* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DONGRI TO DUBAI
  • Availability : Available
  • Translators : ASHOK PADHYE
  • ISBN : 9788184984491
  • Edition : 10
  • Publishing Year : JANUARY 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 440
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DONGRI TO DUBAI: SIX DECADES OF THE MUMBAI MAFIA, PUBLISHED IN 2012, IS A NON-FICTION BOOK ABOUT NOTORIOUS GANGSTERS AND ALSO CONTAINS A COMPREHENSIVE COVERAGE OF DAWOOD IBRAHIM’S LIFE. THIS IS THE FIRST BOOK THAT PRESENTS THE HISTORY OF THE MUMBAI MAFIA, AND DETAILS THE LIVES OF KARIM LALA, CHHOTA RAJAN, HAJI MASTAN, ABU SALEM, AND VARADARAJAN MUDALIAR. THE MAIN PART OF THE BOOK REVOLVES AROUND DAWOOD IBRAHIM AND DESCRIBES HIS STORY STARTING FROM A YOUNG AGE AS A BOY IN MUMBAI TO THE INTERNATIONAL TERRORIST HE HAS BECOME TODAY. THIS BOOK TRACES THE JOURNEY OF A BOY FROM DONGRI TO DUBAI. DAWOOD IBRAHIM KASKAR WAS BORN IN 1955 TO A POLICEMAN. THE AUTHOR DESCRIBES DAWOOD’S FIRST ROBBERY, HIS LOVE AFFAIRS DURING HIS YOUTH, AND HOW HE TURNED INTO A LOCAL GOON. THE POLICE USED TO USE HIM AGAINST VARIOUS PATHAN GANGSTERS. GRADUALLY, HE MANAGED TO DESTROY THE COMPETITION, FORMED THE DAWOOD GANG, AND ENDED UP BEING THE MUMBAI POLICE’S ARCH NEMESIS. THE DON IS AN ALLY OF PAKISTAN’S ISI, THOUGH HE IS NOT AN ISLAMIC FUNDAMENTALIST. ZAIDI ANALYSES THAT THIS ALLIANCE WAS BORN OUT OF NECESSITY. PAKISTAN IS SAID TO SHELTER HIM THOUGH HE IS ONE OF THE MOST WANTED PEOPLE ON THIS PLANET, AND IN RETURN HE FUNDS ISLAMIC JIHADS. INTERESTINGLY, DAWOOD’S BIGGEST SOURCE OF INCOME IN PAKISTAN COMES FROM SELLING PIRATED BOLLYWOOD MOVIES. THE PERSONALITY AND CHARACTERISTICS OF DAWOOD IBRAHIM HAVE BEEN COVERED WELL IN THIS BOOK. HIS LUST FOR POWER, HIS FOCUS, HIS SHREWDNESS, AND HIS CALCULATING MIND HAVE BEEN CAPTURED BEAUTIFULLY. DONGRI TO DUBAI: SIX DECADES OF THE MUMBAI MAFIA COVERS THE PEOPLE BEHIND THE MAJOR CRIMES IN INDIA. METICULOUSLY RESEARCHED, THIS BOOK ALSO HAS INTELLIGENT ANALYSIS ALONG WITH THE FACTS. DAWOOD IBRAHIM’S RISE FROM A LOCAL TO AN INTERNATIONAL GANGSTER IS SURE TO KEEP READERS HOOKED. THE NEW MOVIE, SHOOTOUT AT WADALA, IS BASED ON THIS BOOK.
