* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: STILL LOLO
 • Availability : Available
 • Translators : PRANAV SUKHADEV
 • ISBN : 9789386745262
 • Edition : 1
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 200
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
 • Ebooks:
 • Print Books:
FOR FASHION JOURNALIST LAUREN ("LOLO") SCRUGGS, A SHORT FLIGHT TO LOOK AT CHRISTMAS LIGHTS TURNED INTO A NIGHTMARE WHEN SHE WAS STRUCK BY THE PLANE`S SPINNING PROPELLER BLADES. AS LAUREN WAS RUSHED TO THE HOSPITAL, THE WORLD WATCHED IN SHOCK AND HORROR. SEVERAL MAJOR SURGERIES AND THOUSANDS OF PRAYERS LATER, LAUREN WAS STILL ALIVE. BUT SHE HAD SUFFERED BRAIN TRAUMA AND LOST HER LEFT HAND AND LEFT EYE. AND SHE HAD TO FACE SOME INCREDIBLY DIFFICULT QUESTIONS: WHAT KIND OF FUTURE WILL I HAVE? WHERE IS GOD IN ALL THIS PAIN? WILL ANYONE EVER BE ABLE TO LOVE ME NOW? IN STILL LOLO, LAUREN AND HER FAMILY REVEAL WHAT REALLY HAPPENED THAT NIGHT, WHAT LAUREN`S LIFE IS LIKE TODAY, WHAT GOT THEM THROUGH THEIR JOURNEY TOWARD HEALING, AND HOW THEY CONQUERED ALL ODDS TO PERSEVERE AS A FAMILY. CONTAINING EXCLUSIVE PHOTOS AND PERSONAL STORIES FROM LAUREN AND HER FAMILY, STILL LOLO IS A COMPELLING AND FIERCELY BEAUTIFUL ACCOUNT OF FAITH, DETERMINATION, AND STAYING TRUE TO WHO YOU ARE--NO MATTER WHAT.
"ख्रिसमसनिमित्त केलेली शहरातील रोषणाई पाहण्यासाठी फॅशन जर्नालिस्ट लॉरेन ऊर्फ लोलो त्या लहानशा विमानात फेरफटका मारण्यासाठी बसली खरी; पण ती रात्र तिच्यासाठी काळरात्रच ठरली. कारण विमानातून उतरताना विमानाच्या प्रोपेलरच्या फिरणाऱ्या पात्यांमध्ये येऊन तिचा भयंकर अपघात झाला. आपल्या प्राणांसाठी झगडणाऱ्या जखमी लॉरेनला जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेत होते, तेव्हा जणू सगळं जगच धक्का बसल्याप्रमाणे स्तिमित होऊन पाहत होतं. कित्येक मोठ्या शस्त्रक्रियांनंतर आणि हजारो जणांच्या प्रार्थनांनंतर लोलो जिवंत राहिली. पण तिच्या मेंदूला जबर मार बसला होता आणि या अपघातात तिनं आपला डावा हात आणि डोळा गमावला होता. जिथं बाह्य सौंदर्याला प्रचंड महत्त्व दिलं जातं, अशा फॅशनच्या क्षेत्रातच काम करणाऱ्या सुंदर लॉरेनचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त झालं, असं अनेकांना वाटलं होतं. पण ते चूक होतं ! ‘स्टिल लोलो’ या पुस्तकात लॉरेन आपल्याला सांगते की, त्या रात्री नेमकं काय घडलं, या भयंकर अपघातातून ती कशी वाचली आणि बाहेर आली, आणि आज तिचं आयुष्य कसं आहे... तिच्यासमोर उभ्या असलेल्या अत्यंत अवघड प्रश्नांचीही ती न डगमगता, प्रामाणिकपणे उत्तरं शोधायचा प्रयत्न करते- माझं आता भवितव्य काय? या प्रकारानंतर कोणी माझ्यावर प्रेम करेल की नाही? या सगळ्या वेदनादायी प्रवासात देव कुठं आहे? भयविरहित जीवन कसं जगावं, आणि आयुष्यात कोणतीही संकटं, आव्हानं समोर आली तरी त्यावर कशी मात करायची, हे तिच्या जीवनकहाणीतून लॉरेन आपल्याला सांगते. लॉरेन आणि तिच्या कुटुंबाची ही सुंदर कहाणी- ‘स्टिल लोलो’ आपल्याला बरंच काही सांगून जाते- श्रद्धा, जिद्द, चिकाटी आणि काहीही झालं तरी आपलं स्वत्व जपण्याची आस ! "

