्येक लिखाण आणि प्रयत्नांना लाख लाख शुभेच्छा ....!!! ---------- शुभाशीर्वाद ... !! ...Read more

  • Rating StarRajendra Jadhav

    Milind, absolutely great, you have touched all thoughts and feelings of those who are preparing for competitive exams. This book never let the reader to divert their mind. I think each reader can recall their past. This book will definitely help to tink, for those who are willing to appear for such competitive exams and their parents too. Once again congratulations and all the best. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.