* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: THE MAN FROM PAKISTAN
 • Availability : Available
 • Translators : SHEKAR JOSHI
 • ISBN : 9788184985566
 • Edition : 2
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 456
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
 • Print Books:
THE MAN FROM PAKISTAN BY DOUGLAS FRANTZ AND CATHERINE COLLINS IS A SHOCKING AND INTRIGUING TALE ABOUT INTERNATIONAL LEVELS. THE NOVEL IS AN INTENSE AND FAST - MOVING STORY TOLD THROUGH THE EYES OF AMERICAN AND EUROPEAN OFFICIALS. THE SECOND NUCLEAR AGE HAS BEGUN AND THERE IS FEAR ALL AROUND. NOT SINCE THE END OF THE COLD WAR HAS THERE BEEN SUCH FEAR ABOUT A POSSIBLE NUCLEAR DISASTER. THIS TIME IT`S WORSE AS THE EFFECTS COULD NOW BE LARGER AND MORE DEVASTATING. SHOULD SUCH AN ACT HAPPEN, IT IS POSSIBLE THAT THE MASTERMIND BEHIND IT IS THE FORMIDABLE ABDUL QADEER KHAN. ABDUL QADEER KHAN IS THE PAKISTANI MAKER OF THE POWERFUL ISLAMIC BOMB. HE HAS MASTERMINDED A VAST NUMBER OF UNDERGROUND ENTERPRISES THAT HAVE LED TO THE SELLING OF NUCLEAR SECRETS TO COUNTRIES LIKE LIBYA, IRAN AND NORTH KOREA. KHAN`S ORGANISATION MAY BE A LOOSE - KNIT ONE, BUT ITS THREAT REMAINS. IT STILL HAS THE CAPABILITY TO SELL WEAPON BLUEPRINTS, PARTS AND CONTAINS THE KNOW - HOW TO BRING TOGETHER THE PARTS INTO A DO - IT - YOURSELF BOMB KIT. IN SUCH A SITUATION, ONE WOULD EXPECT THE AMERICAN AUTHORITIES TO TAKE ACTION AND HALT ALL SUCH OPERATIONS, BUT TO EVERYONE`S SURPRISE THEY CHOOSE TO LIE LOW AND WATCH KHAN`S ACTIONS. AS THEY AWAIT KHAN`S EVERY NEXT STEP, ONE BY ONE HE PROVES ALL PROBABLE INTERNATIONAL SAFEGUARDS TO BE DEFUNCT. HE PROVES TO THE WORLD THAT NONE OF THEM MATTER AND ARE COMPLETELY DYSFUNCTIONAL. THE SUSPICION WAS ON KHAN RIGHT FROM THE BEGINNING AND AMERICAN AND EUROPEAN OFFICIALS ULTIMATELY DO CATCH HOLD OF HIM, BUT UNFORTUNATELY THE NUCLEAR GENIE IS OUT AND IS NOW OF GREAT DANGER. THE MAN FROM PAKISTAN IS AVAILABLE IN PAPERBACK. THE BOOK WAS PUBLISHED IN 2008 BY TWELVE.
आंतरराष्ट्रीय पातळीवर संभ्रावस्था निर्माण करणारी एक सत्यकथा! या ग्रहावरील सर्वात धोकादायक अशा उद्दाम आणि युद्धखोर देशामध्ये अण्वस्त्र तंत्रज्ञानाचा फैलाव करण्यासाठी केवळ एका माणूस कसा वागतो, कोणत्या थराला जाऊ शकतो; याबाबत ध्योक्याची सूचना देणारे तसेच सर्वकाही द्यात असूनही अमिरेकेच्या सरकारने हे सर्व होऊ कसे दिले, यावर प्रकाश टाकणारे पुस्तक.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #DOUGLASFRANTZ #CATHERINECOLLINS #SHEKARJOSHI #THEMANFROMPAKISTAN #तोएकपाकिस्तानी #
Customer Reviews
 • Rating Starकिरण माने

  NakKi vacha barech mahiti purna pustak aahe.

