* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: SWAR
 • Availability : Available
 • ISBN : 9788171613137
 • Edition : 16
 • Publishing Year : JUNE 1979
 • Weight : 130.00 gms
 • Pages : 148
 • Language : MARATHI
 • Category : SHORT STORIES
 • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
Quantity
Buying Options:
 • Ebooks:
 • Print Books:
SOME OF THE `RAGA` SOME KEYNOTES ARE STRICTLY NOT EXCLUDED, NOT BECAUSE THEY ARE NOT SUITABLE; ON THE CONTRARY THEY ARE& EXCLUDED TO MAKE THE `RAGA` MORE BEAUTIFUL, THEY ARE; EXCLUDED WILLINGLY TO GIVE A PECULIARITY AND WHILE DOING SO THEIR EXISTENCE IS NOT FORGOTTEN AT ALL, ONLY IT IS AVOIDED. THAT IS THE REASON WHY MY HUSBAND CANNOT FIT INTO YOUR LIFE AND MEMORIES AND WHY WE BOTH CANNOT FIT INTO EACH OTHER`S LIVES." VA PU HAS A VERY PECULIAR AND UNIQUE STYLE TO HANDLE DIFFICULT THINGS IN THE MOST SIMPLE MANNER, REVEALING THE HARSH AND HARD CORES OF TRUTHS IN A VERY EASY STYLE, UNTANGLING THE KNOTS SMOOTHLY YET FIRMLY AND SUCCESSFULLY. THE SUCCESS OF HIS STORIES LIES IN THE SELECTION OF THE MOMENTS. THESE SAME MOMENTS ARE WITNESSED BY MANY BUT IT TAKES A VERY SENSITIVE MIND TO PUT THEM INTO WORDS, NEEDLESS TO SAY THAT ONLY VA PU HAS THE CAPACITY, HE GIVES SUCH STRENGTH AND DIMENSIONS TO THESE MOMENTS THAT THEY GLOW IN THEMSELVES, THEY MAKE US THINK, INSPECT OURSELVES, CONTEMPLATE OVER THEM. IT IS HIS STYLE AND FRESHNESS WITH WHICH HE SEES LIFE, HIS HOPEFUL AND MAGNANIMOUSNESS WHICH MAKES EACH STORY A UNIQUE PIECE OF LIFE DAWDLING IN OUR MINDS HOURS LATER.
काही काही रागदारीत काही काही स्वर वज्र्यच असतात... वज्र्य झालेला स्वर वाईट असतो म्हणून वगळायचा नसतो, तर एक राग उभा करण्यासाठी आपण तो खुशीनं विसरायचा असतो... वाद्यातल्या तेवढ्या पट्ट्या उपटून फेकायच्या नसतात, त्यांना फक्त चुकवायचं असतं..! म्हणून तुझ्या आठवणीत, सहवासात माझा नवरा बसू शकत नाही आणि एकमेकांच्या संसारात आपणा एकमेकांना स्थान नाही.’’ लोकप्रिय कथाकार वपु काळे अतिशय सहजतेनं अशी चपखल उदाहरणं देऊन आयुष्यातली गुंतागुंत सोपी करण्याचा नेमका धागा आपल्या हाती देतात. त्यांच्या सर्वच कथांमध्ये कथेच्या ओघात मिसळून असं चिंतन येतं आणि ते वाचकांना विचार करायला लावतं. मुळात कथा अतिशय खुमासदार; सहसा कुणाच्या ध्यानीमनी न येणाया क्षणांच्या, घटनांच्या झालेल्या. त्याची अभिव्यक्ती असते वपुंच्या खास मिस्कील शैलीत! त्यांच्या लेखनातील जीवनविषयक प्रसन्न, उदार, आशावादी दृष्टिकोनामुळे त्यांची प्रत्येक कथा वाचकाचं मन जिंकून घेते. ‘स्वर’मधील कथाही वाचून संपल्या तरी मनात दीर्घकाळ रेंगाळत राहतील...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
 • Rating StarNEWSPAPER REVIEW