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #EKLADHAASAHI #STILLLOLO #एकलढाअसाही. #BIOGRAPHY&TRUESTORIES #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #PRANAVSUKHADEV #LAURENSCRUGGS "
Customer Reviews
 • Rating StarManali Ballal

  नुकतेच `एक लढा असाही `पुस्तक वाचले. ही भयानक अपघातात हात गमावलेल्या तरूणीचे आत्मकथन आहे. फारच वाचनिय. त्यानिमित्ताने अमेरिकन संस्कृती लहान अपघातातही मदतीतील तत्परता त्यातील अचूकता आणि नियोजन वाखाणण्याजोगे आहे.जवळच्या व्यक्तींचे प्रेम आणि परमेश्वरावरी आढळ श्रद्धेत `असाध्य ते साध्य `करण्याचे सामर्थ्य आहे याची प्रचिती येते. ...Read more

 • Rating StarLOKPRABHA - 18 MAY, 2018

  दुर्दम्य आशावादाची गोष्ट... आयुष्य ही फार वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. प्रत्येक माणसाला एका ठरावीक कालखंडाचे आयुष्य मिळालेले असते आणि वाट्याला येणाऱ्या हेलकाव्यांसकट प्रत्येकजण ते जगत असतो. कधी वाट्याला सुख येते तर कधी न संपणारे दुख: आणि वेदनांची मालिक. या सगळ्यातून पुढे जाण्यासाठी माणसाला एक गोष्ट आधार देते, ती म्हणजे सगळं सहन करून चांगलंच होणार आहे हा आशावाद. अशाच अनेक मानसिक आणि शारीरिक वेदनांना तोंड देऊन मरणाच्या दारातून केवळ आशा आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावर पुन्हा जीवनाशी एकरूप होणाऱ्या अमेरिकन फॅशन जगतातील पत्रकाराची गोष्ट म्हणजे ‘स्टील लोलो’ या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद. अर्थात ‘एक लढा असाही’. लॉरेन ही तेवीस वर्षांची उत्साही आणि देवावर मनापासून श्रद्धा असणारी अमेरिकन मुलगी. शिक्षण नुकतंच संपवून हळूहळू आपल्या स्वप्नांच्या दिशेने मार्गक्रमण करणारी. तिने नुकतंच लोलो हे ऑनलाईन फॅशन मासिक सुरू केलेलं असतं. त्या मासिकाचं काम करत ती तिच्या आई-वडिलांसोबतच राहत असते. आपल्या आवडत्या क्षेत्रातल्या विविध संधींचा माग घेत तिचं आयुष्य सुरू होतं. नुकतंच तिचं तिच्या बॉयफ्रेंड जेम्ससोबत ब्रेकअप झालेलं असतं पण तोही अतिशय जाणीवपूर्वक आणि समजुतीने घेतलेला निर्णय असतो. मग अशी कोणती घटना लॉरेनच्या आशावादाची आणि श्रद्धेची परीक्षा घेणारी घडते? अशा कोणत्या घटनेने तिचं आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलतं? लॉरेन आणि ब्रिटनी या जुळ्या बहिणी. ब्रिटनी धीट, तर लॉरेन जरा लाजरीबुजरीच. दोघी बहिणी वाढत असताना अचानक अतिशय आनंदी कुटुंबाची घडी विस्कटते, ती आई-वडिलांच्या घटस्फोटाने. लहान वयात अनेक भावनिक हेलकाव्यांना तोंड देत ब्रिटनी आणि लॉरेनचं बालपण सरतं. काही काळानंतर आई-वडील एकत्र येतात आणि आयुष्य पुन्हा सुरळीत सुरू होतं. लॉरेन तिची शाळा संपवून