 • Rating StarKiran Borkar

  पाकिस्तानच्या अणुबॉम्ब निर्मितीचा जनक अब्दुल करीम खान ( ए. क्यू. खान ) याची ही सत्यकथा . खान हा पक्का भारतद्वेष्टा आणि त्या द्वेषापायी त्याने अणुबॉम्बच्या निर्मितीत हात घातला .इतकेच नव्हे त्याने जागतिक पातळीवर अण्वस्त्र तंत्रज्ञानाचा काळाबाजार सुरू कला .त्याने आणि त्याच्या सहकार्यांनी इराण, लिबिया, उत्तर कोरिया अश्या देशांना आपले तंत्रज्ञान विकले होते . पाकिस्तानच्या अणूक्षेत्रातील त्याचा उदय आणि अस्त याची रसभरीत ही कहाणी आहे . ...Read more

 • Rating StarDAINIK TARUN BHARAT 15-03-2015

  पाकिस्तानच्या अणुबाँब जनकाची सुरस कहाणी… ‘द मॅन फ्रॉम पाकिस्तान’ हे पाकिस्तानच्या अणुबाँबचे तथाकथित जनक डॉ. ए. क्यू. खान यांच्या एकूण कारकिर्दीचा आढावा घेणारे असे पुस्तक. पाकिस्तानला अण्वस्त्रसज्ज देशांच्या पंक्तीत नेऊन बसविण्याचा ध्यास घेतलेला हा मणूस पाकिस्तानच्या अणुक्षेत्रातील त्याचा उदय आणि एकूण कामगिरी यांची रसभरित कहाणी, लेखक डग्लस फ्रान्झ आणि पत्रकार पत्नी कॅथरिन कॉलिन्स यांनी या पुस्तकाद्वारे सादर केली आहे. ‘तो एक पाकिस्तानी’ हा या पुस्तकाचा मराठी अनुवाद शेखर जोशी यांनी केला आहे. मूळ पुस्तकाइतकाच त्याचा अनुवादही माहितीपूर्ण आणि मनोरंजक करण्याचा लेखकाचा प्रयत्न जागोजागी दिसून येतो. २० व्या शतकाच्या प्रारंभी अल्बर्ट आईनस्टाईनने अणूमधे लपलेल्या शक्तीचा शोध लावला. दुसऱ्या महायुद्धात याचा वापर अणुबाँबच्या निर्मितीत करण्यात आला. या अणुबाँबच्या स्फोटामध्ये जपानमधील हिरोशिमा-नागासाकी ही शहरे क्षणार्धात जळून खाक झाली. हा इतिहास सर्वांच्या परिचयाचा आहे. या हादऱ्यानंतर सगळे जग हादरून गेले. बऱ्याच राष्ट्रांनी एकत्र येऊन अण्वस्त्रबंदीसाठी आवाज उठवला. अमेरिका, रशिया, ब्रिटन अशा प्रमुख राष्ट्रांनी एकत्र येऊन ‘आय ए ई ए’ म्हणजेच आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. सदर आयोग मार्शल प्लॅन म्हणून परिचित असलेल्या योजनेच्या धर्तीवर एक योजना तयार करून शांततापूर्ण अणुकार्यक्रम राबविण्यास प्रोत्साहन देईल असे जाहीर करून या प्रस्तावाचे ‘शांततेसाठी अणु’ असे नामकरणही केले. एकीकडे ‘आय ए ई ए’ आकार घेत असतानाच दुसरीकडे अमेरिकेने इराण, इस्त्रायल, भारत, पाकिस्तान यासारख्या अनेक देशांना अणुभट्ट्या सवलतीच्या दरात विकायला सुरुवात केली. अमेरिकेचा या क्षेत्रातील प्रभाव कमी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून रशियानेही स्वत:ची मित्र राष्ट्रे असलेल्या देशांना अणुतंत्रज्ञानाची खिरापत वाटायला सुरू केली. या सर्वांची अतिशय मनोरंजक माहिती या पुस्तकातून मिळते. थोडक्यात काय तर लहानमोठी सर्वच राष्ट्रे अण्वस्त्रनिर्मितीबाबत छुपेछुपे प्रयत्न करू लागली. शांततापूर्ण अणुऊर्जा कार्यक्रम आणि त्याचा अण्वस्त्रनिर्मितीसाठी व्हावयाचा संभाव्य वापर यातील तथाकथित सीमारेषा म्हणजे एक मृगजळ असल्याचे हळूहळू सिद्ध होऊ लागले