* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SASHACHE SINHAVALOKAN
  • Availability : Available
  • ISBN : 9788177668995
  • Edition : 2
  • Publishing Year : DECEMBER 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 96
  • Language : MARATHI
  • Category : LITERATURE
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-122 OOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
‘SASHACHE SINHAVALOKAN’ IS A OVERVIEW OF A MARATHI LITERARY LEGEND V.S.KHANDKAR’S LIFE. KHANDEKAR HAS DESCRIBED HIS LIFE STORY IN THE BOOK ‘EKA PANACHI KAHANI’ WHICH CONTAINS HIS LIFE SPAN FROM 1818 TO 1929 . AFTER THAT AUTHOR SUNILKUMAR LAWATE BROUGHT COLLECTION OF HIS AUTOBIOGRAPHICAL STORIES NAMED AS ‘PAHILI PAVALE’ & THIS IS THE THIRD PART OF KHANDEKAR’S AUTOBIOGRAPHICAL ESSAYS.
वि. स. खांडेकरांनी आपल्या जीवनात आत्मपर असं विपुल लेखन केलं. त्या लेखनात आत्मगौरवापेक्षा कंठलेल्या जीवनाची तटस्थ चिकित्सा आढळून येते. त्यामागे सिंहावलोकन करण्याची वृत्ती दिसते. हा आत्मपर लेखसंग्रह त्याचंच उदाहरण. मागं न पाहता सुसाट धावणारा ससा हरतो. सिंहावलोकन करणारी माणसं जीवन जिंकतात. जो साहित्यिक आपल्या जीवन व साहित्याची सुसंगती शोधत पुढे जातो, तोच समाजास पुढे नेऊ शकतो. हे समजावणारं ‘सशाचे सिंहावलोकन’ एकविसाव्या शतकातील गतिशील माणसांना नि साहित्यिकांना केवळ श्रद्धा नि सबुरी देत नाही तर जीवनाची सापेक्ष दृष्टीही देते!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #सशाचे सिंहावलोकन
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    सृजनात्मतेचा सहज आविष्कार!... ‘एका पानाची कहाणी’ हे वि. स. खांडेकर यांचं अधिकृत आत्मचरित्र या आत्मचरित्रांमध्ये जन्म ते विवाहपर्यंतचा कालावधी त्यांनी अंतर्भूत केलेला आहे. त्याचा उत्तरार्ध मात्र त्यांनी लिहिली नाही. मात्र आपल्या आयुष्यातील घटना-प्रसं-व्यक्तींवर त्यांनी प्रसंगानुसार लेखन केलेलं आहे. पण ते स्फूट स्वरूपात, अशा काही स्फूट लेखनांमधून खांडेकरांच्या साहित्यिक जीवनाविषयीचे लेखक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी संपादित करून पहिली पावलं या नावानं ते प्रकाशित केलं. त्यातून खांडेकरांची साहित्यिक म्हणून झालेली जडण-घडण स्पष्ट होते आणि आता डॉ. लवटे यांनी खांडेकरांच्या स्फूट लेखनांमधून त्यांच्या आयुष्यातील घटनांवर जे लेखन केलं. प्रामुख्यानं आत्मपर असं, ते ‘सशाचे सिंहावलोकन’ या नावानं त्यांनी संपादित केलंय. मेहता पब्लिशिंग हाऊस’ने प्रकाशित केलंय. वि. स. खांडेकर हे ध्येयवादी लेखक जीवनासाठी कला, की कलेसाठी कला या वाङ्मयीन वादात ‘जीवनासाठी कला’ या पक्षाचा ठामपणे पुरस्कार करणारे. त्यांनी आपलं सारं आयुष्य आणि लेखनही आदर्श. ध्येयवादी, तत्वशील जीवनाकरिता वेचलं. आदर्श समाज घडवण्यासाठी, पुढच्या पिढीला आदर्श देण्यासाठी म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक शिक्षकी पेशा पत्करला. आयुष्यभर तेच ध्येय डोळ्यांपुढे ठेवून इतर सारी प्रलोभनं त्यांनी तुच्छ मानली. जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक, आशावादी अन् आदर्शवादी, नि:स्वार्थी, निर्लेप आहे. त्याचा प्रत्यय ‘सशाचे सिंहावलोकल’ या त्यांच्या आत्मपर लेखसंग्रहातून येतो. आपल्या आयुष्याकडे ते त्रयस्थपणे पाहतात. मिश्लीकपणे आपली फजितीही ते सांगतात. आपल्या बालपणाविषयीही ते सांगतांना मुलांशी हितगुज केल्यासारखं, मनमोकळेपणानं बोलतात. कधी भावुकही होतात. त्यांच्या अनुभवातून येणारे विचार कधी सुभाषितात्मक, तर कधी अतिशयोक्तपूर्णही असतात. उदा. केवळ पश्चात्तापानं जसा कुणी संत होत नाही तसा केवळ मनाच्या टोचणीतून काही कुणी प्रतिभेचा स्पर्श लाभलेला साहित्यकार होऊ शकत नाही (पू ६०) किंवा वक्रोक्तिपर्ण सुभाषित, ‘पण सल्ला हा देण्याकरता असतो. घेण्याकरता नसतो, हे तर मानवी स्वभावाचं मुख्य सूत्र आहे’ (पृ ५५) किंवा ‘माणसांची खात्री आणि नियतीची इच्छा यांच्या संघर्षात नेहमी नियतीचाच विजय होतो’ (पृ २४) खांडेकरांच्या उपमादेखील त्यांच्या उच्च सृजनात्मकथेचा, प्रतिभेचा प्रत्यय देतात. उदा. भरून आलेल्या आभाळातही मध्येच कुठेतरी एखादी चांदणी लखलखत राहावी. त्याप्रमाणे माणसाच्या चांगुलपणावरली श्रद्धही त्यात डोकावत असते. (पृ ३४) ‘भेंडांचे लाकूड पाण्यात कितीही बुडवलं तरी हा सोडताच चटकन जसं वर येतं, तसं पुस्तकं बाजूला पडली की मन या विचारांच्या चित्रविचित्र सावल्यांच्या पाठशिवणीचा खेळ पाहत राही’ (पृ ६६) ‘शरीर भाकरीवर जगत असलं तरी त्याच्यातलं चैतन्य स्वप्नावर जगत असतं. माणसाची आत्मशक्ती जेवढी मोठी, तेवढी त्याची स्वप्नं अधिक भव्य’. (पृ ७१) ‘सशाचे सिंहावलोकन’मधील प्रत्येक लेख खांडेकरांच्या जीवननिष्ठेचा, तत्त्वांचा, आदर्शाचा द्योतक आहे. त्यांच्या उच्च प्रतिभेचा, सृजनात्मतेचा सहज आविष्कार आहे. त्यातून स्फटिकवत प्रामाणिकता, सहजता डोकावते. हे लेख आदर्श जीवनाचा धडा तर देतातच. पण त्यात प्रचारकी थाट नसतो. हितगुज केल्याप्रमाणे ते वाचकांशी संवाद साधतात. लेखनशैलीतील लीनता, मार्दव वाचकांवर अपेक्षित प्रभाव टाकते. प्रत्येक रसिक वाचकानं हे सिंहावलोकन जरूर वाचावं. डॉ. लवटे यांनी संपादनातून वाचकांसाठी महत्त्वाचं काम केलं. चंद्रमोहन कुलकर्णीच मुखपृष्ठ पुस्तकाच्या विषयाशी अनुकूल आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.