* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: ADAM
 • Availability : Available
 • ISBN : 9788184982947
 • Edition : 4
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 328
 • Language : MARATHI
 • Category : FICTION
 • Available in Combos :RATNAKAR MATKARI COMBO SET - 14 BOOKS
Quantity
VARAD, THE MAIN CHARACTER OF ADAM. THIS BOOK REVEALS HIS JOURNEY THROUGHOUT THIS LIFE. IN A WAY, IT IS ALMOST SIMILAR TO ANY MAN’S JOURNEY, THOUGHTS, ACTS AND BELIEFS. THIS NOVEL IS IN A WAY THE GRAPH OF HIS COMPLETE LIFECYCLE, RIGHT FROM THE BEGINNING. AT HIS YOUNG TENDER AGE HE IS VERY MUCH CURIOUS ABOUT THE OTHER GENDER, BUT HIS CURIOUSITY IS NEVER SATISFIED IN A PROPER WAY. WHEN HE ATTAINS MATURITY, HE IS RUTHLESSLY USED BY GROWN UP YET UNSATISFIED FEMALES. HE HIMSELF FALLS IN LOVE WHEREAS SHYAMALA MARRIES HIM NOT FOR LOVE BUT JUST FOR CONVENIENCE. LATER, SHE REMARRIES WITH HER OWN FIRST LOVE. THIS LEAVES VARAD IN A VERY SAD STATE OF MIND. HIS SHATTERED MIND TURNS TO PREMA. HE GIVES UNCONDITIONAL SHELTER TO PREMA AND HER CHILDREN WHO LATER ASKS HIM FOR HER SHARE IN HIS PROPERTY. LASTLY, HE SEEMS TO FIND SOLACE IN NIRMALA’S COMPANY. BUT THIS DOES NOT CONTINUE FOR TOO LONG. ONCE AGAIN, VARAD IS LEFT ALL ALONE IN THIS WORLD, LOVELESS…………
अ‍ॅडम`चा नायक वरदचा जीवनप्रवास थोड्याफार फरकाने बऱ्याच पुरुषांचा असतो, तसाच आहे. लहानपणी स्त्री देहाविषयींचे कुतूहल, ते नीटसे न भागणे. पुढे असमाधानी स्त्रियांकडून वापरले जाणे, नंतर खरेखुरे प्रेमात पडणे. त्याच्याविषयी प्रेम नसतानाही `श्यामले`ने सोयीसाठी त्याच्याशी लग्न करणे. आणि कालांतराने आपल्या पहिल्या प्रियकराशी संबंध ठेवून वरदाचे जिने उद्ध्वस्त करणे, जिला तिच्या मुलांसह विनाअट आधार दिला त्या `प्रेमा`ने पुढे घरामध्ये वाटा मागणे आणि ज्या `निर्मले`कडून किंचित्काल प्रेम मिळाले तिलाही अखेर दुरावणे, असा वरदाच्या प्रेमाचा आलेख आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#RATNAKAR MATKARI #PARDESHI#ADAM # SWAPNATILCHANDANE #RANGANDHALA #SANDEH #PARDESHI #MRUTYUNJAYEE #NIRMANUSHYA#EK DIVAVIZTANA#SAMBHRAMACHYALATA #MEHTAPUBLISHINGHOUSE#HORROR STORIES#MARATHIBOOKS #रत्नाकर मतकरी #परदेशी
Customer Reviews
 • Rating StarSachin Kumbhar