आहे. या अशा पार्श्वभूमीवर पाकिस्तानी शास्त्रज्ञ व या कादंबरीचा नायक अब्दुल करीम खान अण्वस्त्र चळवळीत सक्रिय होत आपली पावलं उमटवित होता. खानचा जन्म २७ एप्रिल १९३६ रोजी भारतातील भोपाळ संस्थानात झाला. खानचे वडील अब्दूल गफूर खान ‘मुस्लीम लीग’ या राजकीय पक्षासाठी कार्य करीत असत. मुस्लिमांच्या स्वतंत्र राष्ट्राची मागणी आणि हिंदूंचा द्वेष हे गुण खानने आपल्या वडिलांकडून वारसाहक्काने मिळवले होते. पुढे जरी खानने आपल्या आयुष्यातील दहा वर्षे युरोपात घालवली असली तरीही बालपणापासून झालेल्या मुस्लीम संस्कारांच्या पगड्यातून तो बाहेर पडू शकला नाही. पाकिस्तानच्या निर्मितीनंतरही सुमारे दशकभर त्या देशाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. किमान प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या उद्योग, शाळा आणि आर्थिक संस्था या सुविधांचीही तिथे कमतरता होती. त्या तुलनेत भारताची आर्थिक स्थिती झपाट्याने होत होती. त्याची असूया वाटणारे खान सारखे बरेच पाकिस्तानी होते. अब्दूल खान या पाकिस्तानी शास्त्रज्ञानाने जागतिक पातळीवर अण्वस्त्र तंथज्ञानाचा काळाबाजार करावयास सुरुवात केली. त्याच्या कारवायासंबंधी बारीक सारीक बारकावे लेखकाने सुसंगत रीतीने मांडले आहेत. सुमार दर्जाचे तंत्रज्ञान अवगत असलेला हा शास्त्रज्ञ आपली राक्षसी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी काय काय करतो. द्वितीय अणुयुगाचा एक महत्त्वाचा भागीदार कसा बनतो, पाकिस्तानसारख्या एका सर्वस्वी कमकुवत देशाला अण्वस्त्रसज्ज देशांच्या पंक्तीत कसा नेऊन ठेवतो आणि जगातील अत्यंत अस्थिर देशांना आपले अण्वस्त्र तंत्रज्ञान बिनदिक्कत कसे विकतो या सर्वाची कहाणी सांगण्यासाठी हे पुस्तक लिहिले आहे. यामध्ये खानच्या कारवायांचा उदय आणि ऱ्हास याची कारणे जाणून घेऊन वाचकापर्यंत पोहोचविण्याचे काम लेखकाने केले आहे. तांत्रिक बाजू बरोबरच पुस्तकाची ललित बाजूसुद्धा व्यवस्थित हाताळली असल्यामुळे वाचकाची उत्सुकता व कुतूहल जागे ठेवण्यात लेखकाला यश मिळाले आहे. एका वेगळ्याच विषयावरचे माहितीपूर्ण व उत्कंठा वाढवणारे असे हे पुस्तक आहे. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SHRIMAN YOGI
SHRIMAN YOGI by RANJEET DESAI Rating Star
Sacchit Erande

श्रीमान योगी.... हे नक्की चरित्रलेखन आहे की आत्मकथन असा पानोपानी प्रश्र्न पडावा इतक्या मधूर आणि आत्मीय शब्दसंपन्नतेत सखोल मांडणी तेही भावनीक ओल कुठेही हलू न देता. एखाद्याच्या डोक्यावरची सगळी कर्जे फिटली तरी महाराजांनी हिंदू म्हणून जगण्याचे सौभा्य मिळवून दिले त्याचे ऋण फेडणं कोणांसही केवळ अशक्य! आणि ते कदाचित फिटूही नये... नपेक्षा ते फेडण्याची अवकात असलेला या भुमंडलावर अवतारित होऊच शकत नाही! 🚩🚩🚩🚩🚩 ...Read more

BARI
BARI by RANJEET DESAI Rating Star
Prasad Natu