टेक्सासमधल्या एका युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत असते. पण तिला काही त्या शिक्षणात रस वाटत नसतो. तिला वहिवाट मोडून काहीतरी ऑफबीट करावंसं वाटत असतं. सुरुवातीपासून लॉरेनला फॅशन विश्वात रस असल्याने ती एका मालिकेच्या फॅशन विभागात उमेदवारी सुरू करते. याच दरम्यान तिला अनेक माणसे भेटतात. ईश्वरावरील तिच्या श्रद्धेची प्रचीती अनेकदा आल्याने तिचा देवावरचा विश्वास अधिकच दृढ होत जातो. इंटर्नशिपच्या काळात तिचे अनुभवविश्व समृद्ध होत असतं. तिला चांगली-वाईट माणसं भेटत असतात. न्यूयॉर्कच्या त्या विश्वात श्रद्धेला काहीसं बाजूला ठेवत लॉरेन मुक्त विहार करते आणि पुन्हा तिच्यामागे एक विचित्र आजार लागतो. कुटुंबीयांना घाबरवून सोडणाऱ्या आजारातून लॉरेन उठते तसे घरचे तिला न्यूयॉर्क सोडून घरी येण्याचा आग्रह धरतात. घरी आल्यानंतर लॉरेन शॅनन या आपल्या मैत्रिणीसह एक मासिक सुरू करते. पण तिचं आणि तिच्या कुटुंबाचं आयुष्य बदलणारी घटना खिसमसच्या काळात घडते. खिसमसच्या पूर्वसंधेला लॉरेन आपल्या कुटुंबासह चर्चमध्ये जाते. चर्चमधील सांगीतिक कार्यक्रमानंतर झालेल्या चर्चमधील भाषणात वक्ते जीवनातील आशावादाचे महत्त्व अधोरेखित करतात, त्यावेळी कोणालाही कल्पना नसते की हाच आशावाद तिच्या भावी आयुष्यात निर्णायक ठरणार आहे. चर्चमधील कार्यक्रमानंतर लॉरेन तिची मैत्रीण शॅनन आणि माईक यांच्यासह त्यांच्या घरी मेजवानीच्या निमित्ताने जाते. भव्य-दिव्य आयुष्य जगणारी माईक खिसमससाठी शहरात केलेली सजावट आणि रोषणाई विमानातून बघण्याची कल्पना सांगते. काही वेळातच लॉरेन मित्र-मैत्रिणीसोबत माईकच्या चार आसनी विमानात स्वार होऊन खिसमसच्या रोषणाईचा आनंद घेत असते. पण अचानक माईकमध्ये सुरू झालेली खरखर आणि डोक्यातल्या विचारांमुळे लॉरेनच्या मनात भीती दाटून येते. बाहेर गडद अंधार आणि पाऊस पडत असताना लॉरेनच्या हृदयात भीतीने धडधड होत असते. आणि काही क्षणांत तिच्या लक्षात येते की विमानाने सुखरूप लँडिंग केलं आहे. खाली उतरताना आजूबाजूच्या गडद अंधारात तिला फक्त इंजिनचा मोठा आवाज येत असतो आणि काही क्षणांतच लॉरेनचा एक जीवघेणा अपघात झालेला असतो. अंधारात न दिसल्याने विमानातून उतरून लॉरेन विमानाच्या उजवीकडच्या पंख्याच्या दिशेने चालत जाते. अतिशय वेगाने फिरणाऱ्या त्या प्रोपेलरच्या माराने लॉरेन रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असते. तिचा डावा हात शरीरापासून वेगळा झालेला असतो आणि तिच्या डोक्याला व डोळ्यालाही जबर मार बसलेला असतो. मेंदूलादेखील मार बसतो. उपचार सुरू होतात, लॉरेन मृत्यूशी झुंज देत असते. काही वेळाने डॉक्टर तिची प्रकृती स्थिर असल्याचा निर्वाळा देतात. तिच्या मेंदूवर, हातावर आणि चेहऱ्यावर अनेक