मुंबईवर ६० वर्षे आपला प्रभाव पाडणारे गुंडाच्या टोळ्यांचे डॉन होते. त्यात हाजी मस्तान, करीम लाला, वरदराजन मुदलियार, छोटा राजन, अबू सालेम हे होते. पण या सर्वांवर कडी केली ती दाऊदने. या सर्वांची तपशीलवार माहिती काढून अभ्यासपूर्वक त्यांच्यावर लिहिलेले हे पहिलेच पुस्तक आहे. एका साध्या शाळकरी पोरापासून टोळीच्या दादापर्यंत दाऊदची उत्क्रांती कशी होत गेली, दाऊदने पोलिसांचा उपयोग करून आपल्या प्रतिस्पध्र्यांना कसे निपटले आणि शेवटी तो मुंबई पोलिसांचा एकमेव सूडकरी कसा बनला, याचे वर्णन यात आहे. हे पुस्तक म्हणजे मुंबईतील गुन्हेगारीचा एक अधिकृत इतिहास आहे. एका पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा दाऊद याने पठाणांच्या टोळीला कसे निपटले, पहिली सुपारी कशी दिली गेली व शेवटी दुबईतून दाऊद कसा पाकिस्तानात पळून गेला, याचे थरारक वर्णन पुस्तकात आले आहे. पत्रकार एस. हुसेन झैदी यांनी कमालीच्या बारकाईने हा सर्व इतिहास शोधून पुस्तकात आणला आहे. त्यांची ‘ब्लॅक फ्रायडे’ व ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ ही अन्य गाजलेली पुस्तके आहेत. त्यांच्या अन्य पुस्तकावर जसे चित्रपट निर्माण झाले तसाच चित्रपट याही पुस्तकावर तयार होत आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #S.HUSSAIN ZAIDI #ASHOKPADHYE #MUMBAIVARILHALLA #DONGARITEDUBAI
Customer Reviews
  • Rating StarGopal Khatokar

    डोंगरी ते दुबई : मुंबईतील गुन्हेगारी जगतावरील महत्वाचे पुस्तक मुख्यत्वेकरून कुप्रसिद्ध गुन्हेगारी जगतातील " डॉन " समजल्या जाणाऱ्या दाऊद इब्राहिम (कासकर) ची गुन्हेगारी विश्वातील वाटचाल यात अधोरेखित केले आहे. यातून निर्माण झालेल्या टोळ्या व त्यां्यातील टोळीयुद्ध मोडीत काढण्यासाठी मुंबई के पोलिसांनी केलेले प्रयत्न व केलेली एन्काऊंटरस. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून पूर्वीपासूनच प्रसिद्ध असून सर्वाधिक रोजगार देणार, स्वप्नपूर्ती करणारे शहर म्हणून नावाजलेलं होते व आजही आहे. या ठिकाणचा समुद्र किनारा, माझगाव डॉक येथील मोठे आयात बंदर व त्यामुळे संपूर्ण जगातून येथे होणारी आयात-निर्यात त्यातून मिळणारे मोठे उत्पन्न, गिरणी कारखान्याची निर्मिती यामुळे रोजगाराला मिळालेली चालना या कारणामुळे देशातील उत्तरे व दक्षिणेकडून कामाच्या शोधात आलेल्या कामगारांचा लोंढा. नंतर गिरणी कामगार संपामुळे वाढलेली तरुण बेरोजगारी. मुंबईतील उच्चभ्रू वर्ग त्यांचं अलिशान राहणीमान मुंबईतील झगमगाट याला मोहुन अनेक तरुण झटपट श्रीमंत होण्यासाठी गुन्हेगारी जगताकडे त्यांचं झालेलं स्थलांतर तस्करी, मटका,जुगार, दारूचे गुत्ते, लुटालूट, खंडणी, खून इत्यादी मार्गे मुंबईत सुर झालेली गुन्ह्यांची सुरुवात. यातून निर्माण झालेल्या गुंडांच्या टोळ्या, त्यानंतर ची रक्तरंजित टोळीयुद्ध, दाऊदची " डी " कंपनी अरुण गवळीची "BRA" कंपनी. दाऊद ची अंडरवर्ल्डमधील वाटचाल त्याला येऊन मिळालेले गुंड व त्यांच्या टोळ्या, इलेक्ट्रॉनिक वस्तू व सोन्याची त्याने केलेली तस्करी. नंतर दाऊदचे दुबई मध्ये झालेले पलायन, दाऊद या गुंड, तस्कराचे नंतर झालेले जागतिक हिटलिस्ट वरील दहशत वाद्यात रूपांतर. दाऊद चे बॉलीवूड व क्रिकेट जगताशी सोबत असलेले संबंध.