मला आठवते आहे, 2011-14 या काळांत आम्ही कोल्हापूरला होतो,तेव्हाची गोष्ट. मी बँक ऑफ इंडियाच्या कोल्हापूर मुख्य शाखेला वरिष्ठ प्रबंधक (कर्ज विभाग) होतो. “हॉटेल कृष्णा” चे प्रपोजल आमच्या कडे आले होते. त्या निमित्ताने स्वामीकार रणजीत देसाई ह्यांचे मेव्हण श्री.उदयसिंह शिंदे आणि त्यांचे सुपुत्र श्री. सिद्धार्थ शिंदे ह्यांचा परिचय झाला.आपले समूहाचे कर्ताधर्ता श्री. कृष्णा दिवटे सर ह्यांचा कोल्हापूर मधे कुणाशी परिचय नसेल अशी व्यक्ति भिंग घेऊन शोधावी लागेल.एक दिवस ते मला म्हणाले, स्वामीकार रणजीत देसाई यांचे गांव कोवाडला चलता का.शनिवारी,संध्याकाळी कार्यक्रम आहे.रणजीत देसाई यांची पुण्यतिथि होती. प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे देखिल येणार आहेत.त्यांचा कार्यक्रम देखील होईल.साहित्य आणि संगीत असा दुर्मिळ योग एकत्र येणं हे मोठ्या भाग्याचे.मी लगेच जाऊया म्हटले.त्या प्रमाणे साधारणतः संध्याकाळी 4.00 कडे मी,माझी पत्नी सौ भावना आणि श्री दिवटे सर आणि सौ. वहिनी असे चौघे आम्ही गेलो.तिथे बऱ्याच नवीन गोष्टी समजल्या.जसे रणजीत देसाई आणि प्रसिद्ध गायक वसंतराव देशपांडे ह्यांची घट्ट मैत्री होती.दरवर्षी कोवाड येथे त्यांचे येऊन रहाणे हे कळले.रणजीत देसाई ह्यांचे घर बघायले मिळाले,ज्याचे स्मारकांत रूपांतर झाले,त्यांचे साहित्य,त्यांचे हस्त-लिखित,राहुल देशपांडे यांच्याशी झालेली वैयक्तिक ओळख.हे सारे कधी विसरता येणार नाही.श्री.शिंदे ह्यांनी मला साहित्याची आवड म्हणून स्वामीकारांची 2-3 पुस्तके मला भेट म्हणून दिली.त्यातले एक पुस्तक म्हणजेच “बारी”.रणजीत देसाई ह्यांची पहिली कादंबरी.कथाकार म्हणून सुरुवात केलेल्या देसाई यांची ही पहिली कादंबरी. ह्या कादंबरीस प्रसिद्ध साहित्यिक श्री.वि.स.खांडेकर ह्यांची प्रस्तावना लाभली आहे. रणजीत देसाई ह्यांनी कादंबरीचा विषय त्यांच्या दृढ परिचयात असलेला भूभाग निवडला.कोल्हापूर ते बेळगाव रस्त्यावर सुतगट्टी नावाचे गांव लागते.तिथून 15-20 किमी आंत काकती नावाचे गावं लागते.ह्या गावापर्यंत अगदी गहिऱ्या जंगलाने वेढलेली वाट ही सुतगट्टीची बारी म्हणून ओळखली जाते.त्या जंगलात गुजराण करणाऱ्या बेरड जमातीची ही कथा आहे.ही कादंबरी लिहिण्यासाठी त्यांनी ह्या भागात राहणाऱ्या बेरड जमातीचे जीवन अगदी जवळून पूर्ण सहानुभूतीने पाहिले.ही कादंबरी वाचतांना हे पदोपदी लक्षात येतं की शहरातल्या आलीशान बंगल्यात बसून चितारलेले हे ग्रामीण जीवन नाही.त्यातील प्रत्येक प्रसंगात जिवंतपणा आढळतो. कारण रणजीत देसाईनी जवळपास 3-4 वर्ष ह्या भागात राहून त्या जीवनाचा जवळून अभ्यास केला. आपल्या समोरच सारे घडते आहे असे वाटू लागते.मला आठवते आहे की ही कादंबरी मी जेंव्हा पहिल्यांदा वाचली.त्यातील पात्रांची निवड,त्यांचे स्वभाव दर्शन, निसर्ग चित्रण, तेथील समस्या आणि स्वातंत्र्यानंतर बदलत चाललेले जीवनमान.हयात कुठेही काल्पनिकपणा वाटत नाही. वि.स.खांडेकर ह्यांनी लिहिलेली प्रस्तावना त्यांच्या साहित्यिक विद्वतेचा परिचय करून देणारी आहे.