* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: DIARY OF ANNE FRANK
 • Availability : Available
 • Translators : Mangala Nigudkar
 • ISBN : 9788177661422
 • Edition : 8
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 276
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
This diary by Anne Frank is one of the most valuable literatures in the world. You will not come across a single human being who has not shed tears while reading it. Anne Frank was a victim of the torture camps for the evacuation of the Jews during the Second World War. She succeeded in running away from the Nazis along with her mother, sister and other four people. They remained in hiding nearly for two years. But somehow, the Nazis found them and sent them to the torture camps. Only her father was not captivated. After Anne`s death, her diary came into the possession of her father. He published it in the year 1947, immediately it was welcomed on all levels because of its uniqueness and Anne`s peculiar writing style. She has revealed the hideousness of the torture camps in her diary, at the same time; she has very freely and innocently described the feelings in her mind during her growing years. She has written that she wants to be alive even after her death, and she was very much thankful to god for the wonderful gift of life and the ability to write a diary capturing her feelings perfectly well. During last 40 years, millions of copies of this book have been sold worldwide.
‘‘द डायरी ऑफ अ‍ॅन प्रँâक’’ हे जागतिक साहित्य-विश्वातील एक अमोल लेणे आहे. एका तेरा वर्षीय मुलीची ही अनुभव-गाथा वाचताना; डोळ्यांत टिपूसही येणार नाही, अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. दुस-या महायुद्धाच्या काळात ज्यू लोकांचा जो छळ झाला, त्यातील अघोरी अनुभव वाट्याला आलेली ही बालिका. आईवडील, बहिण आणि अन्य चार व्यक्ती नात्झी भस्मासुरापासून दूर पळत, एका इमारतीत लपून-छपून जीवन कंठू लागतात. पण दोन वर्षांतच त्यांना हुडवूâन काढण्यात येते आणि जर्मन छळछावणीत सर्वांची रवानगी होते. कसेबसे वडील मात्र वाचतात. अ‍ॅनच्या मृत्युनंतर तिची डायरी वडिलांच्या हाती आली आणि १९४७ साली ती जेव्हा प्रसिद्ध झाली; तेव्हा तिचे वाङ्मयीन आगळेपण वाचकांच्या तात्काळ ध्यानात आले. महायुद्धात मानवी जीवन किती कवडीमोल झाले होते, वांशिक वर्चस्वाच्या खोट्या कल्पनेपायी इतरांचा अमानुष छळ करण्यासाठी मनुष्य कसा प्रवृत्त होतो, याचे प्रत्ययकारी चित्रण तर या डायरीत आहेच; पण एका उमलत्या कळीच्या भावभावनांना तिने आपल्या लेखनात यथेच्छ, कोणताही आडपडदा न ठेवता, वाट मोकळी करून दिली आहे. ‘‘मला मृत्युनंतरही जगायचे आहे, आणि म्हणून देवाने दिलेल्या या देणगीबद्दल मी अत्यंत ऋणी आहे’’ असे तिने लिहिले. ही देवाची देणगी; म्हणजे तिच्यात वसणा-या सर्व भावभावनांना शब्दांत पकडण्याचे सामथ्र्य. गेल्या ४० वर्षांत या पुस्तकाच्या लाखो प्रति खपल्या!
Video not available
Keywords
Customer Reviews
 • Rating StarZEE MARATHI DISHA 13 JULY - 19 JULY, 2019

  जगात गाजलेली अनमोल डायरी... महायुद्धात मानवी जीवन किती कवडीमोल होतं, वांशिक वर्चस्वाच्या खोट्या कल्पनेपायी इतरांचा छळ करण्यास माणूस कसा प्रवृत्त होतो, याचं प्रत्ययकारी चित्रण ‘द डायरी ऑफ अ‍ॅन फ्रॅंक’मध्ये वाचून मन सुन्न होतं. १९४२ ते १९४४ अशी दोन वरषं अ‍ॅन फ्रॅंक या १३ वर्षीय बालिकेला ना शाळा, ना मैत्रिणी अशा परिस्थितीत एका गुप्त ठिकाणी अज्ञातवासात राहावं लागलं. तेव्हा मनातील कोंडलेल्या भावभावनांना कोणताही आडपडदा न ठेवता वाट मोकळी करून देण्यासाठी, तिनं डायरी लिहायला सुरुवात केली. १२ जून १९४२ ते १ ऑगस्ट १९४४ पर्यंत तिनं रोजनिशी लिहिली. सुरुवातीला तिनं शाळेतल्या मित्रमैत्रीणींविषयी आठवून आठवून लिहिलं. नंतर ओघातच गुप्तनिवासात राहणाऱ्यांच्या स्वभाविषयी, त्यांना मदत करणाऱ्यांविषयी, तिचे आई-वडील, बहीण मारगॉट या कुटुंबीयांविषयी, त्यांचे स्वभावविशेष, सवयी तसंच बाहेरच्या युद्धजन्य परिस्थितीविषयी ती लिहीत होती. गुप्तनिवासात आल्यापासून हितगुज