यातून निर्माण झालेली दाऊदची प्रेमप्रकरणे इत्यादी. हुसेन झैदी यांचे लिखाण शैली ही वाचकाला खिळवून ठेवते. त्यांनी अनेक वर्ष क्राईम रिपोर्टर म्हणून विविध वृत्तपत्रात केलेलं काम. गुन्हेगारी जगतातील बारकावे यांचे त्यांनी केलेले वर्णन या पुस्तकाला एक उंचीवर नेऊन ठेवत. याच बरोबर. एक शहर म्हणून मुंबईची झालेली डेव्हलपमेंट, बांधकामे, तेथील निर्माण झालेली उपनगरे, रोजगार निर्मिती या निमित्ताने आलेले लोक व शहराची भरभराट याचा पूर्ण लेखाजोखा यातून मिळतो. अंडरवर्ल्ड ( छुपे जगत) ची वास्तविक प्रकारची माहिती, त्यांच्याशी असलेले राजकारणी, बॉलीवूड क्षेत्राचे, पोलिसी संबंध सामान्य वाचकाला नक्कीच हेलावून टाकते. ...Read more

  • Rating StarShekar Gawale

    पुस्तक जरा वेगळ्या विषयावरचं आहे.पण मुंबईतल्या माफियांचा साठ वर्षांचा इतिहास झैदींनी चांगल्या प्रकारे मांडलाय.वाचतांना मन भुतकाळात जातं एवढं मात्र नक्की..!!जरूर वाचा,पण शेवटी व्यक्ती तितक्या प्रकृती.कोणाला आवडेल,कोणाला नाही... " पसंद अपनी अपनी "

  • Rating StarRanjeet Waghmare

    तस्करी, गोळीबार, खंडणी, एन्काऊंटर आणि बरंच काही... -------- मुंबईच्या डोंगरी भागातील एका पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा, पोलिसांचा वापर करून मुंबईत दादागिरी करतो. मुंबई पोलिसांच्या सहकार्याने कैक दोन नंबर धंदे, अनेक वस्तूंची तस्करी करतो. मुंबई पोलिसांकरव (एन्काऊंटर च्या माध्यमातून) विरोधकांना संपवतो. पुढे मुंबईत बॉम्बस्फोट अन मुंबईतून दुबईला पलायन, पाकिस्तानात आश्रय आणि शेवटी मुंबई पोलीसच त्याच्या मागावर. असा थक्क करणारा प्रवास म्हणजे लेखक एस. हुसैन झैदी यांचं `डोंगरी टू दुबई` हे दाऊद वरील पुस्तक. या पुस्तकामध्ये `दाऊद`ला डॉन करण्यापर्यंत छोटा राजन, छोटा शकील व त्याचे मित्र, मद्रासी गुंडांच्या व पठाणांच्या टोळ्या, दाऊद-गवळी यांच्या गॅंग मधील टोकाची दुश्मनी, हाजी मस्तानची दहशत, 1960 साली दारूच्या धंद्यातून वर्षाला 12 कोटी रुपये कमावणारा वरदराजन, तर बाबू रेशीम, रमा नाईक आणि अरुण गवळी यांची BRA ही टोळी. मन्या सुर्वे, करीम लाला अशा अनेक गुंडांच्या टोळ्यांमध्ये कधी दोस्ती तर जास्त करून दुश्मनी. विरोधकांवर गोळीबार, खून हे नित्याचेच. `खून का बदला खून` हे सूत्र ठरलेले. कहर म्हणजे भर दिवसा हायकोर्ट व तुरुंगात जाऊन विरोधकांवर गोळीबार करून बदला घेणे. तर वेळप्रसंगी स्वतःचा बचाव करण्यासाठी काही गुंडांचे देशो-देशी पलायन. खंडणीसाठी उद्योजक, बिल्डर, बॉलिवूडकरांना धमक्या, अपहरण. वेळप्रसंगी खून हे या जगातील उठाठेवी. या सर्वांचा निपटारा व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून एखाद्या गुंडाचा नियोजित पद्धतीने एन्काऊंटर करणे (थोडक्यात पोलिसांकडूनही खुनच) असे हे `याच जगातील वेगळे जग` `डोंगरी ते दुबई` या पुस्तकात डोकावल्यास समजू शकते. एका वेगळ्या व फिल्मी स्टाईल परंतु सत्य अशा जगाचा प्रत्यय आपणास या पुस्तकातून येतो. सर्वकाही ईथे सांगणे योग्य नाही, बाकी वाचनाची आवड असणाऱ्यांनी हे पुस्तक नक्की वाचून बघावे. ...Read more

  • Rating StarVaibhav Kumbhar