प्रकारच्या सर्जरी करायच्या असतात. मेंदूला इजा झाल्यामुळे ती कदाचित नीट बोलू शकणार नाही असे डॉक्टर सांगतात. तिचे व्यक्तिमत्त्व व स्वभाव पूर्णपणे बदलेला असू शकेल असा अंदाज वर्तवतात. यामुळे लॉरेनच्या कुटुंबीयांवर प्रचंड ताण येतो. लॉरेनच्या देवावरील श्रद्धेची आणि आशावादाची ही परीक्षाच असते. काही दिवसांनी लॉरेन शुद्धीवर येते पण तिचा डावा हात आणि डोळा निकामी झालेला असतो. हळूहळू उठण्याचा, चालण्याचा प्रयत्न करत लॉरेनची प्रगती होत असते. काही दिवसांतच तिच्या प्रकृतीत आश्चर्यकारकरीत्या सुधारणा झालेली दिसते. काही अंतर चालणं, थोडंफार बोलणं असं करत लॉरेन आयुष्य पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करते. परंतु आपला हात व डोळा गमावणं ही गोष्ट तिच्यासाठी प्रचंड धक्कादायक असते. या गोष्टीचा स्वीकार करण्याचं धैर्य तिला आशावादाने आणि देवावरील श्रद्धेने मिळतं. लॉरेनने मृत्यूला हुलकावणी दिली खरी, पण एका हाताशिवाय असलेलं आयुष्य तिच्यापुढे वाढून ठेवलेलं असतं. एकाच हाताने दररोजची कामं करणं तिच्यासाठी अशक्य होत होतं. औषधांचा प्रभाव ओसरल्यानंतर वेदनांची जाणीव तिला होत जाते आणि तिच्या आत्मविश्वासाला तडा जातो. तिच्यासाठी आपलं अपंगत्व जगासमोर येणं लाजिरवाणं वाटू लागतं. फॅशनजगतात एका हाताचं आणि अंध डोळ्याचं अपंगत्व घेऊन वावरणं तिला असह्य होतं आणि यातून तिला नैराश्य येतं. आयुष्य बदलून टाकणाऱ्या या एका जीवघेण्या अपघातातून उभं राहण्यासाठी तिला जगभरातून असंख्य लोकांची साथ मिळते. तिच्या घरच्यांसह तिची बहीण व नवरा तिला या अंधकारमय आयुष्यातून बाहेर काढण्यासाठी साथ देतात. लॉरेन कृत्रिम अवयवांसह पुन्हा दमदारपणे आयुष्यातील संकटांवर मात करून उभी राहते. खिसमसच्या पूर्वसंधेचा हा दिवस लॉरेनच्या आयुष्याला अनपेक्षित कलाटणी देणारा ठरतो. ती दवाखान्यात असताना प्रसारमाध्यमांद्वारे या अपघाताची बातमी जगासमोर येते आणि जगभरातून आर्थिक मदतीला आणि भावपूर्ण संदेशांचा ओघ सुरू होतो. दवाखान्यातच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी तिची बातमी मिळवण्यासाठी येऊ लागतात. आजारातून उठल्यावरही तिचे फोटो टिपण्यासाठी माध्यमे उत्सुक असतात. या एका भयंकर अपघाताने लॉरेन या सामान्य मुलीचं आयुष्य बदलून जातं. या आशावादाची कथा तिने ‘स्टील लोलो’ या पुस्तकात शब्दबद्ध केली. तिच्या आयुष्याचा, अपघाताचा आणि त्यानंतर आयुष्याला सामोरे जाण्याचा प्रवास स्तिमित करणारा आहे. साध्या साध्या संकटाने खचून जाणाऱ्या व्यक्तींसाठी तिचा हा प्रवास प्रेरणादायी आहे. तिची कथा वाचताना आपली संकटे क्षुल्लक वाटतात. आशावादाची आणि जगण्याच्या जिद्दीची ही गोष्ट नक्कीच सर्वांनी वाचायला हवी. -विशाखा कुलकर्णी ...Read more