  मध्यमवर्गीय जीवनातील समस्यांचे वैशिष्ट्यपूर्ण आकलन... लोकप्रिय कथाकार वपु काळे अतिशय सहजतेनं चपखल उदाहरणांद्वारे आयुष्यातील गुंतागुंत सोपी करण्याचा नेमका धागा वाचकांच्या हाती सोपवतात. त्यांच्या प्रत्येक कथेत चिंतनाचे सूर उमटत राहतात आणि त्या चिंतनाचया सुरांनी अर्थांची वेगवेगळी वलये मनात फेर धरू लागतात. मुळात अत्यंत खुमासदार घटना; चमत्कृतिपूर्ण प्रसंग व व्यक्ती; आणि त्यांच्या अनपेक्षित वर्तनामुळे उडणारा गोंधळ... पण तो वपु आपल्या खास कथाकथनतंत्रशैलीने कमालीचा उत्कंठापूर्ण बनवतात. त्यामुळे त्यांच्या कथेचा शेवट एकतर ध्यानीमनी नसलेली कलाटणी देऊन होतो किंवा आसमंत लख्खकन चकाकून सोडणारे जीवनविषयक तत्त्वज्ञान किंवा सत्य सांगून होतो. जीवनविषयक प्रसन्न, आशावादी व उदार जाणीव ही त्यांच्या प्रत्येक कथेला एक वेगळीच उंची देऊन जाते. ‘स्वर’ या कथासंग्रहाच्या शेवटच्या पृष्ठावर हा आशय व्यक्त करणारा ‘ब्लर्ब’ दिला आहे; तो यथोचितच आहे. वपुंच्या कथचे मर्म प्रकट करणारा आहे. ‘स्वर’ मध्ये एकूण पंधरा कथा आहेत. ठुमरी, सोळा जानेवारी, स्वर, सत्कार, धर्म, किक्, पराभव, जिद्द, दुर्वास, भाऊचा धक्का, पहिली खेप, वसावसाचा वसा, मोले घातले बोलाया, मला समजतंय, आणि ‘मी, माझी सौ व तिचा प्रियकर’, ठुमरी ही गोष्ट वीस पृष्ठांची आहे. बाकीच्या सहा ते पंधरा पृष्ठांच्या. आपल्या पतीनं आपली एकेकाळची प्रेयसी अचानक भेटल्याचे सांगितल्यावर जयश्रीमधला संशय चवताळून उठतो. स्वप्नात कोणीतरी देवी येते आणि तिला सांगते, ‘‘तुझ्या नवऱ्याला सांभाळ.’’ एका सिनेमाला जयश्री जाते, त्या चित्रपटाची कथा तिला आवडते. लग्नापूर्वीचे प्रियकर-प्रेयसी एकमेकांना भेटतात आणि दोघांच्यात काहीही न घडता ते एक रात्र एकत्र काढतात. फक्त गप्पा मारतात. जयश्री ही कथा रंगवून शेजाऱ्यांना सांगते आणि म्हणते, ‘‘पण हे असे आदर्श पुरुष सिनेमातच सापडणार. प्रत्यक्षात एवढा संयम पाळू शकणारा माणूस अशक्य. आलेली संधी पुरुष सोडतो काय कधी? नाटक, सिनेमा, कथा-कादंबरीत ठीक आहे हे सगळं–’’ तेव्हा निवेदकाला सांगावंसं वाटतं की, ‘‘मूर्ख स्त्रिये, अगं, असा एक मर्यादा पुरुषोत्तम ह्या क्षणी तुझ्या या उंबऱ्यात उभा आहे.’’ ठुमरी हे नाव या कथेला दिलेय; ते का? अनुराधा सुनीलला सांगते, ‘‘संसार हा धीरगंभीर उदात्त रागदारीसारखा असतो. तास तास चालणारा. ठाम, विलंबित, द्रुत अशा अंगानं फुलणारा. केव्हा केव्हा फार संथ वाटणारा. उदास करणारा. कंटाळा आणणारा आणि मध्येच तुझ्यासारख्या मित्राची आठवण, हा मोठा राग आळवून झाल्यानंतरच्या ठुमरीसारखी असते. दहा मिनिटात संपणारी पण सगळी मैफल गुंगत ठेवणारी. मरगळ घालवणारी.’’ रजेवर जाण्यापूर्वी लीला फडणीस प्रत्येक सहकाऱ्याला एकेकट्याला गाठून कॉन्फिडेन्शियली सांगते, ‘‘डॉक्टरांनी सोळा तारीख दिली आहे. कुणाला सांगू नका.’’ प्रत्येकाला मनातून वाटते, ‘‘ही कॉन्फिडेन्शियल बातमी फक्त आपल्यालाच ठाऊक आहे... लीला फडणीसने ही खास बातमी फक्त आपल्यालाच सांगितलीय या जाणिवेने प्रत्येकजण मोहरतो. परिणाम? सोळा तारखेला ऑफिसात कोणीच येत नाही. प्रत्येकाची रजेची चिठ्ठी... एकटे बॉस येतात. तेही मॅटर्निटी होमचा नंबर फिरवतात... यासारखा किस्साही वपु काळे मोठा खुलवून पेश करतात. हेच वपुंचे मानसशास्त्राचे ज्ञान ‘सत्कार’ कथेतही आपल्याला दिसते. आपला एकसष्टीचा गौरवांक निघावा ही एकेकाळी नाट्यचित्रपटसाहित्यक्षेत्रात काही काळ कार्य करणाऱ्या केशवरावांची