सर्वसाधारणपणे आपण पुस्तक चाळतो तेंव्हा आपण प्रस्तावनेकडे दुर्लक्ष करतो.पण मित्रांनो, प्रस्तावना देखील अवश्य वाचा.ही कादंबरी तेग्या ह्या नायकाच्या अगदी तरुण वयापासून ते म्हातारपणा पर्यन्तची कहाणी आहे.पण ही कहाणी केवळ तेग्याची नसून त्याच्या भोवती फिरणाऱ्या आणि गुंफलेल्या बेरड जमातीची कथा आहे. रणजीत देसाई यांची ही पहिली कादंबरी आहे हे कुठेच जाणवत नाही. कादंबरी वाचतांना लक्षात येते की,कोल्हापूर ते बेळगाव रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीवर रात्रीच्या वेळेस दरोडा घालून आणि जंगलातून लाकडे तोडून ती विकणारी,आणि त्यावर गुजराण करणारी ही बेरड जमात.स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी पासून ते स्वातंत्रोत्तर काळात ह्या जमातीच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनावर झालेल्या बदलांचे खूप सुरेख वर्णन ह्या कादंबरीत चितारले आहे.तेग्या हा गावचा नाईक असतो आणि ही वाटमारी किंवा दरोडे त्याच्या नेतृत्वाखाली घातले जातात.गावात ह्या तेग्याचा मोठा दरारा.कादंबरीच्या सुरुवातीलाच असे दाखविले आहे की,तेग्या जंगलातून वस्तीच्या रोखाने परतत असतांना,त्याला नदीच्या पाण्यात काही खळबळत असल्याची चाहूल लागते.त्याला वाटते कुणी तरी जंगली जनावर असावे.म्हणून तो शिकारीच्या उद्देश्याने तिकडे वळतो.तर नदीच्या काठाला एक व्यक्ति उभी असल्याचे त्याला दिसते.ती व्यक्ति त्याच्या भात्यातले मासे आपल्या स्वतःच्या घोंगडीच्या खोळीत टाकताना दिसते.तो त्या व्यक्तीस तसे करण्यापासून आडवायला जातो.तर त्याच्या लक्षात येत की,ती व्यक्ति म्हणजे एक स्त्री आहे.ती 15-16 वर्षाची एक तरुणी असते.ती सहजासहजी त्याचे मासे परत देत नाही.तिच्याशी झटापट करताना,त्या तरुणीच्या लक्षांत येते की,तेग्याची फरशी (हल्ला करण्यासाठीचे शस्त्र) ही झाडांत अडकली आहे.ती शिताफीने ती फरशी मिळविते आणि तेग्यावर उगारते.मी चेन्नटी गावच्या कल्लूची नात आहे अशी आपली ओळख देत, ती त्याची फरशी नदीत फेकून दिसेनाशी होते. तेग्या काही काळ तसाच उभा रहातो.तो बेरवाडीचा नायक असतो,म्होरक्या असतो.त्याला एका तरुणीने फसवावे आणि डोळ्या समोर त्याची फरशी घेऊन जावे.हे त्याला फारसं रुचत नाही.तो बेरडवाडीत येतो.तिथे तो त्याचा मामा मल्ला सोबत रहात असतो.घरी पोहोचल्यावर त्याचा मामा फरशी बद्धल विचारतो.(ती त्याच्या वडिलांकडून आलेली वारसाने फरशी असते) तो खोटच सांगतो की चंद्रोजीस दिली.ते मामाला पटत नाही. तेग्या विचार करीत असतो की,आई गेल्यावर गेल्या काही वर्षात घरात कुणी बाई माणूस नाही.तो मामाला म्हणतो त्याला लग्न करायचे आहे.तो घडलेली सगळी हकीकत त्याला सांगतो आणि चेन्नटी गावची कल्लूची नात आहे. तिच्या बाबत काही माहिती आहे का विचारतो.मामा त्याला तिच्याशी लग्न करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो.कारण तिच्या भांडकुदळ स्वभावाची मामाला कल्पना असते.पण तेग्या हट्ट धरून असतो की तरी त्याला तिच्याशीच लग्न करायचे आहे.