  वैवाहिक जीवनात पुरुष शरीरसुख जबरजस्तीने मिळवत असेल तर त्याला बलात्कार ठरवणारे आपण हीच गोष्ट त्याला मिळत नसेल तर वेश्यागमन हा सहज पर्यंत सुचवणारे आपण जेव्हा वरदा हा पर्यंत निवडतो तेव्हा त्याच शरीर त्याला साथ देत नाही हे निव्वळ झिणझिण्या आणणारं ..... तमिळ मधील सुभाषिताने सुरवात झालेली हि कादंबरी पुरुषाला व्यथा असतात हे दृढ करणारी ..... कादंबरीचा नायक वरदा याच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर अनेक स्त्रिया येऊनही स्त्रीलंपट वाटत नाही तो त्यामुळेच .... स्त्रीदेहाविषयी चे लहानपणापासूनचे आकर्षण पुढे दहावीत असताना आपल्याच मोलकरणीसोबत होणारी पूर्ती ..... कळत नकळत असमाधानी स्त्रियांकडून वापरले जाणे ..... कॉजेल मध्ये प्रेमात पडल्यावर आधी नकार पचवून मग स्वार्थासाठी लग्न करणारी श्यामला ..... तिच्याकडून मात्र लग्नाच्या पहिल्या रात्रीच अपमानास्पद वागणूक जिच्या वर प्रेम करूनही जिंकू न शकल्याची भावना ..... त्या नंतर उध्वस्त नायक एक्झिक्युटिव्ह पर्यत उच्च पडला पोहोचूनही आपल्या साहेबाची सोय करून निर्विकार राहणार ...... आपल्या पहिल्या प्रियकरासोबत पळून जाऊन नायकाचं जीवन उध्वस्त करणारी श्यामला ..... एका पोलीस इन्स्पेक्टर ने मुलासहित सोडून दिलेली बायको प्रेमा जिला कसलाही विचार न करता दिलेला थारा नवरा मेल्यानंतर तिच्या मुलांच्या शिक्षणाची जबादारी घेतली पुढे त्याच प्रेमाने घरात वाटा मागताच सर्व सोडून जाणारा नायक .... आपल्याच ऑफिस मधील सहकाऱ्यांकडून काही काळासाठी मिळालेलं प्रेम अखेर तिलाही दुरावणं .....हा सारा प्रेम आणी काम यांचा प्रवास केलेला नायक .... खिळून ठेवण्याचं काम मतकरींनी केलंय .... शारीरिक संबंधाची पुष्कळ वर्णनं येऊनसुद्धा कुठेही अश्लिल न वाटता पुरुषाच्या गरजांवर बोट ठेवणारी तसेच कोणत्याही वाईट मार्गाने न जाता तसाच जगात रहाणं सुचवणारी सोबतच जगण्याचा संघर्ष करणारी कथा जिवंत भासते ..... आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर पुरुषांसाठी सोय आहे आहे असं म्हणून स्त्रियांकडे झुकणारा समाज मग बेगडी वाटू लागतो आणी सुरु होतो नायकासोबत आपलासुद्धा नैतिकतेसोबत झगडा .... ...Read more

 • Rating StarSantosh Rangapure

  अॅडम.... एक अस्वस्थ करणारा विलक्षण अनुभव.... स्त्री पुरुष संबंधां बद्दल इतक्‍या बेधडकपणे लिहिलेलं हे पुस्तक वाचताना खरंतर आतून हादरायला होतं. आजपर्यंत स्त्री च्या दुःखावर, तिच्यावर होणाऱ्या अत्याचारांवर अनेक पुस्तकं लिहिली आणि वाचली गेली परंतु पुरूषाच्या दृष्टीकोनातून त्यांची व्यथा समजून लिहिले गेलेले पुरूषांना समर्पित केलेलं माझ्या वाचनात आलेलं कदाचित हे पहिलंच पुस्तक.... अॅडम अत्यंत बोल्ड आहे कदापि बर्‍याच जणांना ते अश्लील सुद्धा वाटेल परंतु विषयाचा गाभा आणि आशय समजून घेतल्यास या गोष्टी गौण वाटतील आणि अॅडम एक वेगळीच अनुभूती देऊन जाईल. अॅडम चा नायक वरदराज याचा जीवनप्रवास प्रत्येक पुरुषाला थोड्याफार प्रमाणात आपलासा वाटेल, लहानपणी स्त्री देहा विषयीचे कुतुहल, ते नीटसे न भागलया मुळे घडणार्‍या चूका, नंतर खरेखुरे प्रेमात पडणे परंतु पत्नी श्यामला हिने केलेला अनन्वित छळ आणि स्वतःच्या सोयीसाठी त्याचा वापर करून त्याचे जीवन उद्ध्वस्त करणे, नंतर प्रेमा जिला वरद विना अट तिच्या मुलांसह आधार देतो तिचे पुढे जाऊन घरामधे वाटा मागणे आणि ज्या निर्मले कडून अल्पकाळ निस्सीम प्रेम मिळाले तिचे दुरावणे सर्व काही मनाला चटका लावुन जाते. खरंच जगाच्या या रहाटी मध्ये पुरुषाला ही एक संवेदनशील आणि तरल मन असते ज्यात प्रेम, समर्पण, त्याग या सर्व भावना असतात कदाचित समाज आणि लेखनकार हे विसरून प्रत्येक वेळी त्यालाच खलनायक बनवत आहे असे मला वाटते. स्त्रियांवर होणार्‍या अन्याया -अत्याचारांचे चित्रण हा सखोल साहित्याचा केंद्रबिंदू समजला जातो, पण पुरुष वर्गावर देखील इतक्या प्रमाणात नसला तरी अन्याय होतोच मग त्याचे कोणा साहित्यकाराकडून चित्रण होते का? नेमका हाच धागा पकडून मतकरींनी लिहिलेली समस्त पुरुष वर्गाला समर्पित केलेली अॅडम हि कादंबरी अक्षरशः मनाला भावते. आयुष्यभर प्रामाणिक कष्ट करून वरदाला ना व्यावसायिक यश मिळते ना कौटुंबिक सुख, एका परीने जीवन जगण्यासाठी पुरुषाला कराव्या लागणाऱ्या धडपडीवर आणि कराव्या लागणाऱ्या अगणित तडजोडींवर..... एकूण मानवी जगण्यातल्या दुःखावरच ही कादंबरी भाष्य करते. लिखाणाच्या ओघात काही ठिकाणी कादंबरी खूप लांबली आहे तसेच बरीच अनावश्‍यक पात्र घुसवली गेली आहेत असे वाचताना नक्कीच जाणवते आणि कादंबरी मधील पात्रांवर आणि घटनांवर वाचकांचे आक्षेप किंवा मतभेद ही असू शकतील परंतु कादंबरीचा आशय लक्षात घेता पुरुषांच्या वेदनेवर फुंकर घालणारी अॅडम नक्कीच वाचनीय.... ...Read more

