* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: CRY OF THE KALAHARI
 • Availability : Available
 • Translators : MANDAR GODBOLE
 • ISBN : 9789353174651
 • Edition : 1
 • Weight : 500.00 gms
 • Pages : 432
 • Language : MARATHI
 • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
 • Ebooks:
 • Print Books:
THIS IS THE STORY OF THE OWENS TRAVEL AND LIFE IN THE KALAHARI DESERT. HERE THEY MET AND STUDIED UNIQUE ANIMALS AND WERE CONFRONTED WITH DANGER FROM DROUGHT, FIRE, STORMS, AND THE ANIMALS THEY LOVED. THIS BEST-SELLING BOOK IS FOR BOTH TRAVELERS AND ANIMAL LOVERS.
‘क्राय ऑफ कालाहारी’ हे पुस्तक म्हणजे कालाहारी वाळवंटात सात वर्षे राहिलेल्या मार्क आणि डेलिया ओवेन्स यांच्या जंगली प्राण्यांच्या सहवासातील अनुभवांवर आधारित कादंबरी आहे. त्याचा मंदार गोडबाले यांनी मराठी अनुवाद केला आहे. बदली कपड्यांचा एक जोड आणि एक दुर्बीण वगळता बाकी विशेष काही न घेता मार्क आणि डेलिया या तरुण अमेरिकन जोडप्याने प्राणिजीवनाचा अभ्यास करण्यासाठी आफ्रिकेचे विमान पकडले. तिथे पोहोचल्यावर एक जुनाट लँडरोव्हर गाडी विकत घेऊन त्यांनी कालाहारी वाळवंटात (डिसेप्शन व्हॅली) खोलवर मजल मारली. ते सात वर्षे त्या परिसरात राहिले. विशेष म्हणजे त्या ठिकाणी कोणीही मानव कधीही गेलेला नव्हता, तिथे ना कोणते रस्ते होते, ना कोणी माणसे. हजारो चौरसमैलांच्या परिसरात पाण्याचा कोणताही स्रोत नव्हता. त्यांच्या आजूबाजूला जे प्राणी होते, त्यांनीही कधी माणूस पाहिला नव्हता.

No Records Found
No Records Found
Keywords
#CRYOFKALAHARI #MARKANDDELIAOWENS #MANDARGODBOLE #HINA #RODAVEL #MAKADIKADICHERAN #DECEPTIONVALLY #BILTONG #VHANDERWESTUIZEN #KORHAN #FLYKACHER #ZIZIFAS #RANCHAR #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #क्रायऑफकालाहारी #मार्कआणिडेलियाओवेन्स #मंदारगोडबाले #हायना #रोंडावेल #मकाडीकाडीचेरण #डिसेप्शनव्हॅली #बिल्टाँग #व्हॅनडरवेस्टुईझेन #कोरहान(पक्षी) #फ्लायकॅचर #झिझीफस #रांचर #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक
Customer Reviews
 • Rating StarVinaya Jangle

  सन 1974 च्या दरम्यान मार्क आणि डेलिया ओवेन्स हे अमेरिकी दाम्पत्य आपले घर आणि त्यातील वस्तू विकून थोडे पैसे उभे करतात . आफ्रिकेतील कालाहरी वाळवंटात वन्यजीवांच्या संशोधनासाठी जातात .सुरुवातीला पैशाचे फार पाठबळ नसताना आपले वन्यजीवांवरील संशोधन सुरू करता .वाळवंटातील हा एकाकी भूभाग तोपर्यत मानवी स्पर्शापासून दूर होता .अनंत अडचणी सोसून तेथे सात वर्षे दोघेही राहतात .तेथील सिंह ,ब्राऊन हायना यांच्या सामाजिक जीवनाबद्दल खूप वेगळी माहिती त्यांना मिळते .तेथील प्राणीही त्यांना आपले मानतात .सिंह ,ब्राऊन हायना त्यांच्या अगदी आजूबाजूला वावरत राहतात .पाण्यासाठी हजारोंच्या संख्येने स्थलांतर करणाऱ्या विल्ड बिस्टची कृत्रिम कुंपणाने झालेली परवड त्यांना दिसते . जगासमोर पोडतिडकीने हे सगळं ते मांडतात .दोघ मिळून ते `Cry of the Kalahari `हे पुस्तक लिहितात . मंदार गोडबोले यांनी या पुस्तकाचा सहजसुंदर अनुवाद केला आहे .विलक्षण अनुभव देणारे हे पुस्तक आहे . ...Read more

