* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TAKE ME HOME
  • Availability : Available
  • Translators : SUNITI KANE
  • ISBN : 9788184986303
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 380
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
  • Sub Category : MEMOIRS, DIARIES, LETTERS & JOURNALS
  • Available in Combos :RASHMI BANSAL COMBO SET - 7 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
TAKE ME HOME: THE INSPIRING STORIES OF 20 ENTREPRENEURS FROM SMALL-TOWN INDIA WITH BIG-TIME DREAMS IS THE STORY OF INSPIRING ENTREPRENEURS WHO NEVER LEFT THEIR HOMETOWNS TO GET FOREIGN EDUCATION OR DECIDED TO WORK A FEW YEARS ABROAD. THEY ARE YOUNG AND INNOVATIVE AND HAVE BUILT EMPIRES FROM THEIR HOMELAND. RASHMI BANSAL DESCRIBES THE LIVES OF SUCH ENTERPRISING TALENT WITH HER BOOK, TITLED TAKE ME HOME: THE INSPIRING STORIES OF 20 ENTREPRENEURS FROM SMALL-TOWN INDIA WITH BIG-TIME DREAMS. SHE BELIEVES THAT THESE SONS OF THE SOIL HAVE NEVER ABANDONED THEIR OWN HOMES FOR THE GREENER PASTURES AND HAVE RUN GLOBAL TRIUMPHS THROUGH THEIR OWN WORLD. TAKE ME HOME: THE INSPIRING STORIES OF 20 ENTREPRENEURS FROM SMALL-TOWN INDIA WITH BIG-TIME DREAMS IS THE STORY OF A NEW GENERATION OF MOGULS WHO BRING HOPE TO THEIR COMMUNITIES, WRITTEN IN SIMPLE AND RELATABLE VERSE. THEIR STORIES INSPIRE PEOPLE TO DREAM BIGGER WITHOUT LAMENTING THEIR LOCATION OR BACKGROUND.
किरीट देशपांडे यांनी नागपुरात राहून आपलं व्यवसायाचं स्वप्न पूर्ण केलं... चंदूभाई विराणी यांनी राजकोटमधून सुरुवात करून ‘ग्लोबल’ उद्योग साकारला... दीपक दाधोटी यांनी बेळगावमधून घेतलेली ‘उद्योग-भरारी’ देश-विदेशांत पोहोचली... या सगळ्यांना हे जमलं; तर मग तुम्हाला का नाही जमणार? या पुस्तकात आहेत आपल्या मातीशी इमान राखत उद्योगांची उभारणी करणाऱ्या २० उद्योजकांच्या विलक्षण प्रेरक कहाण्या. भारतातल्या लहानशा खेड्यांमधून या उद्योजकांनी आपल्या उद्योगाची सुरुवात केली, आणि ते जागतिक स्तरावर नेले. विशेष म्हणजे त्यासाठी त्यांनी स्थानिक पातळीवरील गुणवान मंडळींच्या गुणांचाच कौशल्याने उपयोग करून घेतला, आणि नवीन रोजगारही निर्माण केला. त्यांनी सिद्ध केलं की, एक चांगला उद्योग उभारण्यासाठी तुम्ही मोठ्या शहरांमध्येच असलं पाहिजे असं काही नाही. त्यांनी दाखवून दिलं की, तुमच्याकडे योग्य दृष्टिकोन, ध्येयवेड आणि जिद्द असेल तर तुम्हीही यशस्वी उद्योजक होऊ शकता; तुम्हीही तुम्हाला हवं ते करू शकता; काहीतरी नवीन घडवू शकता; तुमचा स्वत:चा असा यशोमार्ग निर्माण करू शकता — हा मार्ग ‘मायमाती’तून सुरू होणारा... ‘ग्लोबल’ आकाशाला गवसणी घालणारा...!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #SWAPNANCHEINDRADHANU #TAKE ME HOME #सुनीति काणे #SUNITI KANE #RASHMIBANSAL #स्वप्नांचे इंद्रधनू #FOLLOW EVERY RAINBOW #रश्मी बन्सल
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 13-04-2015

