* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: I SHALL NEVER ASK FOR PARDON
  • Availability : Available
  • Translators : AVANTI MAHAJAN
  • ISBN : 9788184989915
  • Edition : 1
  • Publishing Year : MARCH 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 332
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
N\A
ब्रिटिशांच्या जोखडाखालचे आयुष्य; हे आपले आयुष्य नव्हे, याची जाणीव पांडुरंग खानखोजेंना लवकरच झाली. अर्थात त्यावेळचे भारताचे शासनकर्तेही तितकेच सावध होते. हा तरुण आपल्याला त्रासदायक ठरणार, आपल्या एकहाती, अनिर्बंध सत्तेला विरोध करणार, हे त्यांच्या लक्षात आले होते. स्वत:मधील दाहक क्षात्रतेजाचा शोध घेतच खानखोजेंनी देश सोडला आणि नजरे समोरचे स्वतंत्रमातृभूमीचे स्वप्न क्षणभरही नजरेआड होऊ न देता, हा स्वाभिमानी राष्ट्रभक्त देशोदेशी, खंडा-खंडांतून हिंडला. स्फोटके बनविणे आणि युद्धशास्त्रात प्रशिक्षण घेतल्यानंतर, अन्यब्रिटिशांची सत्ता उलथवून टाकण्याचे स्वप्न पाहणा आपल्यासारख्याच सहकार्यांच्या शोधात खानखोजे जगभर हिंडले. अमेरिकेमध्ये त्यांनी अभिनव अशा ’गदरपार्टी’ची स्थापना केली. त्यातल्या बऱ्याच सभासदांनानंतर ब्रिटिशांनी फासावर चढविले. परंतु मनमात्र सदासर्वकाळ मातृभूमीकडे ओढ घेत होते. काहीही करून खानखोजेंना भारतात परत यायचेच होते. ही गोष्ट घडायला तब्बल चाळीस वर्षांचा कालावधी जावा लागला खरा; परंतु ते भारतात परत आलेच!

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MIKADHIHIMAFIMAGNARNAHI #ISHALLNEVERASKFORPARDON #मीकधीहीमाफीमागणारनाही #BIOGRAPHY&TRUESTORIES #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #AVANTIMAHAJAN #SAVITRISAWHNEY "
Customer Reviews
  • Rating StarLoksatta Chaturang 17th Sept.2017

    भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आपल्याला माहीत असला तरी त्यात अनेक व्यक्ती, अनेक गट, अनेक चळवळी, घटना अशा आहेत ज्याच्यावर फारसा प्रकाश पडलेला नाही. अनेक जणांनी भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांना त्यात फारसे यश मिळाले नाही. आि त्यामुळे त्यातल्या ब-याच जणांची नावेही कुणाला माहित नाहीत. अर्थात याचा अर्थ त्यांच्या कामाचे महत्त्व कमी होते असा नाही. पडद्याआड राहिलेल्या अशाच एका चळवळीवर आणि स्वातंत्र्यसैनिकावर ‘मी कधीही माफी मागणार नाही’ या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे. ‘आय शॅल नेव्हर आस्क फॉर पार्डन’ या सावित्री साव्हनी यांच्या पुस्तकाचा अवंती महाजन यांनी केलेला हा अनुवाद आहे. शाळेत असताना भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या संदर्भात ‘गदर पार्टी’बद्दल वाचल्याचे आठवते. पहिल्या महायुद्धाच्या इतिहासात ‘कामा गाटा मारू’ या जहाजाबद्दलही काही एक उल्लेख होता. मात्र, त्यामागचा इतिहास ख-या अर्थाने उलगडला गेला आहे तो या पुस्तकात. हे पुस्तक म्हणजे खरे तर क्रांतिकारक पांडुरंग खानखोजे यांचे चरित्र आहे. पुस्तकाच्या मूळ लेखिका सावित्री यांचे ते वडील. मात्र खानखोजे यांचे सगळे आयुष्यच भारतीय स्वातंत्र्यलढ्याला वाहिलेले असल्याने त्यांच्या या लढ्याचा इतिहासच त्यांचे चरित्र बनून आपल्यापुढे या पुस्तकाद्वारे आला आहे. