* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184981612
  • Edition : 4
  • Publishing Year : NOVEMBER 2008
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 262
  • Language : MARATHI
  • Category : LITERATURE
  • Available in Combos :VISHWAS PATIL COMBO SET - 10 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A VERY CREATIVE FORM OF LITERATURE HANDLED VERY CONFIDENTLY BY VISHWAS PATIL. HE HAS ATTEMPTED TO CAPTURE THE CLASS ONE PIECES OF ART, BOTH IN THE WORLD OF PAINTS AND WORDS. HE HAS TRIED TO INTERROGATE THE HOLLYWOOD AND THE BOLLYWOOD THOROUGHLY. WHILE DOING SO VERY BRAVELY AND BOLDLY HE HAS ATTEMPTED TO WALK OVER THE ROUTES OF ITALIAN, FRENCH, BRITISH LANDS. IN THIS WONDERFUL BOOK ALL THE BIG BUDDIES HAVE COME TO MEET YOU. THEY ARE FROM ALL OVER THE WORLD. MOST OF THE UNIVERSALLY FAMOUS PERSONALITIES LIKE SHAKESPEARE, TOLSTOY, JOHN FORD, DOSTOEVSKY, GARBO, SOPHIA LAWRENCE, THOMAS HARDY, SHARATCHANDRA, DAVID LEAN, MARLENE BRANDO, STANLEY KUBRICK, ROMAN POLANSKI, CHARLIE CHAPLIN, STEVEN SPIELBERG, MEHBOOB KHAN, KOPOLA, MADHUBALA, K. ASIF, INGRID BERGMAN, V. SHANTARAM ARE VISITING US THROUGH THIS BOOK.
वाऱ्यासोबत न वाहून गेलेली आणि वाऱ्यावर स्वार झालेली जगातील अव्वल चित्रशिल्पे आणि शब्दशिल्पे!हॉलीवूड-बॉलीवूडच्या अंतर्बाह्य दृष्टीक्षेपासह इटालियन, फ्रेंच , ब्रिटिश अशा अनेक अभिनव चाकोऱ्यांचा, विश्वास पाटील यांनी घेतलेला अभ्यासपूर्ण ललित धांडोळा.शेक्सपिअर, टॉलस्टॉय, जॉन फोर्ड, दोस्तायव्हस्की, गार्बो, सोफिया लॉरेन, थॉमस हार्डी, शरत्चंद्र, डेव्हिड लीन, मार्लन ब्रँडो, स्टॅन्ले क्युब्रिक, रोमन पोलन्स्की, चार्ली चॅप्लीन, स्टीव्हन स्पीलबर्ग, मेहबूब खान, कोपोला, मधुबाला, के. असिफ, इनग्रिड बर्गमन, व्ही. शांताराम असे अवघ्या विश्वाचे अनेक सगेसोयरे या शब्दांगणात तुमच्याशी हृद्गत करतील!
* कै.रा.तु.पाटील साहित्य पुरस्कार २००८ * आपटे वाचनमंदिर आणि इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्टतर्फे २००८ सालचा `विशेष लक्षणीय गद्य साहित्यकृती` पुरस्कार * महाराष्ट्र राज्य पुरस्कार-वि.द.घाटे पुरस्कार-२००८-२००९
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#28TH NOV #SAMBHAJI(1.SAHAKAR MAHARSHI SHANKARRAO MOHITE PATIL PURSKAR 2005 2.KAVI MADHAV PURSKAR 2006 3.AKSHARGANDH PURSKAR 2006 ) #NOT GONE WITH THE WIND #BANDA RUPAYA #KRANTISURYA #NAGKESHAR #संभाजी(१.सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील २.कवी माधव पुरस्कार २००६ ३.अक्षरगंध पुरस्कार २००६) #नॉट गॉन विथ द विंड #बंदा रुपया #क्रांतिसूर्य #नागकेशर
Customer Reviews
  • Rating Starनमिता नितीन आफळे