    मुलांना स्वातंत्र्य द्या!... मुलांनी ठराविक क्षेत्रातच करिअर करावे, अमक्या क्षेत्रात करू नये, असे सांगून आपल्या मुलातील नावीन्यता आणि उत्साह कमी करू नका. याउलट मुलांना स्वातंत्र्य देऊन त्यांच्या पाठीशी उभे राहा, असा सल्ला प्रसिद्ध लेखक रश्मी बन्सल यंनी दिला. ही मुलाखत प्रसिद्ध लेखिका अपर्णा वेलणकर यांनी घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. मेहता पब्लिकेशनच्यावतीने बन्सल यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकाच्या विशाखा हॉलमध्ये आयोजित करण्यात आला. यावेळी बन्सल म्हणाल्या की, प्रत्येक व्यक्तीत मोठी शक्ती आहे, वेगळेपण आहे. पण, ते जाणायला हवे आणि ती शक्ती योग्य पद्धतीने वापरली गेली पाहिजे. फ्लिपकार्ट, स्नॅपडील आणि मिंत्रासारख्या कंपन्या या बन्सल ग्रुपच्या आहेत. मी सुद्धा बन्सल असली तरी मीही वेगळा व्यवसाय करण्याच्या हेतूनेच कार्यरत झाले. नोकरीचा पर्याय मी स्वीकारला नाही आणि लिखाणाच्या आवडीतून साहित्याच्या क्षेत्रात आले, असे त्या म्हणाल्या. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये मी एमबीए करत असतानाच तेथे एक पुस्तक लिहिण्याची संधी मिळाली. आयआयएमचे विद्यार्थी भल्या मोठ्या पगाराची नोकरी मिळवतात. असे नाही तर २० ते २५ टक्के विद्यार्थी स्वतःचा उद्योग, व्यवसाय करीत आहेत. या सर्वांवर प्रकाश टाकणारे ते पुस्तक होते. त्याला मिळालेले यश मला लिखाणाकडे अधिक ओढ लावणारे ठरले. माझे पुस्तक वाचून अनेक प्रतिक्रिया मला येतात. मी पुस्तक वाचले आणि नोकरीचा राजीनामा दिला, असा मेल करणारेही माझे वाचक आहेत. आपल्यातील क्षमता आणि कौशल्य ओळखून आपण निर्णय घ्यायला हवा. पालकांनी आपल्या पाल्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे. जबरदस्ती किंवा इमोशनल ब्लॅकमेल करणे हिताचे नाही. पालकांनी त्यांचे करिअर केले तो काळ आणि आताचा काळ यात कमालीचा फरक आहे. आता करिअरचे मार्ग, विविध प्रकारच्या संधी हे लक्षणीयरित्या बदलले आहे. त्याचा विचार करून मुलांना प्रोत्साहन द्या, तो नक्की काय करू इच्छित आहे. ते जाणून घ्या, असे बन्सल म्हणाल्या. मी निवडलेले करिअर आई-वडिलांना मनापासून आवडले नाही. पण, २० वर्षांनी वडिलांना जाणीव झाली की मी जो मार्ग निवडला तो योग्य होता. त्यांनी विस्तृत मेलद्वारे त्यांच्या भावना मला कळविल्या. पण, त्याला फार उशीर झाला, असे मला वाटते, असे त्यांनी सांगितले. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 14-04-2015

    गोष्टीरूपातील विचार अधिक परिणामकारक : ज्या व्यक्तींनी व्यवसायात उत्तुंग यश मिळविले त्यांच्याकडे बघून गोष्टी लिहिल्या. त्यासाठी विविध भागातील वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींची निवड केली. फक्त विचार देण्यापेक्षा ते विचार गोष्टीच्या रूपातून दिले तर ते अिक परिणामकारक ठरतात, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका व उद्योजिका रश्मी बन्सल यांनी केले. मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे कुसुमाग्रज स्मारक येथे त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम नुकताच झाला. त्यांनी लिहिलेल्या ‘टेक मी होम’ या पुस्तकाच्या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार अपर्णा वेलणकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. रश्मी बन्सल म्हणाल्या, ‘‘उच्च शिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग व्यवसायात नक्कीच होतो. प्रत्येक माणसात एक शक्ती आहे. ती त्याला ओळखता आली पाहिजे. अनेकांना नोकरी करण्याची इच्छा असते. मात्र त्यातील काही विद्यार्थ्यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा असतो. अशा तरुणांसाठी व्यवसायाला प्रेरणा देणारे पुस्तक लिहिले.’’ मेहता पब्लिशिंग हाऊसच्या मनीषा देवकर यांनी प्रस्ताविक केले. ...Read more

  • Rating Starpramodgokhale

    This is book nicely translated, i appreciate author, bringing this book in Marathi. Book is inspiring and translation is thrilling. I am retired blue collar worker technician worked in India and abroad. I feel it is to my heart.

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more