इच्छा. ते स्वत: आजारपणामुळे अंथरुणाला खिळलेले. म्हणून साठीबाबत संबंधित व्यक्तींना स्मरण देण्यासाठी ते त्यांना भेटायचे पत्नी सरस्वीबाई हिला सुचवतात. पण संबंधित व्यक्ती फारसा प्रतिसाद देत नाहीत. साठीच्या दिवशी नेमका केशवरावांना भेटून डॉ. साठे हार घालतात. त्याच आनंदाच्या भरात केशवरावांना अ‍ॅटॅक येतो आणि ते पलंगावर कोसळतात. डॉक्टर इंजेक्शन देतात तेव्हा केशवराव शुद्धीवर येतात. डॉ. साठे सरस्वतीबार्इंना सांगतात, ‘‘आज त्यांना कुणालाही भेटू देऊ नका. कुणी हार आणले तर तुम्ही ते घेऊन त्यांना नेऊन द्या. पण भेटायला देऊ नका.’’ सरस्वतीबाई दर तासाने एकेक हार घेऊन केशवरावांना देत हा अमक्याचा, हा तमक्याचा असे सांगत राहतात आणि केशवरावांच्या मनाला उभारी आणत राहतात. ‘‘हा लपंडाव. लोकांनी मला फसवायचं. मी लोकांना फसवायचं. कृतघ्न सहकाऱ्यांच्या उपेक्षेचा धक्का पतीला या अवस्थेत जाणवू नये’’ म्हणून सरस्वतीबाईनी चालवलेली ही कसरत म्हणजे एक मानसशास्त्रीय उपचारच ! टेलिफोन ऑपरेटरच्या जागेसाठी इंटरव्ह्यूचा कॉल आलेली पुष्पा शाळिग्राम फोनवरून आपणास उशीर होईल असे सांगते, तेव्हा तिच्या आवाजातला गोडवा व मार्दव जाणवून कथानिवेदक तिचीच नेमणूक करायचे मनोमन नक्की करतो. तंबोऱ्याच्या तारांना जवारी लावल्यावर ज्याप्रमाणे स्वर काही काळ घुमत राहतो, त्याची आस मनी राहते तसा काहीसा तिचा आवाज - तो त्याला जिंकतो. प्रत्यक्षात ती येते, तेव्हा तिचा काळा रंग व सामान्य रूप पाहून त्याला प्रश्न पडतो, ‘‘परमेश्वरानं या मुलीला काहीही न देण्याएवढं कफल्लक का असावं?’’ तरीही त्या आवाजामुळं तिला नोकरी दिली जाते. बॉसला ती नंतर एकदा आपल्यावर असलेल्या कर्जाची कल्पना देताना म्हणते, ‘‘माझ्यासारखी मुलगी ज्या आईवडिलांना असते, त्यांना ती मुलगी म्हणजे कर्जच नाही का?... कातडीचा रंग काळा. त्याचे हजार रुपये मी धरले. केस आखूड. त्याचे पाचशे रुपये. डोळेही पाणीदार नाहीत. त्याचे पाचशे. ओठ जाड. त्याचे हजार. बांधा- त्याचे दोन तीन हजार. लग्नाच्या वेळी फक्त पैसाच धावून येईल. एखादा अडलेला वरपिता देईल त्याच्या गृहलक्ष्मीची जागा मला.’’ आपल्याच ऑफिसमधल्या अच्युतबरोबर ती दोन तीन महिने फिरताना दिसल्याचे बॉसला कळते. तेव्हा त्याला आश्चर्य वाटते. खरे तर अच्युतचे लग्न ठरलेले असते; त्याची भावी पत्नी परगावी गेलेली असते, हे सर्वांना ठाऊक असते. बॉसच्या प्रश्नाला उत्तर देताना पुष्पा आपली भूमिका प्रकट करते, ‘‘मी निव्वळ स्वत:च्या आनंदासाठी अच्युतबरोबर फिरते. मला थोडा कैफ हवा होता. धुंदी हवी होती. पुरुष बाईसाठी कसा वेडापिसा होतो हे मला लांबून पाहायचं होतं. माझ्या लग्नानंतर मला तसा कैफ अनुभवायला मिळेलच ह्याची खात्री नव्हती... एकदा पुरुषाच्या वासनेने उसळी खाल्ली की त्याला फक्त स्त्री हवी असते. मग ती कशी का असेना !... मला माझ्या या कुरूपतेनंच वरदान दिलंय असं म्हणायला हवं. माझ्यासारख्या कुरूप मुलीबरोबर अच्युतसारख्या राजबिंड्या गृहस्थाचं काही गणित असेल अशी शंकाही घेण्याचं धाडस कुणाला झालं नाही.. जसं एखादीचं सौंदर्य अपूर्व असतं तशी माझी कुरूपताही अपूर्व आहे.’’ ‘स्वर’ या कथेच्या माध्यमातून वपुंनी रूपहीन कुमारी तरुणीच्या व्यथांची एक वेगळीच कैफियत सादर केली आहे. पुष्पाला घेऊन अच्युत आपल्या भावी सासुरवाडीलाही भेट देतो; तरी कोणाला काही वाटत नाही. यासारखे तपशील म्हणजे वपुंचे मास्टर स्ट्रोकच ! ‘आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राम्हण होता’ अशा कहाणीच्या ढंगात ‘वसावसाचा वसा’ ही कथा वपु सांगतात. कथेतल्या ब्राम्हण अविरत पत्नीधर्माचा वसा घेतो, त्यामुळे त्याला वडिलांनी दिलेला शाप बाधत नाही. बायको वसावसा ओरडत नाही. ‘‘हे व्रत कायम करायचं असतं, हे व्रत शंकरानं पार्वतीला, पार्वतीनं गणेशाला, गणेशानं नारदाला आणि नारदांनी अनेकांना सांगितलं’’ असाही परंपरेचा हवाला वपु देतात. बंद पडलेली स्कुटर मेकॅनिक दोन मिनिटातच ठीक करतो आणि ती वाघिणीसारखी गुरगुरू लागते. त्या मेकॅनिकनं स्कुटरचीच कळ फिरवली नाही, आपलीही फिरवली असं निवेदकाला वाटतं, आणि घरातल्या मुलाच्या समस्येकडे नव्या दृष्टीने तो बघायला सिद्ध होतो. (किक्) एका साहित्यिकाकडे रविवारी लेखककवींची मैफल जमते. हॉटेलमधून खाद्यपदार्थ येतात. लेखककवी खूष होतात. अनेक रविवार असे जातात... हे खाद्यपदार्थ कोण पाठवते?... वपु आपल्या चाहत्या रसिकाचे कौतुक ‘पराभव’ या कथेद्वारे करण्याची संधी देतात. वपु काळे यांच्या या कथांमधून मध्यमवर्गीय जीवनातील अनेकविध सामाजिक-नैतिक-कौटुंबिक समस्यांचेही एक वेगळे रूप समोर येते. या अस्तित्वाला भक्कम मानसिक आधार शोधण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. जगण्यासाठी विशिष्ट मूल्यभानाची गरज असते. आयुष्याची इमारत भक्कम पायावर उभी करावी लागते. भावभावनांच्या पायावर ती सदैव हादरत राहते; तिला भक्कमपणा आणण्यासाठी, एका नैतिक भानाची गरज असते. त्या नैतिक भानाचे विविध पैलू प्रकट करणे हे एक कथाकार म्हणून वपु काळे आपले उत्तरदायित्व मानत राहिले. ‘स्वर’मधील कथा त्याची साक्ष देतात. ...Read more

 • Rating StarDAINIK LOKSATTA 14-07-2002

  संवादोत्सुक कथा… कथा या वाङ्मयप्रकाराचा कौटुंबिक कथा हा जर एक उपप्रकार मानला, तर त्या कथांच्या सदंर्भात कथाकार व. पु. काळे यांचे नाव आवर्जुन घ्यावे लागेल. खास मध्यमवर्गीय संसारकथा म्हणजे व. पु असं समीकरण मांडायला अजिबात हरकत नाही, इतक्या विपुल संख्यनं व. पुं. नी ‘आंबटगोड’ कुटुंबकथा लिहिल्या. माणसांमध्ये वाढत चाललेला विसंवाद, एकलेपणा व. पुं. च्या कथांच्या केंद्रस्थानी असल्याचं दिसून येतं. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांच्या तीन पुस्तकांची नवी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. ‘स्वर’ हा संग्रह १९७९ साली प्रथम प्रकाशित झाला. ही त्याची पाचवी सुधारित आवृत्ती आहे. तीक्ष्ण निरीक्षणशक्ती आणि त्यातून उतरलेली जीवाला हुरहूर लावतील, अशी व्यक्तिचित्रणं व.पुं.च्या इतर संग्रहांप्रमाणेच ‘स्वर’मध्येही वाचायला मिळतात. आपल्या सांसारिक जीवनात कधी ना कधी वाट्याला येणाऱ्या प्रसंगांपैकी जवळच्या आप्ताचा मृत्यू ही एक घटना. लहान मुलांना शक्यतो त्यापासून दूर ठेवण्याचा अयशस्वी प्रयत्न नेहमीच केला जातो. ‘मला समजलंय’ ही कथा अशा प्रसंगांमधलं गांभीर्य, वैय्यर्थता आणि दु:ख खूप तपशीलवार आणि नेमकेपणानं टिपते. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more