* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184982732
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 456
  • Language : MARATHI
  • Category : REFERENCE AND GENERAL
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE WORK SHABDACHARCHA CONTAINS A COLLECTION OF ABOUT A THOUSAND WORDS OF MARATHI LANGUAGE, WHICH MOSTLY OCCUR IN PRINTED BOOKS AS WELL AS IN PRINTED PERIODICALS. MANY A TIME SOME OF THESE WORDS ARE MIS-SPELT AS REGARDS THE LONG AND SHORT VOWELS IN THEM. AT TIMES THE MEANING OF SOME SEEMS TO HAVE BEEN MIS-CONCEIVED. THIS HAPPENS DUE TO THE LACK OF AWARENESS ON THE PART OF THE WRITERS AS TO THE ORIGIN AND/OR ETYMOLOGY OF THE WORDS. NOW-A-DAYS MARATHI SPEAKING STUDENTS BEING EDUCATED THROUGH ENGLISH MEDIUM FACE THIS DIFFICULTY TO A GREAT EXTENT. THESE WORDS ARE THEREFORE DISCUSSED AND EXPLAINED FROM THE POINT OF VIEW OF EXACT GRAMMATICAL FORM, CORRECT WRITING IN SCRIPT, ETYMOLOGICAL MEANING AND PROPER FIELD OF USE IN THE LANGUAGE. HAVING BEEN SERIALLY DISCUSSED FIRST IN TWO DIFFERENT MARATHI DAILY NEWS PAPERS, THEY ARE HERE ARRANGED IN AN ALPHABETICAL ORDER IN THE FORM OF A BOOK, WHICH CAN BE CONVENIENTLY USED BY STUDENTS AND TEACHERS OF MARATHI LANGUAGE, WRITERS, JOURNALISTS AND EDITORS.
‘अठरा विश्वे दारिद्र्य’ असे सर्रास बोलले, लिहिले जाते. कोणती अठरा विश्वे? नावे सांगता येतील? नाहीतच, तर कोठून सांगणार? मग हा शब्दप्रयोग आला कोठून? डॉ.म.बा. कुलकर्णी सांगतात, ‘अठराविसे’ असा शब्दप्रयोग असायला हवा. अठराविसे · ३६०. म्हणजे बाराही महिने दारिद्र्य! ‘शब्द’ हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. शब्दाला रंग-रूप असते. रस-गंध असतो. त्यामुळे ते जाणीवपूर्वक वापरता आले पाहिजेत. शब्दकोशामध्ये तर सर्वच शब्द असतात, पण तेथे ते एक प्रकारे निर्गुण-निराकार अवस्थेत असतात. देवळांमध्ये प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर जसे दगडाच्या मूर्तीला ‘देवत्व’ प्राप्त होते, तसेच शब्दांचे आहे. वापरातून त्यांच्यात प्राणप्रतिष्ठा होते. ते सजीव होतात. बोलू लागतात, डोलू लागतात. ही किमया डॉ.म.बा. कुलकर्णी यांनी या पुस्तकात उलगडून दाखवली आहे.
* `प्रकाशक मित्र` उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार २०१०-२०११ * म.वि.अकोलकर पुरस्कार २०११
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SHABDACHARCHA #SHABDACHARCHA #शब्दचर्चा #REFERENCEANDGENERAL #MARATHI #DR.M.B.KULKARNI #डॉ.म.बा.कुलकर्णी "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 21-08-2011