 • Rating StarPrathamesh Zore

  प्रथम काहीशा काम दृष्टीने लिहलेले हे पुस्तक पुढे मात्र आयुष्याचा खूप मोठा धडा शिकवते. ज्यांनी हे पुस्तक वाचले आहे त्यांना नक्कीच कळेल ह्या पुस्तकाच्या विषयाची गरज ह्या आताच्या जगात तर खूपच आहे. रत्नाकर मतकरी ❤️❤️🙏

 • Rating StarDipak Bhutekar

  अॅडम! "ज्याच्या ढुंगणावर तीळ आहे तो पुरुष आयुष्यात अनेक खुर्च्यांवर बसतो आणि ज्याच्या लिंगावर तीळ आहे तो अनेक स्त्रियांचा उपभोग घेऊ शकतो" या तामिळ म्हणीने कादंबरीची सुरुवात होते व या म्हणीनेच शेवट होतो. `वरदाच्या आयुष्यात नोकरीच्या रूपाने अनेक खुर्च्ा येतात तसेच अनेक स्त्रिया देखील येतात` मात्र हे आता वाटतंय तितकं गमतीशीर मुळीच नाही. याउलट ते अतिशय दाहक आणि त्रासदायक आहे. स्त्री पुरुषांमधील आकर्षण म्हणजे नक्की काय? हे लहानपणी कुतुहलाने शोधणाऱ्या वरदाला आयुष्याचे पैलू हळुवार उलगडत जातात. त्याच्या आयुष्यात अनेक स्त्रिया येतात खऱ्या; पण स्वार्थापायी कुणी त्याला शरीर सुखासाठी वापरून सोडतात तर कुणी पैशांसाठी. कुणी लुबाडून निघून जाते, तर कुणी फसवून पळून जाते. वरदा पुन्हा पुन्हा आपलं आयुष्य शून्यातून उभं करण्याचा प्रयत्न करतो, कधी प्रेमाच्या बाबतीत तर कधी पोटापुरत्या पैशांसाठी... त्याचाच हा प्रवास म्हणजे रत्नाकर मतकरी लिखित अॅडम! शेवटी वरदाला एक कळतं, स्त्री पुरुष म्हणजे एकमेकांना सुख देण्यासाठी निसर्गाने घडवलेले दोन जीव, त्यांनी हे शरीर आहे तोवर एकमेकांना आयुष्यभर सुख द्यावं. पण प्रत्यक्षात होतं मात्र या उलटच! हे जीव एकमेकांना सुख देण्याऐवजी देतात काय तर दुःख, अवहेलना, त्रास आणि अपमान! एकदातरी हे पुस्तक वाचायलाच हवं... ❤️ ...Read more