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने देशाच्या स्वातंत्र्यासाठी पेटून उठलेल्या एका तरुण मुलाची ही कथा आहे. क्रांती हाच त्याचा ध्यास होता. वध्र्याजवळच्या एका छोट्याशा गावातला हा मुलगा. घरातल्या परंपरागत, जुन्या चालीरीतीत वाढलेला हा मुलगा पुढे अनेक आंतरराष्ट्रीय घटनांचा साक्षीदार बनतो आणि त्याचे निधर्मी विचारसणीच्या, ‘मानवता हीच सगळ्यात श्रेष्ठ’ असे मानणा-या व्यक्तीत रूपांतर होते, त्याचीसुद्धा ही कथा आहे. भारताच्या स्वातंत्र्याचा ध्यास लागलेल्या खानखोजेंनी लहानपणी केलेल्या काही उपद्व्यांमुळे पोलिसांची त्यांच्यावर नजर होती. घरच्यांचा त्यांच्या कामाला विरोध होता. त्यावेळी स्वातंत्र्य मिळवायचे तर लष्करी शिक्षण घेतले पाहिजे, त्यासाठी परदेशात जावे लागले तरी चालेल असे त्यांच्या मनाने घेतले आणि १९०६ साली एक दिवस बोटीत बसून त्यांनी जपान गाठले. तिथून काही दिवसांनी ते अमेरिकेला पोहोचले. जिथे जाऊ तिथे समानधर्मी लोक (मग ते कुठल्याही देशाचे असोत!) शोधायची त्यांची धडपड चालू होती. या काळात उदरनिर्वाहासाठी शेतात काम, रुग्णालयात साफसफाई इथपासून अनेक कामे त्यांनी केली. यादरम्यान सॅनफ्रान्सिस्कोच्या लष्करी अकादमीतून त्यांनी प्रशिक्षण घेतले. पुढे ओरेगॉनमधून शेतकी पदवीही घेतली. स्वातंत्र्योत्तर भारताला शेतीसंंबंधी नवी दृष्टी देण्यासाठी आपल्या या शिक्षणाचा उपयोग होईल म्हणून त्यांनी हे शिक्षण घेतले होते. याचदरम्यान, पंडित काशीराम, बिशनदास कोचर, लाला हररदयाळ, सोहनसिंग अशा काही जणांशी त्यांची मैत्री जमली. डॉ. सन यत् सेन, लेनिन यांच्यासारख्या नेत्यांच्या भेटी झाल्या. अमेरिकेत भारतीयांसाठी काम करणा-या ज्या अनेक छोट्या संस्था होत्या त्यांच्या एकत्रीकरणातून ‘गदर पार्टी’ सुरू झाली. तिच्या ‘प्रहारक’ विभागाचे खानखोजे हे प्रमुख होते. इतरांना लष्करी प्रशिक्षण देणे हे त्यांचे मुख्य काम. भारताबाहेर राहून भारतासाठी चळवळ करणारी ‘गदर’ ही पहिलीच संस्था होती. भारतात यादवी युद्ध सुरू करून ब्रिटिश सरकारला रंजीस आणण्याची त्यांची योजना होती. त्यानुसार निरनिराळ्या ठिकाणांहून कार्यकर्ते भारतात जायला निघाले. स्वतः खानखोजेंनी जर्मनी, अमेरिका, पर्शिया, अफगाणिस्तान अशा मिळेल त्या मार्गाने प्रवास केला. त्यावेळी त्यांच्यावर जिवावरचे काही प्रसंगही ओढवले. परंतु त्यांची ही योजना सफल झाली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे संपर्काचा अभाव, खोली नसलेल्या योजना आणि तर्वâशुद्धतेच्या अभावाची विचारसरणी! विखुरलेल्या स्वरूपात काम करून अशा मोठ्या मोहिमेत यश मिळणे शक्यच नव्हते. असे असले तरी या चळवळीतील प्रत्येकाने आपल्या परीने प्रयत्न केले, हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. प्रचंड धडपडीनंतरही यश न आल्याने असेल, पण खानखोजेंचा चळवळीतील सन १९२४ च्या सुमारास संपला. त्यानंतर त्यांनी मेक्सिकोत राहून शेती केली. मक्याच्या नवीन जातींवर संशोधन केले. मोफत शेतकी शाळा काढल्या. नंतर ते भारतात स्थानिक झाले. पण ना त्यांचे भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे स्वप्न साकार झाले. ना देशाला शेतीत स्वयंपूर्ण बनवायचे! त्यादृष्टीने त्यांची