सांगावं, अशी कोणी मैत्रीण नाही म्हणून या रोजनिशीलाच मैत्रीण समजून तिचं नाव तिनं ‘किटी’ ठेवलं. दबलेल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी ‘प्रियतम किटी’ संबोधून ती लिहू लागली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्यू लोकांचा छळ झाला. त्यामुळे बालपणी फुलपाखरू आयुष्य जगणाऱ्या अ‍ॅन फ्रॅंकला अचानक नाझींच्या छळकथांना सामोरं जावं लागतं. अ‍ॅन फ्रॅंकचे कुटुंबीय, व्हॅनडॅन कुटुंबीय नाझी भस्मासुरापासून दूर पळत एका इमारतीत लपून छपून राहू लागतात. सर्व बाजूंनी बंदिस्त, पडद्यांनी झाकलेल्या खिडक्या, दबकून बोलणं, शाळा सवंगडी दुरावलेले... बाहेरच्या जगाशी पूर्णपणे तुटलेला संपर्क, बरोबर आणलेल्या पुस्तकांच्या वाचनाविषयी दुसरा काहीही विरंगुळा नाही... साधी बेल वाजली तरी आपल्याला पकडायलाच आले आहेत ही धास्ती. अशा प्रकारचं जगणं वाट्याला आलं. काहींना सहानुभूती वाटली, मदत करावीशी वाटली तरी ते करू शकत नाहीत, कारण ही बातमी कळली तर जर्मन लोक मदतकर्त्यांना जबर शिक्षा करत. अशा धास्तावलेल्या परिस्थितीत या मंडळींनी दोन वर्षं काढली. ४ ऑगस्ट १९४४ रोजी ही मंडळी पकडली गेली आणि जर्मन छळछावणीत त्यांची रवानगी झाली. त्यातून काही दिवसांतच अ‍ॅनचे वडील आटो फ्रॅंक कसेबसे वाचले. १९५३ पर्यंत ते अ‍ॅमस्टरडॅममध्ये राहिले. १९५३ नंतर ते त्यांच्या बहिणीकडे स्वित्स्झर्लंडमधील बॅसेल या गावी राहिले. १९ ऑगस्ट १९८० रोजी ते वारले. त्या अगोदरच त्यांनी अ‍ॅनची डायरी प्रकाशित केली होती. ४ ऑगस्ट १९४४ रोजी गुप्तनिवासात लपून राहिलेल्या लोकांना पकडण्यात आलं. मिएप गाइस व बेप व्हायस्कुइज्ल या दोन सेक्रेटरींना अ‍ॅनच्या रोजनिशीचे कागद जमिनीवर विखुरलेले सापडले. मिएपनं ते सर्व गोळा करून सुरक्षित ठेवले. युद्धसमाप्तीनंतर अ‍ॅन वारल्याचं तिला कळलं, तेव्हा तिनं ते कागद अ‍ॅनचे वडील आटो फ्रॅंक यांच्या स्वाधीन केले आणि त्यांनी ही रोजनिशी १९४७मध्ये प्रकाशित केली. जागतिक साहित्यविश्वात एक अनमोल लेणं असलेल्या या डायरीच्या आतापर्यंत लाखो प्रती खपल्या आहेत. -मंगला गोखले ...Read more

 • Rating StarNEWSPAPER REVIEW

  वादळ आणि दिवली यांच्या संघर्षाची ही आहे कहाणी... अ‍ॅन फ्रॅंकच्या आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या रोजनिशीच्या रूपाने तिने मिळवलेले अमरपण. या रोजनिशीत एका तरुण, भावनाप्रधान मुलीचे हृद्गत आहे. एवढ्या लहान वयात तिला असलेले जगाचे आणि जीवनचे ज्ञान मनाला थक्क करते. ‘‘जग चांगलं आहे. त्यातली माणसे प्रेमळ आहेत. त्यांच्या भलेपणावर माझा पुरा विश्वास आहे.’’ अ‍ॅन म्हणायची. ‘‘माझे आयुष्यातले मुख्य ध्येय म्हणजे विध्वंस, नाश करणे हे होय.’’ हिटलर नाझी जर्मनीचा पुढारी ओरडून सांगत होता. त्याची मते साऱ्या जगाला ओरडून सांगण्यासाठी, एका बलवान राष्ट्राची सारी यंत्रणा आणि शक्ती खपत होती तर त्याच्या राक्षसी जुलमाला बळी पडलेल्या अ‍ॅनची मते, फक्त तीच वाचू शकत असलेल्या या रोजनिशीखेरीज कुणालाही माहित नव्हती. आज हिटलटरच गगनभेदी आवाज लुप्त झाला आहे. त्याची मते विसरली गेली आहेत. पण साऱ्या जगाला सांगण्यासाठी एक कैफियत स्वत:च्या हृदयाशी बाळगून बसलेली ही रोजनिशी मात्रआज अमर झाली आहे. जगातील जवळजवळ ७० (सत्तर) भाषांतून या रोजनिशीचे अनुवाद छापले गेले आहेत. तिच्या वाचकांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. -जॉर्ज स्टीव्हन्स ...Read more

 • Rating StarSAHITYA-KALA 25-11-1988

  मरणानंतरही ‘जगणारी’ – अ‍ॅन फ्रॅंक… दुसरे महायुद्ध ही ह्या शतकातील अनेक दृष्टीने सर्वांत महत्त्वाची घटना म्हणावी लागेल. दुसऱ्या महायुद्धापासून जगाच्या नकाशात आमुलाग्र बदल झाले, जर्मनी आणि इंग्लंडसारख्या बलाढ्य शक्ती रसातळाला गेल्या आणि अमेरिका व रशियसारख्या नव्या शक्तींचा उदय झाला; पण या सर्वांपेक्षा दुसरे महायुद्ध लक्षात राहते ते भीषण अशा संहारामुळे. हिटलरच्या अट्टाहासापायी ६० लाख ज्यूंना आपले प्राण गमवावे लागले, शिवाय सैनिकांच्या मृत्यूची गणतीच नाही. सुमारे ८० मिलीयन लोक दुसऱ्या महायुद्धात मारले गेले. इतका भीषण संहार घडवून आणणारी ही घटना जगाच्या इतिहासात एकमेव असावी. या घटनेवर संशोधन होऊन जितके प्रचंड लिखाण झाले आहे तेवढे जगाच्या इतिहासातील अन्य कोणत्याही घटनेवर झाले नसावे. आज या घटनेवर आधारलेली अक्षरश: हजारो पुस्तके अस्तित्वात आहेत. विविध