    भाषाप्रदूषण टाळण्यासाठी शब्दचर्चा... मराठी शब्द, त्यांची व्युत्पत्ती, त्याचा अर्थ, शुध्दाशुध्दता याविषयी चर्चा करणारे डॉ. म. बा. कुलकर्णी यांचे `शब्दचर्चा’ हे पुस्तक मेहता प्रकाशनातर्फे नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे. त्यानिमित्त.. अनेक शब्द आल्या बोलण्या-लिहिण्यात असतात, पण त्यांचा नेमका अर्थ आपल्याला माहीत नसतो. कित्येक शब्दांच्या अर्थाबद्दल आपण कधी विचारच केलेला नसतो. योग्य समजुतीअभावी भाषेचा चुकीच्या पध्दतीने वापर आपण करीत असतो.. सहा-सात वर्षांपूर्वी जेव्हा `लोकमत’च्या संपादकांच्या सूचनेवरुन मी `शब्दचर्चा लिहायला सुरुवात केली, तेव्हा मराठी भाषेत ज्यांच्या स्वरुपाबद्दल चर्चा करावी, असे हजाराहून अधिक शब्द असू शकतील, असे मला प्रारंभी तरी मुळीच वाटले नव्हते. पण आता `शब्दचर्चा’ हे हजार शब्दांची चर्चा समाविष्ट झालेले पुस्तक प्रकाशित झाल्यावर मात्र, `अरे अजून काही शब्द बाकी राहिलेले आहेतच, असेच मला वाटते आहे!’ अशी शब्दचर्चा का करावी लागते? तेच आज इथे `लोकमत’मधील शब्दचर्चा या सदराचा उपसंहार म्हणून सांगायचे आहे! भाषेत `अशुध्द’ असे काही नसते, हे काही अशी खरे असले, तरी कोणतीही भाषा जर ज्ञान संक्रमणासाठी वापरायची असेल, तर तिचे एक `प्रमाण’ रुप मानावे लागते आणि त्या रुपात फार वेगाने बदल होऊ नयेत, यासाठी हे रुप मुद्रित व्यवहारात सांभाळावेही लागते. प्रमाण मराठी भाषेतील कित्येक शब्दांचे रुप, अर्थ, याबद्दल आवश्यक त्या योग्य समजुतीच्या अभावी अनेक लेखक, विशेषत: पत्रकार ही काळजी घेताना दिसत नाहीत; ही खेदाची गोष्ट आहे. वृत्तपत्रातील मजकूर वाचकांच्या दृष्टीसमोर नित्य येत असल्याने, भाषेवर त्याचा मोठाच प्रभाव पडत असतो व त्यामुळे भाषाप्रदूषण मोठ्या प्रमाणात घडत असते. हे प्रदषण टाळायला हवे आहे. मी (रोज एका शब्दाबद्दल) शब्दचर्चा लिहीत होतो, तेव्हा माझ्या लक्षात येत होते की, वृत्तपत्रांमधून अनेक चुकीचे शब्द भाषेत रुढ होऊ लागलेले आहेत. (योग्य शब्द कंसात) उदाहरणार्थ अबालवृध्द (आबालवृध्द), अधुनिक (आधुनिक), आतंकवादी (आतंककारी), दुरावस्था (दुरवस्था), सहस्त्र (सहस्त्र)... वगैरे. शब्द वापरताना त्यांची व्याकरणिक रचना लक्षात घेतली जात नाही. त्यामुळे अयोग्य रुपे सर्रास वापरली जातात. उदाहरणार्थ घेवून (घेऊन), ठेऊन (ठेवून), रहाणे, राहणे (राहाणे), पहाणे, पाहणे (पाहाणे). हृस्व-दीर्घातील बदलाने मराठीत अर्थबदल होत नाही, असे प्रतिपादन अलीकडे आग्रहाने केले जाते आहे.. पण अनेक शब्दांमध्ये यापेक्षा वेगळी स्थिती दिसते. उदाहरणार्थ- सलिल, सलील. मिलन, मीलन. विशेष म्हणजे अशी ही उदाहरणे `संस्कृत’ भाषेतली आहेत, अशी त्यांची विल्हेवाट लावणारे आणि `भाषिक’ सारखे शब्द त्यासाठी बदलून त्याला `भाषक’ असे रुप देणारे अभ्यासक `तज्ञ’ या मराठी शब्दाला नाकारुन संस्कृत तज्ज्ञ या शब्दाचा पुरस्कार करीत असतात! शब्दांचे अर्थ हे यादृच्छिक असतात,म्हणजेच ते (arbitrary) पध्दतीने त्यांना प्राप्त झालेले असतात, असे मानले जाते; पण हे फार थोड्या व विशेषत: भाषेतील काही मूलभूत शब्दांबद्दलच खरे दिसते. कारण आपल्या मराठी भाषेत अनेक शब्द असे आहेत की त्यांचे अर्थ अन्य काही शब्दांच्या संबंधातून त्यांना प्राप्त झालेले आहेत. उदा. गुण्या, गोपालमुहूर्त, ग्राम्य, कर्णधार-अस्मिता वगैरे. काही सांस्कृतिक, ऐतिहासिक, सामाजिक परंपरांचा आधार असलेले आणि त्यांतून अर्थ स्पष्ट होणारे अनेक शब्द आपल्या भाषेत आहेत. उदाहरणार्थ- दंपती, दक्षिणा, घटस्फोट, घंगाळ, अनसूया, गवसणे, वगैरे. या परंपरांचा बोध झाला तर या शब्दांचा वापर आपण अधिक जाणकारीने करु शकू. अनेक शब्द आपल्या बोलण्या-लिहिण्यात असतात, पण त्यांचा नेमका अर्थ काय म्हणून