* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: SPEEDPOST
 • Availability : Available
 • Translators : APARNA VELANKAR
 • ISBN : 9788177664409
 • Edition : 10
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 392
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : LITERATURE
Quantity
Buying Options:
 • Ebooks:
 • Print Books:
The relation between a mother and her children is the most primitive one, they are tied together tightly through the umbilical cord and through their minds as well. This new era has given a different depth to the relation between a mother and her children. This new era, with its collapsed moral culture and disintegrating virtues is shattering and challenging the relationship, the faith on each other. The internationally famous author Shobha De, has written letters to all her 6 children as a mother. These letters are compiled together in this book. Each mother will find them close to her heart; each letter reveals a mother's mind. The letter reflects the worries of a mother, the burden on her heart and mind in the anxiety of her children's welfare. Today's competition and the world with its vice and temptations is more than enough to make any mother anxious. Topics like the family, the relationship, the family culture, traditions, the insistence on being virtuous, strict discipline, the revolutionary attitude of the young generation, the lengthy phone conversations, the bills causing severe arguments in the house, the lingering parties till midnights, the internet chatting, The list is endless; all this is compiled in this book. It also includes the topics like adolescence, love at a tender age, the physical attraction, friendship with its various dimensions, choosing a partner, and the disputes in the close relationships. Country, god, religion. social liabilities, sense of citizenship! The topics are various, the incidences are different. These letters will show the tender love of a mother, full of affection, full of worries. She loves you, she beats you to awake the sleeping senses. She teases, she ridicules. She makes you laugh, she makes you cry. She has written these letters, full of all the feelings you wish to feel, each letter will touch every lively mind.
N/A

No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
 • Rating StarTrupti Kulkarni

  शोभा डे लिखित, अपर्णा वेलणकर अनुवादित ‘स्पीडपोस्ट’ या मेहता पब्लिशिंग हाऊस (पुणे) यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकातल्या ‘पेज थ्री आई’ या पात्राला ‘प्रणव कुलकर्णी’ यांनी लिहिलेले पत्र. _________________ झगमगत्या दुनियेतून मुलांच्या भावविश्वात अगद उतरता येणाऱ्या पेज थ्री पण तितक्याच हळव्या आईस, तब्बल सहा मुलांचं नेटानं संगोपन करताना वेगवेगळ्या टप्प्यांवर पत्ररूपानं त्यांच्यासमोर तू अनुभवांची शिदोरी खुली केलीस. ही पत्रं तुला प्रकाशित का करावीशी वाटली माहीत नाही; पण ती केलीस हे उत्तम झालं. कसंय, अडनेडी वयातल्या प्रत्येकालाच कधीतरी वाटतं की `आई आपल्याला पुरेसा वेळच देत नाही आणि आपल्यावर तिचं मुळी थोडंफारही प्रेम नाहीये. इतरांच्या आया बघा.