कोनांनी ही घटना पाहण्याचा अनेक अभ्यासकांनी, इतिहासकारांनी, कलावंतांनी प्रयत्न केला आहे. त्यामुळे विविध छटांनी हा काळ वाचकांच्या डोळ्यांसमोर गोचर होतो. ओल्गा लेंग्वेल या सामान्य स्त्रीचे आत्मकथन हिटलरच्या यातनातळाचे ज्वलंत दर्शन घडविते. वाचताना देखील त्या वर्णनातला भयानकपणा थरारून सोडणारा आहे. नाझी सैनिकांनी ज्यू स्त्रियांवर केलेल्या अत्याचारातून जी मुलं झाली, अशांना काही प्रश्न विचारून त्याचे संकलीत पुस्तकही हा एक अभिनव उपक्रम म्हणता येईल. हा सारा खटाटोप ऑस्ट्रेलियातील एका ज्यू पत्रकाराने-पीटर सीक्रीव्हस्की याने Born Guilty : Children of Nazi Families. ‘‘या पुस्तकात केला. या विविध लेखनातून दुसऱ्या महायुद्धातील अनेक गोष्टी स्पष्ट होतात. तरीसुद्धा, हिटलरचा मृत्यू, बंकर नं ७, ईव्हा ब्राऊनचा मृत्यू, अश अनेक गूढ गोष्टींची ऊकल मात्र होऊ शकली नाही. आजपर्यंत तरी या गोष्टी वादग्रस्तच आहेत. दुसऱ्या महायुद्धावर जगातील अनेक प्रमुख भाषांत विपुल साहित्य निर्माण झाले. वि. ग. कानिटकारांनी लिहिलेला ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’ हा ग्रंथ मराठी वाचकाला दुसऱ्या महायुद्धांचा काळ डोळ्यासमोर उभा करतो. ‘नाझी भस्मासुरांचा उदयास्त’ हा वस्तुनिष्ठ इतिहास सांगणारा ग्रंथ आहे. या घटनेला कादंबरीची कलात्मकता वि. स. वाळींबे यांनी ‘दुसरे महायुद्ध’ या ग्रंथात प्राप्त करून दिली आहे. जी. ए. कुलकर्णी या सिद्धहस्त प्रतिभावंताने ‘ओल्गा लेंग्वेल’चे आत्मकथेने (वैऱ्याची एक रात्र) मराठीत आणून आणखी एक काळ्याकुट्ट कृत्याचे दर्शन घडविले. यातील भयानकता, मृत्यूचे थैमान, (प्रत्यक्ष मृत्यूपेक्षाही – मृत्यूचे निकट सानिध्य) यानी वाचक अस्वस्थ होतो. ‘मानवता’ या मूल्यावरची श्रद्धा हळमळू लागते. ‘हायरी ऑफ फ्रॅंक’ हा एक वेगळाच अनुभव मंगला निगुडकर यांनी मराठीत आणला. ‘अ‍ॅन’ ही बारा-तेरा वर्षांची ज्यू मुलगी. हिटलरशाहीचा पाश जर्मनीच्या सभोवतालच्या छोट्याछोट्या राष्ट्रांभोवती आवळत गेला आणि त्यात ‘हॉलंड’ ही होते. हळूहळू तर, ‘ज्यू’ वरील बंधने वाढत गेली आणि शेवटी तर, ठराविक तारखेच्या आंत ज्यूंना देशत्याग करण्याचा आदेश देण्यात आला आणि जे ज्यू देशाबाहेर जाणार नाहीत त्यांची रवानगी निर्दयपणे यातना तळावर करण्यात येई. हिटलरच्या या ज्यू द्वेशाच्या वणव्यात अनेक ज्यू कुटुंबियांनी देशत्याग केला आणि बहुदा तटस्थ राष्ट्रांचा आश्रय घेतला. पण कुटुंबांनी देशत्याग केला आणि बहुदा तटस्थ राष्ट्रांचा आश्रय घेतला. पण ज्यांना देशत्याग शक्य झाला नाही त्रूाचे मात्र खूपच हाल झाले. अनेकांना ‘कॉन्सट्रेशन कॅप’ची न परतीची वाट चालावी लागली. कित्येक ज्यू कुटुंबियांनी हॉलंडमध्येच लपून छपून रहाण्याचा मार्ग स्वीकारला. (त्यातूनही ज्यांच्या गुप्तनिवासाची बातमी ‘गेस्टापो’ ज्यू ना लागली त्यांची रवानगीही यातनातळावर केली गेली.) १२-१३ वर्षांच्या अ‍ॅनच्या कुटुंबावरही असाच अज्ञातवास कंठण्याची वेळ आली. नुकतीच उमलू लागलेली अ‍ॅन् आपल्या आई वडिलांबरोबर अज्ञात निवासात राहायला गेली. त्यांच्याबरोबर व्हॅनडॅन कुटुंबही अज्ञातवासात आश्रयाला आले आहे. श्री. व सौ. व्हॅनडॅन आणि त्यांचा चौदा-पंधरा वर्षांचा मुलगा पीटर. अज्ञात निवासातील जागा दोन कुटुंबाना अपुरी आहे. माणसे आणि सामान यांची गर्दी झाली आहे. ‘इथे कुणी राहते.’ हे बाहेरच्या लोकांना (विशेषत: गेस्टापोजना) कळू नये म्हणून वावरतांना अनेक बंधने स्वत:भोवती घालून घ्यावी लागतात. निवासाच्या खालच्या मजल्यावरचं ऑफिस दिवसा सुरू असते म्हणून वरच्या मजल्यावर चालतांना पायाचे आवाज होऊ न देणे, हळू बोलणे, मोठ्याने हसणे नाही, बाथरूममधला नळ वापरायचा नाही, शेगडी पेटवायची नाही, खिडकीतून बाहेर डोकवायचे नाही, खिडकी खरे तर उघडायची सुद्धा नाही, एक-ना दोन अशा अनेक बंधनांमुळे या गुप्त निवासातले जीवन म्हणजे स्वत:च स्वीकारलेली एक कैद असे उमलू पाहणाऱ्या अ‍ॅनूला वाटू लागले. या पूर्वीच्या मुक्त आणि स्वच्छंदी जीवनाकडे ओढ घेत असते. या गुप्त निवासातले बंधनात जखडलेले जीवन तिला खूपच असह्य होते. हे सगळे अ‍ॅनूला कुणाजवळ तरी बोलायचे आहे, मन मोकळे करायचे आहे, पण ऐकायला वेळच कुणाला नाही. तेव्हा अ‍ॅन् रोजनिशी लिहिण्याचे ठरविते. कारण ‘‘माणसापेक्षा कागद जास्त सहनशील, सोशीक असतो.’’ आपले शब्द तो मुकाट्याने ऐकतो, असे अ‍ॅनला वाटते. या अज्ञात वासात अ‍ॅनची डायरी हीच तिची जिवलग मैत्रिण बनते डायरीचे नाव अ‍ॅनूने गंमतीने ‘किटी’ ठेवले आहे. प्रत्येक दिवसांच्या डायरीलेखनाची सुरुवात ‘प्रिय किटी’ने होते आणि शेवट– तुझी अ‍ॅन्! रोजनिशी, लिहितांना कसल्याही उपचारांचे बंधन नसल्यामुळे अ‍ॅन खूपच मोकळेपणाने लिहिते. आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट प्रिय किटी’ला सांगण्याचा तिचा प्रयत्न आहे. १२-१३ वर्षांच्या मुलीने लिहिलेले मनोगत खरोखरच जिवंतपणाने वाचकांपुढे साकार हाते, अ‍ॅन काही सिद्धहस्त लेखिका नव्हती, तरीही तिचे अनुभवाशी पावलेले तादात्म्य तिच्या शब्दांतून चैतन्याची फुंकर मारून जाते आणि शब्दच जिवंत होतात. मुलीच्या जीवनातील वय वर्षे १२ ते १५ ही अत्यंत विचित्र असतात. या काळात बालपणातील गोंडस निष्पापपण हरवलेले असते आणि तारुण्याचे सळसळते चैतन्य अद्याप लाभलेले नसते! त्यामुळे एका विचित्र मन:स्थितीतून हा खडतर प्रवास हात असतो. अ‍ॅन्च्या दुर्दैवाने तिचा हा काळ गुप्त निवासातल्या कैदेत गेला. तिच्या लेखनातून मानसिक कोंडमारा स्पष्ट जाणवतो. आपण कोणत्या परिस्थितीत सापडलो आहोत याची तिला जाणीव आहे. गांभीर्य आहे तरीही तिचा सहज स्वभाव अनेकदा उसळून येतो आणि तिची लेखणी एखादा मजेशीर प्रसंग रंगवून जाते. गुप्तनिवासाचे वर्णनही अत्यंत रेखीवपणे प्रकट होते. तेथील अडचण, माणसांची आणि सामानाची गर्दी, यामुळे उद्भवणारे फजितीचे प्रसंग अतिशय मार्मिकपणे प्रकट होतात. तसेच बाहेरून येणाऱ्या ज्यू छळाच्या बातम्या, युद्धाच्या बातम्या, रात्रीबेरात्री आकाशात घरघरणारी ब्रिटिश बॉम्बर्स, जमिनीवरून घडाडणाऱ्या जर्मन तोफा आणि या सर्वांमुळे गुप्तनिवापसात उठणारे विविध तरंग! यांचे अतिशय परिणामकारक चित्रण ‘किटी’च्या अनेक पानांतून प्रत्ययाला येत. या सर्वांत अ‍ॅनच्या शरीरात बदलांबरोबरच होणारे मानसिक बदलही सुस्पष्टाणे दिसून येतात. अ‍ॅन हळुहळू तारुण्याकडे जाऊ लागते. तरुण मनांची प्रेमाची भूकही तिने कोणताही आडपडदा न ठवेता प्रकट केली आहे. सुरुवातीला तिला न आवडणारा, कंटाळवाणा, आळशी, येडपट पीटरही तिला आता आवडू लागतो. (गुप्तनिवासात मैत्री करण्यासाठी ती एकमेव -------- उपलब्ध असतो.) कदाचित परिस्थितीतून तडजोड म्हणून तिने तो स्वीकारलाही असेल, पण अ‍ॅन् पीटरवर प्रेम करू लागते आणि तारुण्याबरोबरच स्पर्श, डोळ्यांची भाषा या अत्यंत तरल भावनाही जागृत होतात. जीवनात खूपच सुख व आनंद असल्याचा नवाच प्रत्यय तिला येतो, इथून पुढची अ‍ॅन थोडी वेगळी वाटते. स्वत:त रमणारी, स्वत:शीच बोलणारी आणि विचार करणारी... युद्ध संपल्यानंतर... च्या मुक्त जीवनाची चित्रे अ‍ॅन डोळ्यासमोर उभी करते. पण दुर्दैवाने युद्ध संपण्याआधी अ‍ॅनचे आयुष्य संपते... लपूनछपून राहणाऱ्या ज्यू कुटुंबांची खूपच कुचंबणा होऊ लागते. अन्नही कमी मिळू लागते. आसपासच्या, शेजारीपाजाऱ्यांच्या पकडल्या गेल्याच्या बातम्याही अस्वस्थ करू लागतात आणि या वणव्यात अ‍ॅनचे कुटुंबही सापडते. यातना तळाची वाट सर्वांनाच चालावी लागते. १४ जून १९४२ रोजी सुरू झालेला अ‍ॅन् किटी संवाद १ ऑगस्ट १९४४ रोजी अचानक थांबतो.’ कारण ४ ऑगस्ट रोजी या गुप्तनिवासावर ‘द ग्राईन पॉलिशे’ नी धाड घातली आणि सर्वांना पकडून नेले. गेस्टापोच्या लोकांनी गुप्तनिवास संपूर्ण धुंडाळला. जुनी मासिके, पुस्तके, वर्तमानपत्रे जमिनीवर इत:स्तता फेकून दिली. त्यातच एली व मिएप यांनपा अ‍ॅनची डायरी सापडली आणि आज ती डायरी वाचकासमोर एक कोवळे मन उलगडते आहे. खरे तर सर्वांना पकडले गेल्यानंतर यातना तळावरच खऱ्या ‘यातनेला’ सुरुवात होते. पण त्या आधची अ‍ॅनचे डायरी लेखन थांबते. तरीसुद्धा बंदिस्त आणि घुसमटलेल्या जीवनाचे हुंकार आयुष्याच्या क्षणभुंगुरतेची जाणीव करून देतात. प्रत्यक्ष भेटणाऱ्या मृत्यूपेक्षा मृत्यूचे निकटचे सानिध्य हे अतिशय भयकारी असते! क्षणोक्षणी दचकत पोलिसांच्या आणि गेस्टापोजच्या बुटांच्या खडखडाटावर आपले आयुष्य ओलीस ठेवून जाणणारे ते आठ माणसांचे कुटुंब! अ‍ॅनच्या डायरीतून या सत्याचा प्रत्यय येतो. मानवी मनोव्यापार अतिशय गुंतागुंतीचे असतात. पण अ‍ॅनने स्वत:च्या सहजसुंदर शैलीतून त्या बंदिस्त जीवनातल्या क्रियाप्रतिक्रियांचा नेमका वेध घेतला आहे. लहान सहान गोष्टीवरून धुसपुसणारी लहान-मोठी माणसे आणि त्यांच्या मनाचे विविध पदर हळुवारपणे उलगडले जातात. काहीतरी ‘आदम्य’ ‘उज्वल’ निर्माण करण्याच्या कृत्रीम खटपटीने अ‍ॅन डायरी लिहित नाही– तर लिहिण्यात एक प्रांजळ प्रवाहीपणा दिसतो. अ‍ॅनला स्वत:जवळ असणाऱ्या भुंगांची जाणीव आहे. गुप्तनिवासात ती कथा, निबंध, लेख लिहित असते. तरीही तिचे आपल्या ‘किटी’वर खूपच प्रेम आहे. ‘किटी’ पासून ती काही लपवून ठेवीत नाही. अगदी निकटच्या माणसांचे गुणदोष किटीला सांगून टाकते. लिहिण्याच्या ओघात, ‘‘माणसाचे खरे स्वरुप, त्याच्याशी भांडण होते तेव्हाच प्रकट होते, तोवर नाही! हे शाश्वत सत्यही ती प्रकट करते. १४ वर्षांच्या अ‍ॅनचे हे विचार मोठ्या माणसानाही थक्क करणारेच आहेत. अ‍ॅनचे एक आवडते पेन, चुकून कचऱ्याबरोबर शेगडीत टाकले जाते, अ‍ॅन खूप शोधते. पण दुसऱ्या दिवशी शेगडीतल्या राखेत पेनची क्लिप सापडते. हा प्रसंग तसा साधाच, पण अ‍ॅन म्हणते, ‘दु:खात सुख एवढेच की, माझ्या पेनचे दहन झाले. पुढे माझेही तेच व्हावे अशी तीव्र इच्छा आहे!’’ एका बाजूला ‘युद्धानंतर’ या विषयावर उत्साहाने बोलणारी अ‍ॅन स्वत:च्या मृत्यू कल्पनेलाही निरामय मनाने सामोरी जाते. युद्धानंतर आपल्या रोजनिशीला खूप महत्त्व येईल असे तिला मनातून कुठेतरी वाटते. आपल्या डायरीत, ‘एका कुरूप वेड्या बदकाचे मनोगत’ असे नावही ती देते. ...मार्च १९४५ मध्ये हॉलंड मुक्त झाले, पण त्यापूर्वी दोनच महिने बर्जेस बेल्सनच्या कैदेत अ‍ॅन मरण पावली... ‘युद्धानंतर’चा दिवस तिच्या आयुष्यात उगवलाच नाही! ‘मला मृत्यूनंतरही जगायचे आहे.’’ आणि म्हणून देवाले दिलेल्या देणगीबद्दल मी अत्यंत ऋणी आहे!’ असे अ‍ॅन म्हणायची... तिने लिहिलेल्या डायरीच्या रूपाने ती आजही जिवंत आहे. अनेकांना भेटते आहे. सौ. मंगला निगुडकरांनी अ‍ॅनच्या डायरीचा मराठी अनुवाद साधून अ‍ॅनची मराठी वाचकांशी भेट घडवून आणली आहे. अ‍ॅनच्या मृत्यूनंतर ४० वर्षांनी अगदी, अ‍ॅन भेटल्याचे समाधान मिळते. -प्रा. कृष्णाजी कुलकर्णी ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGKESHAR
NAGKESHAR by VISHWAS PATIL Rating Star
महाराष्ट्र टाइम्स 10 नोव्हेंबर 19

इतिहास आणि वर्तमानभूमीच्या आशयसूत्रांनी विश्वास पाटील यांचे कादंबरीविश्व आकाराला आले आहे. पूर्वदिव्य इतिहासाचे गौरवीकरण तसेच वसाहतकाळातील स्वातंत्र्यगाथेने (क्रांतिसूर्य, महानायक) त्यांच्यातील लेखकाला नेहमीच साद घातलेली आहे. सहकार आणि धरणग्रस्तांच्याजीवनावरील कादंबऱ्या महत्त्वाच्या ठरल्या. तसेच एक `वाचकप्रिय कादंबरीकार` म्हणूनही त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. विश्वास पाटील यांनी कादंबरी लेखनातून `महाराष्ट्र इतिहासबांधणी`चा प्रकल्प अभिनव रीतीने न्याहळला आहे. शिवकाळ, पेशवेकाळ, वसाहतकाळ, स्वांतत्र्यलढा ते गिरणगाव या दृष्टीने ऐतिहासिक महाराष्ट्र परंपरेचा मागोवा त्यांनी कादंबरीतून घेतला. काळ आणि व्यक्ती यांच्या परस्परसाहचर्याच्या दर्शनबिंदूतून त्यांनी `महाराष्ट्र` वाचला आहे. इतिहास आणि वर्तमान, शौर्य आणि नामुष्की तसेच आधुनिकतेच्या विपरीत दृष्टिबिंदूतून दीर्घकालीन महाराष्ट्राचे वाचन केले आहे. अर्थात त्यांच्या या महाराष्ट्र इतिहासवाचनाबद्दलाची अनेक अंगानी चिकित्साही होऊ शकते. मराठी वाङ्मयीन पर्यावरणात गंभीर आणि लोकप्रिय अशा द्वंदाभिरुचीचा लंबक सतत हिंदोळताना दिसतो. त्यावरून विविध भूमिकांचे इत्यर्थ सतत मांडले गेले. त्या संदर्भात विश्वास पाटील यांच्या कादंबऱ्यांचाही विचार होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर विश्वास पाटील यांच्या `नागकेशर` या नव्या कादंबरीकडे पाहावे लागते. कादंबरीस ग्रामीण महाराष्ट्राची पार्श्वभूमी लाभली आहे. सहकाराचा उदय, वाटचाल, विस्तार आणि -हास हा महाराष्ट्राला परिचित आहेच. आधुनिक महाराष्ट्राच्या पुनर्घटनेत यशवंतराव चव्हाण यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. ग्रामीण जीवनाच्या कायाकल्पात त्यांच्या धोरणदृष्टीचा सहभाग होता. सहकाराच्या विशाल जाळ्यातून महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनात काही प्रमाणात शेती उद्योगाचे विकेंद्रीकरण झाले. मात्र खेडोपाडी सहकार रुजत-विस्तारत असताना जिल्ह्याजिल्ह्यात नवी अर्थसत्ताकेंद्रे उदयास आली आणि त्यातून सत्ताकेंद्री अल्पजनांचे वर्तुळ तयार झाले. सहकाराला उतरती कळा लागली. मराठी कादंबरीकारांनी या सहकाराच्या भल्याबुऱ्या जीवनाचे दर्शन त्यांच्या कादंबऱ्यांतून घडविले. व. ह. पिटके यांच्या `शिदोरी` पासून ते मोहन पाटील यांच्या `साखरफेरा` कादंबरीपर्यंत सहकारकेंद्री ग्रामीण जीवनााची चित्रणपरंपरा