ANNA POLITKOVSKAYA

About Author

Birth Date : 30/08/1958
Death Date : 07/10/2006


ANNA STEPANOVNA POLITKOVSKAYA WAS A RUSSIAN JOURNALIST AND HUMAN RIGHTS ACTIVIST, WHO REPORTED ON POLITICAL EVENTS IN RUSSIA, IN PARTICULAR, THE SECOND CHECHEN WAR. IT WAS HER REPORTING FROM CHECHNYA THAT MADE POLITKOVSKAYAS NATIONAL AND INTERNATIONAL REPUTATION.

अमेरिकेच्या न्यूयॉर्वÂ शहरात जन्मलेली अ‍ॅना मॉस्को शहरात लहानाची मोठी झाली. तिचं मूळ नाव होतं अ‍ॅना स्टेपानोवना माझेप्पा. मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीतून तिने १९८०मध्ये पत्रकारितेतील पदवी मिळवली. तिचा पती अलेक्झांडर पोलितकोवस्क्या क्झग्लायड या कार्यक्रमाचा वृत्तसंपादक होता. वेरा आणि लिया ही त्यांची दोन अपत्यं. पत्रकारितेतील तिचं योगदान आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनांनी दखल घेण्याइतवंÂ वैशिष्ट्यपूर्ण होतं. नोवाया गॅझेटा या स्वतंत्र आणि १९९१नंतरच्या काळातील रशियन राजवटीवर कठोर टीका करणाNया वृत्तपत्रांची ती विशेष वृत्त वार्ताहर होती. नोवाया गॅझेटा मधून प्रचलित राजवटीविरुद्ध आणि मानवी हक्कांच्या पुरस्कारांसाठी तिने सातत्याने केलेल्या स्तंभलेखनातून निर्माण झालेल्या तिच्या बNयाच पुस्तकांना पुरस्कार मिळाले; पण तिच्या निर्भीड लेखनामुळे तिच्यावर विषप्रयोगासारखे जिवावरचे प्रसंगही गुदरले. तिचा मृत्यूही अज्ञात मारेकNयांनी केलेल्या गोळीबारात झाला. लब्धप्रतिाQष्ठत रशियन लोक आणि अध्यक्ष पुतिन यांच्या हडेलहप्पी धोरणांचे आणि फसलेल्या प्रशासनाचे बुरखे टराटरा फाडणारं ए रशियन डायरी हे पुस्तक तिच्या ग्रंथसंपदेतील मानाचा तुरा आहे. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल सह पत्रकारिता आणि मानवी हक्कांचा पुरस्कार यासाठी अनेक पुरस्कार मिळवणाNया पोलितकोवस्क्याची ए रशियन डायरी आजतागायत रशियात प्रकाशित झालेली नाही.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
A RUSSIAN DIARY Rating Star
Add To Cart INR 560

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोहोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ...Read more

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
मिलिंद रोहोकले

फारच छान आहे