` तुलनेचं हे वादळ आई आणि मुलाच्या नात्यात आलं की जहाजावर कितीही रसद असली तरी आपल्याला सुखी ठेवण्यासाठी झटणाऱ्या फूटभर अंतरावरल्या चेहऱ्यावरच्या गाजदार लाटाही मग, मन ओळखेनासं होतं. नात्यांमधले अडथळे असो वा नातं सुशेगात वल्हवणारी वल्ही, दुनियेत सगळीकडे थोड्याफार प्रमाणात सारखीच असतात; पण बंडखोर वयात हे सांगणार तरी कोण आणि कसं? तू लिहिलेली पत्रं केवळ तुझ्या सहा मुलांपुरती मर्यादित न राहता कितीतरी टीनएजर्सच्या मनांचा अचूक ठाव घेतात ती तू हे सांगतेस म्हणूनच. सतत चेहऱ्यावर मेकअपची मागणी करणारं जग, लेखिका म्हणून सगळी व्यवधानं विसरून वाचकांना आवडणाऱ्याच साच्यात शाई ओतायला सांगणारा कागद, वैवाहिक आयुष्याच्या स्वतःच्या म्हणून असलेल्या स्वतंत्र अपेक्षा आणि या सगळ्याला पुरून उरत मुलांना पत्रांतून आयुष्य उत्फुल्लपणे जगायला शिकवणारी तू. आमच्या आया पेज थ्री कल्चरच्या नसतीलही, स्वतःच्या मनातलं कागदावर मुक्तपणे लिहिणं त्यांना कदाचित कॉलेजनंतर जबाबदाऱ्यांच्या धबडग्यात जमलंही नसेल, पण म्हणून त्यांनी आमच्यासाठी आयुष्यासोबत केलेल्या तडजोडीचं महत्त्व थोडीच कमी होतं? `स्पीडपोस्ट` वाचताना प्रत्येकजण आईसोबतच्या आपल्या नात्याचे अर्थ पानापानांवरच्या अवकाशात शोधत राहतो. प्रत्यक्ष ओळीं इतकंच बिटविन दि लाईन्स लिहिणाऱ्या तुझ्या लेखणीचं हे खरं यश. मुलांपाशी व्यक्त होताना तू इतका कमालीचा मोकळेपणा कसा राखू शकतेस याचं कॉलेजात हे पुस्तक वाचल्यावर प्रचंड आश्चर्य वाटलेलं (पुढं `स्पाउज`सारख्या पुस्तकांतून मात्र तुझ्या जगण्याची फिलॉसॉफी गवसली). जे विषय बोलताना आम्हीही संकोचतो तेसुद्धा तू किती सुंदरपणे हाताळले आहेत. जबाबदारीपूर्ण जगण्यासाठी मुलांची मानसिक बैठक घडवताना कुठलाच विषय तू गौण मानला नाहीस. जगण्याबद्दल तू आमच्या भाषेत बोललीस आणि कितीतरी गुंते झरझर सुटले. स्वतःच्याच विश्वात मुलं हरवलेली असताना आई म्हणून खंबीर स्टँड मांडलास आणि जाणवू देत नसली तरी आईचंही स्वतंत्र आयुष्य असतं हे मान्य करायला शिकवलंस तू आणि हेही शिकवलंस की स्वतंत्र आयुष्य असूनसुद्धा मुलंच तिच्या आयुष्याचा ड्रायव्हिंग फोर्स असतात. असंख्य टिनएजर्सच्या मनांतलं द्वंद्व शांत करत आयुष्याला स्थिरत्व आणि दिशा देणाऱ्या तुझ्या या दीपस्तंभरूपी `स्पीडपोस्ट`ला म्हणूनच हे प्रतिपत्र. आयांवर कितीही रुसलो तरी त्यांच्याशी असलेले अतूट बंध जाणणारी आम्ही मुलं ...Read more

 • Rating StarDAINIK TARUN BHARAT 20-02-2004

  जगण्याचा वेगळा दृष्टिकोन देणारं : स्पीडपोस्ट... पत्रे ही खरे तर प्रत्येक व्यक्तिच्या जीवनातील अत्यंत खासगी मालमत्ता. खासगी आणि एक वेगळा ‘आपुलकीचा अनुभव देणारी. दुसऱ्याची पत्रे वाचायची नसतात असा संकेत असतानाही जेव्हा दुसरे ती पत्रे स्वत:हून प्रसिद्ध रतात तेव्हा? तेव्हा अशी पत्रे नेहमीच वाचायची असतात. किमान शोभा डे यांनी त्यांच्या सहा मुलांना लिहिलेली ही पत्रे तरी प्रत्येक पालकांनी आणि मुलांनी वाचायला हवीत. पत्रांबाबतचा लोकसंकेत माहीत असूनही ही पत्रे केवळ आपल्याच मुलांसाठी मार्गदर्शक ठरणारी नाहीत तर इतरांनाही त्यातून खूप काही मिळण्यासारखे आहे. हा लेखिकेचा विश्वास सार्थ आहे. अपर्णा वेलणकर यांनी स्पीडपोस्टचा मराठीमधून केलेला अनुवाद तितक्याच मुक्तपणे व्यक्त झाला आहे. बोलीभाषेतील शब्दांमध्येही