    मुंबई मिरोर ,इंडियन एकस्प्रेस अशा कित्येक नामवंत वृत्तपत्रांमध्ये काम केलेल्या एका पत्रकाराने लिहिलेले हे पुस्तक मुंबईच्या टोळीयुद्धाची कथा सांगते. १९५०-६० च्या दशकातील करीम लाला, हाजी मस्तान, वरद राजन यांच्यापासून सुरू होऊन २००९ - १० पर्यंत च्या गु्हेगारी जगतातील घटना हे पुस्तक अत्यंत उत्कंठावर्धक पद्ध्तीने रंगवते.. पुस्तकातील बहुतांश भाग हा दाउद इब्राहिम वर केंद्रित आहे. पुस्तकामध्ये कुठेही लेखकाने कोणत्याही गुन्हेगाराचे उदात्तीकरण केल्यासारखे जाणवत नाही हे विशेष. भारताच्या आर्थिक राजधानी ची दुसरी रक्तरंजित काळी बाजू जाणून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचावे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

PRATIKSHA
PRATIKSHA by RANJEET DESAI Rating Star
Mahesh Muley

अतिशय सुंदर पुस्तक, आयुष्य जगताना खूप काही हरवले आहे वाटते पण हे पुस्तक नव्याने जगायला आणि आहे ती परिस्थिती स्वीकारायला वाटा शोधायला नवीन प्रेरणा देते, सध्या समाजाची स्थिती बदलली असताना स्त्रियांना आणि त्यांच्या भावनांचा विचार करण्यासाठी नैतिकता जागेकरण्याला हे रणजीत देसाई लिखित पुस्तक खूपच महत्त्वाचे ठरेल... ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
विजय भास्कर, अमरावती

*दुर्दम्य : दहा कोटीत एक असा अजब ऑफिसर* *प्रामाणिकपणाचा दर्प, माणुसकीचा स्पर्श आणि एकाकी आयुष्याची कहाणी. काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, आपल्या कामाचा आणि जगण्याचा ठसा उमटवतात; पण त्यांना एका शब्दात चांगलं किंवा वाईट ठरवणं कठीण अतं. त्यांच्या स्वभावातील विरोधाभासच त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात. ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे जी. बी. देशमुख यांचं पुस्तक अशाच एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतं. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात सुमारे पंचवीस वर्षे सहकारी म्हणून अनुभवलेले सी. व्ही. कृष्णन एकनाथानन, म्हणजेच एकनाथन, यांचं व्यक्तिचित्र लेखकाने कोणताही कृत्रिम मुलामा न देता रेखाटलं आहे. त्यांच्या कठोर शिस्तीमागची तत्त्वनिष्ठा, विचित्र वाटणाऱ्या सवयींमागची भूमिका आणि एकाकीपणाच्या आड दडलेली माणुसकी उलगडत जाते. त्यामुळे हे केवळ एका अधिकाऱ्याचं चरित्र राहत नाही; ते माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न ठरतं. *पहिली भेट : हात मागे घेतला!* ४ जुलै १९८८. चंद्रपूरहून अमरावतीला बदली होऊन आलेल्या लेखकाची एकनाथन यांच्याशी पहिली भेट. उंच, धिप्पाड आणि गंभीर व्यक्तिमत्त्वाच्या या अधिकाऱ्यांसमोर लेखकाने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत एवढंच म्हटलं— “So you are reporting today. Okay.” या कोरड्या प्रतिसादातून त्यांच्या स्वभावाची पहिली झलक दिसते. मात्र, पुढे लेखकाने दिलेल्या टंकलेखनाच्या कामाची अचूकता पाहून आणि तो मेजर पी. के. बापट यांच्याकडे काम करून आल्याचं समजल्यावर एकनाथन म्हणाले— “Only a military man can carve out such workers. I am impressed.” कडक शिस्तीचा आग्रह धरणारा हा अधिकारी गुणवत्तेची दखल घ्यायलाही तितकाच तत्पर होता. पहिल्या भेटीत हात मागे घेणारा माणूस कामातील गुणवत्तेसमोर मात्र मनमोकळेपणाने दाद देतो. इथूनच या व्यक्तिमत्त्वातील विरोधाभासांची रंजक ओळख सुरू होते. *दोन रुपये चाळीस पैशांतून दिसलेलं तत्त्वज्ञान* एका व्यापाऱ्याकडून चुकून दोन रुपये चाळीस पैसे जास्त घेतले गेल्याचं लक्षात आल्यानंतर एकनाथन यांनी ती रक्कम परत करण्यासाठी स्वतःचे शंभर रुपये खर्च करून माणूस पाठवला. रक्कम छोटी होती; पण हिशेबातील तत्त्व मोठं होतं. त्यांच्या दृष्टीने पैशाची किंमत त्याच्या रकमेवर