 • Rating Starmanish wagh

  संवर्धनाचे साहसी अनुभवविश्व ! मार्क आणि डेलिया ओवेन्स.... जॉर्जिया विश्वविद्यालयात शिकणारे प्राणीशास्त्रातील दोन पदवीधर अमेरिकन. पी.एचडी.साठी विषय शोधत असतानाच आफ्रिकेतील नाहिशा होणाऱ्या वन्यजीवांबद्दल माहिती मिळते. यासाठी आफ्रिकेच्या नकाशाचा अभ्यासकरताना मानवी पदस्पर्शापासून लांब असलेले कालाहारी वाळवंट त्यांना साद घालते. घरातील टी.व्ही., रेडिओ, भांडीकुंडी सगळं विकून मिळालेले 1100 डॉलर्स आणि जवळची काही शिल्लक पुंजी घेऊन हे जोडपे जोहान्सबर्गच्या विमानात बसते आणि तिथून कालाहारीच्या वाळवंटात दाखल होते. इथे त्यांच्या सोबत असते एक `थर्ड हँड` लँड रोव्हर गाडी, वन्यजीवांप्रती असलेली प्रचंड ओढ आणि त्यांचा अभ्यास करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती. कालाहारीच्या मध्य भागात `पसंत` पडलेल्या एका जागेवर ते आपला तंबू बांधतात. ही जागा इतकी दुर्गम होती की, खुरट्या झुडपांच्या जंगलातून, शंभर मैल अंतरावरून रोजच्या वापरायचे पाणी आणावे लागे. बाहेरील जगापासून आता हे जोडपे पूर्णपणे अलिप्त होऊन जगू लागले. माणसाने कधीच न पाहिलेल्या अशा काही वन्यजीवांशी त्यांची ओळख होते. कधी पावसाळ्यात त्यांच्या तंबूबाहेर दोन-तीन हजार हरणांचा जमाव चरताना दिसे तर कधी सिंहांचे गुरगुरणेच पहाटेचा `अलार्म` असे. डोळे किलकिले करून बघावे तर वाळवंटातल्या या महान शिकाऱ्याची सावली तंबूबाहेर बसलेली दिसे. फक्त कालाहारीमध्येच आढळणारा ब्राऊन हायना (तरसाचा एक प्रकार), जो आजपर्यंत मानवाने कधीच पाहिला नव्हता, यांचा खास मित्रच झाला होता. त्यांच्या तंबूला सावली देणारे झाड एका बिबट्याचे घर होते. हा बिबट्या झाडावर बसला की त्याची शेपटी यांच्या तंबूच्या दाराशी एखाद्या पडद्यासारखी लोंबकाळत असे. आत येता-जाताना ती शेपटी बाजूला करावी लागे. इथे या जोडप्याला काही आपत्तींशीही सामना करावा लागला होता. कधी पाण्याशिवाय दिवसेंदिवस अडकून पडावे लागले तर कधी प्रचंड वादळाने वाताहात झाली. कधी मैलोन् मैल पसरलेल्या वणव्याचा सामना करत यातून सहीसलामत सुटका करून घ्यावी लागली. इथले सिंह, हायना, हरिणं आणि इतर वन्यजीव दुष्काळाचा सामना कसा करतात, त्यांची स्थलांतरे, पिलांचे संगोपन हे सगळे मार्क आणि डेलिया यांना इथे बघायला-शिकायला मिळाले. हरणांचे जगातील सर्वात मोठे स्थलांतर त्यांनी अनुभवले. इथल्या जीवविविधतेचा अभ्यास काही महिन्यातच पूर्ण होईल, या आशेवर गेलेले हे दाम्पत्य तब्बल सात वर्षे या वाळवंटात राहिले. या आणि अशा अनेक चित्तथरारक घटनांनी साकारलेले हे अनुभवविश्व त्यांनी डायरीरूपात लिहून ठेवले होते. त्याचेच पुस्तकरूप म्हणजे `क्राय ऑफ द कालाहारी`! मंदार गोडबोले यांनी ते मराठीत भाषांतरित केले. `साद घालतो कालाहारी` या नावाने ते वाचकांसमोर आणले मेहता पब्लिशिंग हाऊसने. हे केवळ चरित्र नसून माणसाच्या अविचाराने जैवविविधतेचा कसा नाश होतो याचे स्वानुभवावर आधारलेले समाजप्रबोधन आहे. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला देण्यात आलेले ज्येष्ठ प्राणी अभ्यासक, साहित्यिकांचे प्रसंगानुरूप `कोट्स` पुस्तकाचे साहित्यिक मूल्य वाढवणारे आहेत. जेन गुडॉल यांनी प्रतिक्रियेत म्हटल्याप्रमाणे, हे पुस्तक प्राण्यांमध्ये आणि खऱ्याखुऱ्या साहसांमध्ये रस असणाऱ्या प्रत्येकाने वाचलेच पाहिजे. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

