* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BILLY BUDD
  • Availability : Available
  • Translators : SHIRDHANKAR BHANU
  • ISBN : 9789353171995
  • Edition : 1
  • Publishing Year : 1966
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 80
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :AMERICAN CLASSICS COMBO SET-17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
BILLY BUD IS SELECTED AS THE SAILOR FOR THE WARSHIP ‘INDOMITABLE’. THE COMMANDING FORCES OF THE SHIP ARE WARY AND WORRIED AS THE SAILORS ALL OVER THE WARSHIPS HAVE GONE BERSERK. REVOLT IS THE ONLY WORD THAT THEY SEEM TO UNDERSTAND. NATURALLY, TO MAINTAIN DISCIPLINE, THE OFFICERS HAVE TO TAKE HARSH ACTIONS. JOHN KLAGART IS RESPONSIBLE FOR THE ‘FLAG’ DEPARTMENT. VAGABOND BY NATURE, HE HAS A KEEN EYE ON THE FELLOW SAILORS. IT IS HIS DOUBT THAT BILLY BUD, A NOTORIOUS SAILOR IS TRYING TO PROVOKE OTHER SAILORS. WHEN HE EXPRESSES HIS DOUBT, CAPTION VERR GOES WILD. THOUGH SOFT AND SWEET BILLY BUD IS FAMOUS AMONG FELLOW SAILORS, HE GETS SUPREMELY INSULTED WITH THE ACCUSATIONS PUT FORTH BY JOHN. HIS WRATH UPSETS THE ENVIRONMENT AT THE ‘INDOMITABLE.’ THE BOOK PRESENTS THE STORY OF THESE ACCUSATIONS AND THEIR FRIGHTENING IMPACT.
‘इन्डॉमिटेबल’ युद्धनौकेवरील खलाशी बिली बडला त्याचे सहकारी अडचणीत आणत असतात. जॉन क्लॅगार्ट हा निशाण खात्याचा प्रमुख या सगळ्या प्रकारामागे आहे, असं या युद्ध नौकेवरचा अनुभवी पण वयस्कर खलाशी लास्कर, बिलीला वारंवार सांगतो; एके दिवशी अगदी सहजपणे जॉनचं खरं रूप बिलीच्या समोर येतं. काय होतं तेव्हा?
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#HERMAN MELVILLE# SHISTICHA BALI# BHANU SHIRDHANKAR# #हर्मन मेलव्हिल#शिस्तीचा बळी#भानू शिरधनकर#
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 20-05-2019

    समुद्रसफरीतील रोमहर्षक कादंबरी... ‘टैंपी’ या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आणि तनामनाने दर्यावर्दी असलेले हर्मन मेलव्हिल यांनी आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात लिहिलेल्या आणि मृत्यूनंतर प्रकाशित झालेल्या ‘बिली बड’ या कादंबरीचा मराठी अनुवाद ‘शिस्तीचा बळी’ ा नावाने प्रसिद्ध झाला आहे. या छोट्याशा कादंबरीत शाही आरमारी दलात ‘इन्डॉमिटेबल’ या युद्धनौकेवर निवड झालेल्या बिली बड या खलाश्याच्या आयुष्याची काव्यात्म आणि विश्लेषणात्मक मांडणी केली आहे. जहाजावरील छोटा अधिकारी जॉन क्लॅगार्ट हा बिली बडवर बेदिली माजविण्याचा संशय व्यक्त करतो. त्यातून बिली खवळून उठतो आणि युद्धनौकेवर खळबळ माजते. बिलीवरचा आरोप नौदलाची शिस्त आणि मानवी मनाची जडणघडण यात हे रोमहर्षक कथानक पुढे सरकत राहते. ...Read more

  • Rating StarLOKPRABHA 12-04-2019

    शिरधनकर यांचे साहित्यघन... साठ ते ऐंशीचे दशक वैविध्यपूर्ण लिखाणाने गाजविणाऱ्या भानू शिरधनकर यांची पुस्तके आज वाचकांना माहिती नसल्याने विस्मृतीत गेली आहेत. त्यांनी अनुवादित केलेली दोन पुस्तके गेली अनेक वर्षे अनुपलब्ध होती. मेहता पब्लिशिंग हाऊसने ती दर्मीळ झालेली पुस्तके मिळवून त्यांचे पुनर्प्रकाशन केले. त्यानिमित्ताने आपल्याकडील वाचनव्यवहारासोबत शिरधनकर यांच्या साहित्याचा घेतलेला हा शोध... एकूणच लेखकांना घाऊकरीत्या विसरले जाण्याच्या या आरंभ काळात मेहता पब्लिशिंग हाऊसने वेगवेगळ्या कारणांनी गतस्मृत झालेल्या भानू शिरधनकर यांच्या दोन अनुवादित पुस्तकांच्या केलेल्या जीर्णोद्धाराची घटना ही आजच्या वाचकांसाठी महत्त्वपूर्ण आहे. एकोणीसशे चाळीस ते सत्तर या काळात अफाट लेखनप्रपंच करून या लेखकाने मराठी साहित्याला अत्यंत नवख्या असलेल्या विषयांची भर घातली होती. वाचनवेड, प्राणी-पक्षी, सागरी साहस, गुन्हेगारी विश्व, समुद्रामार्गे होणारी सोन्याची तस्करी, क्रीडा अशा सर्वच विषयांवर भाषिक सामर्थ्याने त्यांनी लेखणी चालवली. चाळीसच्या दशकापासून शिरधनकर यांनी ‘किर्लोस्कर’मध्ये सागरी जीवनावरच्या आपल्या आणि इतरांकडून ऐकलेल्या अनुभवांना शब्दबद्ध करण्यास सुरुवात केली. ‘उधानवारा’, ‘सागर संग्राम’, ‘शिमाळ आलं, शिमाळ आलं!!’ ही रिपोर्ताजरूपी लेखांची सागरी जीवनावरील इत्थंभूत माहिती देणारी मराठीतील पहिली-वहिली पुस्तके शिरधनकर यांच्या नावावर आहेत. त्यामुळे जगप्रसिद्ध अमेरिकी लेखक हर्मन मेलविल यांच्या एकोणिसाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या ‘बिली बड’ आणि ‘टायपी’ या सागरी जीवनावरच्या कादंबऱ्या त्यांच्याजवळ अनुवादासाठी आल्या असाव्यात. १९६६ साली दोन्ही कादंबऱ्या ‘पाचूचे बेट’ आणि ‘शिस्तीचा बळी’ या नावाने एकाच पुस्तकाद्वारे प्रकाशित झाल्या होत्या. – पंकज भोसले ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more