* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CRITICAL MASS
  • Availability : Available
  • Translators : SUDARSHAN ATHAWALE
  • ISBN : 9788184988307
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 460
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
JOCELYN "JOSS" COLE, A BURNED-OUT PUBLIC DEFENDER FROM L.A., HAS OPTED FOR A QUIETER LIFE IN THE SAN JUAN ISLANDS OF WASHINGTON STATE. JOSS HAS NO SIGNIFICANT CLIENTS OTHER THAN A GROUP OF COMMERCIAL FISHERMAN SUFFERING FROM A STRANGE AND SERIOUS ILLNESS, A CONDITION THAT DOCTORS CANNOT DIAGNOSE, AND WHICH JOSS BELIEVES HAS AN INDUSTRIAL CAUSE. THEN INTO HER OFFICE COMES DEAN BELDEN, A WELL-HEELED CLIENT IN SEARCH OF A LAWYER TO HELP HIM SET UP A BUSINESS IN THE ISLANDS. WITHIN DAYS BELDEN IS SUBPOENAED TO APPEAR BEFORE A FEDERAL GRAND JURY. LESS THAN AN HOUR AFTER TESTIFYING, AND BEFORE JOSS CAN DISCOVER WHAT HAPPENED IN THE SECRECY OF THE GRAND JURY ROOM, BELDEN DIES IN A FIERY EXPLOSION OF HIS FLOAT PLANE ON SEATTLE`S LAKE UNION. GIDEON VAN RY IS A NUCLEAR FISSION EXPERT AND A SCHOLAR IN RESIDENCE AT THE CENTER FOR NONPROLIFERATION STUDIES IN MONTEREY, CALIFORNIA. ONE OF HIS DUTIES IS TO UPDATE THE CENTER`S DATABASE, AN EXTENSIVE CATALOG LISTING FISSIONABLE MATERIALS AND WEAPONS OF MASS DESTRUCTION. GIDEON IS TROUBLED BY THE APPARENT FAILURE TO ACCOUNT FOR TWO SMALL TACTICAL NUCLEAR DEVICES MISSING FROM A STORAGE FACILITY IN THE FORMER SOVIET UNION.THE TWO WEAPONS WERE LAST SEEN IN PACKING CRATES, TO BE SHIPPED TO AN AMERICAN COMPANY CALLED BELDEN ELECTRONICS. GIDEON HAS BEEN UNABLE TO LOCATE THIS FIRM, AND NOW HE IS LEFT WITH ONLY ONE POSSIBLE LEAD, THE LAWYER WHO INCORPORATED THE COMPANY-JOCELYN COLE. FRAUGHT WITH TENSION AND SUSPENSE, CRITICAL MASS IS STEVE MARTINI AT HIS ELECTRIFYING BEST. IT IS THE STORY OF WHAT CAN HAPPEN IN A WORLD WHERE PRIVATE HATE AND PUBLIC APATHY COMBINE TO UNCORK THE SLEEPING BUT DEADLY GENIE OF NUCLEAR TERROR.
प्रचंड गर्दी आणि गजबजाटाच्या आयुष्याला कंटाळलेली वकील जोसलीन कोल शांतता आणि एकान्त शोधण्यासाठी वॉशिंग्टन राज्यात स्थायिक होते... एक नवा व्यवसाय उभारण्याच्या कामात मदत करायला वकील शोधत डीन बेल्डन जोसलीनच्या ऑफिसमध्ये येतो. काही दिवसांत डीनला ग्रँड ज्यूरींसमोर साक्षीसाठी उभे राहावे लागते; पण अचानक त्याचा मृत्यू होतो... अणुविभाजन विषयातील तज्ज्ञ गिडियन रे एका गंभीर गोष्टीने अस्वस्थ होतो. रशियात दोन अणुबाँबचा शोध लागत नसतो आणि ते नकली चलनावर ‘बेल्डन इलेक्ट्रॉनिक्स’ या कंपनीच्या पत्त्यावर पाठवलेले असतात. याचा तपास घेण्यासाठी गिडियन पोहोचतो बेल्डनची कंपनी स्थापन करणाऱ्या वकील जोसलीनकडे! यातून उलगडत जाते एक उत्कठावर्धक – प्रचंड संहार करणाऱ्या अणुबाँबची आणि हीन दर्जाच्या राजकारणाची!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #CRITICALMASS #CRITICALMASS #क्रिटिकलमास #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUDARSHANATHAWALE #STEVEMARTINI #स्टीव्हमार्टिनी "
Customer Reviews
  • Rating StarKiran Borkar

    जेनिफर कोल हि तरुण वकील वाशिंग्टनमधील एका छोट्या गावात आपला वकिली व्यवसाय करीत शांतपणे जगतेय . एक नवा उद्योग चालू करण्यासाठी डीन बेल्डन तिची मदत घेतो .पण काही दिवसांनी त्याला ज्यूरीसमोर चौकशीसाठी बोलाविण्यात येते पण अचानक तिथे त्याचा मृत्यू होतो . गिियन रे हा संयुक्त राष्ट्राचा आण्विक शस्त्रांचा तज्ञ आहे .राशियातून दोन आण्विक शस्त्रे चोरीला गेल्यामुळे तो अस्वथ आहे .त्याचा पाठपूरवठा करताना त्याला ती दोन शस्त्रे कुठे पाठवली त्याचे चलन सापडते ,त्यावर बेल्डनच्या कंपनीचे नाव असते . तपासासाठी तो त्याच्या वकीलाकडे ,जोसलीन कोलकडे येतो आणि उलगडत जाते एक भयानक सत्य. एका छोट्या गोष्टीने सुरवात झालेली हि कथा शेवटी पोचते ती प्रचंड संहार करणाऱ्या अणुबॉम्बकडे आणि हीन दर्जाच्या राजकारणाकडे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.