सेलिब्रेटिज वर्गाचा टच आणि त्यातून मनाचा धांडोळा शोधण्याची सुरेल कसरत या अनुवादामध्ये उमटली आहे. थोडसं लांबण वाटत असलं तरी ते आवश्यकच आहे, याची पुरेपूर जाणीव वाचताना होत राहते. समाजाच्या अत्यंत उच्चभ्रू वर्गातील एक नामांकित प्रस्थ असलेल्या डे यांच्या जीवनशैलीचा पुस्तकावर प्रभाव असणे स्वाभाविक आहे. पार्टी, शेड्युल्स, देशात आणि परदेशातील असाईनमेंटस अशा बिझी लाईफस्टाईलमध्येही आईच्या मनात आपल्या मुलांविषयी असलेल्या सर्वसामान्य चिंता आणि शंकांपासून त्याही सुटलेल्या नाहीत, याचे सरळसोट चित्रण स्पीडपोस्टमध्ये आहे. त्यातही त्यांची मुले म्हणजे पहिल्या लग्नाची दोन, दुसऱ्या लग्नाची दोन आणि दुसऱ्या पतीची दोन अशी सहाजणं. घरामध्ये गोकुळ असावं असं वाटणाऱ्या या वलयांकित कुटुंबातील प्रश्न चारचौघांसारखेच पण उत्तर मात्र खास शोभा डे स्टाईलची. आपलं आणि आपल्या मुलांच्या आयुष्याची तुलना करताना कुठेही आपण ‘ग्रेट’ असल्याचा ‘फील’ त्या होऊ देत नाहीत हेच त्यांचे ‘ग्रेट’पण सर्वात धाकटी मुलगी आनंदिता रडून विचारते की, आज रात्री तू पार्टीला न जाता माझ्याबरोबर राहू नाही का शकत, तरीही तिचा विरोध पत्करून लेखिकेचं पार्टीला जाणं आणि घरी परत येईपर्यंत मुलीच्या आठवणीने झालेली जिवाची घालमेल या पुस्तकाच्या प्रारंभापासूनच त्यातील आशय मनामध्ये घट्ट बसून जातो. सकाळी आनंदिताने येऊन मारलेली मिठी एखाद्याने थोबाडीत मारण्यापेक्षाही कठोर शिक्षा होती ही लेखिकेची जाणीव स्वत:च्या चुका आणि संवेदनशीलता प्रामाणिकपणे व्यक्त करणारी आहे. स्पीडपोस्टची पकड तेथूनच सुरू होते. रणदीप, राधिका, आदित्य, अवंतिका, अरुंधती, आनंदिनी या आपल्या मुलांना लिहिलेली पत्रे म्हणजे स्पीडपोस्ट, मुलांच्या आयुष्यातील अनेक घटनांची साक्षीदार असलेल्या आणि नसलेल्या आईने याबद्दल मुलांशी, मुलांच्या भाषेत, मुलांसाठी आणि स्वत:साठीही केलेला हा लेखनप्रपंच. या घटनांमध्ये मुलांच्या शाळा, त्यांचा पहिला जॉब, इंटरव्ह्यू, मुलींखती शाळेची सहल, मैत्रिणीमध्ये झालेली भांडाभांडी अशा रुटिन घटना तर आहेतच, पण मुलीने पहिल्यांदा आईशिवाय केलेली शॉपिंग, मुलांच्या गर्लफ्रेंडस, प्रेमप्रकरण, त्यांची पहिली घरच्याशिवाय केलेली व्हॅकेशन टूर, चॅटरुममधील गप्पा आणि त्यातून लेखिकेला आलेलं टेन्शन... अशा काही पत्रांमधून आईला वाटणारी काळजी, मुलं आपल्यापासून दूर तर जात नाहीत ना, याची चिंता आणि पुन्हा मुलांकडे आपल्यासाठी पुरेसा वेळ नसला तरी त्यांना आपली आठवण आहे याचा विश्वास, प्रत्येक पत्राच्या शेवटी व्यक्त होताच. स्पीडपोस्टमधील अनेक पत्रं मनाला भिडणारी आहेत. तरीही त्यातील एका पत्राचा इथे उल्लेख करायलाच हवा. घरातला मोठा मुलगा असलेल्या रणदीपला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देताना, त्याच्या हाती परिवाराची जबाबदारी सोपविताना लेखिकेने त्याच्यावर असलेला विश्वास आणि लहान भावंडांना समजावून घेण्यासाठी त्याला करावी लागणारी कसरत या दोन्हींची सांगड घातली आहे. त्याच्यात आणि त्याच्या सर्वात धाकट्या बहिणींमध्ये असलेले तब्बल सोळा वर्षांचे अंतर तसे प्रचंडच. तरीही तो आपल्या परिवाराला एकसंघ ठेवू शकतो. ही तिची सक्षम जाणीव तिने अतिशय भावस्पर्शीपणे मांडली आहे. यातील लेखिकेच्या लिखाणाची स्टाईल कोठेही न मारता चपखलपणे अनुवाद करण्याची किमया वेलणकर यांना उत्तम रितीने जमली आहे. सिलेक्टिव्ह मेमरीज या पुस्तकाचा अनुभव त्यांच्याकडे असला तरी स्पीडपोस्टकरता त्यांचे कौतुक करायलाच हवे. जीवनाचा एक वेगळा दृष्टिकोन ही पत्रे आपल्याला देतात. ज्याला जीवनाच्या आसक्तीचा मनमुराद अनुभव घ्यायचा असेल त्यांनी ही स्पीडपोस्ट वाचायलाच हवीत. -सुनिता महामुणकर ...Read more