शोकांतिकाच झाली असे म्हणावे लागेल. या पुस्तकाने एका अप्रकाशित, दुर्लक्षित कामावर, त्या कालखंडावर प्रकाश टाकला आहे. इतक्या जुन्या कालखंडाची तपशिलात माहिती जमवणे हे तसे जिकिरीचेच काम. ते सावित्री साव्हनी यांनी चिकाटीने पार पाडले आहे. खानखोजे हे मध्यमवर्गीय, साध्या कुटुंबातून आलेले. परंतु किरकोळ व्यक्तिमत्त्वाच्या या माणसाने आयुष्यभर एका ध्यासापोटी जे काम केले, प्रचंड कष्ट उपसले, अफाट भ्रमंती केली, ते वाचून आश्चर्यचकित व्हायला होते. हा सगळाच प्रवास रोमहर्षक आहे. पण पुस्तकात तो तितकासा उतरलेला नाही. घटना, नावे, ठिकाणे, कालखंड या सगळ्यांची जंत्री लांबलचक झाली आहे. नावे द्यायला हवीत ते खरे असले तरी संख्येमुळे ती लक्षात राहात नाहीत. त्यांचे संदर्भ लागणे कठीण होते. गर्दीमुळे मुख्य क्रांतिकारकांची व्यक्तिमत्त्वेही डोळ्यांसमोर उभी राहत नाहीत. खुद्द खानखोजेंच्या बाबतीतही हे झाले आहे. नेरिझजवळची त्यांची सुटका लेनिन यांच्या प्रभावामुळे त्यांचे ‘लेनिनित’ होणे असे उल्लेखनीय प्रसंग फार थोडे आहेत. अर्थात असे असले तरीही हे एका मोठ्या आणि दुर्लक्षित कालखंडाचे दस्तावेजीकरण आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व नाकारून चालणार नाही. हे पुस्तक म्हणजे पांडुरंग खानखोजे या व्यक्तीचे चरित्र असले तरी तो गदर पार्टीचा आणि बहुतेकांना अज्ञात असलेला भारताचा इतिहास आहे. ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 19-6-2016

    स्वातंत्र्यलढ्याच्या काळातील ‘गदर’ चळवळीतीची कथा आणि या चळवळीतील क्रांतिकारक पांडुरंग खानखोजे यांचे हे चरित्र आहे. ब्रिटिशांचा रोष ओढवून घेतल्यामुळे १९०६मध्ये खानखोजे यांनी भारत सोडला. गदर चळवळीची स्थापना करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. जपान, अमेरिका,पर्शिया, रशिया असा प्रदिर्घ प्रवास केला. १९१४मध्ये त्यांना मेक्सिकोने आश्रय दिला. तिथे ते शेतीशास्त्रज्ञ म्हणून नावारुपाला आले. स्वातंत्र्यानंतर भारताचे शेतीधोरण आखण्याच्या समितीत त्यांना स्थान मिळाले. १९५५मध्ये ते कायमचे भारतात परतले. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
लोकमत २५.९.२०२३

शब्बीर रोमानी हे व्यवसायाने वकील. मातृभाषा अर्थात उर्दू आणि शिक्षण मराठी माध्यमातून झालेले. २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या उर्दू पुस्तकाला, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या साहित्य अकादमी केंद्राचे पुरस्कार लाभले आहेत. आता मिर्झागालिबवरचे नवे पुस्तक, `मी गालिब बोलतोय...!` लक्ष वेधून घेत आहे. गालिबच्या एका शेरची पहिली ओळ घेऊन सांगायचे झाल्यास, जिक्र गालिबचा आणि खूबसूरत बयान लेखकाचे असे या पुरस्काराबद्दल म्हणता येईल. मिर्जा असदुल्ला खां,`गालिब` या श्रेष्ठ शायरची शायरी, त्याचे पत्रलेखन, चरित्र यावर आजवर शेकडो पुस्तक प्रसिद्ध आहेत. लेखकाने प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार गालिबवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. मराठी, हिंदी-उर्दू लेखकांची ते तपशील पाहून आचंबा वाटतो. शिवाय शब्बीर रोमानी यांनी इथे आपल्या लेखनाचे प्रयोजन सांगताना म्हटले आहे, कि गालिबबद्दल अनेक उलट-सुलट प्रकारच्या कहाण्या, विनोद, (कसलेही