दाखवणारी कादंबरीपरंपरा मराठीत आहे. सहकार या व्यापक क्षेत्रातील साखर कारखानाकेंद्री जीवनाचा चित्रफलक मराठी कादंबरीकरांनी कसा वाचला हे पाहणे समाजशास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाचे ठरू शकते. या कादंबरीपरंपरेत विश्वास पाटील यांची `नागकेशर` कादंबरी दाखल झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील गजरा खोऱ्यातील बापूसाहेब डोंगरे-देशमुख कुटुंबाची कहाणी या कादंबरीत केंद्रवर्ती आहे. ध्येयवादी शिक्षक असणाऱ्या बापूसाहेब अचानक राजकारणाकडे ओढले जातात आणि एका प्रदेशाचा कायाकल्प होतो. साखर कारखान्याच्या येण्याने साऱ्या प्रदेशाचा भौतिक पालट होतो. तेथील समाजजीवन बदलते. तालुक्यातील राजकारणावर बापूसाहेबांची एकहाती नियंत्रण असते. बापूसाहेबांचे बंधू नानासाहेबांचेही कुटुंब कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. बापूसाहेबांचे चिरंजीव प्रिन्स उच्च शिक्षित मात्र मनाने एकाकी असतात. गावातीलच पतीच्या छळाला कटांळलेल्या शलाका या विवाहित तरुणीशी प्रिन्स लग्न करतो. प्रिन्सच्या कलासक्त, सुसंस्कृत स्वभावामुळे ती लग्नास तयार होते. बापूसाहेबानंतर सत्तेची सारी सूत्रे प्रिन्स-शलाकाकडे येतात. आणि बापूसाहेबांच्या पश्चात बंधू नानासाहेब, त्यांचा मुलगा बाजीराव, सून नेत्रा यांचा प्रिन्स-शलाका यांच्यासोबत सत्तासंघर्षला सुरूवात होते. पुढे कारखाना, मेडिकल कॉलेज, स्थानिक स्वराज्य संस्था ते विधानपरिषद, लोकसभा निवडणुकांच्या राजकारणात दोन्ही कुटुंबात संघर्षाचा कडेलोट होतो. आणि सहकार प्रगतीला खीळ बसून दोन्ही कुटुंबांना दुःखान्ताला सामोरे जावे लागते. त्याची झळ तालुक्यातील जनतेला सोसावी लागते. अखेरीस कादंबरीतील संघर्षनाट्याचा शेवट सुखान्त स्वरूपाचा आहे. असे काहीएक या कादंबरीचे कथनसूत्र आहे. देशमुख कुटुंबातील तीन पिढ्यांचे चित्रण कादंबरीत आहेत. देशमुख कुटुंब केंद्रस्थानी ठेवून कादंबरीत एका तालुक्यातील समाजजीवन न्याहाळले आहे. या कुटुंबाच्या संबंधित घडामोडीतून निर्माण झालेली समाजवळणे कादंबरीत आहेत. एका अर्थाने साखरप्रदेशाला लगडलेल्या विषारी मुळ्यांची ही कहाणी आहे. सत्तेच्या वाट्यासाठीचा पराकोटीचा संघर्ष त्यातले सूडनाट्य-वैरभावाचे वेगवान घटना-प्रसंगातून निवेदन केले आहे. सत्ता केंद्राभोवतालची निवडणूक, राजकारणातील सूक्ष्मता कादंबरीत आहे. त्यामुळे मानवी वर्तनस्वभावात झालेल्या पालटाचे चित्रण आहे. निवडणूककेंद्री सामाजिक वृत्तांताने कादंबरीला वेगळे परिमाण मिळवून दिले आहे. मराठा कुटुंबातील स्त्रियांचा राजकारण सहभाग, अस्तंगत डाव्यांचे राजकारण, राजकारणातील स्त्री-पुरुषांचे संबंधाचे चित्र आहे. नायिकाप्रधान कादंबरी असे या कादंबरीचे स्वरूप आहे. कादंबरीच्या मध्यवर्ती स्त्रीपात्रे असून कांदबरीच्या चलसृष्टीत त्यांच्या उपस्थितीवावराला विशेष महत्त्व आहे. आदर्शवादी-शुभंकर व खलत्व दर्शक स्त्रीपात्रांच्या रूपातून समाज-राजकारणाचे दर्शन घडविले आहे. कादंबरीतील मुख्य कथनाचा विस्तार करणारी अनेक उपकथानके कादंबरीत आहेत. या उपकथनाचे धागेदोरे एकमेकांत गुंतलेले आहेत. भूतकाळातील व्यक्ती कहाण्यांच्या प्रदेशानी वर्तमानाचा कथनपट विणला आहे. त्या त्या व्यक्तींच्या भूतकाळातील रहस्यमय वाटणाऱ्या पूर्वकथनांनी त्यात रंग भरले आहेत. परिमल मारवडी, बापू, रमेश दिवसे व शलाकाची पूर्वकहाण्यांचे संदर्भधागे वर्तमान कथनभूमीत आहेत. विश्वास पाटील यांनी या कादंबरीत सत्ताधारी मराठा कुटुंबातील बारकावे आणि त्यांचा वर्तनस्वभाव, वृत्ती, सूडाचे बारकाईने चित्रण केले आहे. श्रीमंत कुटुंबे, त्यांच्यातील जातीय-सरंजामी गंड, राजकारणातील शह-प्रतिशहाचे सखोल चित्रण कांदबरीत आहे. राजकारणाचे रंगभरण करणारा समाजवृत्तांत कादंबरीत सतत आहे. गावाकडील यात्रा, मिरवणुका तसेच निवडणुकातील तपशीलभरणांनी कादंबरीत रंग भरले आहेत. कादंबरीत पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय घराण्यांच्या तपशीलाच्या भासमान प्रतिकृती मोठ्या प्रमाणात आढळतात. गेल्या चार दशकातील साखरकेंद्री प्रदेशातील राजकारणाचा पट त्याचे साद-पडसाद कादंबरीभर सतत जाणवत राहतात. सहकाराच्या -हासकाळाकडे विशिष्ट दर्शनबिंदूतून पाहण्याचा हा प्रयत्न आहे. कादंबरीची भाषा प्रवाही स्वरूपाची आहे. प्रथमपुरुषी कथन आणि वेगवान घटना-प्रसंगाची गुंफण त्यामध्ये आहे. मोजक्या व्यक्तिरेखांचे प्रभावी आणि