ते दोघे चेन्नटीला जातात.कल्लूला मागणी घालतात.कल्लू तेग्याच्या वडिलांचा खास मित्र असतो.कल्लू लग्नाला तयार देखिल होतो.पण त्याची नात,नागी तिचं नांव असते,ती त्याला विरोध करते.ते दोघेही कल्लूला खूप खूप बोलून निघून जातात.कल्लू त्यांचा गावाच्या वेशी पर्यन्त पाठलाग करतो आणि म्हणतो की तुम्ही तिला रात्री पळवून घेऊन जा.कारण ती तशी तयार होणार नाही.माझी काही तक्रार नाही.दोघांना ते पटते.ते दोघे आणि चंद्रोजी असे तिघेही तिला चेन्नटीला जाऊन पळवून घेऊन येतात.दुसऱ्या दिवशी सकाळी ती घरात दिसत नाही तेव्हा ती पळून गेली असे वाटते.कारण ती घरांत कुठेच नसते.तेग्या आणि मल्ला शोधाशोध करू लागतात.तेग्या आणि मल्ला चेन्नटीला जाऊन कल्लूला विचारतात की तिथे आली कां,पण ती तिथे नसते. तेग्या घरी येतो तर ती घरांत असते.ती त्याला स्वयंपाक करण्यासाठी लाकडे आणायला गेली होती असे सांगते.शेवटी ते दोघे एकमेकांना स्वीकारतात. काळू हा खबऱ्या असतो.तो वाटमारीसाठी सावज आल्याची खबर देत असतो.एकदा चुकीची खबर आणल्याने तेग्याच्या मालकाच्या,इनामदाराच्या बैलगाड्यावर दरोडा टाकला जातो.त्यात इनामदाराची पत्नी असते.तिला पाहून तेग्या त्यांचा लुटलेला ऐवज परत करतो. इनामदारास न सांगण्याचे वचन घेतो.पण त्यांचा गडी बाळू सावकारास सर्व सांगतो. दसऱ्याला,तेग्या नेहमी प्रमाणे इनामदारास बिदागी मागण्यास जातो.इनामदार त्याला हाकलून देतात.तो माफी मागतो पण इनामदार एका अटीवर तयार होतो.तो म्हणतो सरोळीचा पाटील माझा वैरी आहे,त्याचा काटा काढ.तो तयार नसतो. कारण त्याचा जिगरी मित्र चंद्रोजी,पाटलाकडे कामाला असतो.पण तेग्या शेवटी तयार होतो.तो पाटलाचा खून करतो.इनामदार शब्द फिरवितो.त्याला वाचवत नाही आणि रु.5000/- ही देत नाही.त्याला पोलिस पकडून नेतात.त्याचा मित्र काळू त्याच्या साठी वकील करून त्याची फाशी टाळतो.पण तरी जन्मठेप होतेच.त्याची बायको नागी गर्भार असते.तो तिकडे जेल मधे असतांना,इकडे नागी मुलाला जन्म देते.13 वर्षाने तेग्या सुटून येतो तो पर्यन्त मुलगा ईश्वरा मोठा झालेला असतो. तेग्या घरी येतो.तेव्हा बरेच काही बदललेले असते. तो परत आल्या नंतर काही महिन्यातच नागी जळून मरण पावते. देशाला स्वातंत्र मिळालेले असते.त्यामुळे वाटमारीला आळा बसतो.वन विभागाचे काम सुरू होते. वृक्षतोड ऐवजी वृक्षसंवर्धनावर जोर दिला जातो.तेग्याचा मुलगा गावात एक गुरुजी असतात.त्यांच्या संपर्कात येतो.त्यांचे शिष्यत्व पत्करून त्याचे परंपरागत व्यवसाय बंद करतो.हळूहळू त्या गावातील सर्व परंपरागत व्यवसाय बंद होत जातात.लोक उदरनिर्वाहासाठी गावं सोडून बाहेर गांवी जातात. ह्या कादंबरीचा शेवट हा विशेष असा twist and turn वगैरे असलेला नाही. पण माझी इच्छा आहे की ही कादंबरी तुम्ही जरूर जरूर वाचली पाहिजे ह्या साठी शेवट सांगत नाही. मला खरोखर आश्चर्य वाटते की, ह्या कादंबरीवर आधारित एखादा चित्रपट कसा आला नाही किंवा आला असेल तर मला माहित नाही.मित्रांनी प्रकाश टाकावा. ...Read more