तेजस यादव वाचला तो कर्ण ! आवडला तो कर्ण ! भावला तो कर्ण ...!
दोन वर्षापुर्वी मृत्युंजय कादंबरी वाचून झालती . त्या कादंबरीने कित्येक जणांच आयुष्य कायापालट केल , हे मराठी साहित्य विश्व जाणून आहे . आता नुकतीच राधेय वाचून पुर्ण झाली . लेखक रणजित देसाई सुरवातीच ्हणतात ....
" राधेय
हे कर्णचरित्र नव्हे .
प्रत्येकाच्या मनात दडलेला
कर्ण असतो . माझ्या मनातल्या
कर्णाची ही कहाणी . भावकहाणी .
याची सत्यता शोधायची झाली ,
तर त्यासाठी महाभारताची पाने
चाळण्याचे काहीच प्रयोजन नाही ,
कदाचित आपल्या मनाची चार पाने
उलटलीत , तर त्यात हा कर्ण दिसेल ."
मला कादंबरीत एक विशेष गोष्ट आवडली , ती म्हणजे कर्ण कुठेच वरचढ , रंगवून दाखवला नाही. त्याचे गुण दाखवले तसे त्याचे दोष ही दाखवले . नदीच्या प्रवाहावर वाहत जाणार त्याचं आयुष्य , त्याच दातृत्व , त्याच मित्रप्रेम , त्याचा मनाचा गाभारा , त्याचा आयुष्यी आलेली अहवेला वाचकांसं खुप काही शिकवून जाते . देसाईंची लेखणी इतकी प्रभावशाली आहे की ते कुरुक्षेत्राची युध्दभुमीही जिवंत झालेला भास होतो .
मी जेवढा कर्ण वाचला तो मला सर्व आठवला ! मग तो ` शिवाजी सावंतांचा ` असो अथवा नटसम्राट मधील ` वि.वा.शिरवाडकर ( कुसुमाग्रजांचा ) . कादंबरी वाचून झाल्यावर कुसुमाग्रजांची ती ओळ आठवली
कृष्ण -
" अरे वेड्या तुझ्यासारखे कर्मयात्री ह्या धरेवरच्या माणसांचे दिपस्तंभ.!
तुमचे जीवन हे केवळ जळण्यासाठी , ह्या प्रकाशात आम्हाला आमच्या वाटा सापडतात .
खुप सुंदर वाचनीय , आणि भरभरुन शिकवनारी कादंबरी .... ...Read more
Abhiram Bhadkamkar महा-सम्राट
"इतिहास वाचून माणूस बेभान होतो, भानावर येतोच असं नाही" हे (बहुधा) वि ग कानेटकर यांचे विधान मला कायमच महत्वाचे वाटते।
प्रकाशनास काही महिने लोटले असले तरी निवांत ऐसपैस वेळ काढून वाचायची म्हणून बाजूला ठेवलेली ज्येष्ठ कादंबरीकार विश्वा पाटील ह्यांची महासम्राट ही कादंबरी हातात घेतली आणि तिने झपाटून गेलो। ही कादंबरी बेभानही करते आणि एक भानही देते हे तिचे वैशिष्ट्य आहे.
विश्वासरावांची शैली आणि त्यांची शब्दसंपत्ती ह्यावर नवे काय बोलणार? पण ही कादंबरी उभ्या देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील घटनांचे केवळ चमकदार कथन यापुरती मर्यादित न राहता तत्कालीन सामाजिक व राजकीय परिसराचे भान देणारी ठरते।
तेव्हाचा काळ बारीकसारीक तपशिलांसह उभा करते. ती छत्रपतींच्या तेजस्वी कर्तृत्वाला मुजरा तर करतेच पण त्यासोबत त्यांच्या जन्मापूर्वीची राजकीय परिस्थिती, त्यातून आईसाहेबांच्या मनात उगवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या अत्यंत अवघड, जवळजवळ अशक्यप्राय स्वप्नाच्या पाठलागाची वेगवान घडामोड चितारते.
मुघलांचे डावपेच, खेळया नेस्तनाबूत करण्यामागची `अत्यंत योजनाबद्ध आखणी` मांडत जाते।
ही कादंबरी माझे त्याकाळाबद्दलचे आकलन वाढवते.
मऱ्हाटी मुलाखातला तत्कालीन निसर्ग यात येतो, तत्कालीन नातेसंबंध, समाजधारणा आणि परचक्राच्या दडपणाखालची उलघाल यातून त्या काळाचा पट मांडला जातो आणि इथेच कादंबरी केवळ एका युगपुरुषांचे चरित्रकथन न रहाता एका शतकाचा लेखाजोखा होऊन जाते। वेगळेपण आहे ते हेच की ही कहाणी महाराक्षसी लाटांविरुद्ध पोहून जात महासागरालाच बांधून घालणाऱ्या चिवट आशावादाची आणि या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवणाऱ्या बुद्धीचातुर्याची होत जाते।
म्हणूनच ती एकाच वेळी बेभानही करते आणि भानही देते।
कादंबरी संपते एक स्वल्पविराम देत...
आता पुढचे भाग... त्याची अधीरता आणि उत्सुकता...
डोळे दिपून जावेत अशा थोर व्यक्तिमत्वाचे चित्रण हे शिवधनुष्य होते, जे लिलया पेलले आहे...
यात रेखाटलेली चित्रे अप्रतिम आहेत... घराघरात भक्तिभावाने ठेवावा आणि `अभ्यासावा` असा हा `झंझावात` आहे... ...Read more