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

PARVA
PARVA by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
Veerashri Vaidya - Karandikar

#पर्व #डॉ_एस_एल_भैरप्पा दैवी चमत्कार , शाप , वर या महाभारतातील गोष्टीना फाटा देत त्यावेळी घडलेल्या घटना , प्रसंग ,परिस्थिती त्याचा वस्तूनिष्ठ अर्थ लावून डॉ भैरप्पा यांनी `पर्व` लिहिले आहे आहे. महत्वाच्या मुख्य पात्रांना माणूस म्हणून मांडले आहे.यासाठी महाभारतातील प्रसंग जिथे जिथे घडले तिथे त्यांनी भेटी दिल्या. अनेक अपरिचित रूढी, परंपरा त्यांना दिसून आल्या ,ज्या महाभारत कालीन जीवनात होत्या. कादंबरीमागील लेखकाचा अभ्यास ,तर्कसुसंगत विश्लेषण अगदी प्रस्तावनेपासून दिसून येते. मूळ महाभारत फार परखड आहे ,ते कोणाचेच गुण -दोष लपवत नाही, अगदी भगवान श्रीकृष्णाचे सुद्धा. व्यासांनी सगळ्या पात्रांबद्दल तटस्थपणे लिहिले आहे. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित डॉ भैरप्पांनीही नेमका हाच तटस्थपणा कादंबरीतही कायम ठेवला आहे. कोणत्याही एकाच व्यक्तीवरचे लिखाण म्हणजे त्याच्या दृष्टीकोनातून पूर्ण महाभारत बघण्यासारखे होते. यातून त्या पात्राबद्दल गुणांचे उदात्तीकरण आणि त्यामुळे दोष झाकोळणे हे होतेच , पण समग्र वाचले तर कळते महाभारत ग्रे शेड चे आहे , प्रत्येकाचे गुण-दोष असणारे. `पर्व ` ने ही हेच सूत्र कायम राखले आहे. महाभारताच्या व्यक्तिरेखांबाहेर जाणारी वेगळी अशी कोणीही व्यक्ती नाही असे म्हणतात. अगदी खरे आहे. महाभारत हे चिरंतन आहे. आपण सगळेच दैनंदिन आयुष्यात त्यातले कुठले ना कुठले पात्र जगत किंवा वठवत असतो. कधी भीष्म , कधी धृतराष्ट्र तर कधी कृष्ण सुद्धा ! पात्र चांगले किंवा वाईट असं न बघता, ते जे वागले , त्यांनी जे निर्णय घेतले - त्याचे परिणाम कसे झाले ? आपल्याला त्यांच्याकडून अपेक्षित असलेले असे योग्य निर्णय कोणते होते ? तसे योग्य निर्णय आपण दैनंदिन आयुष्यात वेळ आली तर घेतो का ? , घेऊ शकतो का ? याचे चिंतन हेच त्यातून हाती येणारे सार आहे असे मला वाटते . हे नाही जमलं तरी किमान, परीक्षण करून वागणें हे आपल्या हाती नक्कीच आहे. उमा कुलकर्णी यांच्या उत्तम अनुवादामुळे मराठी भाषेत `पर्व` आपल्यापर्यन्त नेमकेपणाने पोहोचले आहे. महाभारत काळे वा पांढरे नाही तर ग्रे शेड चे आहे. म्हणजे कुठलीच व्यक्ती पूर्ण चांगली किंवा पूर्ण वाईट नाहीये त्यात. दुर्दैवाने आपल्याला वाचताना पचत नाही ते. एकच रंग बघायला आणि समजायला सोपा असतो. म्हणूनही काहींना `पर्व ` रुचत नाही. © वीरश्री वैद्य - करंदीकर ...Read more

VAISHAKH
VAISHAKH by RANJEET DESAI Rating Star
Chetan Koli

खूप मस्त आहे हे पुस्तक... छोट्या कथा आहेत, पण लालित्यपूर्ण आहेत.