* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MARATHITIL BARAMAS KAVYE
  • Availability : Available
  • ISBN : 9788184983494
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 104
  • Language : MARATHI
  • Category : REFERENCE AND GENERAL
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
‘ENJOY THE UNIQUENESS OF ALL THE TWELVE MONTHS FROM THE ASPECT OF ANGUISH THE POEMS RELATED TO THE TWELVE MONTHS OF A YEAR ARE KNOWN ARE ‘BARAMAS’. MOST OF THE NORTHERN STATES LIKE PUNJAB, RAJASTHAN, GUJARAT, BENGAL, BHOJPUR ETC. ARE WELL VERSED IN THESE BARAMAS OR TWELVE-MONTHS POETRY, BUT NOT MAHARASHTRA. THERE ARE A VERY FEW EXCEPTIONS LIKE THAT OF THE GREAT POET, G.D.MADGULKAR, WHOM WE ALL KNOWN AS ‘GADIMA’. MANY OF HIS POEMS INVOKE SUCH FEELINGS IN OUR MINDS WHICH US LONG FOR OUR BELOVED ONES. WHEREAS THE NORTHERN STATES HAVE AMPLE LITERATURE EXPRESSING THE STATE OF MIND OF A WIFE WHOSE HUSBAND IS FAR AWAY FROM HER FOR MONTHS AND YEARS TOGETHER. THE ‘TWELVE-MONTH POEMS’ ARE EXCLUSIVE AND UNIQUE FORM OF LOCAL LANGUAGE. THOUGH IT IS TRUE THAT THEY EXPRESS THE FEELINGS OF THE LONER, THE WIFE, THEY ARE OFTEN SUNG IN GROUPS WHERE ALL THE FEMALES SHARE THEIR LONELINESS. MOST OF THE STATES HAVE TAKEN A NOTE OF THIS LITERARY FORM AND HAVE GONE FORWARD IN CRITICIZING, STUDYING THEM IN DEPTHS. IN MARATHI, THERE WERE HARDLY ANY POEMS WRITTEN IN THIS FORM. SO IT WAS A HERCULEAN TASK TO EXPLORE THEM RIGHT FROM DHULIA TO TANJAWUR, (DISTRICTS OF INDIA SET APART PHYSICALLY). VERY FEW SUCH POEMS COULD BE FOUND WHICH WOULD FULFILL THE PURPOSE. THESE ALL NEWLY FOUND ‘BARAMAS POEMS’ ARE INCLUDED HEREIN. THIS LITERARY FORM WHICH IS HARDLY UNKNOWN HAS THUS FOUND A NEW PATH IN OUR SOCIETY. WE ARE SURE THAT IT WILL BE WELCOMED BY ALL THE ART LOVERS.
‘‘दिवसामागून दिवस चालले ऋतुमागुनी ऋतू जिवलगा कधी रे येशील तू’’ अशी कविवर्य ग.दि. माडगूळकर यांच्यासारखी रसिक हृदयात विरह वेदनेची कळ उमटविणारी दीर्घ विरह गीते मराठीत फारशी लिहिली गेली नाहीत. स्वतंत्र निसर्ग कविताही प्राचीन कवींनी लिहिलेली दिसत नाहीत. तथापि उत्तर भारतातील पंजाबी, राजस्थानी, गुजराती, बंगाली, भोजपुरी, इत्यादी भाषांतून पती जवळ नसल्याने विरहाने ग्रासलेल्या नायिकेच्या भावना व्यक्त करणारी पदे विपुल प्रमाणात लिहिली गेली आहेत. त्यांना ‘बारामास काव्ये’ असे म्हणतात. हा लोकभाषेतील एक प्रकार आहे. आणि काही ठिकाणी तो समूहरूपातही गायिला जातो. त्या-त्या भाषेत या काव्यांवर अभ्यासपूर्ण समीक्षा ग्रंथ लिहिले गेले आहेत. त्या दृष्टीने मराठीतील अशा विरहगीतांचा शोध धुळ्यापासून तंजावरपर्यंतच्या ग्रंथसंग्रहांतून घेतला असता फार थोडी काव्ये उपलब्ध झाली. तीच प्रस्तुत संग्रहात समाविष्ट केली आहेत. रसिकांपुढे हा अल्पज्ञात काव्यप्रकार ठेवला आहे. हा अभिनव काव्यप्रकार मराठी वाचकांना आवडेल, अशी अपेक्षा आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MARATHITILBARAMASKAVYE #MARATHITILBARAMASKAVYE #मराठीतीलबारामासकाव्ये #REFERENCEANDGENERAL #MARATHI #VASANTJOSHI "
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more