 • Rating StarDAINIK SAKAL 21-03-2004

  आईची मुलांसाठी ‘भेट’... सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात आयुष्याला सामोरे जाताना आपली मुले तग धरतील ना, मोहमयी दुनियेत पावलापावलावर दिसणाऱ्या प्रलोभनांना केवळ आधुनिकता आणि खोट्या प्रतिष्ठेसाठी भुलून ती भरकटणार तर नाहीत ना, ही चिंता सध्या प्रत्यक आईलाच भेडसावते. अशाच आधुनिकतेच्या झंझावातात वावरणाऱ्या आल्या सहा मुलांना प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी लिहिलेली पत्रे कोणत्याही आईच्या हृदयातील भावनाच बोलून दाखवतात. ई-मेल, एसएमएसच्या सध्याच्या जमान्यात मुलांचा आईवडिलांशी संवादही दुर्मीळ झाला आहे. अशा मुलांना नव्या जगात जगताना, झुंजताना, संकटांमधून वाट शोधताना एक शिदोरी हवी म्हणून लेखिकेने या पत्रांच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधला आहे. कुटुंब, त्यातील व्यक्तींचे परस्परांशी नाते, परंपरा, नीतिमूल्ये यांची चर्चा या पत्रांत आहे. आपल्या संस्कृतीची, कुटुंबव्यवस्थेची मुलांना ओळख करून देत असतानाच आपण ही संस्कृती पुढच्या पिढीकडे संक्रमित करण्यास कमी पडलो, ही खंतही त्यांना आहे. झगमगत्या दुनियेत, प्रसिद्धीच्या वलयात वावरत असताना मुलांच्या बालपणातील काही गोष्टी निसटून गेल्याची जाणीव त्यांना आहे. पण त्याचबरोबर मुलांचे वाढते वय, बदलते भावविश्व, नव्या पिढीला हवेहवेसे वाटणारे स्वतंत्र, मुक्तजीवन, बंडखोर वृत्ती या गोष्टी छोट्या छोट्या प्रसंगांतून त्यांनी जाणल्या आहेत, टिपल्या आहेत. मुलांना त्यांच्या विचारांनी जगू देताना, तरुण वयात त्यांना हवे ते क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य देत असतानाच बाह्य जगातील प्रलोभनांना, दिखाऊपणाला ती भुलणार नाहीत, याची काळजीही आई या नात्याने पुरेपूर घेतली आहे. त्यासाठी त्यांनी उपदेशाचे डोस पाजलेले नाहीत किंवा आकांडतांडवही केलेले नाही. एखादी गोष्ट पटली नाही किंवा योग्य नाही म्हणून नकार देऊन त्यांनी मुलांना दुखावले नाही. मुलांना त्या गोष्टीचा त्यांनी अनुभव घेऊ दिला. स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्ती तुलना व स्पर्धा यांचा स्पर्श न होता एकत्र राहू शकत नाहीत. पण स्पर्धेची क्षणिक भावना जोवर तुमच्या मनाचा पूर्ण कब्जा घेत नाही आणि नात्याच्या मुळावर घाव घालण्याइतकी प्रबळ होत नाही, तोवर तिचे अस्तित्व नाकारण्याची केविलवाणी धडपड करू नका, असे त्या मुलांना बजावतात. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला ‘सपोर्ट सिस्टिम’ची गरज असते आणि ती आई, भावंडांच्या आधारानेच भागविली जाते. त्यासाठी कुटुंबातील व्यक्तींचे परस्पर नातेसंबंध दृढ असणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणतात. आपल्या सहा मुलांचे स्वभाव भिन्न असले, आवडीनिवडी टोकाच्या असल्या तरी प्रेमाच्या धाग्याने त्यांच्यातील नात्याची वीण घट्ट ठेवण्याचा प्रयत्न शोभा डे यांनी जाणीवपूर्वक केल्याचे दिसते. प्रेमाने ओथंबलेली, मायेने जवळ करणारी, कधी रागावणारी, वास्तवाची जाणीव करून देत चिमटे काढणारी, कधी हसवणारी, तर कधी धारेवर धरणारी ही सुंदर पत्रे कोणत्याही आईला आपलीच वाटतील. आधुनिक जगाला सामोरे जाणाऱ्या नव्या पिढीतील मुलांसाठी ही पत्रे म्हणजे खरोखरच शिदोरी आहे. संदर्भ बदलले तरी कोणत्याही दोन पिढ्यांमधील नातेसंबंध, परस्परांविषयीच्या भावनाच ही पत्रे व्यक्त करतात. -नयना निर्गुण ...Read more

