MANI BHAUMIK

About Author

Birth Date : 30/03/1931


BHOWMIK WAS BORN IN A SLUM IN TAMLUK VILLAGE IN MIDNAPORE, WEST BENGAL. HIS CHILDHOOD WAS SPENT FACING PROBLEMS LIKE CYCLONES, FLOODS, DROUGHT AND POVERTY. HE COMPLETED HIS EDUCATION IN MATERIALS SCIENCE FROM I.I.T., KHARAGPUR, WITH THE HELP OF A SCHOLARSHIP. FROM HERE PH.D. OBTAINED IN 1959, HE WENT TO THE UNIVERSITY OF CALIFORNIA, USA TO CONDUCT RESEARCH ON A SLOAN SCHOLARSHIP.

पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथल्या तामलुक खेड्यातील एका झोपडपट्टीत भौमिक यांचा जन्म झाला. चक्रीवादळे, महापूर, दुष्काळ व गरिबी आदी समस्यांना तोंड देत त्यांचे बालपण गेले. त्यांनी शिष्यवृत्तीच्या साहाय्याने आपले शिक्षण पूर्ण करत पदार्थविज्ञानात खरगपूर, आय.आय.टी. येथून पीएच.डी. मिळवली. १९५९मध्ये ते स्लोन शिष्यवृत्ती मिळवून अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात संशोधन करण्यास गेले. त्यांचे काम पाहून १९६८मध्ये नॉरथ्रॉप कॉर्पोरेट, रिसर्च लॅबोरेटरी या जगप्रसिद्ध संस्थेने त्यांना आपल्याकडे काम करण्यासाठी बोलावले. तिथे भौमिक यांनी संशोधनातून जगातील अत्यंत कार्यक्षम असे पहिले एक्सायमर लेसर किरण तयार करणारे यंत्र निर्माण केले. या लेसर किरणांच्या साहाय्याने माणसाच्या बुबुळाच्या वक्र पृष्ठभागाला पाहिजे तसा आकार देण्याची शस्त्रक्रिया त्यांनी शोधली. यामुळे डोळ्यांचा नंबर जाऊन चश्मा किंवा लेन्सेस यांशिवाय माणसाला अधिक स्वच्छ दिसू लागते. या क्रांतिकारी शस्त्रक्रियेला लॅसिक (LASIK) असे नाव पडले. यामुळे भौमिक यांचे नाव जगभरात प्रसिद्ध झाले. त्यांचे अनेक संशोधननिबंध प्रसिद्ध आहेत. क्वांटम पदार्थविज्ञान, विश्वरचनाशास्त्र यांमध्ये लागणारे अद्भुत शोध व त्यांचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम या विषयांत त्यांना रस आहे. त्यांनी क्वांटम नावाची एक मालिका तयार केली असून, ती सध्या लोकप्रिय होत आहे. बंगालमध्ये भौमिक यांनी भौमिक एज्युकेशनल फाउंडेशन स्थापन केले आहे. त्याद्वारे अत्यंत हुशार, पण गरीब विद्यार्थ्यांना दरवर्षी मदत केली जाते.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
PARMESHWAR EK SANKETIK NAV Rating Star
Add To Cart INR 250

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more