परिणामकारक चित्रण कादंबरीत आहे. सत्तानाट्याच्या सूड विकृतीचे शोकान्तभावात पर्यवसित होणारे प्रभावी चित्र कादंबरीत आहे. नानासाहेबांचा मुलगा बाजीराव अंगाला स्फोटके लावून विहिरीत उडी मारून आत्महत्या करतो. त्याच्या शरीराच्या ठिक-या उडतात या प्रसंगाचे अतिशय खोलवरचे चित्र कादंबरीत आहे. वाचकांना सतत कथनात गुंतवून ठेवणारी ही जिज्ञासाशैली आहे. वाचकलक्ष्यी आवाहनपरतेला साद घालणारे कथनरूप कादंबरीत आहे. त्यामुळे विश्वास पाटील यांच्या कादंब-यातील आवाहनशैलीचा अधिक विस्तृत अभ्यास होऊ शकतो. सहकाराचा व ग्रामीण कुटुंबातील सत्तासंघर्षाचा मोठा पाट मांडणा-या या कादंबरीवर भारतीय आदर्शवादी कुटुंबव्यवस्थेतील मूल्यांची गडद सावली आहे. त्यामुळे एकाच व्यक्तीच्या वर्तनव्यहाराकडे काळ्या-पांढ-या रंगात कादंबरीत पाहिले आहे. स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन पारंपरिक स्वरूपाचा आहे. तसेच प्रथमपुरुषी कथनाची सारी सूत्रे कथनकर्त्याकडे असल्यामुळे कथनावर संपूर्णतः नियंत्रण कथनकाराचे राहते. त्यामुळे पात्रांचा अवकाश सीमित झाला आहे. त्यामुळे ते एकरंगीस्वरूपात चित्रीत होतात. `मला तुमच्यापेक्षा एक गुंजभरही अधिक मोठेपण नको त्याची सोबत हवी, `त्याच्या सावलीसह` असे सत्ताकेंद्री असणा-या कर्तबगार शलाकाच्या म्हणण्यातून पारंपरिक पतिनिष्ठतेचे मूल्य अप्रत्यक्षपणे सूचित झाले आहे. शीर्षकात ध्वनित झालेल्या विरोधात्म समांतरन्यासात प्रगतीच्या चक्रावरच आघात करणारी व्यवस्था सहकारक्षेत्रात निर्माण झाली आहे. कादंबरीत झाडाचे आणि नागकेशराचे रूपक कल्पिले आहे. झाडांची मुळं जमिनीत खोलवर जातात. भूमीतून जीवनरस घेत वाढतात, मात्र त्यांच्यावर बांडगूळ वाढते. ऊसाच्या फडात नागकेशराच्या वेली वाढाव्यात आणि त्याने सारे पीकच नाहीसे करुन टाकावे, अशा त-हेने महाराष्ट्राच्या सहकार विकासालाच नष्ट करुन टाकणा-या जीवनानुभवाचे चित्रण कादंबरीत आहे. सहकाराच्या प्रगतीला कुटुंबातील सत्तासंघर्ष कारणीभूत ठरत आहे, या विचारसूत्राचे प्रकटीकरण कादंबरीतून अभिव्यक्त झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सहकार जीवनातील -हासाचे, कुटुंबकेंद्री सत्तासंघर्षाचे चित्रण करणारी ही महत्त्चाची कादंबरी आहे. ...Read more

BETTER
BETTER by DR.ATUL GAWANDE Rating Star
Divya Marathi 9.11.19

वैद्यकीय क्षेत्राचा सखोलतेने, अभ्यासपूर्णतेने आणि सोदाहरण घेतलेला वेध... डॉ. अतुल गवांदे हे अमेरिकेत शल्यविशारद म्हणून प्रॅक्टिस करतात. वैद्यकीय क्षेत्रात अधिक गुणवत्ता, अचूकता, सुसूत्रता कशी आणता येईल, या विषयी त्यांनी सखोल आणि सोदाहरण चर्चा केली हे त्यांच्या ‘बेटर’ या पुस्तकातून. या पुस्तकाची त्यांनी तीन विभागांत विभागणी केली आहे. पहिला भाग आहे ‘परिश्रमपूर्वक लक्ष पुरविणे’, दुसरा भाग आहे ‘कार्यप्रणाली वापरणे’ आणि तिसरा भाग आहे ‘कल्पकता.’ या पुस्तकाचा अनुवाद केला आहे सुनीति काणे यांनी. ‘परिश्रमपूर्वक लक्ष पुरविणे’ या विभागात त्यांनी ‘हात धुण्याबाबत’ या प्रकरणात जंतुसंसर्ग टाळण्यासाठी हात धुणं कसं आवश्यक आहे, ते केव्हा आणि कशा पद्धतीने धुतले पाहिजेत याचं विवेचन केलं आहे. त्याचबरोबर विविध रोग पसरविणारे विविध रोगजंतू, जंतुसंसर्ग नियंत्रण विभाग याविषयीही माहिती दिली आहे. बाळंतरोग हा जंतुसंसर्गामुळे होतो, हे शोधून काढून निर्जंतुकतेचा आग्रह धरणाऱ्या डॉक्टरची कथा, जंतुसंसर्गाच्या संबंधातील उदाहरणं इ. बाबींचा समावेशही या प्रकरणात करण्यात आला आहे. ‘स्वच्छ करून टाकणे’ या प्रकरणात त्यांनी पोलिओ निर्मूलनाच्या मोहिमेचं तपशीलवार विवेचन केलं आहे. पोलिओ मोहीम कशी सुरू झाली, इथपासून ते या मोहिमेचं जगभर पसरलेलं जाळं, कर्नाटकमधील त्यांच्या एका डॉक्टर मित्राबरोबर फिरताना पोलिओ निर्मूलन मोहिमेच्या बाबतीत आलेले अनुभव इ. बाबत त्यांनी सविस्तर लिहिलं आहे. ‘युद्धातील दुर्घटना’ या प्रकरणात त्यांनी युद्धात जखमी होणाऱ्या सैनिकांच्या जखमा कशा प्रकारच्या असतात, सैनिकांवर उपचार करण्याच्या पद्धतींमध्ये होत गेलेल्या सुधारणा, सैनिकांना तातडीने उपचार करण्यासाठी केलेली व्यवस्था, त्यात येणाऱ्याb अडचणी, त्यावर शोधलेले उपाय इ.