 • Rating StarDAINIK SAMANA 04-04-2004

  तरुणांपासून प्रौढांपर्यंत साधलेला संवाद... शोभा डे यांच्या सिलेक्टिव्ह मेमरीज या पुस्तकाचा अनुवाद अपर्णा वेलणकर यांनी केला होता. त्यांनीच शोभा डे यांच्या ‘स्पीड पोस्ट’ या पुस्तकाचाही अनुवाद केला आहे. या पत्ररूपी पुस्तकाचं वेगळेपण यात आहे की मुलांना द्देशून लिहिलेल्या या पत्रातील संवाद तरुणांपासून प्रौढांपर्यंत साऱ्यांशीच साधतो. खरं म्हणजे ई-मेलच्या जमान्यात पत्रं हा कालबाह्य प्रकार ठरला आहे. तरीही ‘स्पीड पोस्ट’नं आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. ‘स्पीड पोस्ट’मधली सहा मुलांची ममा ही जगातल्या कोणत्याही मातेची प्रतिमा. आपल्या काळजाच्या तुकड्यांवर अपार मायेचा वर्षाव करणारी, प्रेमळ कधी तितकीच कठोर, तर कधी काळजीनं हळवी होणारी आई आपल्याशी जवळीक साधते. २१व्या शतकाच्या उंबरठ्यावरील तरुणाईपुढील आव्हानं, स्पर्धा, बदलती जीवनमूल्यं, अर्थसत्तेचं अनिर्बंध प्राबल्य यामुळे अवघे आयुष्य ढवळून निघत आहे. त्यातच नातेसंबंधांना हादरे बसत आहेत. या साऱ्याला सामोरे जाताना तरुणाई कधी गोंधळलेली, कधी भरकटलेली होऊ शकते. कोवळ्या वयातील त्यांच्या विश्वाशी सुसंवाद साधण्याचा, त्यांचं आधुनिक बदलतं, अपरिहार्य जग समजून घेण्याचा स्तुत्य प्रयत्न या पुस्तकात केला गेलाय. मुलांशी संवाद साधताना कुठेही छडी उगारलेली दिसत नाही. प्रसंगी समज दिली गेली असेल, पण चुकलेलं कोकरू उबदार घरट्याच्या वाटेवर परतेल असा विश्वास यात व्यक्त होतो. त्यांची उच्चभ्रू जीवनशैली, अत्यंत व्यस्त आयुष्य, धावपळ, मन अस्वस्थ करणाऱ्या आयुष्यात घडलेल्या अनेक कडू-गोड घटना त्यातूनही कुटंबाशी असलेलं घट्ट नातं हे ‘घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिल्लांपाशी’ असंच. कुटुंबात पहिल्या पतीची, दुसऱ्या पतीची मुलं अशी. अपरिपक्व वयातील मुलांशी संवाद, आपुलकी साधणं, सर्वांनाच आपलं घर वाटणं यात ममाची स्त्रीची भूमिका महत्त्वाची. ही कसरत करताना आलेले अनुभव, प्रसंग, मनाची होणारी घालमेल पत्रांतून व्यक्त होत राहते. पुस्तकातील असंख्य पत्रांत विविध विषयांवर चर्चा आहे. कौटुंबिक चौकट, परस्पर नातेसंबंध, संस्कृती, नीतिमूल्यांचा आग्रह, तर दुसरीकडे आधुनिक जगाचं अनिवार आकर्षण असलेली जीवनशैली पार्ट्या, इंटरनेट चॅटिंग, तासन्तास चालणारे टेलिफोन कॉल्स, स्पर्धा, आव्हानं, प्रलोभनं अशा सर्वस्पर्शी पत्रांचा खजिना मनाला स्पर्शून जातो. या पत्रांचा सूर केवळ उपदेशाचा, काळजीचा आग्रहाचा नाही. लेखिकेनं आपलं मनही अत्यंत दिलदारपणे उलगडलंय. मागे वळून बघताना नकळत आपल्या हातून घडलेल्या चुकांची कबुलीही आहे. आधुनिक जगात वावरताना आपली मुलं विचारपूर्वक निर्णय घेतील. नातेसंबंधांना हादरे बसणार नाहीत, मोठा मुलगा वडीलकीच्या नात्याने कुटुंबाचे बंध सैल होऊ देणार नाही असा सार्थ विश्वास त्या व्यक्त करतात. पत्रातील भाषेचा डौल काही वेळा सेलिब्रिटी टच वाटला तरी तो भावस्पर्शी, हळुवार मनाचा उद्गार आहे हे जाणवतं. काही पत्रांचा शेवट मात्र अगदी काळीज ओतल्यासारखा. ‘सदैव काळजी आणि संशयात बुडालेली तुमची ममा.’ असा आपल्या दोन मुलांना उद्देशून लिहिलेल्या एका पत्रातील हा तुकडा ‘तुम्ही किती बदल्या मिळवता किती पैसा अगर पुरस्कार मिळवता याच्याशी मला देणं-घेणं नाही. तर मग मी चुकूनसुद्धा तुमच्या पायात पाय अडकवायला मध्ये मध्ये येणार नाही. ‘प्रॉमिस!’ प्रस्तुत पुस्तकातील हा संवाद कोणत्याही संवेदनशील जागरूक पालकाच्या व पाल्याच्याही काळजाला हात घालणारा, त्यांचं अंत:करण उलगडून दर्शविणारा एकमेकांवरच्या विश्वासानं, मायेनं एकमेकांशी घट्ट बंध असलेलं हे कुटुंब वर्षाच्या सरत्या रात्री उगवत्या वर्षाच्या स्वागतासाठी एकमेकांसोबत सज्ज असतं. तो क्षण एकमेकांच्या मिठीत पाणावलेल्या नेत्रांनी साजरा होता. वाचकांनाही पत्रांप्रमाणेच हा क्षणही मुठीत धरून ठेवावासा, हृदयात साठवून ठेवावासा वाटतो. -माधुरी महाशब्दे ...Read more

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SHRIMAN YOGI
SHRIMAN YOGI by RANJEET DESAI Rating Star
Sacchit Erande

श्रीमान योगी.... हे नक्की चरित्रलेखन आहे की आत्मकथन असा पानोपानी प्रश्र्न पडावा इतक्या मधूर आणि आत्मीय शब्दसंपन्नतेत सखोल मांडणी तेही भावनीक ओल कुठेही हलू न देता. एखाद्याच्या डोक्यावरची सगळी कर्जे फिटली तरी महाराजांनी हिंदू म्हणून जगण्याचे सौभा्य मिळवून दिले त्याचे ऋण फेडणं कोणांसही केवळ अशक्य! आणि ते कदाचित फिटूही नये... नपेक्षा ते फेडण्याची अवकात असलेला या भुमंडलावर अवतारित होऊच शकत नाही! 🚩🚩🚩🚩🚩 ...Read more

BARI
BARI by RANJEET DESAI Rating Star
Prasad Natu

मला आठवते आहे, 2011-14 या काळांत आम्ही कोल्हापूरला होतो,तेव्हाची गोष्ट. मी बँक ऑफ इंडियाच्या कोल्हापूर मुख्य शाखेला वरिष्ठ प्रबंधक (कर्ज विभाग) होतो. “हॉटेल कृष्णा” चे प्रपोजल आमच्या कडे आले होते. त्या निमित्ताने स्वामीकार रणजीत देसाई ह्यांचे मेव्हण श्री.उदयसिंह शिंदे आणि त्यांचे सुपुत्र श्री. सिद्धार्थ शिंदे ह्यांचा परिचय झाला.आपले समूहाचे कर्ताधर्ता श्री. कृष्णा दिवटे सर ह्यांचा कोल्हापूर मधे कुणाशी परिचय नसेल अशी व्यक्ति भिंग घेऊन शोधावी लागेल.एक दिवस ते मला म्हणाले, स्वामीकार रणजीत देसाई यांचे गांव कोवाडला चलता का.शनिवारी,संध्याकाळी कार्यक्रम आहे.रणजीत देसाई यांची पुण्यतिथि होती. प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे देखिल येणार आहेत.त्यांचा कार्यक्रम देखील होईल.साहित्य आणि संगीत असा दुर्मिळ योग एकत्र येणं हे मोठ्या भाग्याचे.मी लगेच जाऊया म्हटले.त्या प्रमाणे साधारणतः संध्याकाळी 4.00 कडे मी,माझी पत्नी सौ भावना आणि श्री दिवटे सर आणि सौ. वहिनी असे चौघे आम्ही गेलो.तिथे बऱ्याच नवीन गोष्टी समजल्या.जसे रणजीत देसाई आणि प्रसिद्ध गायक वसंतराव देशपांडे ह्यांची घट्ट मैत्री होती.दरवर्षी कोवाड येथे त्यांचे येऊन रहाणे हे कळले.रणजीत देसाई ह्यांचे घर बघायले मिळाले,ज्याचे स्मारकांत रूपांतर झाले,त्यांचे साहित्य,त्यांचे हस्त-लिखित,राहुल देशपांडे यांच्याशी झालेली वैयक्तिक ओळख.हे सारे कधी विसरता येणार नाही.श्री.शिंदे ह्यांनी मला साहित्याची आवड म्हणून स्वामीकारांची 2-3 पुस्तके मला भेट म्हणून दिली.त्यातले एक पुस्तक म्हणजेच “बारी”.रणजीत देसाई ह्यांची पहिली कादंबरी.कथाकार म्हणून सुरुवात केलेल्या देसाई यांची ही पहिली कादंबरी. ह्या कादंबरीस प्रसिद्ध साहित्यिक श्री.वि.स.खांडेकर ह्यांची प्रस्तावना लाभली आहे. रणजीत देसाई ह्यांनी कादंबरीचा विषय त्यांच्या दृढ परिचयात असलेला भूभाग निवडला.कोल्हापूर ते बेळगाव रस्त्यावर सुतगट्टी नावाचे गांव लागते.तिथून 15-20 किमी आंत काकती नावाचे गावं लागते.