TARPHULA
TARPHULA by SHANKAR PATIL Rating Star
Vijay Patil

`टारफुला` ......आज ग्रामीण कथालेखक शंकर पाटील यांचं `टार फुला `पुस्तक वाचण्यात आलं.या पुस्तकात स्वातंत्र्य पूर्वीच्या व काही स्वातंत्र्य उत्तर काळात महाराष्ट्रात असलेल्या खेडे गावाची परिस्थिती वर्णन आपल्याला दिसून येते.यात वर्णन केलेल्या खेड हे महारष्ट्र-कर्नाटक सीमेवरील आहे. सुरुवातीला या गावात सुभानराव पाटील या नावाच्या गाव पाटलांचा खूप वचक असतो आणि त्याच्याच वचकांमुळेच गावात चोरीमारी खून दरोडा या गोष्टी कमी होत असतात आणि गाव व्यवस्थित नांदत असतं...पण त्याच्या अचानक मृत्यू गावात कसं गावगुंडांचा हैदोस वाढतो.म्हणतात ना.... वाघाच्या मेल्यानंतर, कोल्ही सुद्धा वाघ बनतात... गावात कुणाचा कुणाला पायपूस राहत नाही आणि गावात अराजक माजत...याच काळात पाटील मेल्यामुळे पाटलीन ही एकाकी होते.पाटलाला मूल नसल्यामुळे कुणाचा मूल पाटलांना दत्तक जाणार यासाठी गावात दोन तट पडलेले असतात एका बाजूला केरू नाना दुसऱ्या बाजूला, देसायांचा गट असतो.. पाटलांचे जुने सहकारी गाव वतन दार कुलकर्णी यांना मात्र यातून काहीच निर्णय घेता येत नसतो तो जरी वतनदार माणूस जरी असला तरी त्यांच्या कडे काहीसे करण्याची काही धमक नसते व गाव गुंडांना सामोरे जाण्याची ताकद त्यांच्यात नसते, त्यांच्या पाठीमागे उभा होणारा तसा कोणताच माणूस नसतो...पाटलीन बाई घाबरून गाव सोडून जातात आणि आपल्या भावाच्या मुलाला दत्तक विधान करण्यासाठी कोल्हापूरातच रहतात. या दरम्यानच्या काळात गावातील गुंडांना वाटते की कुलकर्णी यांनी पाटलीणबाई ना सल्ला दिला आणि भावाच्या मुलाला दत्तक घ्यायला लावलं.त्यामुळे त्यांचाही खून होतो गावात परत एकदा आणखी अराजक माजते...आणि याच दरम्यान गावातील लोक पाटलांची शेती बळकावतात काही शेती केरू ना ना काही देसाई यांचा पण नंतर गावात बदली पाटील येतात, बदली पाटील परशुराम आणि त्याची तीन भावंडं त्याचा सगळा लवाजमा आल्यानंतर गावातील पूर्ण परिस्थिती बदलून जाते त्यांनी गावावर एकछत्री अंमल करायला सुरुवात करतात आणि गावातील सर्व गावगुंडांना सगळ्यांनाच धडा शिकवतात पण त्याच बरोबर त्यांची नियत काही साफ नसते, गावातल्या गरिबांना कसे नाड तात, वेळोवेळी पोलिसांचा वापर करून कसे ते गावातील लोकांना अडकून आपला गावावर कसा हक्क राहील वर्चस्व राहील याचा प्रयत्न सुरू होतात. यानंतर गावात गट पडल्यामुळे, गरिबांना कोणीच वाली राहत नाही पण एक वेळ अशी येते की ते परशुराम पाटील यांना सुद्धा त्यांच्या तालमीत तयार झालेला हिंदुराव आव्हान देतो आणि परशुरामना सुद्धा असे दिसून येते की शेरास सव्वाशेर हा कोणी तरी असतो एकंदरीत काय या गावगाड्यात चालणारी उलाढाल आणि गावाकडचे तिरक व बेरकी राजकारण शंकर पाटील यांनी अतिशय उत्कृष्टपणे मांडले आहे.खोबरं तिकडं चांगभलं म्हणणारी म्हादू कोळी सारखी मंडळी व गादीची इमानाने चाकरी करणारी महादू तराळ सारखी माणसं ही गावात भेटतात....म्हणजेच गावातील राजकारण हे कोणत्या पद्धतीने खेळलं जातं,गावातील मंडळी कशी एकमेकाची जिरवा जिरवी करण्यासाठी, कुठल्या थराला जातात आणि या गावातला मोठ्या मंडळी च्या नादात जी गावातील लहान मंडळी किंवा सरळ मंडळी असतात त्यांचा कसा बळी दिला जातो हे अतिशय वेधक पणे मांडले आहे गावात होणारे सण, समारंभ जत्रा याचाही त्यांनी अचूक वर्णन केलेले आणि यामुळे गावातील मातीचा गंध आपल्याला आल्यावाचून राहत नाही. ..... विजय पाटील ...Read more