 • Rating StarDainik Loksatta ,Lokrang 24-12-17

  ‘जेव्हा आयुष्य तुमच्याशी क्रूर खेळ खेळतं, तेव्हाही निराश न होता पुढे जात राहायचं..’ प्रत्येक वळणावर ही भावना तुमच्यापर्यंत पोहोचवणारं छोटेखानी पुस्तक म्हणजे ‘एक लढा असाही..’ फॅशन पत्रकारिता करणाऱ्या एका अमेरिकन तरुणीच्या जीवनातली ही सत्यघटना. तिचं ाव लॉरेन ऊर्फ लोलो स्क्रग्ज. ‘लोलो मॅगझिन’ याच नावानं तिनं स्वत:चं ऑनलाइन मासिक सुरू केलं होतं. तिचं करीअर आकार घेत होतं. ख्रिसमसचे सूर वातावरणात तरंगत होते. तेव्हाची ही घटना.. शहरातली दिव्यांची रोषणाई वरून बघायला गंमत येईल म्हणून एका छोटय़ा दोन-आसनी विमानातून चक्कर मारायला लोलो गेली आणि.. तिच्यासाठी ती काळरात्र ठरली. विमानाचा पंखा लागून तिला जबरदस्त अपघात झाला. इतका जीवघेणा, की वेदना आणि काळीकुट्ट निराशा यापलीकडे दुसरं काहीही शक्य वाटत नव्हतं. डावा हात आणि डावा डोळा तिनं गमावला. मेंदूला जबर इजा झाली. मुळात ती जगेल की नाही याचीच खात्री नव्हती. जगलीच तर तिला कदाचित सलगपणे पूर्ण वाक्यही बोलता यायचं नाही, कदाचित तिचा स्वभाव पूर्ण बदलेल.. अशा अनेक शंका डॉक्टरांना होत्या. इथून पुन्हा आत्मविश्वासानं उभं राहण्यापर्यंतचा तिचा खडतर प्रवास, त्यातली धडपड, मधले अनेक खाचखळगे, अत्यंत अवघड वाटा आणि त्यावर केलेली मात या साऱ्याचं चित्रण म्हणजे हे पुस्तक. ‘लोलो मॅगझिन’ आता तिनं नव्या उभारीनं आणि नव्या रूपात सुरू केलं आहे. लोलोचं कुटुंब, तिचं बालपण, कौटुंबिक नात्याची वीण, अपघातापूर्वीचं आणि नंतरचं आयुष्य, तिचे मित्र, करीअरचा शोध या गोष्टीही या कहाणीत आहेत. या सगळय़ा आव्हानात्मक प्रवासात लोलोचं कुटुंब सतत सावलीसारखं तिच्याबरोबर आहे. त्यामुळे या पुस्तकाची रचनाही अशी आहे, की प्रत्येक प्रकरण लोलो, तिची आई, तिचे वडील, तिची बहीण अशा वेगवेगळ्या लोकांच्या नजरेतून उलगडत जातं. या पुस्तकात वारंवार ज्या दोन गोष्टींवर भर दिला आहे त्या म्हणजे जिद्द आणि श्रद्धा. लोलोचे आई-वडील हे सश्रद्ध आणि चर्चशी संबंधित. तिचे कुटुंबीय म्हणतात, ‘‘या सगळ्यातून आम्ही मार्ग काढू शकलो ते केवळ आमच्या श्रद्धेमुळे, हे निश्चित. येशूचा भक्कम पाठिंबा नसता तर हे शक्य झालं नसतं.’’ ‘दैवी हेतू’, ‘कृपादृष्टी’, ‘प्रार्थनाच बदल घडवेल’ असे शब्दप्रयोग पुस्तकाच्या निवेदनात वारंवार येतात. लोलोही एके ठिकाणी म्हणते की, ‘‘श्रद्धा माझ्यासाठी चार दिवसांचं ‘फॅड’ नव्हतं. उलट, माझ्या जीवनाचा पाया होता तो.’’ लोलोकडे जिद्द होतीच. ती नसती तर अशा अवस्थेतून ती बाहेर पडलीच नसती. अपघातानंतर काही दिवसांनी लोलो जेव्हा चालू लागली तेव्हा ती फार तर वीस पावलं चालू शकेल असा तिच्या फिजिकल थेरपिस्टचा अंदाज होता. लोलो मात्र तीस पावलं चालली. ही जास्तीची पावलं म्हणजे तिच्यातली धगधगती जिद्द होती. तिच्या जिद्दीची अनेक उदाहरणं या पुस्तकात विखुरली आहेत. या कहाणीचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे अपघात, संघर्ष, जिद्द आणि त्यातून मिळालेलं यश असा सरळसोट प्रवास इथे नाही. जिद्द बांधली तरी वारंवार दाटून येणारी निराशा, वास्तवाचे अस चटके, भविष्यात काय वाढून ठेवलं असेल या भावनेतून खचणारी उमेद, कृत्रिम हात घेऊन समाजात कसं वावरणार, या विचाराने निर्माण झालेली भीती या गोष्टी तपशिलानं पुस्तकात येतात. लोलोच्या भावनांचा उद्रेक येतो. उद्ध्वस्त करणारे क्षण येतात. हा प्रवास सोपा नाही याची प्रचीती येते. पण तरीही त्यावर मात करता येते, ही भावना उमेद जागवणारी ठरते. पुस्तकाला बेथनी हॅमिल्टनची प्रस्तावना आहे. बेथनी ही समुद्राच्या लाटांवर स्वार होणारी प्रोफेशनल ‘सर्फर’ आहे. यातला विलक्षण भाग असा, की वयाच्या १३ व्या वर्षी सर्फिग करताना शार्क माशाच्या हल्ल्यात ती जखमी झाली आणि त्यात तिला एक हात गमवावा लागला. दुसरी कुणी असती तर पुन्हा पाण्यातही उतरली नसती. बेथनीच्या धाडसी जीवनावर ‘सोल सर्फर’ हा चित्रपट तयार झाला आणि लोलोनं तो बघितला. त्यानंतर फोन, ई-मेलवर त्यांचा संपर्क सुरू झाला. बेथनीनं ज्या भीतीवर मात करून सर्फिग या तिच्या आवडत्या खेळात पुन्हा प्रावीण्य मिळवलं ते लोलोसाठी प्रेरणादायी ठरलं. आपलं पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वी बेथनीनं ते बघावं अशी लोलोची इच्छा होती. त्यामुळे बेथनीनं अत्यंत प्रेमाने लोलोच्या आशावादाची तारीफ करत ही प्रस्तावना लिहिली. ‘स्टिल लोलो’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद प्रणव सखदेव यांनी केला आहे. प्रेरणादायी गोष्टी आपल्याला नेहमीच आवडतात. कधी कधी सत्य हे कल्पनेपेक्षाही अद्भुत असतं, असं म्हटलं जातं. त्याचा पडताळा अशा सत्यकथा वाचताना येतो. ‘प्रेरक कथा’ हा साहित्यप्रकार आता चांगलाच रुजला आहे. यात वंश, वर्ण, भौगोलिक अंतर असे सगळे अडथळे पार करून वाचकाला त्या व्यक्तीशी जवळीक साधता येते. मुळात जगण्यासाठी माणसाला बळ हवं असतं. कोणतीही परिस्थिती आली तरी त्यावर मात करता येऊ शकते असा दिलासा हवा असतो. आश्वस्त करणारं उदाहरण समोर हवं असतं. ती गरज अशी पुस्तकं पूर्ण करतात. अमक्याला जमलं, मग मलाही ते जमेल असा आशावाद ती जागवतात. ...Read more