ह्या गावापर्यंत अगदी गहिऱ्या जंगलाने वेढलेली वाट ही सुतगट्टीची बारी म्हणून ओळखली जाते.त्या जंगलात गुजराण करणाऱ्या बेरड जमातीची ही कथा आहे.ही कादंबरी लिहिण्यासाठी त्यांनी ह्या भागात राहणाऱ्या बेरड जमातीचे जीवन अगदी जवळून पूर्ण सहानुभूतीने पाहिले.ही कादंबरी वाचतांना हे पदोपदी लक्षात येतं की शहरातल्या आलीशान बंगल्यात बसून चितारलेले हे ग्रामीण जीवन नाही.त्यातील प्रत्येक प्रसंगात जिवंतपणा आढळतो. कारण रणजीत देसाईनी जवळपास 3-4 वर्ष ह्या भागात राहून त्या जीवनाचा जवळून अभ्यास केला. आपल्या समोरच सारे घडते आहे असे वाटू लागते.मला आठवते आहे की ही कादंबरी मी जेंव्हा पहिल्यांदा वाचली.त्यातील पात्रांची निवड,त्यांचे स्वभाव दर्शन, निसर्ग चित्रण, तेथील समस्या आणि स्वातंत्र्यानंतर बदलत चाललेले जीवनमान.हयात कुठेही काल्पनिकपणा वाटत नाही. वि.स.खांडेकर ह्यांनी लिहिलेली प्रस्तावना त्यांच्या साहित्यिक विद्वतेचा परिचय करून देणारी आहे.सर्वसाधारणपणे आपण पुस्तक चाळतो तेंव्हा आपण प्रस्तावनेकडे दुर्लक्ष करतो.पण मित्रांनो, प्रस्तावना देखील अवश्य वाचा.ही कादंबरी तेग्या ह्या नायकाच्या अगदी तरुण वयापासून ते म्हातारपणा पर्यन्तची कहाणी आहे.पण ही कहाणी केवळ तेग्याची नसून त्याच्या भोवती फिरणाऱ्या आणि गुंफलेल्या बेरड जमातीची कथा आहे. रणजीत देसाई यांची ही पहिली कादंबरी आहे हे कुठेच जाणवत नाही. कादंबरी वाचतांना लक्षात येते की,कोल्हापूर ते बेळगाव रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीवर रात्रीच्या वेळेस दरोडा घालून आणि जंगलातून लाकडे तोडून ती विकणारी,आणि त्यावर गुजराण करणारी ही बेरड जमात.स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी पासून ते स्वातंत्रोत्तर काळात ह्या जमातीच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनावर झालेल्या बदलांचे खूप सुरेख वर्णन ह्या कादंबरीत चितारले आहे.तेग्या हा गावचा नाईक असतो आणि ही वाटमारी किंवा दरोडे त्याच्या नेतृत्वाखाली घातले जातात.गावात ह्या तेग्याचा मोठा दरारा.कादंबरीच्या सुरुवातीलाच असे दाखविले आहे की,तेग्या जंगलातून वस्तीच्या रोखाने परतत असतांना,त्याला नदीच्या पाण्यात काही खळबळत असल्याची चाहूल लागते.त्याला वाटते कुणी तरी जंगली जनावर असावे.म्हणून तो शिकारीच्या उद्देश्याने तिकडे वळतो.तर नदीच्या काठाला एक व्यक्ति उभी असल्याचे त्याला दिसते.ती व्यक्ति त्याच्या भात्यातले मासे आपल्या स्वतःच्या घोंगडीच्या खोळीत टाकताना दिसते.तो त्या व्यक्तीस तसे करण्यापासून आडवायला जातो.तर त्याच्या लक्षात येत की,ती व्यक्ति म्हणजे एक स्त्री आहे.ती 15-16 वर्षाची एक तरुणी असते.ती सहजासहजी त्याचे मासे परत देत नाही.तिच्याशी झटापट करताना,त्या तरुणीच्या लक्षांत येते की,तेग्याची फरशी (हल्ला करण्यासाठीचे शस्त्र) ही झाडांत अडकली आहे.ती शिताफीने ती फरशी मिळविते आणि तेग्यावर उगारते.मी चेन्नटी गावच्या कल्लूची नात आहे अशी आपली ओळख देत, ती त्याची फरशी नदीत फेकून दिसेनाशी होते. तेग्या काही काळ तसाच उभा रहातो.तो बेरवाडीचा नायक असतो,म्होरक्या असतो.त्याला एका तरुणीने फसवावे आणि डोळ्या समोर त्याची फरशी घेऊन जावे.हे त्याला फारसं रुचत नाही.तो बेरडवाडीत येतो.तिथे तो त्याचा मामा मल्ला सोबत रहात असतो.घरी पोहोचल्यावर त्याचा मामा फरशी बद्धल विचारतो.(ती त्याच्या वडिलांकडून आलेली वारसाने फरशी असते) तो खोटच सांगतो की चंद्रोजीस दिली.