    एखाद्या लेखकाच्या लिखाणाचा कॅलिडोस्कोप कसा असावा, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे विश्वास पाटील @⁨Vishwas Patil⁩ !!! प्रस्तुत पुस्तकानं जेव्हा एका प्रदर्शनात माझ्या मनावर गारूड केलं तेव्हा खरंच प्रांजळ कबुली देते, फोटो आणि परिचय वाचेपर्यंत मला हे कोणीसमान नावाचे वेगळेच लेखक आहेत असं वाटलं होतं. (@⁨Vishwas Patil⁩ विश्वासदादा, मी तुमची माफी मागते यासाठी !!) 🎬 कट १ 🎬 चित्रपट हे प्रामुख्यानं मनोरंजनाचं साधन म्हणून ओळखले जातात. पण चित्रपट हे एखादी वाचलेली कादंबरी किंवा बघितलेलं नाटक या मूळ कलाकृतीवर आधारित असं माध्यमांतर केलेलं आविष्कारित रूप आहे, हे तितकंच खरं आहे. पण माध्यमात झालेल्या बदलामुळे कधी मूळ छापील पुस्तकावर इतके छान संस्कार किंवा बदल होतात की वाटावं, प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट !!! याउलट काही पुस्तकं वाचण्याचा आनंद माध्यमांतर झाल्यानंतरचं रूप पाहण्याहूनही कैक अधिक वाटतो. ललित कलेच्या रसग्रहणाच्या किंवा रसास्वादाच्या शिक्षणाला (हो, हेही शिकवलं जातं !!) आत्तापर्यंत तरी फार गांभीर्यानं घेतलं जात नसे त्यामुळेच जणू काही ते "आपोआपच येतं" असा गैरसमज होता. पण कोणत्याही कलाकृतीनं इतिहास घडवण्याआधी ती बऱ्याच मोठ्या भौगोलिक आणि ऐतिहासिक घटनांना सामोरी गेलेली असते. अशाच काही वैशिष्टय़पूर्ण अशा पुस्तक, चित्रपट, नाटकांचा एक अतिशय वाचनीय आणि माहितीपूर्ण खजिना म्हणजे हे पुस्तक. यात समान वर्गातल्या किंवा आधारित अशा वर्गतल्या परदेशी आणि भारतीय कलाकृतींची Facts and Figures पण कुठेही रंजकतेचा भडकपणा न होता माहिती दिली आहे. 🎬 कट २ 🎬 Gone with the Wind ची Margaret Michelle, Fyodor Dostoevsky, Ben Kingsley, Shakespeare चा Othello आणि आपले "झुंझारराव" तसंच "ओमकारा" किती एक से बढ़कर एक उदाहरणं घेऊन लिहिलंय, की हे पुस्तक कमालीचं झालंय. 🎬 कट ३ 🎬 विश्वासदादांनी कुठेही लिखाणाचा crisp किंवा रोचकता सोडलेली नाही. त्यामुळेच हे पुस्तक मी जेव्हा जेव्हा वाचते, मला एखादा भव्यदिव्य चित्रपट किंवा खुल्या सभागृहात चाललेला नाट्यप्रयोगच वाटतो. 🎬 कट ४ 🎬 यातला माझा सगळ्यात आवडता भाग आहे "चार्ली : द ग्रेट लाफ्टर डिक्टेटर." त्याचा पहिलाच परिच्छेद - "जेव्हा हिटलरसारखा महाभयंकर हुकूमशहा निम्म्या जगाच्या छाताडावर ऐसपैस बसला होता, उर्वरित विश्वालासुद्धा तो वाकुल्या दाखवू लागला होता, फ्रान्स, इंग्लंड आणि अमेरिकेसारख्या मित्रराष्ट्रांनी आपल्या तोफा हिटलर किंवा जर्मनीकडे वळवण्याचा विचारही केला नव्हता, एवढेच नव्हे तर पुढे सन १९४१ पर्यंत महायुद्धाला प्रारंभ होऊन दोन-अडीच वर्षे उलटल्यावरही अमेरिकेसारख्या बलदंड राष्ट्राने हिटलरची कळ काढायचे धाडस दाखवले नव्हते, तेव्हाची गोष्ट. मात्र काळाचा विलक्षण महिमा असा की, दुसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडण्यापूर्वीच हिटलर हे मानवजातीवरचे संकट आहे, याचा साक्षात्कार होऊन, एका कलावंताच्या मेंदूत हिटलरचे विडंबन करावयाचे बीजारोपण आधी झाले होते. त्या मानवतावादी जगप्रिय कलावंताचे नाव चार्ली चॅपलिन!" 🎬 कट ५ 🎬 "दर्यावर स्वारी - माॅबी डीक ते एम.टी. आयवा मारू" हेही असंच भन्नाट प्रकरण आहे. त्यात लेखक अनंत सामंत यांच्याबद्दल लिहिलेली माहिती, सगळंच भारी. 🎬 कट ६ 🎬 चित्रपट नाटक ही माध्यमं रूढार्थानं मनोरंजनात्मक मानली गेली असली तरी त्यामागे असणारं visualization, कित्येक कलांचा (यात कलादिग्दर्शन, कपडेपट, अगदी सगळ्या unit च्या पाळ्या सांभाळून चवी सांभाळणारा खानसामा, नुसती रंगरंगोटी नसणारी underestimated art of make-up designing हे सारेच) आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यातनं होणारी आर्थिक उलाढाल बघता it is a serious thing which one needs to take seriously !!! लेखकांच्याच भाषेत मी सांगू शकते..... "वाऱ्यासोबत न वाहून गेलेली आणि वाऱ्यावर स्वार झालेली जगातील अव्वल चित्रशिल्पे आणि शब्दशिल्पे ! हॉलीवूड-बॉलीवूडच्या अंतर्बाह्य दृष्टीक्षेपासह इटालियन, फ्रेंच, ब्रिटिश अशा अनेक अभिनव चाकोऱ्यांचा, विश्वास पाटील यांनी घेतलेला अभ्यासपूर्ण ललित धांडोळा." विश्वासदादा, "माणसं माझी : विठा ते विल्यम शेक्सपिअर" वाचल्यावर अशीच मी भारून जाईन !!! या छापील कलाकृतीसाठी मनापासून धन्यवाद. ता. क. - चंद्रमोहन कुलकर्णींची पुस्तकाला दिलेली जोड अक्षरशः अजोड आहे आणि असं हे राजेशाही पुस्तक छापल्याबद्दल प्रकाशक आदरणीय सुनीलदादा मेहता आणि मेहता पब्लिशिंग हाऊसला मनापासून धन्यवाद !!! ...Read more

  • Rating StarAjinkya Kulkarni

    हाॅलीवुडच्या `आर्ट फिल्म` १९४२ पासुनच्या पहायची सवय असेल आणि जागतिक साहित्य वाचलेले असेल तर प्रचंड आनंद देतं हे पुस्तक.

  • Rating StarMadhavi Kulkarni

    अतिशय माहितीपूर्ण व वाचनीय.

  • Rating Starकिरण माने

    अतिशय कल्पक आणि ओघवत्या भाषेत जगभरातील सुंदर सिनेमे आणि पुस्तकांचा अतिशय छान आढावा घेतलाय.

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more