बाबत सविस्तर विवेचन केलं आहे. ‘योग्य कार्यप्रणाली वापरणे’ या विभागातील ‘नग्न रुग्ण’ या प्रकरणात स्त्री-पुरुषांच्या गुप्तांगांची, नाजूक अवयवांची तपासणी वेगवेगळ्या देशांत कशा प्रकारे केली जाते, या तपासणीच्या वेळी स्त्रियांनी कशा प्रकारचे कपडे घालावेत, पुरुष डॉक्टर जेव्हा एखाद्या स्त्रीच्या नाजूक अवयवांची तपासणी करत असेल तेव्हा तिथे शॅपेरॉन (नर्स किंवा दुसरी स्त्री) असावी का, याबाबतची डॉक्टरांची आणि रुग्णांची विविध मतं सांगितली आहेत. काही डॉक्टर्सचे आणि रुग्णांचे या संदर्भातील अनुभव नोंदवले आहेत. ‘तुकड्यातुकड्यातलं काम’ या प्रकरणात डॉक्टरांच्या अर्थकारणाची चर्चा केली आहे. डॉक्टरांनी प्रत्येक सेवेसाठी किती मोबदला घ्यावा, याबाबत सुनिश्चितता नसली तरी सर्वसाधारणपणे त्याचे दर ठरवता येऊ शकतात. कोणताही डॉक्टर एखाद्या विमा कंपनीशी जोडलेला आहे का नाही, यावरही त्याची आमदनी ठरलेली असते. डॉक्टरची व्यावसायिकता आणि त्याचा सेवाभाव यावरही गवांदे यांनी सोदाहरण चर्चा केली आहे. अर्थातच ती अमेरिकेतील वैद्यकीय सेवेच्या संदर्भात आहे. एकूणच हे प्रकरण डॉक्टरांच्या अर्थकारणावर सविस्तरपणे प्रकाश टाकणारं आहे. ‘फाशीच्या कोठडीतले डॉक्टर्स’ या प्रकरणात कैद्यांना प्रत्यक्ष मृत्युदंड देताना डॉक्टरांचा त्यात प्रत्यक्ष सहभाग असावा की नाही, यावर तपशीलवार चर्चा केली आहे. फाशीच्या कोठडीत डॉक्टरच्या उपस्थितीची गरज का भासली, अमेरिका आणि कॅलिफोर्नियातील डॉक्टर संघटनांनी मृत्युदंडाच्या वेळी डॉक्टरचा त्यात सहभाग असण्याला केलेला विरोध, कैद्यांना मृत्युदंड देण्याचे प्रकार, त्यातील त्रुटी, मृत्युदंडाच्या अंमलबजावणीत डॉक्टरांच्या सहभागाबाबतची आचारसंहिता, ज्या डॉक्टरांनी कैद्यांच्या मृत्युदंडात सहभाग घेतला त्यांचा दृष्टिकोन आणि त्यांचे त्या संदर्भातील अनुभव इत्यादी मुद्द्यांच्या आधारे सखोल चर्चा केली आहे. ‘लढा देण्याबाबत’ या प्रकरणात गुंतागुंतीच्या काही केसेसचे अनुभव सांगितले आहेत. डॉक्टरी कौशल्य पणाला लावूनही काही वेळेला गुंतागुंतीच्या केसेसमध्ये कसं अपयश येतं आणि काही वेळेला आश्चर्यकारकरीत्या पेशंट कसा बचावतो, हे या अनुभवांवरून दिसून येतं. शेवटी डॉक्टरांच्या प्रयत्नांनाही कधी कधी मर्यादा येते, हे या प्रकरणावरून दिसून येतं. या पुस्तकाच्या ‘कल्पकता’ या तिसऱ्या भागातील ‘गुणसंख्या’ या प्रकरणात बाळंतपणाच्या वेळेस उद्भवणाऱ्या अडचणी, त्याबाबत केल्या जाणाऱ्या उपाययोजना इ.बाबत सविस्तर आणि सोदाहरण चर्चा केली आहे. ‘बेल कव्र्ह’ या प्रकरणात सी. एफ. या कफाशी संबंधित आजाराबाबत तपशीलवार आणि सोदाहरण चर्चा केली आहे. ‘कामगिरी सुधारण्यासाठी’ या प्रकरणात डॉ. गवांदे यांनी नांदेड (कर्नाटक) जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या बाबतीतील अनुभव सांगितले आहेत आणि त्या अनुभवांच्या आधारे सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्स अनेक अडचणींवर मात करून किती कार्यक्षमतेने सेवा बजावत असतात, याची चर्चा केली आहे. जिल्हा रुग्णालयातील कार्यक्षम डॉक्टर्स बघितल्यानंतर गवांदे यांनी आपलं मत नोंदवताना लिहिलं आहे, ‘असं असूनही मला जे दिसलं, ते होतं : सुधारणा घडवणं शक्य असतं! त्यासाठी तीव्र बुद्धिमत्ता गरजेची नसते. त्यासाठी नेटानं, प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहणं गरजेचं असतं. त्यासाठी स्वच्छ नैतिक विचार गरजेचे असतात आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्यासाठी प्रयत्न करत राहण्याची तयारी गरजेची असते.’ समारोपात, सरासरीपेक्षा अधिक चांगली कार्यक्षमता प्राप्त करण्याच्या काही युक्त्या त्यांनी सांगितल्या आहेत. तर, वैद्यकशास्त्रातील काही महत्त्वाच्या बाबींची सोदाहरण आणि साधक-बाधक चर्चा करणारं हे पुस्तक वैद्यकीय क्षेत्रात येऊ घातलेल्या विद्याथ्र्यांसाठी आणि कार्यरत असणाऱ्यांसाठीही मार्गदर्शक असलं, तरी ते कुठेही कंटाळवाणं किंवा रटाळ होत नाही; कारण गवांदे यांची साधी, सोपी भाषा आणि त्यांनी दिलेली उदाहरणं. त्यामुळे सर्वसामान्य वाचकही हे पुस्तक अगदी रुचीने वाचू शकतो. गवांदे यांनी वैद्यकीय क्षेत्राच्या संदर्भात केलेली चर्चा अन्यही क्षेत्रांना लागू होऊ शकते. त्यांची ही चर्चा मानवी मू्ल्यांनाही स्पर्श करते. अगदी प्रस्तावनेपासून समारोपापर्यंत हे पुस्तक वाचकाच्या मनाची पकड घेतं. तेव्हा वैद्यकीय क्षेत्राच्या विविध पैलूंचं दर्शन घडविणारं, त्या क्षेत्राविषयीची माहिती आणि ज्ञान वाचकांपर्यंत सहजतेने पोचवणारं हे पुस्तक अवश्य वाचावं असं आहे. सुनीति काणे यांचा अनुवाद उत्तम. -अंजली पटवर्धन ...Read more