नव्हे, तर तो योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याच्या प्रामाणिकपणावर ठरत होती. नियम पाळताना ते कोणतीही तडजोड करत नसत. मात्र, कर्मचाऱ्याचा न्याय्य लाभ असेल, तर त्याला मंजुरी देण्यासही ते मागेपुढे पाहत नसत. नियमभंग करणाऱ्यांसाठी कठोर आणि हक्कासाठी पात्र असणाऱ्यांसाठी तत्पर, ही त्यांच्या कार्यपद्धतीची दोन टोकं होती. त्यांची वक्तशीरपणाची कल्पनाही विलक्षण होती. उशिरा येणं चुकीचं; पण वेळेच्या खूप आधी येणंसुद्धा शिस्तीच्या चौकटीबाहेरचं! “Before time is also not the right time.” या भूमिकेतून त्यांच्या नियमप्रियतेचा अतिरेक जाणवतो; पण त्याच वेळी प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःची एक काटेकोर चौकट असणारा माणूसही दिसतो. *शिस्तीच्या पोलादी चौकटीमागचा माणूस* एकनाथन यांची शिस्त कधी कधी इतरांना विक्षिप्तपणाच्या जवळ जाणारी वाटे. स्फोटक कारखान्यातील सुरक्षानियमांचं काटेकोर पालन असो किंवा बंदुकीच्या हाताळणीतील खबरदारी, नियम म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नव्हेत, अशी त्यांची धारणा होती. पण या कठोरतेला दुसरी बाजूही होती. कार्यालयातील शिपाई पत्नी-मुलांसह त्यांच्या वातानुकूलित दालनात झोपलेला आढळला. अशा वेळी कारवाई होईल, अशी अपेक्षा असताना एकनाथन यांनी त्याला विचारलं, “तुम हमारे चेंबर मे सोता?” या प्रश्नात नियम मोडल्याची जाणीव होतीच; पण त्याहून आधी दुसऱ्या माणसाच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यांच्या स्वभावातली ही माणुसकी मोठ्या भाषणांतून नव्हे, तर अशा छोट्या प्रसंगांतून व्यक्त होते. म्हणूनच त्यांचं व्यक्तिचित्र एकरेषीय होत नाही. *एकटेपणाचा स्वीकार की त्याची किंमत?* एकनाथन यांनी अविवाहित राहणं, मोजक्याच वस्तूंमध्ये आयुष्य घालवणं, दूरचित्रवाणी-रेडिओपासून दूर राहणं आणि सामाजिक समारंभ टाळणं पसंत केलं. स्वतःच्या अवकाशाबाबत ते अत्यंत आग्रही होते. नातेसंबंधांच्या गर्दीपेक्षा एकांत त्यांना अधिक जवळचा वाटत होता. मात्र, आयुष्याच्या उत्तरार्धात आजारपणाने त्यांची शारीरिक स्वायत्तता हिरावून घेण्यास सुरुवात केली. कर्करोगावरील उपचारांसाठी केरळला गेल्यानंतर भावाच्या घरी राहणंही त्यांना अवघड वाटलं. आपल्यामुळे भावाच्या कुटुंबाला गैरसोय होऊ नये, या विचाराने त्यांनी हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमान आणि स्वावलंबन यांची ही भूमिका समजण्यासारखी असली, तरी तिची किंमत एकटेपणाच्या रूपाने मोजावी लागते. लेखकाने दिलेल्या वडिलांच्या जुन्या पलंगावर अखेरच्या काळात त्यांना आधार मिळाला, हा तपशील मनाला स्पर्शून जातो. आयुष्यभर व्यवहारात काटेकोर राहिलेल्या एकनाथन यांनी त्या पलंगाचा स्वीकार केला. काही नाती शब्दांनी नव्हे, तर अशा साध्या कृतींनी व्यक्त होतात. २०१९ मध्ये मोठ्या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी लेखकाला म्हटलं— “Is this life, Deshmukh? I have to struggle for reaching even upto toilet.” आणि त्यानंतरची त्यांची विनंती अधिक बोलकी होती— “Try to come more frequently. I know it is a long distance. But I need to talk to someone like you with whom I can interact.” जगापासून अंतर राखणाऱ्या माणसालाही अखेरीस संवादाची गरज भासते. दुसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालं. आयुष्यभर