ते मामाला पटत नाही. तेग्या विचार करीत असतो की,आई गेल्यावर गेल्या काही वर्षात घरात कुणी बाई माणूस नाही.तो मामाला म्हणतो त्याला लग्न करायचे आहे.तो घडलेली सगळी हकीकत त्याला सांगतो आणि चेन्नटी गावची कल्लूची नात आहे. तिच्या बाबत काही माहिती आहे का विचारतो.मामा त्याला तिच्याशी लग्न करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो.कारण तिच्या भांडकुदळ स्वभावाची मामाला कल्पना असते.पण तेग्या हट्ट धरून असतो की तरी त्याला तिच्याशीच लग्न करायचे आहे.ते दोघे चेन्नटीला जातात.कल्लूला मागणी घालतात.कल्लू तेग्याच्या वडिलांचा खास मित्र असतो.कल्लू लग्नाला तयार देखिल होतो.पण त्याची नात,नागी तिचं नांव असते,ती त्याला विरोध करते.ते दोघेही कल्लूला खूप खूप बोलून निघून जातात.कल्लू त्यांचा गावाच्या वेशी पर्यन्त पाठलाग करतो आणि म्हणतो की तुम्ही तिला रात्री पळवून घेऊन जा.कारण ती तशी तयार होणार नाही.माझी काही तक्रार नाही.दोघांना ते पटते.ते दोघे आणि चंद्रोजी असे तिघेही तिला चेन्नटीला जाऊन पळवून घेऊन येतात.दुसऱ्या दिवशी सकाळी ती घरात दिसत नाही तेव्हा ती पळून गेली असे वाटते.कारण ती घरांत कुठेच नसते.तेग्या आणि मल्ला शोधाशोध करू लागतात.तेग्या आणि मल्ला चेन्नटीला जाऊन कल्लूला विचारतात की तिथे आली कां,पण ती तिथे नसते. तेग्या घरी येतो तर ती घरांत असते.ती त्याला स्वयंपाक करण्यासाठी लाकडे आणायला गेली होती असे सांगते.शेवटी ते दोघे एकमेकांना स्वीकारतात. काळू हा खबऱ्या असतो.तो वाटमारीसाठी सावज आल्याची खबर देत असतो.एकदा चुकीची खबर आणल्याने तेग्याच्या मालकाच्या,इनामदाराच्या बैलगाड्यावर दरोडा टाकला जातो.त्यात इनामदाराची पत्नी असते.तिला पाहून तेग्या त्यांचा लुटलेला ऐवज परत करतो. इनामदारास न सांगण्याचे वचन घेतो.पण त्यांचा गडी बाळू सावकारास सर्व सांगतो. दसऱ्याला,तेग्या नेहमी प्रमाणे इनामदारास बिदागी मागण्यास जातो.इनामदार त्याला हाकलून देतात.तो माफी मागतो पण इनामदार एका अटीवर तयार होतो.तो म्हणतो सरोळीचा पाटील माझा वैरी आहे,त्याचा काटा काढ.तो तयार नसतो. कारण त्याचा जिगरी मित्र चंद्रोजी,पाटलाकडे कामाला असतो.पण तेग्या शेवटी तयार होतो.तो पाटलाचा खून करतो.इनामदार शब्द फिरवितो.त्याला वाचवत नाही आणि रु.5000/- ही देत नाही.त्याला पोलिस पकडून नेतात.त्याचा मित्र काळू त्याच्या साठी वकील करून त्याची फाशी टाळतो.पण तरी जन्मठेप होतेच.त्याची बायको नागी गर्भार असते.तो तिकडे जेल मधे असतांना,इकडे नागी मुलाला जन्म देते.13 वर्षाने तेग्या सुटून येतो तो पर्यन्त मुलगा ईश्वरा मोठा झालेला असतो. तेग्या घरी येतो.तेव्हा बरेच काही बदललेले असते. तो परत आल्या नंतर काही महिन्यातच नागी जळून मरण पावते. देशाला स्वातंत्र मिळालेले असते.त्यामुळे वाटमारीला आळा बसतो.वन विभागाचे काम सुरू होते. वृक्षतोड ऐवजी वृक्षसंवर्धनावर जोर दिला जातो.तेग्याचा मुलगा गावात एक गुरुजी असतात.त्यांच्या संपर्कात येतो.त्यांचे शिष्यत्व पत्करून त्याचे परंपरागत व्यवसाय बंद करतो.हळूहळू त्या गावातील सर्व परंपरागत व्यवसाय बंद होत जातात.लोक उदरनिर्वाहासाठी गावं सोडून बाहेर गांवी जातात. ह्या कादंबरीचा शेवट हा विशेष असा twist and turn वगैरे असलेला नाही. पण माझी इच्छा आहे की ही कादंबरी तुम्ही जरूर जरूर वाचली पाहिजे ह्या साठी शेवट सांगत नाही. मला खरोखर आश्चर्य वाटते की, ह्या कादंबरीवर आधारित एखादा चित्रपट कसा आला नाही किंवा आला असेल तर मला माहित नाही.मित्रांनी प्रकाश टाकावा. ...Read more