 • Rating StarDAINIK SAKAL 22-10-2017

  अमेरिकेतली फॅशनविषयक पत्रकार लॉरेन स्क्रग्ज हिची कहाणी मांडणारी ही कादंबरी. एका विमा अपघातात लॉरेनला जबर धक्का बसला. तिच्या मेंदूला इजा पोचली. तिनं एक डोळा आणि हातही गमावला. मात्र, लॉरेन या अपघातातून कशी वाचली आणि त्यातून बाहेर येण्यासाठी तिनं काय कलं याचं कथन तिनं या पुस्तकात केलं आहे. लॉरेनला कृत्रिम हात आणि कृत्रिम डोळा बसवण्यात आला. तिला अनेक मानसिक आंदोलनांतूनही जावं लागलं. विलक्षण ऊर्जेनं लॉरेन या सगळ्या बदलांना सामोरी गेली. अनेकांच्या दृष्टिकोनातून लॉरेनची कहाणी उलगडत जाते. स्टिल लोलो या लॉरेनंच लिहिलेल्या मूळ कादंबरीचा अनुवाद प्रणव सखदेव यांनी केला आहे. ...Read more

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

Pawan Chandak

`हरवलेल्या मंदिराचे रहस्य` वाचकांच्या नजरेतून उलगडणारी कादंबरी सुधा मूर्ती लिखित व लीना सोहोनी अनुवादित रहस्यमय पण तितकीच मनाला भावणारी, अत्यंत सोप्या शब्दात मांडलेली इतकेच नाही तर लहान मुलांना जरी वाचून दाखवली तर एका बैठकीत समजणारी अशी अप्रतिम कदंबरी आज एका बैठकीत वाचून झाली. ही कादंबरी वाचतांना माझे लहान होऊन लहानपणी च्या दिवसांत जाऊन सुधा आज्जी मला ही गोष्ट सांगत आहे आणि मी देखील आज वयाच्या चाळिसाव्या वर्षी तितक्याच आवडीने ऐकतोय असं वाटत होतं. एका आटपाट नगरात सोमनायक नावाचा दानशूर राजा एका शिल्पकाराच्या मदतीने पायऱ्यांची विहीर, सात शिवमंदिर, शिल्प, खांब असे सुंदर मंदिर व अमृतमय पाण्याचा झरा असलेली विहीर तयार करतो. व स्वतः पाहरेकरी ठेऊन ती विहीर प्रदूषित होण्यापासून रक्षण करतो. पण तो तीर्थयात्रेला गेल्यावर त्याचा पुत्र हा नियम मोडून मित्रांसोबत जलविहार करून लावलेले सर्व नियम मोडून हे पाणी प्रदूषित करतो ज्यामुळे प्रजेला दूषित पाण्यामुळे आजार व पुढे परक्रीय आक्रमण आदींमुळे हे विहिर पूर्ण बुजवण्यात येते. ही झाली सोमहळी गावविषयी दंतकथा. तर मित्रानो अनुष्का तिच्या आजोळी सुटयात जाते तिथे तिची मैत्री अमित, मेधा, आनंद आणि महादेव यांच्याशी होते. आणि ते गावातील ग्रामीण जीवन, पर्यटन, शेती, गावातील नदी, टेकडी, बगीचा, जंगल, गाय गोठा, वन्यजीव, पक्षी आदी निसर्गमय वातावरणात रमतात. या सर्व गावातील जीवनाचा आनंद घेत असताना एकदा त्यांची आज्जी आजोबा वर लिहिलेली हरवलेल्या मंदिर व विहीर ची गोष्ट त्यांना सांगते. एकदा वळवाचा पावसानंतर नदी काठचे सौंदर्य पाहण्यासाठी अनुष्का आणि तिचे 4 मित्र भटकंती साठी निघतात तेंव्हा अनुष्का चा पाय चिखलात खोलवर रुतल्यावर त्यांना रहस्यमय खड्डा आहे की विहीर आहे की गुफा याचा शोध लागतो. पुढे पडणारे प्रश्न आज्जी आजोबांना ही गोष्ट सांगायची का की आपण एकट्याने खोद काम करायचे ? गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील ? पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील ? शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का ? त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का ? तर वाचक मित्रांनो एकदा नक्कीच वाचून पहा आणि आपल्या मुलांना देखील वाचून दाखवा त्यांना देखील आवडेल डॉ पवन चांडक एक वाचक ...Read more

LEFT TO TELL
LEFT TO TELL by IMMACULEE ILIBAGIZA, STEVE ERVIN Rating Star
Sandip Darwade

आफ्रिकेतील रवांडा या देशात 1994 साली `हुतु` आणि `तुतसी` या जमातींमध्ये भीषण हत्याकांड घडून आले. जवळपास दहा लाखाहून अधिक माणसांचा बळी घेतलेल्या या दंगलीने देशात अराजकाचे सत्र निर्माण झाले. या भयावह कत्तलीच्या काळ्या सावलीत एक लहानशी मुलगी जीव मुठी धरून तो हिंसाचार डोळ्यात साठवत होती. या नरसंहारात आपलं कुटुंब गमावूनही त्याबद्दल संयतपणे बोलणाऱ्या ईमाकुल्ली इलिबागिझाची ही कहाणी. माणसांमधील असीम कुरूपता आणि कौर्य पाहूनही त्यांच्यामधील ईश्वराचे अस्तित्व शोधणारी आणि माणसांच्या जगातील प्रेम, दया, शांती या जाणिवांना आवाहन करणारी ही ईमाकुल्ली पुस्तकाच्या प्रत्येक पानागणिक वाचकाला अधिकाअधिक अंतर्मुख बनवत जाणारी आहे... ...Read more