स्वावलंबनाचा आग्रह धरणाऱ्या या माणसाच्या शेवटच्या शब्दांत मात्र सोबत हवी असल्याची साधी, मानवी ओढ होती. *दहा कोटीत एक हीच खरी ओळख* एकनाथन यांच्यात दोष नव्हते, असं लेखक सांगत नाही. त्यांच्या कठोरतेचा अतिरेक, सामाजिक अलिप्तता आणि विचित्र वाटणाऱ्या सवयी लपवण्याचाही प्रयत्न करत नाही. यामुळेच हे व्यक्तिचित्र अधिक विश्वासार्ह बनतं. एखाद्या माणसाचं मोठेपण सिद्ध करण्यासाठी त्याला निर्दोष ठरवण्याची गरज नसते. निवृत्तीपूर्वी एकनाथन यांनी लेखकाला विचारलं होतं, आपण गेल्यानंतर लोक आपल्याला चांगलं म्हणतील की वाईट? त्यावर लेखकाने दिलेलं उत्तर या पुस्तकाच्या शीर्षकाचा अर्थ उलगडतं— “I won`t tell people as to whether he was a good man or bad man, but whenever such reference comes I would certainly say that he was a man one in ten crore!” ‘दहा कोटीत एक’ ही उपाधी म्हणजे एखाद्या माणसाला देवत्व देणं नव्हे. ती त्याच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची, तत्त्वांशी असलेल्या निष्ठेची आणि सहज वर्गीकरणात न मावणाऱ्या स्वभावाची नोंद आहे. एकनाथन यांचं व्यक्तिमत्त्व समजून घेताना ‘अंतरंगीचे आभाळ : एक काव्यवर्तुळ’ या काव्य संग्रहातील ‘माणसातले सुंदर गुण’ ही कविता आठवते. “संकट येता कुणाचा हात पुढे सरतो; नाव न विचारता माणूस माणसाला धरतो.” एकनाथन यांच्या आजारपणात लेखकाने केलेली मदत आणि चंदूभाऊ पवार यांनी दाखवलेली माणुसकी या ओळींना जगण्याचा संदर्भ देतात. माणुसकी नेहमी गोड शब्दांतूनच व्यक्त होते असं नाही. कधी ती एखाद्याच्या हक्कासाठी ठामपणे उभी राहते, कधी चुकीच्या गोष्टीला विरोध करते, तर कधी आजारी माणसाच्या एकटेपणात त्याला संवादाची सोबत देते. एकनाथन यांच्यातील गुण आणि मर्यादा दोन्ही समजून घेताना ही कविता माणसाकडे पाहण्याची एक खिडकी उघडते. कारण माणसातले सुंदर गुण गाजावाजा करून येत नाहीत; ते एखाद्या कृतीतून, एखाद्या स्पर्शातून किंवा दुसऱ्याच्या दुःखापाशी थांबण्यातून प्रकट होतात. कवितेच्या शेवटच्या ओळींत म्हटल्याप्रमाणे— “माणूस जपता माणूस— अंतरी उघडे आभाळ.” कदाचित एकनाथन यांच्या आयुष्याकडे पाहण्याची हीच एक दृष्टी असू शकते. त्यांच्या सगळ्या स्वभाववैशिष्ट्यांशी सहमत न होताही त्यांच्यातील माणूस समजून घेणं, हीच या पुस्तकाची आणि त्यातून मिळणाऱ्या अनुभवाची खरी कमाई आहे. जी. बी. देशमुख यांनी आठवणींच्या आधारे उभं केलेलं हे व्यक्तिचित्र वाचकाला एका प्रश्नासमोर उभं करतं—माणसाला त्याच्या गुणदोषांच्या बेरजेतून समजून घ्यायचं, की त्याच्या संपूर्ण जगण्याच्या संदर्भात? ‘दुर्दम्य’ हे पुस्तक एका अजब अधिकाऱ्याची गजब गोष्ट सांगतं; पण त्याचबरोबर शिस्त, स्वाभिमान, माणुसकी आणि एकटेपणा यांच्या सीमारेषांवरही विचार करायला लावतं. काही माणसं आपल्याला आवडतात म्हणून लक्षात राहत नाहीत; ती आपल्याला विचार करायला भाग पाडतात म्हणून लक्षात राहतात. एकनाथन हे त्यापैकीच एक. माणसाला समजून घेण्याची, त्याच्या गुणदोषांसह त्याच्याकडे पाहण्याची आणि माणुसकीच्या अर्थाचा नव्याने शोध घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे पुस्तक अवश्य वाचावं. कारण काही पुस्तकं केवळ एका व्यक्तीची ओळख करून देत नाहीत; ती आपल्याला माणसांकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात. हे पुस्तक त्यापैकीच एक. ..... विजय भास्कर , अमरावती ...Read more