प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर माहीत नसते! उदाहरणार्थ- धंदा, व्यवसाय, अमावस्या, ऐरण- वगैरे. कित्येक शब्दांच्या अर्थाबद्दल आपण कधी विचारच केलेला नसतो. उदाहरणार्थ- अरण्यरुदन, गंधमुक्ती, खांदेपालट, प्रपंच, आकाश, शरीर वगैरे. शब्दांच्या काही जोड्या आपल्या भाषेत अश्या आहेत की ज्या जोडीतील दोनही शब्द भिन्नार्थक असूनही एकमेकांऐवजी वापरले जात आहेत! उदाहरणार्थ व्यग्र-व्यस्त, उपहार-उपाहार, वादातीत-वादग्रस्त, आव्हान-आवाहन, चतुरस्त्र-चतुरस्त्र विरोधाभास,गर्हणीय, अशासारखे काही शब्द तर त्यांचा अर्थ लक्षात न घेताच अनेक ज्येष्ठ पत्रकारही सतत वापरीत आलेले आहेत! वास्तविक हे शब्द संदर्भानुसार अतर्विरोध, स्तवनीय-स्तुत्य असे हवेत. वर जे अनेक शब्द उदाहरणादाखल नोंदले आहेत, त्या सर्वांची तर चर्चा शब्दचर्चेत आहेच. पण या चर्चेत अनेक शब्दांच्या नेमक्या अर्थाबद्दलची, किंवा ते ते शब्द नेमके कसे लिहिणे/छापणे योग्य होईल याबद्दलची पृच्छा, अनेक वाचकांनी व विशेषत: पत्रकारांनी केलेली होती, आणि त्यामुळे त्या त्या शब्दांबद्दल विचार केलेला आहे. यापैकी अनेक शब्दांचे मूळ मराठीची आजी असलेल्या संस्कृत भाषेत मिळत होते. त्यानुसार शब्द स्पष्ट करीत असताना अलीकडच्या काही भाषाभिमानी मराठी भाषिक अभ्यासकांच्या मनातील एक शंका-अथवा आक्षेप जाणवत असे. या अभ्यासकांचे म्हणणे असे असते की मराठीने संस्कृतचा हा आधार सोडून दिला पाहिजे! संस्कृतबद्दलचा असा तिरस्कार बाळगण्याने मराठी भाषेचे नुकसान होण्याचीच अधिक शक्यता आहे. मराठी भाषेतून संस्कृतोत्पन्न शब्द काढून टाकायचे ठरविले, तर सत्तर टक्क्यांच्या वर शब्द सोडून द्यावे लागतील! तसे करणे हा आत्मघातच होईल. जे जे शब्द `संस्कृत’ आहेत असे म्हटले जाते, ते जर मराठीत वापरात आहेत,तर ते मराठीच झालेले नाहीत काय? कोणतीही भाषा ही तिच्या व्याकरणिक प्रत्ययांच्या द्वारे केल्या जाणाऱ्या स्वतंत्र वाक्यरचनेने इतर भाषांपासून वेगळी असल्याचे लक्षात येत असते. आपण अनेक इंग्रजी शब्द या पध्दतीने मराठीत समाविष्ट केलेले आहेतच की! `स्टडीरुममधल्या टेबलावरील लँपच्या उजेडात दुसऱ्या दिवसाच्या लेक्चरची तयारी करणारे प्रोफेसर’ ही रचना मराठीच तर असते! कारण या इंग्रजी शब्दांना आपण मराठी प्रत्यय जोडलेले आहेत. मराठीला समृध्द करीत राहणाऱ्या व विशेषत: आपल्या नवनिर्माणक्षमतेचा वारसा मराठीला देणाऱ्या संस्कृतबद्दल दुजाभाव कशाला हवा? मराठी `शुध्द’ लेखनातील काही ढोबळ नियमांचे पालन टाळणेच कसे इष्ट आहे, हेही ही शब्दचर्चा करताना जाणवलेले आहे. शुध्दलेखन म्हणजे काय? ती भाषेतली एक शिस्त असते. त्या शिस्तीमागील प्रयोजन लक्षात घ्यायला हवे की नको? - असेही काही प्रश्न या शब्दचर्चेत आलेले आहेत. परंतु ही शब्दचर्चा म्हणजे केवळ शुध्दलेखनाची अथवा व्याकरणाचीच चर्चा नाही. शब्दाची व्युत्पत्ती, त्याचे लिखित रुप, अर्थक्षेत्र व त्या क्षेत्रात कालौघात झालेला बदल इत्यादी अनेक दृष्टिकोनांतून ही चर्चा, त्या त्या वेळी जाणवलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने मी केलेली आहे. `लोकमत’ने त्यासाठी मला प्रेरित केले होते त्यासाठी लोकमतचे आभार. भाषाप्रदूषण टाळण्यासाठी ही शब्दचर्चा उपयुक्त ठरावी! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more