शेर गालिबच्या नावाने सांगत राहणे) प्रचलित आहेत; त्यामुळे गालिबची कथा, त्याच्या पत्रांमधल्या मनोरंजक गप्पा-गोष्टी आणि त्याच्याशी निगडित आठवणी हे सगळं साध्या सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक. सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातल्या सर्व भावछटा गालिबच्या काव्यातून दिसत असतात. पुस्तक वाचताना गालिबची प्रकृती, त्याची विनोद बुद्धी, संवेदनशील वृत्ती हे आपल्याला जाणवत राहते, आणि लेखकाची तळमळसुद्धा. या पुस्तकाचे वैशिष्टय म्हणजे, मोठी प्रकरण टाळून किस्से सांगावेत अशी रचना. शिवाय लेखकाची साधी-सरळ भाषा, यामुळे शायरीची आणि गालिबबद्दलची सर्वसाधारण माहिती आणि कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हे पुस्तक रंजक वाटेल. सहसा गालिबचे गाजलेले शेर, किस्से हे आपल्या वाचनात असतात. या पुस्तकात गालिबचे अनेक दुर्मिळ शेर, शिवाय फारसी रचनाही या पुस्तकात समाविष्ट असल्याने त्याला एक संदर्भ ग्रंथाचेही स्वरूप आलेले आहे. गालिबला आंबे फार आवडायचे, `मिर्झा गालिब` या गाजलेल्या चित्रपटातला तो प्रसंग आजही लक्षात आहे. आंबे खाताना एक मित्र गालिबला तुच्छतेने म्हणतो, `आम तो गधेभी नही खाते!` त्यावर गालिबने त्वरित उत्तर देतो. `सिर्फ गधेही नाही खाते!` शब्बीर रोमानी यांनी हा प्रसंग व विनोद म्हणून सांगितला नाही, तर त्याचे तपशिलाने वर्णन तर केलेच शिवाय आंब्यावरची गालिबची मोठी गजल त्यांनी दिलेली असल्याने त्या किश्श्याला एक गांभीर्य आलेले आहे. असाच एक किस्सा, ते कलकत्त्याला असताना साध्या चिकणी-सुपारीवर गालिबला कुणी छेडले होते, यावर तुमची शायरी होऊन जाऊ द्या! असे आवाहन केले. या सुपारीच्या दिसण्या-असण्यावरच्या अफलातून शायरीची भली मोठी झलकच गालिबने पेश केली! गालिबच्या एक महत्वाचा शेर आहे. जिक्र ऊस परी-वंश का और फार बयां अपना बन गया रिकीब आखिर, था जो राजदां अपना त्या परिच्या सौंदर्याचे वर्णन आणि तेही माझ्या भाषेतून, माझ्याकडून ऐकले आणि माझा जवळचा असा मित्र आता या प्रेमाच्या नात्यात माझा प्रतिस्पर्धी झाला (आता तो तिच्यावर प्रेम करायला लागला) कलकत्त्याला गालिब दीडेएक वर्ष राहिला होता. तिथल्या धनिकांनी मुशायरे, मुजरे आयोजित केलेले असायचे, गालिबचा तिथे सन्मानही व्हायचा. गालिबने या बद्दल फार जिव्हाळ्याने लिहिले आहे. या मुशायऱ्यामध्ये गालिबचे फारसीचे काव्यवाचन ऐकून फारसी भाषेचे तज्ञ त्याच्यावर नाराज झाल्याची आठवण आहे! गालिबच्या तोंडून फारसीचे कौतुक ऐकून लोकांनी आक्षेप घेतला! गालिब हा आपल्या दुःख, विवंचनेवर हसणारा अद्भुत असा कलावंत होता. हा शेर वाचल्यावर आपल्याला मुन्शी प्रेमचंद यांच्या `पूस कि रात` मधला हलकू आठवतो! मिर्झा गालिबच्या कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हा संग्रह आवडण्यासारखाच आहे. लेखनातल्या भाषिक काही त्रुटी वगळल्यास, गालिबचे किस्से, त्याची शायरी हे सगळे रोचक आहे. ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
पुस्तकप्रेमी

मीना कश्यप शाह *मृत्युंजयी* भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लगणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊन जात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more