AIK SAKHE
AIK SAKHE by V.P.KALE Rating Star
Sumitabh SP

ऐक सखे… वसंत पुरुषोत्तम काळे यांचे हे पंचविसावे पुस्तक एका निराळ्या पद्धतीने छापलेले. गोष्टीतून गोष्टी सांगत जाणारे, ‘अरेबियन नाइट्स’सारखे त्याचे स्वरूप आहे. त्यांच्या कथा अर्थवाही अन् भावप्रधान आहेत. त्यात त्यांचे शब्द काही खास ढंगाने, काही खास जिव्ाळ्याचे, कधी आर्ततेने, तर कधी उन्मादाने नवे रूप धारण करतात. त्यातील माणसेही असामान्य नाहीत. आवतीभोवती असणाऱ्या लहान माणसांचे मोठेपण आणि मोठ्या माणसांचे लहानपण हेच त्यांच्या लेखनात सापडते. त्यांच्या लेखनात सहजता आहे, सौंदर्य आहे, तोरा आहे. `ऐक सखे` पुस्तक म्हणजे दहा कथांचा संग्रह. प्रत्येक कथा मनाला भिडणारी, विचार करायला लावणारी. प्रत्येक कथेमध्ये वपुंनी दिलेली उदाहरणं आणि दाखले वाचकाला एक वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. माणूस कुठेतरी त्या दाखल्यांची/उदाहरणांची तुलना स्वतः अनुभवलेल्या गोष्टींवर करतो. नक्की वाचावे असे पुस्तक. वपुंच्या लेखनिकाचं काम बघणाऱ्या सौ. अनघा पत्की ह्यांचं विशेष कौतुक आणि आभार. सौ. अनघा पत्की ह्या व्यावसायिक लेखनिक नसून रसिक होत्या म्हणूनच, ठाणे ते परळ - टाटा हॉस्पिटलपर्यँत प्रवास. तिथे कॅन्सरवर ट्रीटमेंट, तसेच रेडिएशन. परळ ते वांद्रा प्रवास मग अर्धा तास विश्रांती. आणि मग रात्री साडेआठपर्यंत लेखन. हे सगळं त्या करू शकल्यात. "पावसाचं पाणी साठून झालेला तलाव आणि गाभ्यात पाण्याचा जिवंत झरा असलेला तलाव यात फरक असतोच" ...Read more